Difference between revisions of "Digital-Divide/C2/How-to-use-FOSSEE-Netbook/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 59: | Line 59: | ||
| याची रचना शिक्षण आणि संशोधनासाठी केली गेली आहे. | | याची रचना शिक्षण आणि संशोधनासाठी केली गेली आहे. | ||
− | | | + | |- |
| 00:57 | | 00:57 | ||
| आयात शुल्क व कर सोडून त्याची अंदाजे किंमत "रू 5,000” असेल. | | आयात शुल्क व कर सोडून त्याची अंदाजे किंमत "रू 5,000” असेल. |
Revision as of 13:08, 12 April 2017
Time | Narration |
00:01 | नमस्कार. IIT मुंबईमधे रूपरेखा तयार केलेल्या कमी किमतीच्या FOSSEE Netbook वरील स्पोकन ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
00:09 | आपण शिकणार आहोत, |
00:12 | FOSSEE Netbook चा डेस्कटॉप, |
00:14 | त्या सोबत येणारे काही प्रोग्रॅम्स, |
00:17 | आणि नव्या रिलीजेससाठी ऑपरेटिंग सिस्टीम अपडेटस. |
00:22 | आपण याला FOSSEE Netbook म्हणतो कारण, |
00:26 | FOSSEE Team ने याची स्पेसिफिकेशन्स बनवली आहेत. |
00:30 | ऑपरेटिंग सिस्टीममधे सुयोग्य बदल केले आहेत. |
00:32 | त्याचे सॉफ्टवेअर वितरीत केले आहे. |
00:35 | आणि त्याची अपडेटस आणि ट्रेनिंग पुरवली आहेत. |
00:38 | ही ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु लिनक्सच्या नव्या आवृत्तीपासून तयार केली आहे. |
00:43 | FOSSEE Netbook आयआयटी मुंबईत सुरु केलेले कमी किमतीचा लॅपटॉप आहे. |
00:49 | दिलेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार याचे उत्पादन Basics Comtech Pvt. Ltd ने केले आहे. |
00:55 | याची रचना शिक्षण आणि संशोधनासाठी केली गेली आहे. |
00:57 | आयात शुल्क व कर सोडून त्याची अंदाजे किंमत "रू 5,000” असेल. |
01:03 | हा पाठ रेकॉर्ड करण्यास, FOSSEE Netbook, |
01:08 | GNU / लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे FOSSEE डिस्ट्रीब्युशन |
01:12 | आणि Kazam स्क्रीन रेकॉर्डर वर्जन “1.4.5” वापरत आहोत. |
01:17 | आता FOSSEE Netbook विषयी जाणून घेऊ. |
01:20 | हे FOSSEE Netbook आहे. |
01:24 | ह्याचे वजन अंदाजे “700” ग्रॅम आहे. |
01:28 | डिस्प्ले “10 इंच" असून टचपॅड सुविधा उपलब्ध आहे. |
01:31 | फ्रंट कॅमेरा आणि दोन बिल्ट इन स्पीकर्स आहेत. |
01:35 | दोन रेग्युलर USB ports, एक मिनी HDMI port आणि एक LAN port आहे. |
01:43 | ऑडिओ सपोर्टसाठी हेडफोन आणि माईकचे स्वतंत्र जॅक उपलब्ध आहेत. |
01:49 | ह्यात “32GB” पर्यंत सपोर्ट करणारा SD card चा “slot” आहे. |
01:56 | ह्यामधे 5000 mAH ची बॅटरी आहे. |
1.58 | वापरत असलेल्या प्रोग्रॅमनुसार ती चार ते आठ तासांचा बॅकप देते. |
02:04 | ह्यामधे 1GB RAM आणि 8GB ROM आहे. |
02:07 | wi-fi आणि Bluetooth सपोर्ट देखील आहे. |
02:11 | हार्डवेअरच्या स्पेसिकेशन्सबद्ल अधिक माहितीसाठी http://netbook.fossee.in साईटला भेट द्या. |
02:19 | FOSSEE OS च्या रिकव्हरी/अपडेट/री-इन्स्टॉलेशन साठी युजरने पुढील गोष्टी कराव्यात. |
02:25 | netbook.fossee.in/recovery मधे दिलेल्या सूचनांनुसार sdcard तयार करा. |
02:33 | FOSSEE Netbook बंद करा. |
02:35 | स्लॉटमधे sdcard घालून, पॉवरचे बटण बराच वेळ दाबून धरा. |
02:41 | "'Entering recovery mode...'" मेसेज स्क्रीनवर दाखवला गेला पाहिजे. |
02:46 | पुढील स्क्रीनमधे दाखवलेला योग्य पर्याय निवडा. |
02:51 | येथे 'FOSSEE OS असलेला FOSSEE Netbook चा डेस्कटॉप दिसेल. |
02:57 | डिफॉल्ट रूपात डेस्कटॉपवर काही आयकॉन्स दिसतील. |
03:01 | कुठल्याही संगणकाप्रमाणे आयकॉनवर डबल क्लिक केल्यावर ते ऍप्लिकेशन उघडता येते. |
03:09 | येथे उजवीकडे खाली Network connection आयकॉन आहे. |
03:15 | सध्या तो No network connection असे दाखवत आहे. |
03:18 | network ची जोडणी कशी करायची ते पाहू. |
03:21 | “wi-fi” कनेक्शनसाठी आयकॉनवर क्लिक करा. |
03:25 | आधीपासूनच उपलब्ध असलेल्या कनेक्शन्सची सूची दाखवली जाईल. |
03:30 | तुमच्याकडे wi-fi network चा पासवर्ड असल्यास, यापैकी कोणाशीही कनेक्ट करू शकता. |
03:35 | आपल्या मशीनवर उपलब्ध असलेल्या नेटवर्कपैकी एक निवडू. |
03:40 | नंतर पासवर्ड टाईप करून Connect बटणावर क्लिक करू. |
03:46 | सिस्टीम ट्रेमधील नेटवर्कच्या आयकॉनकडे लक्ष द्या. |
03:50 | आता आयकॉन बदलला आहे. |
03:52 | हे आपण ज्या नेटवर्कशी जडलेले आहोत त्याचे नाव दाखवत आहे. |
03:57 | आता डेस्कटॉपच्या डाव्या बाजूच्या कोप-यात खाली बघा. |
04:03 | येथे Start मेनू दिसेल, जो मुख्य मेनू आहे. |
04:07 | Start मेनूमधे उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशनची वर्गवार सूची दिसेल. |
04:14 | सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशनची सूची बघण्यास प्रत्येक कॅटॅगरीवर क्लिक करा. |
04:21 | त्यापैकी काही पाहू. |
04:24 | Education ह्या भागात ही सर्व ऍप्लिकेशन्स आहेत. |
04:28 | येथे GeoGebra दिसेल. |
04:31 | बीजगणित आणि भूमितीच्या संकल्पना शिकण्यास, हे एक उत्तम विनामूल्य सॉफ्टवेअर आहे. |
04:37 | विशेषतः हे इयत्ता सहावी वा पुढील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. |
04:41 | स्पोकन ट्युटोरियल टीमने GeoGebra शिकण्यास उत्तम असे पाठ बनवले आहेत. |
04:47 | हे http://spoken-tutorial.org वर विनामूल्य उपलब्ध आहेत. |
04:53 | ही लिंक ब्राऊजर विंडोमधे अशी दिसेल. |
04:57 | तुम्ही बघू शकता की हे पाठ अनेक भारतीय भाषांमधे उपलब्ध आहेत. |
05:03 | साईटच्या पानावर दिसत असलेली अशी अनेक विनामूल्य सॉफ्टवेअर्स नेटबुकवर उपलब्ध आहेत. |
05:10 | आपण ती लवकरच पाहू. |
05:13 | पुन्हा Start menu वर जाऊ. |
05:15 | Jmol हे आणखी एक सॉफ्टवेअर पाहू. |
05:19 | रासायनिक रचना जसे की मूलद्रव्ये, बंध इत्यादी “3D” मधे बघण्यास, हे अतिशय उपयोगी आहे. |
05:26 | स्पोकन ट्युटोरियलच्या साईटवर Jmol चे पाठ अनेक भाषांमधे उपलब्ध आहेत. |
05:33 | Start मेनूमधे Graphicsचा भाग पाहू. |
05:40 | येथे GIMP, Inkscape आणि XFig दिसेल. |
05:46 | स्पोकन ट्युटोरियलच्या साईटवर GIMP, Inkscape आणि XFig चे अनेक पाठ उपलब्ध आहेत. |
05:54 | ह्या पाठांचा उपयोग, ही ग्राफिक सॉफ्टवेअर्स शिकण्यास करू शकता. |
06:01 | आता इंटरनेट हा भाग पाहू. येथे हे पर्याय आहेत. |
06:07 | येथे Firefox वेब ब्राऊजर आहे. |
06:10 | येथे Firefox कसे वापरायचे ह्या संदर्भातील पाठ...... |
06:15 | …....अनेक भारतीय भाषांमधे उपलब्ध आहेत. |
06:20 | Office प्रकाराखाली संपूर्ण LibreOffice Suite आहे-
Writer Calc Impress Base Draw Math |
06:31 | स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर संपूर्ण LibreOffice Suite वरील पाठ आहेत. |
06:37 | आता Programming विभागावर जाऊ. |
06:40 | येथे आपण iPython बघू शकतो. |
06:43 | वेबसाईटवर Python वरील पाठांची मालिका आहे. |
06:47 | तसेच येथे Scilab देखील उपलब्ध आहे. |
06:50 | Scilab शिकण्यास स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर पाठ उपलब्ध आहेत. |
06:56 | तसेच Code Blocks आणि Geany सारखे IDEs सुध्दा आहेत. |
07:01 | यासाठीचे पाठ अजून उपलब्ध नाहीत. |
07:05 | परंतु तुम्ही इंटरनेटवर शोध घेतल्यास, ह्या संदर्भातील उपयुक्त माहिती मिळू शकेल. |
07:12 | आता Sound & Video मधील ऍप्लिकेशन पाहू. |
07:17 | आपल्याकडे Audacity आहे जे ऑडिओ ट्रॅक्स रेकॉर्ड करण्यास वापरले जाते. |
07:22 | हे Audacity वापरण्या संदर्भातील पाठ आहेत. |
07:26 | Preferences मधे Desktop, Keyboard, Monitor, Network इत्यादी कस्टमाईज करण्याचे पर्याय आहेत. |
07:33 | Customize look & feel पर्यायावर क्लिक करा. |
07:37 | डिफॉल्ट रूपात आपण Widget टॅबवर आहोत. |
07:40 | येथे दाखवलेल्या विंडोजची डिफॉल्ट थीम बदलता येऊ शकते. |
07:45 | उपलब्ध सूचीतून तुमच्या पसंतीची थीम निवडा. |
07:51 | इतर सर्व टॅब्स आणि त्यातील पर्यायांबद्दल आपण पुढील पाठांत सविस्तर जाणून घेऊ. |
07:57 | Logout हा पर्याय शटडाऊन करण्यास, स्क्रीन लॉक किंवा लॉगआऊट करण्यास वापरला जातो. |
08:03 | Cancel बटणावर क्लिक करू. |
08:05 | Start मेनूचा बाजूचा आयकॉन, हा डेस्कटॉपवर जाण्याचा शॉर्टकट आहे. |
08:10 | त्यावर क्लिक करू. |
08:12 | हे उघडलेल्या सर्व विंडो छोट्या करेल आणि केवळ डेस्कटॉप दाखवेल. |
08:18 | आता डेस्कटॉपवरील काही आयकॉन्स पाहू. |
08:23 | येथे Terminal आहे. |
08:25 | हा कमांड लाईन इंटरफेस आहे. |
08:28 | Terminal चा वापर शिकण्यास, BOSS Linux वरील स्पोकन ट्युटोरियलवरील चे पाठ पहा. |
08:34 | File Manager हे विंडोज OS मधील My Computer प्रमाणे कार्य करते. |
08:39 | या विंडोमधून तुम्ही कुठल्याही फोल्डर किंवा फाईलवर जाऊ शकता. |
08:47 | Software Center च्या सहाय्याने, हवी असलेली सर्व सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येतात. |
08:58 | FOSSEE OS सपोर्ट करत असलेल्या सर्व भाषा Language Support मधे दिसतील. |
09:05 | आपल्याला डेस्कटॉपवर Readme नावाची “pdf” दिसेल. |
09:10 | ही “pdf” उघडून वाचा. |
09:17 | ही तुम्हाला Netbook चा थोडक्यात गोषवारा देईल. |
09:27 | अशाप्रकारे आपण FOSSEE Netbook पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:33 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,कार्यशाळा चालविते परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते |
09:48 | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
09:51 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
09:57 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:04 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. धन्यवाद. |