Difference between revisions of "Git/C2/Basic-commands-of-Git/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
(3 intermediate revisions by 2 users not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
− | {| | + | {| border = 1 |
− | | | + | |'''Time''' |
− | | | + | |'''Narration''' |
|- | |- | ||
Line 9: | Line 9: | ||
|- | |- | ||
|00:05 | |00:05 | ||
− | |या पाठात शिकणार आहोत: | + | |या पाठात शिकणार आहोत: '''Git''' रिपॉझिटरी आणि '''Git''' च्या काही मूलभूत कमांडस. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
|00:13 | |00:13 | ||
− | |या पाठासाठी वापरणार आहोत: | + | |या पाठासाठी वापरणार आहोत: उबंटु लिनक्स 14.04, '''Git 2.3.2''' आणि '''gedit ''' टेक्स्ट एडिटर. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 51: | Line 46: | ||
|01:00 | |01:00 | ||
| साधारण फोल्डरमधे केवळ फाईल्स आणि डिरेक्टरीजचा समावेश असतो. | | साधारण फोल्डरमधे केवळ फाईल्स आणि डिरेक्टरीजचा समावेश असतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|01:04 | |01:04 | ||
Line 329: | Line 325: | ||
|- | |- | ||
|08:26 | |08:26 | ||
− | | | + | | “Changes to be committed” असा मेसेज दिसेल. |
|- | |- | ||
Line 381: | Line 377: | ||
|- | |- | ||
|09:44 | |09:44 | ||
− | |आपल्याला काही तपशील बघायला मिळेल: | + | |आपल्याला काही तपशील बघायला मिळेल: जसे की, '''commit message''' , आपण किती फाईल्समधे बदल केले आहेत, आपण किती गोष्टी समाविष्ट केल्या आणि फाईलचे नाव. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 437: | Line 429: | ||
|- | |- | ||
|11:00 | |11:00 | ||
− | |थोडक्यात, आपण या पाठात शिकलो: | + | |थोडक्यात, आपण या पाठात शिकलो: '''Git''' रिपॉझिटरी आणि '''git init, status, commit ''' आणि ''' log''' सारख्या '''Git''' च्या काही मूलभूत कमांडस. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 479: | Line 469: | ||
|- | |- | ||
|12:08 | |12:08 | ||
− | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून | + | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |
|} | |} |
Latest revision as of 11:49, 17 April 2017
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Basic commands of Git वरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | या पाठात शिकणार आहोत: Git रिपॉझिटरी आणि Git च्या काही मूलभूत कमांडस. |
00:13 | या पाठासाठी वापरणार आहोत: उबंटु लिनक्स 14.04, Git 2.3.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर. |
00:23 | तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता. |
00:27 | या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे. |
00:34 | नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:40 | Git रिपॉझिटरी म्हणजे काय ते पाहू. |
00:44 | Git रिपॉझिटरी म्हणजे आपल्या प्रोजेक्टचा सर्व डेटा संचित करणारा एक फोल्डर. |
00:50 | जो तुमच्या स्वतःच्या किंवा दूरच्या मशीनवर स्थित असू शकतो. |
00:55 | साधारण फोल्डर आणि Git रिपॉझिटरी यामधील फरक म्हणजे- |
01:00 | साधारण फोल्डरमधे केवळ फाईल्स आणि डिरेक्टरीजचा समावेश असतो. |
01:04 | परंतु Git रिपॉझिटरी मधे संपूर्ण हिस्ट्रीसहित फाईल्स आणि डिरेक्टरीजचा संच समाविष्ट असतो. |
01:11 | आता स्वतःच्या मशीनवर Git रिपॉझिटरी तयार करण्याबद्दल जाणून घेऊ. |
01:17 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा. |
01:22 | मी माझ्या मशीनवर Home डिरेक्टरीमधे Git रिपॉझिटरी डिरेक्टरी बनवत आहे. |
01:28 | तुमच्या मशीनवर तुम्ही हव्या त्या ठिकाणी डिरेक्टरी बनवू शकता. |
01:33 | डिफॉल्ट रूपात आपण Home डिरेक्टरीमधे आहोत. |
01:37 | टाईप करा: mkdir space mywebpage आणि एंटर दाबा. |
01:44 | अशाप्रकारे आपण Home डिरेक्टरीमधे "mywebpage" ही डिरेक्टरी तयार केली आहे. |
01:49 | या डिरेक्टरीमधे जाण्यासाठी टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा. |
02:00 | "mywebpage" डिरेक्टरीला Git रिपॉझिटरी बनण्यासाठी टाईप करा: git space init आणि एंटर दाबा. |
02:08 | “Initialized empty Git Repository” असा मेसेज दिसेल. |
02:13 | हे Git यशस्वीरित्या सुरू झाल्याचे दाखवते. |
02:17 | आणि हा आपल्या सिस्टीममधील Git रिपॉझिटरीचा पाथ दाखवत आहे. |
02:24 | इनिशियलायझेशन नंतर mywebpage फोल्डरच्या आत dot git हा हिडन फोल्डर तयार होईल. |
02:32 | हिडन फोल्डर बघण्यासाठी टाईप करा: ls space hyphen a आणि एंटर दाबा. |
02:39 | हे dot git फोल्डर दाखवेल. हा dot git फोल्डर डिलीट केल्यावर संपूर्ण रिपॉझिटरी डिलीट होईल. |
02:47 | त्यामुळे ह्या dot git फोल्डरच्या बाबतीत अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. |
02:51 | आता आपल्याला Git साठी ओळख सेट करणे आवश्यक आहे. |
02:55 | इ-मेल ऍड्रेस सेट करण्यासाठी टाईप करा: git space config space hyphen hyphen global space user dot email space priya[dot]spoken@gmail.com आणि एंटर दाबा. |
03:12 | येथे मी priya[dot]spoken[at]gmail[dot]com हा इमेल वापरला आहे. |
03:18 | तुम्ही तुमचा वैध/उपलब्ध इमेल ऍड्रेस वापरू शकता. |
03:21 | युजरनेम सेट करण्यासाठी टाईप करा: git space config space hyphen hyphen global space user dot name space Priya आणि एंटर दाबा. |
03:36 | मी "Priya" हे युजरनेम वापरले आहे. "Priya" या नावाच्या जागी तुम्ही तुमचे नाव वापरा. |
03:43 | आपण सेट केलेले नाव आणि इमेल ऍड्रेस हा Git वर काम करणा-या व्यक्तीची ओळख आहे. |
03:51 | मी commit मेसेज देण्यासाठी gedit text editor कॉनफिगर करणार आहे. |
03:57 | टाईप करा: git space config space hyphen hyphen global space core dot editor space gedit आणि एंटर दाबा. |
04:09 | आता Git वर gedit कॉनफिगर झाले आहे. |
04:14 | येथे 'global' हा फ्लॅग ऐच्छिक आहे. |
04:17 | global फ्लॅगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या स्लाईडवर जाऊ. |
04:22 | एका मशीनवर अनेक रिपॉझिटरीज बनवता येतात. |
04:26 | hyphen hyphen global हा फ्लॅग वापरल्यास ही सेटिंग्ज मशीनवरील सर्व रिपॉझिटरीजना लागू होईल. |
04:34 | त्यामुळे जेव्हा तुम्ही नवी Git रिपॉझिटरी बनवाल तेव्हा ही सेटिंग्ज डिफॉल्ट रूपात लागू होतील. |
04:42 | तुम्हाला एखाद्या विशिष्ट रिपॉझिटरीजलाच ओळख द्यायची असल्यास hyphen hyphen global फ्लॅग वापरू नका. |
04:49 | पुन्हा टर्मिनलवर जाऊ. |
04:51 | आपण मागे सेट केलेल्या ओळखीचा कॉनफिगरेशन तपशील तपासू. |
04:57 | टाईप करा: git space config space hyphen hyphen list आणि एंटर दाबा. |
05:04 | आता आपण एडिटरचे नाव, इमेल ऍड्रेस आणि युजरनेम पाहू शकतो. |
05:10 | मी येथे 'html' फाईल्स वापरणार आहे. |
05:14 | तुम्ही कोणत्याही प्रकारची फाईल वापरू शकता. उदाहरणार्थ टेक्स्ट किंवा डॉक फाईल्स. |
05:22 | टर्मिनलवर परत जाऊ. मी प्रॉम्प्ट क्लियर करून घेत आहे. |
05:26 | आता टाईप करा: gedit space mypage.html space ampersand. |
05:34 | तुम्ही इतर कुठली फाईल वापरत असल्यास "mypage.html" च्या जागी तुमच्या फाईलचे नाव द्या. |
05:41 | प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी '&' (अँपरसँड) चा वापर केला आहे. आता एंटर दाबा. |
05:47 | मी आधीच सेव्ह करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंटमधून काही कोड या फाईलमधे कॉपी-पेस्ट करणार आहे. |
05:54 | अशाचप्रकारे काही मजकूर तुमच्या फाईलमधे समाविष्ट करा. |
05:58 | मी फाईल सेव्ह करत आहे. |
06:00 | आता माझ्याकडे काही कोड लिहिलेली html फाईल आहे. |
06:05 | एक सूचना: जिथे मी mypage.html वापरत आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फाईलचे नाव वापरा. |
06:13 | आपण Git ला "mypage.html" या फाईलला फॉलो करायला सांगणार आहोत. |
06:18 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा: git space add space mypage.html आणि एंटर दाबा. |
06:27 | आता Git चे स्टेटस तपासून बघू. त्यासाठी टाईप करा: git space status आणि एंटर दाबा. |
06:36 | “new file: mypage.html” असा मेसेज दिसेल. याचा अर्थ Git ने "mypage.html" या फाईलमधे होणारे बदल फॉलो करायला सुरूवात केली आहे. |
06:48 | याला tracking असे म्हणतात. |
06:51 | आपल्या mypage.html या फाईलवर जाऊ. |
06:55 | आणि या फाईलमधे कोडच्या आणखी काही ओळी समाविष्ट करूया. |
06:58 | मी Writer फाईलमधून कोड कॉपी-पेस्ट करणार आहे. |
07:06 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
07:10 | पुन्हा टर्मिनलवर जा. मागीलप्रमाणेच Git चे चालू स्टेटस तपासण्यासाठी टाईप करा: git space status आणि एंटर दाबा. |
07:21 | हे :“Changes not staged for commit:” आणि “modified: mypage.html” असे दाखवत आहे. |
07:28 | याचा अर्थ आपण केलेले बदल staging area मधे समाविष्ट झालेले नाहीत. |
07:34 | Staging area बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर जाऊ. |
07:39 | Staging area ही एक फाईल आहे जी केलेल्या बदलांची माहिती संचित करते जे कमिट करणे आवश्यक आहे. |
07:46 | कमिट करण्यापूर्वी फाईलमधील घटक staging area मधे समाविष्ट करणे गरजेचे आहे. |
07:51 | आपण पुढील पाठात कमिट बद्दल अधिक जाणून घेऊ. |
07:56 | Git ची जुनी वर्जन्स staging area ऐवजी index ही टर्म वापरत. |
08:01 | फाईलमधील नवे बदल staging area मधे समाविष्ट कसे करायचे हे जाणून घेऊ. |
08:07 | टर्मिनलवर जाऊ. प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ. |
08:11 | टाईप करा: git space add space mypage dot html आणि एंटर दाबा. |
08:19 | Git स्टेटस तपासण्यासाठी टाईप करा: git space status आणि एंटर दाबा. |
08:26 | “Changes to be committed” असा मेसेज दिसेल. |
08:30 | याचा अर्थ फाईल staging area मधे समाविष्ट झाली आहे आणि कमिट करण्यासाठी तयार आहे. |
08:37 | आता आपण या ठिकाणी आपला कोड freeze करू. |
08:40 | आपले काम एका विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचले की आपण ते रिपॉझिटरीमधे सेव्ह करू शकतो. त्याला कमिट म्हणतात. |
08:49 | प्रत्येक कमिट हे युजरनेम, इमेल-आयडी, तारीख, वेळ आणि कमिट मेसेज सहित सेव्ह होते. |
08:57 | कमिट कसे करायचे ते पाहू. टर्मिनलवर जाऊन टाईप करा: git space commit आणि एंटर दाबा. |
09:07 | कमिट मेसेज घेण्यासाठी gedit हा टेक्स्ट एडिटर आपोआप उघडेल. |
09:13 | पहिल्या ओळीवर मी कमिट मेसेज म्हणून “Initial commit” असे टाईप करत आहे. |
09:18 | तुम्ही कुठलाही माहितीपूर्ण मेसेज टाईप करू शकता. |
09:22 | येथे hash ने सुरू होणा-या काही ओळी बघू शकतो. तुम्ही त्या तशाच ठेवू शकता किंवा त्या डिलिट करू शकता. |
09:30 | hash च्या ओळीच्या आधी किंवा नंतर कमिट मेसेज लिहा. |
09:35 | भविष्यात या कमिट मेसेजच्या सहाय्याने या स्तरापर्यंत आपण काय केले होते हे जाणून घेऊ शकतो. |
09:41 | एडिटर सेव्ह करून बंद करा. |
09:44 | आपल्याला काही तपशील बघायला मिळेल: जसे की, commit message , आपण किती फाईल्समधे बदल केले आहेत, आपण किती गोष्टी समाविष्ट केल्या आणि फाईलचे नाव. |
09:56 | आता git log कमांड वापरून कमिटचा तपशील बघू शकतो. |
10:00 | टाईप करा: git space log आणि एंटर दाबा. |
10:06 | आपल्या रिपॉझिटरीमधे केवळ एकच कमिट आहे. |
10:09 | हे एक युनिक ID दाखवते ज्याला commit hash किंवा SHA-1 hash म्हणतात. |
10:16 | SHA-1 hash बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर जाऊ. |
10:20 | SHA-1 hash हा 40 अल्फा-न्युमरिक कॅरॅक्टर्स असलेला युनिक आयडी असतो. |
10:25 | Git त्याच्या डेटाबेसमधे सर्व माहिती hash value म्हणून संचित करतो. |
10:31 | Git कमिटस हे SHA-1 hash या नावाने ओळखले जातात. |
10:35 | SHA-1 hash चे महत्व तुम्हाला पुढच्या पाठांत सांगितले जाणार आहे. |
10:41 | टर्मिनलवर जाऊ. |
10:43 | येथे कमिट चा तपशील जसे की, लेखकाचे नाव, इमेल ऍड्रेस, तारीख, वेळ आणि आपण आधी दिलेला कमिट मेसेज दाखवत आहे. |
10:56 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
11:00 | थोडक्यात, आपण या पाठात शिकलो: Git रिपॉझिटरी आणि git init, status, commit आणि log सारख्या Git च्या काही मूलभूत कमांडस. |
11:14 | असाईनमेंट- तुमच्या मशीनवर एक डिरेक्टरी बनवून तिची रिपॉझिटरी बनवा. |
11:20 | टेक्स्ट फाईल तयार करून त्यात काही मजकूर लिहा. |
11:25 | Git रिपॉझिटरीच्या staging area मधे ही फाईल समाविष्ट करा. |
11:29 | तुमच्या रिपॉझिटरी मधे फाईल कमिट करा आणि |
11:32 | git log कमांड वापरून कमिटचा तपशील पहा. |
11:35 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:43 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:55 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:02 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:08 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |