Difference between revisions of "Drupal/C3/Controlling-Display-of-Images/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
 
{|border=1
 
{|border=1
 
| '''Time'''
 
| '''Time'''
Line 354: Line 353:
 
|-
 
|-
 
| 07:19
 
| 07:19
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 15:50, 12 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या 'Controlling Display of Images' वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोतः 'Image styles' आणि 'photo gallery view'.
00:12 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, 'उबंटु लिनॅक्स ऑपरेटिंग सिस्टीम', 'Drupal' 8 आणि 'Firefox' वेब ब्राउजर.
00:21 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:25 आधी तयार केलेली वेबसाईट उघडू.
00:29 ड्रुपलमधे साईटच्या गरजेनुसार आपण इमेजचा साईज आणि स्केल बदलू शकतो.
00:37 ड्रुपल मूळ इमेज घेतो आणि आपल्याला हवे त्याप्रमाणे त्याची साईज आणि स्केल बदलतो.
00:43 नंतर फाईलचे हे वर्जन सेव्ह करतो.
00:46 'Configuration' क्लिक करा.
00:48 आपण येथे 2 'image styles' बनवणार आहोत.
00:51 खाली स्क्रोल करा आणि 'MEDIA tab' वर जा.
00:54 येथे आपण 'Image Styles' पाहू शकतो. यावर क्लिक करा.
00:58 आपण 'table' साठी 'Image style' बनवू जे आपण सेटप केले आहे.
01:03 तसेच पुढच्या 'view' साठीही करू जो आपण 'logos' च्या ग्रिडसाठी बनवणार आहोत.
01:09 'Add image styles' क्लिक करा.
01:12 'Image style name' मधे आपण टाईप करू "Upcoming Events 150 x 150".
01:19 लक्षात घ्या की ड्रुपल आपल्यासाठी 'machine name' भरेल.
01:23 हे आपले 'Image style name' आहे.
01:26 आता 'Create new style' क्लिक करा.
01:29 डाव्या बाजूला, मूळ इमेज, 600 बाय 800 pixels आहे आणि इमेजचे एडिट केलेले वर्जन उजवीकडे आहे.
01:38 'EFFECT' खाली ड्रॉपडाउनमधे 'Select a new effect' क्लिक करा.
01:42 या सूचीत अनेक पर्याय दाखवले गेले आहेत. यातील 'Scale and crop' इफेक्ट निवडू.
01:49 तुमच्या आवडीनुसार कुठलाही पर्याय निवडू शकता, उदाहरणार्थ, 'Rotate, Resize' किंवा अन्य कोणताही.
01:56 'Add' बटनावर क्लिक करा.
01:58 'Width' '150' आणि 'Height' '150' टाईप करा.
02:02 लक्षात ठेवा की मूळ इमेजपेक्षा 'Width' आणि 'Height' जास्त नसावी.
02:07 असे केल्याने इमेज पिक्सलेट केली जाते.
02:11 'Add effect' क्लिक करा.
02:13 येथे आपली नवी 'Image Style' आहे. उजवीकडील इमेजमधे आपण पाहू शकतो की आता स्केल्ड आणि क्रॉप्ड झाली आहे.
02:22 आणखी एक बनवू. 'Image styles' क्लिक करा. आणि नंतर 'Add image styles' बटनावर क्लिक करा.
02:29 यावेळी, 'Image style name' मधे टाईप करू: "photo gallery of logos"
02:35 'Create new style' बटनावर क्लिक करा.
02:38 ही इमेज तुमच्या मशीनवरील कोणत्याही 'photo gallery' मधे असू शकेल.
02:42 हे कोणत्याही इमेजसाठी, कोणत्याही फिल्डमधे आणि कंटेंटमधे करू शकतो.
02:47 पुन्हा 'Select a new effect' क्लिक करा. आणि परत 'Scale and crop' पर्याय निवडा.
02:53 'Add' बटनावर क्लिक करा. आता 'Width' '300' आणि 'Height' '300' टाईप करा.
03:00 आणि परत 'Add effect' बटनावर क्लिक करा.
03:03 लक्षात घ्या की उजवीकडील इमेज आता 300 बाय 300 या नव्या डायमेन्शनमधे आहे.
03:09 येथे दिसेल की ड्रुपल प्रत्येक 'Image style' साठी इमेजचे एक वर्जन बनवतो आणि त्यांना 'site' वर संचित करतो.
03:18 'Structure' क्लिक करा. नंतर 'Views' क्लिक करा.
03:21 आता Edit क्लिक करा. आपल्या 'Upcoming Events view' ला अपडेट करा.
03:27 'Event Logo' क्लिक करा. आणि 'Image Style' ला 'Upcoming Events' ने बदला.
03:33 नंतर 'Apply' क्लिक करा.
03:36 प्रिव्ह्यू सेक्शनमधे खाली स्क्रोल करा. आपल्याला दिसेल की सर्व लोगो युनिफॉर्म आहेत.
03:42 आता 'Save' क्लिक करा.
03:45 'Back to site' क्लिक करा. हा आपल्या वेबसाइटवरील आपला व्ह्यू आहे.
03:50 अशापध्दतीने 'Image Styles' कार्य करतात.
03:53 आता या सर्व इवेंट्ससाठी, ग्रिड लेआउट स्वरूपात नवा view बनवू.
03:59 असे करण्यासाठी, 'Structures' क्लिक करा. नंतर 'Views' आणि 'Add new view' क्लिक करा.
04:05 आपण ह्यास 'Photo Gallery' नाव देऊ.
04:09 'view' सेटिंगला 'Events' प्रकाराचा 'Content' सेट करा.
04:14 'photo-of-the-day' किंवा इमेज गॅलरीसाठी ह्या 'view' चा कोणत्याही इवेंटमधे वापर करता येईल.
04:22 'Create a page' क्लिक करा.
04:25 खाली स्क्रोल करा आणि 'fields' साठी 'Grid' क्लिक करा.
04:29 लक्षात ठेवा, आपण ड्रॉप-डाउन मधे ड्रुपलने दिलेल्या कोणताही इतर पर्याय निवडू शकतो.
04:36 'Items to display' फिल्ड मधे, '9' निवडा. हा 3 बाय 3 grid दाखवतो.
04:42 'Create a menu link' चेक करा.
04:46 'Menu' ड्रॉप-डाउनमधे, 'Main navigation' पर्याय निवडा.
04:51 परत 'Save and Edit' क्लिक करा.
04:54 आपले 5 निकष परत तपासू. 'Display' हे 'Page' आहे.
04:59 'Format' हे एक 'Grid' आहे.
05:01 येथे 'Title' नावाचे केवळ एक 'Field' आहे.
05:04 आणि शेवटीः 'Filter' आणि 'Sort Criteria'
05:08 आत्तासाठी आपण ते असेच ठेवू.
05:12 खाली स्क्रोल करा. येथे आपल्याला दिसेल की आपल्याकडे 4 'columns' आणि 9 'events' आहेत.
05:17 'Format' मधे कॉलम्सची संख्या बदलण्यासाठी, 'Settings' पर्याय निवडा.
05:22 नंतर कॉलम्सची संख्या 3 करा आणि 'Apply' क्लिक करा.
05:28 हे आपल्याला 3 बाय 3 ग्रिड देईल.
05:31 'Fields' मधे 'Add' क्लिक करा.
05:34 'Event Logo' वर जाऊ, यावर चेक-मार्क करू आणि परत 'Apply' क्लिक करू.
05:40 यावेळी, 'Image style मधे photo gallery of logos' निवडू.
05:45 'Link image to' मधे 'Content' निवडा आणि 'Apply' क्लिक करा.
05:50 लगेच खाली प्रिव्ह्यू सेक्शन मधे ग्रिड दाखवले जाईल.
05:55 आपल्याला दिसेल की ग्रिड लेआउट 'table' पेक्षा वेगळा आहे.
06:00 सर्व 'fields' ज्यांना आपण नोडमधून घेतले आहे, एका सेलमधे आहेत.
06:05 आणि आपण ठरवू शकतो की आपल्याला किती सेल्स दाखवायच्या आहेत.
06:09 'Save' क्लिक करा.
06:12 'Back to site' बटनावर क्लिक करा. आणि नंतर 'Photo Gallery' क्लिक करा.
06:17 हे चांगले दिसत आहे.
06:19 मोबाइलसारख्या छोट्या उपकरणांवर, आपले 3 बाय 3 ग्रिड दाखवण्यासाठी सर्व इमेजेसचे स्केल कमी होते.
06:26 आणि हेच ड्रुपल ग्रिडसाठी करतो.
06:29 याचबरोबर आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात,
06:34 या पाठात शिकलो, 'Image styles' आणि 'photo gallery view' .
06:44 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
06:53 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
07:00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:19 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana