Difference between revisions of "LibreOffice-Suite-Impress/C2/Inserting-Pictures-and-Objects/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
{| style="border-spacing:0;"
+
{| border = 1
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 +
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:00  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:00  
Line 461: Line 462:
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 10:05
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 10:05
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
 
|}
 
|}

Latest revision as of 09:41, 21 April 2017

Time Narration
00:00 इम्प्रेसच्या 'Inserting Pictures and Objects' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 यात आपण शिकू, प्रेझेंटेशनमध्ये Pictures आणि Objects समाविष्ट करणे.
00:12 पिक्चर आणि ऑब्जेक्ट फॉरमॅट करणे.
00:15 हायपरलिंक तयार करणे आणि टेबल समाविष्ट करणे.
00:20 येथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00:29 दिसत असलेली URL ब्राऊझरच्या Address Bar मध्ये टाईप करा.
00:34 तुम्हाला स्क्रीनवर इमेज आलेली दिसेल.
00:37 इमेजवर राईट क्लिक करून 'Save Image as' निवडा.
00:41 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
00:43 Name या फिल्डमध्ये 'Open Source-bart.png' असे पहिल्यापासून दिसत आहे.
00:51 'Desktop' लोकेशन निवडून 'Save' बटणावर क्लिक करा.
00:59 आपण पूर्वी सेव्ह केलेले 'Sample Impress' प्रेझेंटेशन उघडू या.
01:04 आता मध्ये पिक्चर समाविष्ट करायचे पाहु.
01:09 मेन मेनूवरील 'Insert' वर क्लिक करून नंतर 'Picture' क्लिक करा.
01:14 आता 'From File' या पर्यायावर क्लिक करा.
01:17 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
01:19 जेथून पिक्चर घ्यायचा आहे तो फोल्डर निवडा
01:23 आपण 'Desktop' हा फोल्डर निवडू या.
01:26 जे पिक्चर समाविष्ट करायचे आहे ते निवडून 'Open' क्लिक करा.
01:31 स्लाईडमध्ये पिक्चर समाविष्ट झाले आहे.
01:35 केलेले बदल undo करू.
01:37 पिक्चर समाविष्ट करण्याची दुसरी पध्दत जाणून घेऊ या.
01:41 'Overview' शीर्षक असलेल्या स्लाईड नंतर प्रथम 'Insert' आणि पाठोपाठ 'Slide' वर क्लिक करून नवीन स्लाईड समाविष्ट करा.
01:50 'Title' टेक्स्टबॉक्सवर क्लिक करा. आणि 'OpenSource Funny' शीर्षक द्या.
01:56 स्क्रीनच्या मध्यभागी एका छोट्या चौकटीत तुम्हाला चार आयकॉन दिसतील. यांस Insert Toolbar म्हणतात.
02:03 Insert Toolbar मधील Insert picture आयकॉनवर क्लिक करा.
02:08 Picture ची फाईल निवडून Open बटणावर क्लिक करा.
02:12 तुम्हाला दिसेल की आलेल्या चित्राने संपूर्ण स्लाईड व्यापलेली आहे.
02:17 चित्राचा आकार बदलण्यासाठी त्या चित्रावर क्लिक करून त्याच्यावर उमटलेले Control points हलवा.
02:27 याच प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये charts आणि movie-clips टाकता येतील.
02:35 हे सर्व तुम्ही करून पहा.
02:38 आता हायपरलिंक करणे शिकूया.
02:41 हायपरलिंक मुळे एका स्लाईडवरून दुसरीकडे सहज जाता येते; तसेच वेब पेज किंवा डॉक्युमेंट उघडता येते.
02:49 प्रथम आपण प्रेझेंटेशनमध्ये Hyperlink बनविणे पहुया.
02:54 'Overview' शीर्षक असलेल्या स्लाईड नंतर नवीन स्लाईड समाविष्ट करा.
03:02 'Title' वर क्लिक करून 'Table of content' टाईप करा.
03:07 बॉडी टेक्स्टवर क्लिक करून पुढील शीर्षकांची यादी टाईप करा.
03:13 'OpenSource funny', 'The present situation', 'Development up to present', 'Potential alternatives', Recommendation'.
03:24 'Development up to present' टेक्स्ट सिलेक्ट करा.
03:28 'Insert' वर क्लिक करून 'Hyperlink' वर क्लिक करा.
03:31 'Hyperlink' नामक डायलॉग बॉक्स उघडेल.
03:34 डावीकडे 'Document' हा आयकॉन सिलेक्ट करा. 'Target in document' या फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या बटणावर क्लिक करा.
03:48 प्रेझेंटेशन मध्ये उपस्थित असलेल्या स्लाईड्सची सूची उघडेल.
03:53 सूची मधून 'Development up to present' ही स्लाईड सिलेक्ट करा.
03:58 या सूचीमधील 'Apply' बटणावर क्लिक करून 'Close' या बटणावर क्लिक करा.
04:04 'Hyperlink' डायलॉगबॉक्समध्ये पुन्हा 'Apply' बटणावर क्लिक करून नंतर 'Close' बटणावर क्लिक करा.
04:12 स्लाईडमध्ये आता कोठेही क्लिक करा.
04:14 आता, त्या टेक्स्टवर कर्सर न्हेताच कर्सर, हाताच्या पंजात बदलेल.
04:20 याचा अर्थ हायपरलिंक यशस्वीरित्या तयार झाली आहे.
04:24 'Hyperlink' वर क्लिक केल्या केल्यास ती तुम्हाला संबंधित स्लाईडवर घेऊन जाईल.
04:29 'Table of content' शीर्षक असलेल्या स्लाईडवर जा.
04:35 त्यात 'External document' ही ओळ समाविष्ट करा.
04:40 हे टेक्स्ट सिलेक्ट करून 'Insert' क्लिक करा. 'Hyperlink' निवडा.
04:45 डाव्या pane मधील 'document' हा आयकॉन सिलेक्ट करा.
04:48 डॉक्युमेटमधील 'path' फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या फोल्डरच्या आयकॉनवर क्लिक करा.
04:55 हायपरलिंक करायाचे डॉक्युमेंट निवडा.
04:58 आपण रायटरच्या ट्युटोरियलमध्ये बनवलेली resume.odt ही फाईल निवडून 'Open' या बटणावर क्लिक करू.
05:07 हायपरलिंक डायलॉग बॉक्समधील 'Apply' बटणावर क्लिक करून नंतर 'Close' या बटणावर क्लिक करा.
05:14 स्लाईडवर कुठेही क्लिक करा.
05:17 आता टेक्स्टवर कर्सर न्हेताच, कर्सर हाताच्या पंजात बदलेल.
05:22 याचा अर्थ आपण हायपरलिंक बनवण्यात यशस्वी झालो आहोत.
05:26 हायपरलिंक्ड टेक्स्ट क्लिक केल्यास तुम्ही संबंधित डॉक्युमेंटवर जाल.
05:31 ही क्रिया 'resume.odt' ही फाईल उघडून देईल.
05:36 याप्रमाणे आपण वेबपेजला हायपरलिंक करू शकतो.
05:40 प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाईड समाविष्ट करा.
05:43 त्याचे शीर्षक बदलून 'Essential open source software' असे करा.
05:48 बॉडीच्या टेक्स्ट बॉक्समध्ये 'Ubuntu Libre Office' टाईप करा.
05:53 मजकूराची दुसरी ओळ निवडा. आधी 'Insert' वर क्लिक करून नंतर 'Hyperlink' वर क्लिक करा.
06:00 डाव्या pane मधील 'Internet' पर्याय निवडा.
06:03 Hyperlink type मध्ये 'Web' निवडा.
06:07 Target field मध्ये ‘www.libreoffice.org’ टाईप करा.
06:16 Hyperlink dialog box मध्ये 'Apply' नंतर 'Close' बटणावर क्लिक करा.
06:23 स्लाईडवर कुठेही क्लिक करा.
06:26 आता जेव्हा आपण ह्या टेक्स्टवर कर्सर नेऊ तेव्हा कर्सर हाताच्या पंजात बदलेल.
06:32 याचा अर्थ आपण हायपरलिंक बनवण्यात यशस्वी झालो आहोत.
06:37 हायपरलिंक केलेल्या टेक्स्टवर क्लिक केल्यावर ते तुम्हाला संबंधित Web pageवर घेऊन जाईल.
06:44 डेटाची रचना rows आणि columns मध्ये करण्यासाठी टेबलचा वापर केला जातो.
06:49 आता इंप्रेस मध्ये टेबल समाविष्ट करायचे पाहु.
06:54 'Development up to the present' शीर्षक असलेली स्लाईड, स्लाईड pane मधून निवडा.
07:00 Task paneच्या लेआऊट या विभागातील 'Title and 2 content' हा आयकॉन सिलेक्ट करा.
07:07 डावीकडील टेक्स्टबॉक्समधील 'Text' सिलेक्ट करा.
07:14 आणि फाँटचा आकार कमी करून तो 26 करा.
07:17 उजवीकडील टेक्स्टबॉक्सच्या मध्यभागी असलेल्या इन्सर्ट टूलबारवरील, 'Insert Table' या आयकॉनवर क्लिक करा.
07:25 Default रूपात column संख्या 5 आणि rows संख्या 2 दिसत आहे.
07:33 आपण columns संख्या बदलून ती 2 आणि rows संख्या 5 करून घेऊ.
07:41 'OK' बटणावर क्लिक करा.
07:44 टेक्स्ट नीट वाचता यावे यासाठी टेबलचा आकार वाढवू.
07:49 टेबलमध्ये माहिती भरा.
07:51 Implementation Year व %
07:56 2006 10%
07:59 2007 20%
08:02 2008 30%
08:05 2009 40%
08:08 आता हेडर रो चा फाँट बदलून तो बोल्ड करा आणि टेक्स्टला मध्यभागी आणा.
08:17 टेबलचा रंग बदलण्यास प्रथम सर्व टेक्स्ट निवडा.
08:22 नंतर Tasks Pane वरील टेबल डिझाईन या विभागातून टेबलची स्टाईल निवडा. आपण ही स्टाईल सिलेक्ट करू.
08:30 आता टेबल चे निरीक्षण करा.
08:33 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08:37 आपण यात, पिक्चर आणि ऑब्जेक्ट फॉरमॅट करणे.
08:43 प्रेझेंटेशनच्या आत व बाहेर हायपरलिंक तयार करणे आणि टेबल समाविष्ट करणे शिकलो.
08:49 COMPREHENSION TEST ASSIGNMENT.
08:53 नवीन प्रेझेंटेशन तयार करा.
08:55 तिस-या स्लाईडमध्ये पिक्चर समाविष्ट करा.
08:58 चौथ्या स्लाईडमध्ये 2 rows आणि 3 columns असलेले टेबल बनवा.
09:03 टेबलच्या दुस-या रो मधल्या दुस-या कॉलममध्ये स्लाईड 3 असे टाईप करा. या टेक्स्टला तिस-या स्लाईडची हायपरलिंक बनवा.
09:14 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:17 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:20 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:25 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:30 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:34 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
09:46 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
09:53 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:05 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha