Difference between revisions of "Biogas-Plant/C3/Laying-the-foundation/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 1: | Line 1: | ||
{| Border =1 | {| Border =1 | ||
− | | | + | |'''Time''' |
− | | | + | |'''Narration''' |
|- | |- | ||
Line 136: | Line 136: | ||
|- | |- | ||
− | |03:54 | + | | 03:54 |
| हे मिश्रण पुढील प्रमाणे तयार करा- | | हे मिश्रण पुढील प्रमाणे तयार करा- | ||
Line 156: | Line 156: | ||
|- | |- | ||
− | |04:17 | + | | 04:17 |
| आता हे द्रव्य कोरड्या रेती - सिमेंटच्या मिश्रणात एकत्र करा. | | आता हे द्रव्य कोरड्या रेती - सिमेंटच्या मिश्रणात एकत्र करा. | ||
Latest revision as of 12:08, 11 April 2017
Time | Narration |
00:01 | नमस्कार मित्रांनो. बायोगॅस संयंत्राच्या पाया बाधाण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:09 | हा ट्युटोरियल खास गवंडयांसाठी उपयोगी आहे. |
00:13 | आता आपण बायोगॅस संयंत्र कसे बांधायचे या बद्दल जाणून घेणार आहोत. हे दीनबंधू प्रतिमे वर आधारित आहे आणि याची क्षमता २ घनमीटरची आहे. |
00:26 | सुरवात करण्यासाठी खालील गोष्टी माहित असले पाहिजे- |
00:30 | बायोगॅस संयंत्र मध्ये ३ विविध टॅंक्सचा समावेश आहे - मिश्रण टॅंक, डायजेस्टर टॅंक बरोबर घुमट आणि मळीचा टॅंक |
00:41 | खलील प्रमाणे या टॅंक्सचे आकारमान आहेत: |
00:45 | मिश्रण टॅंकचा व्यास २२ इंच आणि उंची २ फूट असावी. |
00:52 | गॅस धरणारा घुमटचा व्यास हा ७ फूट व ६ इंच आणि केंद्रातून उंची ४ फूट असावी. |
01:03 | वरचा मळीचा टॅंक हा ५ फूट २ इंच लांबी, ३ फुट २ इंच रुंदी, आणि ४ फुट खोल असावी. |
01:15 | खालचा मळीचा टॅंक हा २ फूट लांबी, २ फुट रुंदी आणि २ फुट २ इंच खोल असावी. |
01:24 | गवंड्यांना सोप्या पद्धतीने समजण्यासाठी हा विडीओ दिवसा नुसारच्या उपक्रमाने दाखवत आहे. |
01:33 | पहिल्या दिवशी बायोगॅस संयंत्राच्या जागेच्या क्षेत्रावर खोदकामास सुरू होते. |
01:40 | येथे दाखवल्या प्रमाणे, डायजेस्टर टॅंक, आणि माळीच्या टॅंकची रूपरेखा चिन्हांकित करण्यासाठी चुना पावडरचा वापर करा. |
01:50 | चुना पावडर कोणत्याही हार्डवेअर दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो. |
01:55 | क्षेत्र चिन्हांकित करून झाले की, खोदण्यास सुरु करा. |
01:59 | फावडयाचा वापर करून ८ फूट व्यास आणि ४ फूट खोल एक गोलाकार खडडा खोदा. |
02:07 | मोठ्या खाड्याला लागून एक दुसरा २ फुट ५ इंच लांबी, एक फुट रुंदी आणि ४ फुट खोल खडडा खोदा. |
02:21 | २ मजूर दोन दिवसात हा खड्डा खणू शकतात. |
02:25 | अन्यथा, ३ मजूर एका दिवसात हे कार्य पूर्ण करू शकतात. |
02:32 | खड्डाची कर्मभूमी अंतर्गोल आकाराची असावी आणि बाकी खड्ड्यांपेक्षा २ फुट खोल असावी. |
02:42 | शक्यतो खड्ड्याचे भिंती सरळ ठेवण्याचे प्रयेत्न केले पाहिजे. |
02:50 | येथे एका दिवसाचा उपक्रम पूर्ण होतो. |
02:53 | आता दुसर्या दिवसाचा उपक्रम सुरु करू. |
02:56 | दुसऱ्या दिवसाचे उपक्रम खालील प्रमाणे आहेत. |
03:00 | डायजेस्टर टॅंकसाठी पाया बसवा. |
03:03 | तरांची जाळी वापरून डायजेस्टर टॅंकसाठी घुमट बांधा. |
03:08 | मिश्रण टॅंक बांधा आणि |
03:12 | माळी टॅंकच्या भिंती तयार करा. |
03:15 | या ट्युटोरियलमध्ये आपण फक्त खड्डा खोदण्याचे आणि डायजेस्टर टॅंकसाठी पाया बसवण्याची पद्धत शिकणार आहोत. |
03:25 | इतर विषय पुढील ट्युटोरियलमध्ये शिकवले जातील. |
03:33 | तर, आता, आपण खड्ड्याचे खोदकाम पूर्ण केले आहे. आणि आपण पाया बांधण्यास तयार आहोत. |
03:41 | तर, आपण पाया तयार करण्यासाठी प्लास्टरचे मिश्रण तयार करू. |
03:46 | प्लास्टरचे मिश्रण म्हणजे रेती आणि सिमेंटचे मिश्रण. |
03:54 | हे मिश्रण पुढील प्रमाणे तयार करा- |
03:59 | वाळू - २०० किलो |
04:02 | सिमेंट - ६० किलो |
04:05 | रेती - १५० किलो |
04:09 | आणि २० लिटर पाण्यात २५० मिली लिटर वॉटरप्रूफिंग द्रव्य साहित्य मिसळा. |
04:17 | आता हे द्रव्य कोरड्या रेती - सिमेंटच्या मिश्रणात एकत्र करा. |
04:24 | मिश्रण एकत्र करताना पुरेस पाणी घालून घ्या जेणेकरून हे मिक्सिंग सतत घट्ट राहील. |
04:34 | चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण एकत्र करण्यास एक फावडा वापरा. |
04:40 | रेती-सिमेंटचे हे मिश्रण आता वापरण्यासाठी तयार आहे. |
04:46 | एक लहान थापी वापरून, ह्या मिश्रणने गोलाकार थापून घ्या. |
04:54 | प्लास्टरची जाडी जमिनी पासून ३ इंच असावी. |
05:00 | ह्या प्रकारे खड्ड्याचा मजला बांधला जाईल. खड्ड्याचा मजला अंतर्गोल आकारात आहे. |
05:10 | त्यामुळे, पायाचा आकार देखील अंतर्गोल असेल. |
05:16 | ह्या मिश्रणाने बाजूच्या भिंती काळजीपूर्वक ३ इंचा पर्यंत बांधा. मात्र अंतर्गोलाचा भाग वाढवू नये. |
05:28 | काळजी घ्या की - कडेचा भाग जाडसर असेल तर, लहान थापी वापरुन स्पाट करून घ्या. |
05:35 | घुमट योग्य संतुलनामध्ये असेल याची खात्री करा. |
05:42 | पाया उभारून झाल्यावर, सुखण्यास १२ तास तसेच ठेवा. |
05:49 | चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे, भारदस्त भिंती आणि अंतर्गोल खड्ड्याकडे लक्ष्य द्या. |
05:55 | तसेच, स्पाट केलेल्या कडांकडे लक्ष्य द्या. |
06:00 | याच बरोबर, येथे हा पाठ संपला. |
06:03 | थोडक्यात, या ट्युटोरियलमध्ये आपण बायोगॅस संयंत्राचे पाया बांधायला शिकलो. |
06:13 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील स्पोकन ट्युटोरियल संघ व Rural-ICT संघाच्या सूक्ताने तयार केला आहे. |
06:24 | या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
06:32 | स्पोकन ट्युटोरियल संघा बरोबर, मी रजनी भोसले Rural-ICT संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |