Difference between revisions of "PERL/C2/Overview-and-Installation-of-PERL/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
m |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
(4 intermediate revisions by 2 users not shown) | |||
Line 20: | Line 20: | ||
|- | |- | ||
| 00:10 | | 00:10 | ||
− | | | + | | PERL ची ओळख करून घेताना उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर PERL इन्स्टॉल करण्याच्या पाय-या जाणून घेऊ. |
|- | |- | ||
| 00:20 | | 00:20 | ||
− | | या पाठासाठी, | + | | या पाठासाठी, तुम्ही इंटरनेटशी जोडलेले असणे गरजेचे आहे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 228: | Line 224: | ||
|- | |- | ||
| 04:49 | | 04:49 | ||
− | |तुमच्या कॉम्प्युटरमधे योग्य लोकशेनवर '''Perl msi file''' | + | |तुमच्या कॉम्प्युटरमधे योग्य लोकशेनवर '''Perl msi file''' सेव्ह करा. |
|- | |- | ||
Line 260: | Line 256: | ||
|- | |- | ||
| 05:31 | | 05:31 | ||
− | | ती म्हणजे; | + | | ती म्हणजे;'''Perl''' |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 05:33 | | 05:33 | ||
− | | '''PPM | + | | '''PPM utility,''' ह्याचा उपयोग '''Perl Modules''' विंडोजवर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी होतो. |
|- | |- | ||
Line 424: | Line 416: | ||
|- | |- | ||
| 08:38 | | 08:38 | ||
− | | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | + | | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. '''http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro''' |
− | + | ||
|- | |- | ||
Line 433: | Line 424: | ||
|- | |- | ||
| 08:53 | | 08:53 | ||
− | |ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | |ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
|- | |- | ||
| 08:56 | | 08:56 | ||
|सहभागासाठी धन्यवाद. | |सहभागासाठी धन्यवाद. | ||
− | |||
− | |||
|} | |} |
Latest revision as of 09:50, 20 April 2017
Title Of Script: PERL Overview and Installing Perl on WIndows and Linux
Author: Manali Ranade
Keywords: PERL Overview, Installing Perl video tutorial, Perl on Windows, Perl on Ubuntu Linux.
Time | Narration |
00:01 | PERL Overview आणि Installation of Perl वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | आपण शिकणार आहोत, |
00:10 | PERL ची ओळख करून घेताना उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर PERL इन्स्टॉल करण्याच्या पाय-या जाणून घेऊ. |
00:20 | या पाठासाठी, तुम्ही इंटरनेटशी जोडलेले असणे गरजेचे आहे. |
00:25 | तुमच्याकडे उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असायला हवी. |
00:30 | येथे उबंटु लिनक्स 12.04 आणि विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. |
00:39 | उबंटु लिनक्सवर पर्ल इन्स्टॉल करण्यासाठी सिस्टीमवर सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल केलेले असावे. |
00:47 | तुमच्याकडे ऍडमिन हक्क असावेत. |
00:50 | तसेच उबंटु वरील टर्मिनल आणि सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरण्याचे ज्ञान असावे. |
00:57 | नसल्यास वेबसाईटवर उपलब्ध असलेले लिनक्सवरील पाठ पहा. |
01:03 | PERL लँग्वेजबद्दल जाणून घेऊ. |
01:07 | PERL हे Practical Extraction आणि Reporting Language यातील आद्याक्षरांनी बनले आहे. |
01:14 | ही एक सर्वसाधारण वापराची प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. |
01:18 | ही मुळात text manipulation साठी तयार केली होती. |
01:23 | ही वेब डेव्हलपमेंट, नेटवर्क प्रोग्रॅमिंग, GUI डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. |
01:31 | ही समजण्यास अतिशय सोपी आहे. |
01:35 | ह्यामधे C किंवा JAVA प्रमाणे गुंतागुंतीचे डेटा स्ट्रक्चर नसते. |
01:41 | ही pattern matching साठी ओळखली जाते. |
01:45 | आणि सर्वात महत्वाचे, PERL ही वापरास मुक्त लँग्वेज आहे. |
01:49 | उबंटु लिनक्स 12.04 OS वर PERL आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते. |
01:56 | इन्स्टॉल करण्यासाठी कुठलीही विशिष्ट पध्दत नाही. |
02:01 | आता उबंटु 12.04 वर आधीच इन्स्टॉल असलेल्या PERL चे वर्जन तपासू. |
02:07 | ctrl + alt + t ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
02:15 | नंतर टाईप करा perl hyphen v |
02:18 | आणि एंटर दाबा. |
02:21 | टर्मिनलवर दाखवल्याप्रमाणे आऊटपुट मिळेल. |
02:26 | हे आऊटपुट PERL चे सध्याचे इन्स्टॉल केलेले वर्जन दाखवत आहे. |
02:31 | माझ्याकडे PERL चे 5.14.2 हे वर्जन आहे. |
02:36 | उबंटु 12.04 वर उपलब्ध असलेली डिफॉल्ट PERL packages पाहू. |
02:43 | launcher bar वर जाऊन Dash Home वर क्लिक करा. |
02:48 | सर्च बारमधे टाईप करा Synaptic |
02:51 | सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजरचा आयकॉन दिसेल. |
02:55 | त्यावर क्लिक करा. |
02:57 | प्रमाणित करण्यासाठी हे तुमचा ऍडमिन पासवर्ड विचारेल. |
03:03 | तुमचा ऍडमिन पासवर्ड टाईप करून Authenticate वर क्लिक करा. |
03:08 | Synaptic Package Manager पॅकेजची सूची दाखवेल. |
03:13 | हे तुमच्या इंटरनेट व सिस्टीमच्या वेगानुसार थोडा वेळ घेऊ शकते. |
03:18 | सूची दिसल्यावर Quick Filter मधे Perl टाईप करा. |
03:22 | आपल्याला पॅकेजेसची सूची दिसेल. |
03:25 | PERL package च्या आधी असलेला हिरव्या रंगाचा चेक बॉक्स ते आधीच इन्स्टॉल असल्याचे दाखवते. |
03:33 | तर चांदणीचे चिन्ह असलेले चेक बॉक्सेस आपल्याला ही पॅकेजेस देखील गरजेचे असल्याचे दाखवते. |
03:41 | हे डॉक्युमेंटेशन बनवायला किंवा PERL स्क्रिप्ट डिबग करायला मदत करेल. |
03:47 | PERL च्या भावी वापरासाठी आवश्यक असे परंतु राहून गेलेले पॅकेज इन्स्टॉल करा. |
03:54 | आता विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर PERL इन्स्टॉल करण्याबद्दल जाणून घेऊ. |
04:00 | ही Perl tutorials रेकॉर्ड करताना, विंडोजसाठी त्याचे 5.14.2 हे वर्जन उपलब्ध होते. |
04:08 | आता PERL चे नवे वर्जन उपलब्ध आहे. |
04:12 | मी PERL चे 5.16.3 हे नवे वर्जन कसे इन्स्टॉल करायचे हे दाखवणार आहे. |
04:19 | ह्या पाठात दाखवलेल्या सर्व PERL कमांडस नव्या वर्जनमधे देखील उत्तम प्रकारे कार्यान्वित होतील. |
04:26 | विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर ब्राऊजर उघडा. |
04:30 | आणि address bar मधे येथे दाखवलेली URL टाईप करा. |
04:35 | हे तुम्हाला PERL च्या डाऊनलोड पेजवर घेऊन जाईल. |
04:39 | सिस्टीमच्या तपशीलानुसार तुमचे डाऊनलोड वर्जन निवडा. |
04:44 | मी 32 bit हे PERL चे वर्जन निवडत आहे. |
04:49 | तुमच्या कॉम्प्युटरमधे योग्य लोकशेनवर Perl msi file सेव्ह करा. |
04:56 | माझ्या मशीनवर ती आधीच सेव्ह करून ठेवली आहे. |
05:00 | PERL msi फाईल ज्या फोल्डरमधे सेव्ह केली आहे तो उघडून फाईलवर डबल क्लिक करा. |
05:07 | पॉपअप विंडोमधील Run वर क्लिक करा. |
05:11 | सेटअप विझार्डमधील Next वर क्लिक करा. |
05:15 | दाखवलेले License Aggrement मान्य करणारा पर्याय निवडा नंतर Next वर क्लिक करा. |
05:21 | आता, Custom Setup विंडो उघडेल. |
05:25 | ही विंडो PERL च्या इन्स्टॉल केल्या जाणा-या फीचर्सची सूची दाखवते. |
05:31 | ती म्हणजे;Perl |
05:33 | PPM utility, ह्याचा उपयोग Perl Modules विंडोजवर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी होतो. |
05:39 | डॉक्युमेंटेशन. हे Perl Modules साठीचे डॉक्युमेंटेशन प्रदान करते. |
05:44 | आणि Perl ची उदाहरणे |
05:47 | ही सर्व डिफॉल्ट फीचर्स तशीच ठेवून Next वर क्लिक करा. |
05:52 | environmental variable आणि file extension च्या संदर्भातील विंडो उघडेल. |
05:59 | येथे दाखवल्याप्रमाणे चेकबॉक्स सिलेक्ट करा. |
06:03 | Next क्लिक करून नंतर Install क्लिक करा. |
06:07 | हे PERL चे इन्स्टॉलेशन सुरू करेल. |
06:11 | तुमच्या इंटरनेटच्या वेगानुसार ह्याला थोडा वेळा लागू शकेल. |
06:16 | हे झाल्यावर Display Release Note checkbox अनचेक करा. आणि Finish क्लिक करा. |
06:23 | अशाप्रकारे विंडोजवरील PERL चे इन्स्टॉलेशन पूर्ण होईल. |
06:27 | आता इन्स्टॉलेशन तपासू. |
06:32 | Start मेनू वर जा. कमांड प्रॉम्प्ट उघडण्यासाठी टाईप करा cmd |
06:39 | कमांड प्रॉम्प्टवर टाईप करा perl space hyphen v |
06:44 | एंटर दाबा. |
06:46 | इन्स्टॉल केलेल्या PERL चे वर्जन मिळेल. |
06:50 | हे वर्जन दाखवत नसल्यास वर दिलेल्या इन्स्टॉलेशनच्या पाय-या पुन्हा करा. |
06:57 | आता Hello Perl चा साधा प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
07:02 | ही फाईल तुम्हाला या पाठासोबत दिली गेली आहे. त्याची लिंक प्लेयरच्या खाली Code Files मधे मिळेल. |
07:11 | ही फाईल डाऊनलोड करून वापरू. |
07:14 | मी ती माझ्या मशीनवर users\Amol डिरेक्टरीमधे सेव्ह केली आहे. |
07:21 | आता तिथे जाऊ. |
07:23 | टाईप करा perl sampleProgram.pl |
07:28 | एंटर दाबा. |
07:30 | कमांड प्रॉम्प्टवर Hello Perl असे दिसेल. |
07:35 | थोडक्यात, |
07:37 | या पाठात शिकलो: |
07:40 | PERL ची ओळख आणि, |
07:43 | PERLचे उबंटु लिनक्स 12.04 आणि विंडोज 7 वर इन्स्टॉलेशन करणे. |
07:50 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:54 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:58 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:06 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:10 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:15 | अधिक माहितीसाठी कृपया |
08:18 | contact at spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
08:23 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:29 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:38 | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro |
08:50 | तुम्हाला हा पर्लचा पाठ आवडला असेल अशी आशा आहे. |
08:53 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
08:56 | सहभागासाठी धन्यवाद. |