Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C4/Database-Design-Primary-Key-and-Relationships/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''Database Design,Primary Key Relationships'''
+
{| border=1
 
+
|'''Time'''
'''Author: Manali Ranade'''
+
|'''Narration'''
 
+
'''Keywords: Base'''
+
 
+
 
+
 
+
{| style="border-spacing:0;"
+
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 16:15, 20 April 2017

Time Narration
00:00 LibreOffice Base वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 Database Design वरील हे पुढचे ट्युटोरियल आहे.
00:10 आपण शिकणार आहोत,
00:13 4. माहितीचा भाग columns मध्ये रूपांतरित करणे.
00:17 5. primary keys नमूद करणे.
00:20 6. table relationships प्रस्थापित करणे.
00:23 मागील पाठात Library application साठी database design ची प्रक्रिया सुरू केली होती.
00:30 Library databaseतयार करण्याचा उद्देश आपण समजून घेतला.
00:36 पुढे libraryसाठी आवश्यक माहिती शोधून तिची व्यवस्थित रचना केली.
00:44 सर्व माहिती Tables मध्ये विभागली.
00:49 आपण Library database मध्ये चार tables बनवली : Books, Authors, Publications आणि Members.
01:00 पुढील पायरीत आपण माहितीचा भाग columns मध्ये रूपांतरित करणार आहोत.
01:07 प्रत्येक टेबलमध्ये कोणती माहिती संचित करायची ते ठरवणार आहोत.
01:13 माहिती साठवण्यास निवडलेला प्रत्येक item एक फिल्ड बनतो व तो टेबलमधील column म्हणून दाखवला जातो.
01:23 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे Books table ला 5 columns आहेत ज्याला fieldsअसेही म्हणतात.
01:31 ह्या columns मधील प्रत्येक row किंवा record मध्ये केवळ एकाच पुस्तकासंबंधीची माहिती आहे.
01:40 तसेच Authors table मधील प्रत्येक रेकॉर्डमध्ये केवळ एकाच लेखकाची माहिती आहे.
01:49 Publishers table मधील प्रत्येक रेकॉर्डमध्ये केवळ एकाच प्रकाशकाची माहिती आहे.
01:58 आवश्यकतेनुसार आपण columns मध्ये बदल करू शकतो.
02:04 उदाहरणार्थ Author name हे First Name आणि Last Nameमध्ये विभागू शकतो. columns द्वारे search किंवा sort करू शकतो .
02:17 calculations चे रिझल्टस ठेवण्यास टेबलमध्ये वेगळ्या columns ची गरज नाही.
02:24 रिझल्ट बघायचा असेल तेव्हा Base मध्ये calculations कधीही करता येऊ शकतात.
02:31 tables आणि columns बाबतीत आपल्याला सुस्पष्टता आली आहे. आता primary keys बद्दल जाणून घेऊ .
02:41 primary key म्हणजे काय?
02:44 प्रत्येक table मधील असा column किंवा त्याचा संच की ज्यामुळे संचित केलेली प्रत्येक row uniquely identified आहे.
02:54 हा column किंवा columns चा संच टेबलची primary keyअसतो.
03:00 हा बहुधा unique identification number असतो, उदाहरणार्थ Book Id किंवा Author Id .
03:08 primary key fields वापरून विविध टेबल्स मधील संबंधित डेटा आपण पटकन एकत्र आणू शकतो.
03:21 primary key मध्ये duplicate values असू शकत नाहीत .
03:26 उदाहरणार्थ माणसांची नावे primary key असू शकत नाही, कारण नावे unique नसतात.
03:34 एकाच table मध्ये सारखेच नाव असणा-या दोन व्यक्ती असू शकतात.
03:40 primary key ला नेहमी value असावीच लागते.
03:45 जर ती रिकामी किंवा Null असेल तर ते फिल्ड primary key ठरवता येणार नाही.
03:52 कॉलम AutoNumber म्हणून सेट केल्याने primary key columnमध्ये व्हॅल्यू असेलच याची खात्री देता येते. Base यातील व्हॅल्यू आपोआप generate करतो.
04:09 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे tablesसाठी primary keys सेट करू शकतो.
04:20 Books tableसाठी BookId,
04:24 Authors tableसाठी AuthorId ,
04:28 Publishers table साठी PublishersId
04:33 तसेच येथे दाखवले नसले तरी Members table साठी MemberId ही primary key असेल.
04:42 टेबलमध्ये primary key सेट केल्याने आपल्याला Entity Integrity मिळते.
04:52 Entity Integrity मुळे टेबलमधे duplicate records नसल्याची खात्री देता येते.
05:00 तसेच रेकॉर्ड identify करणारे फिल्ड unique आहे आणि रिकामे नाही याची खात्री देता येते.
05:10 तीन टेबल्समधील primary keys मुळे त्यांच्यामध्ये आपण संबंध प्रस्थापित करून ती एकत्र करू शकतो.
05:20 Base ह्या संकल्पनेवर आधारित असल्यामुळे Base ला Relational Database Management System, संक्षिप्त रूपात RDBMS म्हणतात.
05:32 relationships चे काही प्रकार पाहू.
05:37 प्रथम One-to-Many relationship पाहू.
05:43 येथे दाखवल्याप्रमाणे Books आणि Authors tables चा विचार करू.
05:49 पुस्तक केवळ एका लेखकाने लिहिलेले असते.
05:55 काही वेळा एकाच पुस्तकाचे दोन किंवा अधिक सहलेखक असतात.
06:02 आपल्या उदाहरणात मात्र प्रत्येक पुस्तकाचा एकच लेखक आहे असे मर्यादित ठेवणार आहोत.
06:10 आपल्या उदाहरणात पुढे एका लेखकाची अनेक पुस्तके असू शकतात.
06:17 Authors tableमध्ये दिसत असलेल्या एका लेखकाची अनेक पुस्तके, Books table दाखवलेली असू शकतात.
06:28 अशाप्रकारे ही one-to-many relationship आहे.
06:32 आणि हे Library database मध्ये दाखवण्यासाठी
06:36 Authors table मधील Author Id ही primary keyघेऊन ती Books table मध्ये समाविष्ट करू.
06:46 Books table मधील Author Id ला Foreign key म्हणतात.
06:53 Publishers table मधील Publisher Id ही primary key, Books table मध्ये समाविष्ट केल्यावर foreign key होईल.
07:06 column किंवा columnsचा संच share केल्यावर आपण database मध्ये one-to-many relationships दाखवू शकतो.
07:17 Foreign keysद्वारे table relationships प्रस्थापित करता येते.
07:23 relationship प्रस्थापित करण्यासाठी एका tableची primary key ही दुस-या tableची foreign key म्हणून दाखवता येऊ शकते.
07:34 याद्वारे आपल्याला Referential integrity ची खात्री देता येते.
07:39 म्हणजेच table मधील प्रत्येक foreign key ची value ही संबंधित tablesच्या primary keyशी जुळली पाहिजे.
07:50 आता Many-to-Many relationship पाहू.
07:56 त्यासाठी table design वर जाऊ.
07:59 अनेक प्रती उपलब्ध आहे असे समजून एक पुस्तक कितीही libraryच्या सदस्यांना देता येऊ शकते.
08:09 तसेच पुस्तकांच्या उपलब्धतेनुसार सदस्य कितीही पुस्तके घेऊ शकतात.
08:17 हे अनेक पुस्तके अनेक सदस्यांना दिल्याचे उदाहरण आहे.
08:25 हे Many-to-many relationship दाखवत आहे.
08:29 आपल्या database मध्ये many-to-many relationship दाखवण्यासाठी
08:35 BooksIssued table हे तिसरे table तयार केले आहे ज्याला Junction tableही म्हणता येईल.
08:45 येथे Books आणि Members ह्या प्रत्येक टेबलमधील primary keys, BooksIssued table मध्ये समाविष्ट करणार आहोत.
08:57 BooksIssued table सदस्याला दिल्या गेलेल्या प्रत्येक पुस्तकाची नोंद ठेवेल.
09:05 अशाप्रकारे तिसरे junction table बनवून many-to-many relationship दाखवू शकतो.
09:13 शेवटी One-to-one relationship पाहू.
09:18 कधीकधी काही attributes किंवा columns हे काही विशिष्ट डेटासाठीच भरले जातात, अन्यथा रिकामेच असतात.
09:30 समजा केवळ एकाच लेखकाचा website address आहे आणि इतरांचा नाही.
09:38 Authors table मधील नवा website column जवळजवळ रिकामा असल्यामुळे disk space वाया जाते.
09:47 हा column नव्या supplemental table मध्ये हलवू शकतो ज्याची Author Id हीचprimary key असेल.
09:58 supplemental table मधील प्रत्येक रेकॉर्ड हे मुख्य table मधील एकाच रेकॉर्डशी संबंधित असेल.
10:06 हे One-to-one relationship दाखवते.
10:10 आपण database मध्ये relationships प्रस्थापित करण्यास शिकलो.
10:15 Database Design च्या दुस-या भागाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:23 आपण हे topics शिकलो.
10:28 4. माहितीचा भाग columns मध्ये रूपांतरित करणे.
10:32 5. primary keys नमूद करणे.
10:34 6. table relationships प्रस्थापित करणे.
10:38 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:48 ह्या प्रॉजेक्टचे संयोजन http://spoken-tutorial.org ने केले आहे.
10:54 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:58 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Ranjana