Difference between revisions of "Netbeans/C2/Handling-Images-in-a-Java-GUI-Application/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
|  00:01  
 
|  00:01  
|  नमस्कार.
+
|  नमस्कार,'''Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE''' वरील पाठात स्वागत.  
 
+
|-
+
|  00:02
+
'''Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE''' वरील पाठात स्वागत.  
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 12:07, 20 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार,Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE वरील पाठात स्वागत.
00:10 आपल्याला नेटबीन्स ची प्राथमिक ओळख तसेच,
00:15 JFrame फॉर्मवरील टेक्स्ट फिल्डस, बटण्स, मेनू समाविष्ट करण्याचे ज्ञान आहे असे समजू.
00:22 नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:29 ह्या पाठात जाणून घेऊ: इमेजेस हाताळण्या संदर्भात सविस्तर माहिती,
00:34 आणि त्यांच्यावर GUI ऍप्लिकेशनमधे एखादी कृती करणे.
00:39 ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00:52 जावा ऍप्लिकेशन मधे इमेजेस ऍक्सेस करणे आणि हाताळण्याची सर्वमान्य पध्दत म्हणजे getResource() मेथड.
00:59 IDE मधील GUI Builder वापरून ऍप्लिकेशनमधे इमेज समाविष्ट करणारा कोड बनवायला शिकू.
01:07 आणि साधी Jframe बनवू ज्यामधे इमेज दाखवणारे एक Jlabel असेल.
01:13 ह्या पाठात पाहू -
01:15 ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे.
01:18 इमेजसाठी पॅकेज समाविष्ट करणे.
01:20 लेबलवर इमेज दाखवणे.
01:22 माऊस इव्हेंटस आणि पॉप-अप्स बनवणे.
01:25 ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करणे.
01:28 आपले सँपल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी IDE वर जाऊ.
01:33 फाईल मेनूतून New Project(न्यू प्रॉजेक्ट) निवडा.
01:37 Categories(केटेगरीस) मधील Java(जावा), Projects(प्रॉजेक्ट्स) खालील Java Application (जावा अप्लिकेशन ) निवडून Next (नेक्स्ट) क्लिक करा.
01:46 Project Name(प्रॉजेक्ट नेम ) फिल्डमधे ImageDisplayApp टाईप करा.
01:54 Create Main Class (क्रियेट मेन क्लास) चेकबॉक्स क्लियर करा.
01:58 तसेच Set as Main Project(सेट अस मेन प्रॉजेक्ट) चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा.
02:03 Finish (फिनिश) क्लिक करा.IDE मधे प्रोजेक्ट तयार झालेले असेल.
02:08 ह्या भागात Jframe form(जेफ्रेम फॉर्म) बनवून त्यात Jlabel(जेलेबल ) समाविष्ट करणार आहोत.
02:14 प्रथम Jframe form(जेफ्रेम फॉर्म) बनवू.
02:17 Projects(प्रॉजेक्ट्स) विंडोत ImageDisplayApp नोड एक्सपांड करा.
02:23 Source Packages(सोर्स पॅकेजस) नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील Jframe form(जेफ्रेम फॉर्म) पर्याय निवडा.
02:30 Class Name(क्लास नेम ) फिल्डमधे ImageDisplay टाईप करा.
02:37 Package (पॅकेज) फिल्डमधे org.me.myimageapp टाईप करा.
02:45 Finish(फिनिश) क्लिक करा.
02:48 आता Jlabel(जेलेबल) समाविष्ट करू.
02:52 IDE च्या उजव्या बाजूच्या पॅलेट मधील Label(लेबल) कॉम्पोनंट निवडून Jframe(जेफ्रेम) वर ड्रॅग करा.
03:01 आता तुमचा फॉर्म अशाप्रकारे दिसला पाहिजे.
03:06 ऍप्लिकेशनमधे इमेजेस किंवा इतर रिसोर्सेस वापरता तेव्हा सामान्यतः रिसोर्सेससाठी वेगळे Java(जावा) पॅकेज बनवतात.
03:15 लोकल फाईल सिस्टीममधे, पॅकेज हे फोल्डर सदृश्य असते.
03:19 प्रोजेक्टस विंडोमधे org.me.myimageapp च्या नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील Java Package(जावा पॅकेज) निवडा.
03:30 New Package विझार्ड(न्यू पॅकेज विझार्ड) मधे org.me.myimageapp पुढे .resources टाईप करा.
03:40 त्यामुळे नव्या पॅकेजचे नाव आता org.me.myimageapp.resources हे असेल.
03:47 Finish(फिनिश) क्लिक करा.
03:49 इमेज समाविष्ट करू तेव्हा प्रोजेक्टस विंडोतील org.me.myimageapp.resources ह्या पॅकेजमधे इमेज आलेली दिसली पाहिजे.
03:59 ऍप्लिकेशनमधे इमेज Jlabel कॉम्पोनंटमधे बसवली जाणार आहे.
04:04 आता लेबलवर इमेज समाविष्ट करू.
04:08 GUI designer मधे फॉर्ममधे समाविष्ट केलेले लेबल सिलेक्ट करा.
04:14 विंडोच्या उजवीकडे असलेल्या पॅलेट खालील प्रॉपर्टी विंडोमधे स्क्रॉल करून Icon(आयकॉन) प्रॉपर्टीवर जा.
04:23 ellipsis(एलिप्सिस) म्हणजेच उजवीकडील तीन टिंबांवर क्लिक करा.
04:30 Icon प्रॉपर्टी(आइकान) डायलॉग बॉक्समधे Import to Project वर क्लिक करा.
04:34 फाईल निवडण्यासाठी तुम्हाला हवी असलेली इमेज ज्या फोल्डरमधे आहे त्या फोल्डरवर जा.
04:42 Next(नेक्स्ट) क्लिक करा.
04:45 विझार्डच्या Select Target Folder पेजमधे Resources(रिसोर्सस) फोल्डर निवडा.
04:49 Finish(फिनिश) क्लिक करा.
04:52 नंतर IDE आपल्या प्रोजेक्टमधे इमेज कॉपी करेल.
04:57 ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करतो तेव्हा ही इमेज वितरणासाठीच्या JAR फाईलमधे समाविष्ट होते.
05:07 OK क्लिक करा.
05:11 तुमच्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून Clean and Build(क्लीन अँड बिल्ड) पर्याय निवडा.
05:18 आता फाईल विंडोवर जाऊन build(बिल्ड) फोल्डर खालील,
05:29 dist(डिस्ट ) फोल्डर मधे jar फाईल बघू शकता.
05:33 imagedisplay(इमेजडिसप्ले) क्लासमधे इमेज ऍक्सेस करण्यासाठी येथे कोड बनतो.
05:38 तसेच फॉर्मच्या डिझाईन व्ह्यूमधे लेबलवर तुमची इमेज दाखवते.
05:43 आता फॉर्म चांगला दिसण्यासाठी काही सोप्या गोष्टी करू.
05:48 Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे Text(टेक्स्ट) प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
05:56 आणि jLabel1 डिलिट करा.
06:04 लेबलवर दाखवले जाणारे टेक्स्ट ही GUI Builder ने तयार केलेली व्हॅल्यू आहे.
06:10 परंतु आपण टेक्स्ट ऐवजी इमेज दाखवण्यासाठी लेबल वापरत आहोत.
06:15 त्यामुळे टेक्स्टची गरज नाही.
06:18 आता लेबल ड्रॅग करून ते फॉर्मच्या मध्यात ठेवा.
06:26 GUI Designer मधे Source(सोर्स) टॅब क्लिक करा.
06:30 Generated Code असे लिहिलेल्या ओळीपर्यंत स्क्रॉल करा.
06:33 GUI Designer द्वारे बनलेला कोड बघण्यासाठी Generated Code च्या डावीकडे असलेले अधिकचे चिन्ह क्लिक करा.
06:42 येथे ही कीलाईन आहे.
06:49 jLabel1 आयकॉन प्रॉपर्टीसाठी Property editor(प्रॉपर्टी एडिटर) वापरलेला असल्याने IDE ने setIcon मेथड बनवली आहे.
06:57 त्या मेथडच्या पॅरामीटरमधे getResource() मेथडला ImageIcon च्या निनावी इनर क्लास कडून कॉल येतो.
07:10 एकदा तुमची इमेज समाविष्ट झाली की Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे इमेजवर राईट क्लिक करा.
07:19 Events(इवेंट्स) खालील Mouse(माउस) मधील mouseClicked(माउसक्लिक्ड ) क्लिक करा.
07:24 व्ह्यू बदलून Source मोडवर जाईल.
07:28 येथे माऊस क्लिक झाल्यावर कार्य करणारा तुमचा कोड येथे लिहू शकता.
07:33 GUI मधे इमेज क्लिक केल्यावर पॉप अप उघडण्यासाठी कोडच्या काही ओळी समाविष्ट करू.
08:00 आपण आवश्यक असलेल्या कोडच्या काही ओळी टाईप केलेल्या आहेत.
08:05 प्रथम पॉप अप साठी नवी Jframe बनवली आहे.
08:12 आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन सेट केले आहे.
08:15 आणि शेवटी पॉप अप वर दिसणारे टेक्स्ट येथे दिलेले आहे.
08:24 ह्या कोडच्या ओळी समाविष्ट केल्यावर फाईलच्या सुरूवातीला दोन ओळी टाईप करून आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट करू.
08:36 import javax.swing.*
08:45 आणि import java.awt.* हे समाविष्ट करा.
08:53 ह्यामुळे प्रोग्रॅमसाठी आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट होतील.
08:59 ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करू.
09:02 इमेज ऍक्सेस करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी कोड बनवला आहे.
09:07 इमेज ऍक्सेस होते का ही खात्री करण्यास ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करा.
09:12 प्रथम प्रोजेक्टचा Main class(मेन क्लास) सेट करू.
09:16 प्रोजेक्ट सुरू केल्यावर कुठला क्लास कार्यान्वित करायचा हे मेन क्लास मुळे IDE ला समजते .
09:21 याशिवाय ऍप्लिकेशन बिल्ड होताना JAR फाईलमधे Main class(मेन क्लास) हा घटक तयार झाल्याची खात्री होते.
09:33 प्रोजेक्ट विंडोतील ImageDisplayApp प्रोजेक्ट नोड वर राईट क्लिक करून Properties(प्रॉपर्टीस) निवडा.
09:41 Project Properties(प्रॉजेक्ट प्रॉपर्टीस) च्या डायलॉग बॉक्समधे डावीकडील Run(रन) कॅटॅगरी सिलेक्ट करा.
09:47 Main Class (मेन क्लास) फिल्ड समोर असलेले Browse(ब्राउज़) बटण क्लिक करा.
09:51 org.me.myimageapp.ImageDisplay सिलेक्ट करून Select Main Class(सेलेक्ट मेन क्लास) क्लिक करा.
10:01 OK क्लिक करा.
10:05 आता Project नोड(प्रॉजेक्ट) वर राईट क्लिक करून Clean & Build(क्लीन & बिल्ड) सिलेक्ट करा.
10:11 Files(फाइल्स) विंडोमधे ऍप्लिकेशनच्या Build प्रॉपर्टीज बघू शकतो.
10:20 Build फोल्डरमधे कंपाईल केलेला क्लास असतो.
10:23 dist फोल्डरमधे एक्झीक्युटेबल JAR फाईल असते ज्यात कंपाईल केलेला क्लास आणि इमेजचा समावेश असतो.
10:32 आता टूलबारवरील Run(रन) निवडा.
10:34 इमेज असलेली आऊटपुट विंडो उघडेल.
10:39 ह्या इमेजवर क्लिक करा.
10:42 वरच्या बाजूला इमेजचे वर्णन दाखवणारा pop-up दिसेल.
10:50 आता असाईनमेंट करू.
10:54 ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे चार इमेजेस असलेले आणखी एक GUI बनवा.
11:01 प्रत्येक इमेजसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस जसे की, कीबोर्ड, माऊस-मोशन, माऊस-क्लिक, माऊस-व्हील इव्हेंट लिहा.
11:12 आपण असाईनमेंट आधीच तयार केली आहे.
11:17 ही कार्यान्वित करू.
11:20 असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
11:26 आपण कीबोर्ड आणि माऊस इव्हेंटस बनवले आहेत.
11:34 शिकलो ते थोडक्यात,
11:36 Jframe फॉर्म बनवला.
11:39 इमेजसाठी पॅकेज समाविष्ट केले.
11:41 लेबलवर इमेज दाखवली.
11:44 तसेच माऊस इन्हेंटस, pop-ups बनवले.
11:49 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11:53 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:56 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
12:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12:19 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12:23 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
12:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:42 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
12:46 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana