Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C2/Create-queries-using-Design-View/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Create Queries using Design View''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Base''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! …') |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 6: | Line 6: | ||
− | + | {| border = 1 | |
− | {| | + | |'''Time''' |
− | + | |'''Narration''' | |
− | + | ||
|- | |- | ||
Line 152: | Line 151: | ||
आणि शेवटी checkedin field निवडा. | आणि शेवटी checkedin field निवडा. | ||
− | |||
− | |||
− | |||
|- | |- |
Latest revision as of 15:34, 20 April 2017
Title of script: Create Queries using Design View
Author: Manali Ranade
Keywords: Base
Time | Narration |
00:00 | बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. |
00:06 | Design View च्या सहाय्याने query बनवणे. |
00:10 | Query Design विंडोच्या सहाय्याने टेबल समाविष्ट करणे. |
00:13 | फिल्ड सिलेक्ट करणे. aliases आणि सॉर्टिंगचा क्रम ठरवणे. तसेच queryद्वारे माहिती शोधण्यासाठी निकष प्रदान करणे. |
00:23 | त्यासाठी आपल्या Library database चे उदाहरण पाहू. |
00:29 | Library database मध्ये आपण पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे. |
00:37 | तसेच आपल्याकडे सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवणारे टेबल आहे. |
00:45 | आता आपण नवी query बनवू. जी सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची दाखवेल. |
00:54 | म्हणजेच सभासदांना दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांविषयीची माहिती मिळवू या. |
01:03 | आपण Library database उघडू या. |
01:07 | डाव्या बाजूच्या पॅनेलवरील Queries च्या आयकॉनवर क्लिक करा. |
01:13 | उजव्या बाजूच्या पॅनेलवरील Create Query in Design view वर क्लिक करा. आता आपल्याला Query Design नावाची नवी विंडो दिसेल. |
01:28 | आणि तसेच Add Table or Query नामक छोटी popup विंडो दिसेल . |
01:39 | येथे आपण query साठी आवश्यक असलेला data चा सोर्स निवडू शकतो. |
01:46 | सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या query मध्ये तिनही टेबल्स असणे आवश्यक आहे. |
01:57 | त्यासाठी सूचीतील Books या टेबलवर क्लिक करा. नंतर popup विंडोच्या उजव्या बाजूला असलेल्या Add बटणावर क्लिक करा. |
02:11 | अशाच प्रकारे आपण BooksIssued table आणि Members table सुद्धा समाविष्ट करू या. |
02:19 | तिनही टेबल्स आपल्याला background मधीलquery design विंडोमध्ये दिसतील. |
02:26 | आता popup विंडो बंद करू या. |
02:31 | त्यामुळे query design विंडो पुढे येईल. |
02:39 | विंडोच्या वरच्या अर्ध्या भागात तीन टेबल्स दिसतील. |
02:46 | तिनही टेबल्स मध्ये योग्य असे अंतर करून घेऊ. |
02:53 | त्यासाठी Members table वर क्लिक करून ते उजव्या बाजूच्या कोप-यात drag करून drop करा. |
03:01 | नंतर BooksIssued table वर क्लिक करून ते मध्यभागात drag करून drop करा. |
03:11 | आता आपल्याला टेबल्स जोडणा-या लाईन्स दिसतील ज्या आपण पूर्वी प्रस्थापित केलेल्या relationships दाखवितात. |
03:23 | relationships चा तपशील बघण्यासाठी आपण या लाईन्सवर डबल क्लिक करू. |
03:30 | आता आपण Query design विंडोच्या खालील अर्धा भाग बघू या. |
03:37 | या भागात सेल्स असलेल्या अनेक rows आहेत. query बनवण्यासाठी आपण यात data भरणार आहोत. |
03:48 | प्रथम आपण Field column बघू या. |
03:53 | येथे आपल्याला रिझल्ट मध्ये दाखवायच्या fields ची निवड करता येते. |
04:01 | त्यासाठी प्रथम विंडोच्या वरच्या अर्ध्या भागातील Books table मधून Title field वर डबल क्लिक करा. |
04:12 | पुढे Members table मधील Name field |
04:17 | आणि नंतर BooksIssued table मधीलIssue Date field |
04:24 | तसेच Return date, actual return date
आणि शेवटी checkedin field निवडा. |
04:34 | विंडोच्या खालच्या अर्ध्या भागातील पहिल्या row मध्ये ही फिल्डस दिसतील. |
04:44 | तसेच तिस-या row मध्ये या फिल्डशी संबंधित टेबल्सची नावे दिसतील. |
04:50 | दुस-या row मधील Alias कडे लक्ष द्या. |
04:57 | येथे आपण निवडलेल्या फिल्डसाठी अर्थपूर्ण नाव टाईप करू या. |
05:04 | image मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण aliases टाईप करू या. |
05:11 | आता आपले aliases टाईप करून झाले आहेत. |
05:15 | पुढे Sort row कडे लक्ष द्या. |
05:21 | येथे आपण query च्या उत्तरातील क्रमवारी ठरवू शकतो. |
05:26 | दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा क्रम घटनाक्रमाप्रमाणे ठरवू. |
05:34 | म्हणजेच आपला रिझल्ट Issue Date वर चढत्या क्रमाने सॉर्ट करू या. |
05:43 | त्यासाठी Issue Date फिल्डखाली आणि Sort rowमधील रिकाम्या सेलवर क्लिक करा आणि मग Ascending वर क्लिक करा. |
05:56 | आता आपण पुढील Visible row वर जाऊ या. |
06:02 | फिल्डस check किंवा un-check करून स्क्रीनवर दाखवली जावीत का नाही हे ठरवू. |
06:11 | आपल्याला दिसेल default रूपात सर्व फिल्ड checked केलेली आहेत. |
06:17 | पुढे आपण Function row वर जाऊ. याचा वापर complex queries बनवण्यासाठी होतो. आत्तासाठी हे आपण सोडून देऊ. |
06:27 | आणि आपण Criterion row वर जाऊ या. |
06:32 | येथे आपण रिझल्ट मर्यादित ठेवण्यासाठी simple किंवा complex निकष ठरवू शकतो. |
06:40 | उदाहरणार्थ सभासदांना दिली गेलेली आणि अद्याप परत न आलेली पुस्तके यासाठी आपणquery करू शकतो. |
06:49 | म्हणजेच checked in न केलेली पुस्तके. |
06:54 | CheckedIn field खालील आणि या row मधील रिकाम्या सेलवर क्लिक करून Equals Zero असे टाईप करा. |
07:06 | आता आपण ही query कार्यान्वित करू. |
07:10 | त्यासाठी आपण कीबोर्ड वरील शॉर्टकट F5 चा वापर करू शकतो. किंवा वरील भागातील Edit menu तील Run Query वर क्लिक करू शकतो. |
07:27 | तुम्हाला विंडोच्या वरच्या अर्ध्या भागात काही डेटा दिसत आहे का? |
07:32 | हा आपल्या queryचा रिझल्ट आहे. |
07:36 | आपल्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती Issue Date च्या क्रमानुसार दिसत आहे. तसेच आपल्याला दिसेल की एकही पुस्तक checked in केलेले नाही. |
07:51 | आता आपण खालील query design area मध्ये जाऊन त्यात हवा तो बदल करू शकतो. |
08:00 | उदाहरणार्थ आपण Checked In चा निकष काढून टाकू. |
08:07 | आता F5 चे बटण दाबून query कार्यान्वित करा. |
08:15 | यावेळी ही query आपल्याला मोठी सूची दाखवेल. |
08:23 | पुढे Control S दाबून आपण ही query सेव्ह करू या. एक छोटी popup विंडो उघडेल. |
08:34 | येथे आपल्या queryला अर्थपूर्ण नाव देऊ या. |
08:38 | History of Books Issued to Members असे टाईप करा. |
08:46 | नंतर Ok बटणावर क्लिक करून विंडो बंद करा. |
08:52 | सेव्ह केलेली query उघडण्यासाठी आपण मुख्य बेस विंडोमध्ये queryच्या नावावर डबल क्लिक करू शकतो. |
09:01 | अशा प्रकारे Design View च्या सहाय्याने आपण यशस्वीरित्या query बनवली आहे. |
09:09 | आता assignment करू. |
09:12 | सभासद Nisha Sharma यांना दिलेल्या पुस्तकांची सूची बनवा. त्यांचा क्रम Issue Date नुसार म्हणजेच घटनाक्रमाने ठेवा. |
09:24 | अशा प्रकारे आपण Creating Queries in Design View वरील स्पोकन ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:31 | आपण जे शिकलो ते थोडक्यात. |
09:33 | Design View च्या सहाय्याने query बनवणे. Query Design विंडोच्या सहाय्याने टेबल समाविष्ट करणे. |
09:41 | फिल्ड सिलेक्ट करणे. aliases आणि सॉर्टिंगचा क्रम ठरवणे. तसेच queryसाठी निकष प्रदान करणे. |
09:49 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
10:10 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |