Difference between revisions of "Biogas-Plant/C2/Benefits-of-Biogas/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
 
{| Border = 1
 
{| Border = 1
! <center>Time</center>
+
|'''Time'''
! <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:57, 11 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार मित्रांनो “बायोगॅस आणि त्याचे फायदे” ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 तुमच्या घरातील हे सामान्य चूल आहे का?
00:09 तुमच्या घरात प्रत्येक दिवशी अश्याच प्रकारे अन्न शिजवले जाते का?
00:13 स्वयपाँकासाठी तुम्ही जी मेहनत घेऊन जळण आणता ती कमी करण्याची इच्छा आहे का?
00:18 तुम्ही तुमच्या पारंपरिक पद्धतीत जळण सरपणाचा व्यापार करू शकता का......?
00:23 आता ह्या पुढे अश्या प्रकारे तुमच्या घरात स्वंपकघराची व्यवस्था होऊ शकते.
00:28 कसे करायचे हे जाणून घेऊ? हा व्हिडिओ पहा.
00:31 “बायोगॅस आणि त्याचे फायदे” ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:36 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकुया- बायोगॅस बद्दल, कसे उत्पादन केली जाते आणि त्याचे उपयोग.
00:44 आपण बायोगॅस संयंत्र बद्दल देखील थोडक्यात जाणून घेणार आहोत.
00:48 बायोगॅस म्हणजे काय?
00:50 बायोगॅस एक वायुरूप इंधन आहे.
00:53 जैविक कचरा टाकल्या मुळे आंबलिय वायूरूप पदार्थ तयार होतो.
00:59 बायोगॅसचे मुख्य घटक मिथेन आहे.
01:03 बायोगॅस संयंत्राच्या वापरामुळे, बायोगॅस सहजपणे व मोफत तयार केले जाऊ शकते.
01:09 हे कुटुंबासाठी तयार केलेले बायोगॅस संयंत्र अश्या प्रकारे दिसते.
01:14 बायोगॅस संयंत्र वापरून काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
01:18 गावांमध्ये कौटुंबिक प्रकारे बायोगॅस संयंत्राची स्थापना, नैसर्गिक संसाधने संरक्षण करण्यास मदत करते.
01:25 तसेच गावातल्या लोकांची मुलभूत सुविधा उपलब्ध करून देते.
01:30 लांब अंतरापासून लाकूड गोळा करण्यात, महिलांचे कष्ट कमी करण्यात बायोगॅस संयंत्र मदत करते.
01:36 धुरकटलेल्या स्वंपाकघरामध्ये स्वयंपाकाच्या दरम्यान आरोग्य वाढण्यास मदत करते.
01:42 एकदा बांधल्यानंतर, बायोगॅस संयंत्राचे आयुष्य कमीत कमी २५ वर्ष टिकते.
01:48 बायोगॅस संयंत्राचे वापर आणि त्याचे देखरेख खूप सोपे आहे.
01:53 बायोगॅस निर्माणासाठी वापरला जाणारा कच्चा माल आहे-
01:57 स्वंपाकघरात निघणारा कचरा जसे पालेभाज्या व फळाची टरफले, उरलेले अन्न, अंड्यांची टरफले, हाडे, इ ...,
02:06 घरगुती ओला कचरा जसे घर स्वच्छ करण्यास वापरलेले पाणी, नासलेले दूध किंवा चहा, इत्याची.
02:13 संयंत्राचे साहित्य जसे गळलेली पाने, फुले, फांद्या, इ ...
02:19 आपण- शेतात निर्माण केलेला कचरा, गुरांची घाण, गुरांचे मल मुत्र आणि शौचाल्याचे घाण पाणी आणि मल मुत्र यांचा देखील वापर करू शकतो.
02:30 थोडक्यात आपण जाणून घेऊ बायोगॅस कसा निर्माण केला जातो.
02:35 ही घरघुती प्रकारची बायोगॅस संयंत्राची आकृती आहे.
02:39 आपण काय पाहतो की येथे मिश्रण टॅंक आहे जेथे आपण कच्चा माल टाकतो.
02:44 आतल्या पाईपातून बायोगॅस संयंत्राच्या आत हा कच्चा माल जातो.
02:49 आणि हा डायजेस्टर टॅंक आहे जेथे कच्च्या मालच्या आंबटामुळे बायोगॅस तयार होतो.
02:55 ह्याला कंपोस्ट टॅंक देखील म्हटले जाते.
02:59 हा बाहेरचा कॉक आहे जिथून संयंत्राच्या बाहेर बायोगॅस सोडला जातो.
03:05 खतासाठी बाहेरचा पाईप देखील आहे.
03:08 मळी टॅंकमध्ये खत गोळा करून खत म्हणून वपरण्यास शेतात घेऊन जाऊ शकतो.
03:15 एक घरघुती प्रकारे बायोगॅस संयंत्र बांधण्यास, किती जागा लागेल.
03:20 थोडक्यात, एक घरघुती प्रकारे बायोगॅस संयंत्र बांधण्यास, आपल्याला १२ फूट बाय ८ फूट जमिनीची जागा लागेल.
03:28 बायोगॅस संयंत्र बांधण्यास किती खर्च लागेल ह्याबद्दल चर्चा करणार आहोत.
03:33 बायोगॅस संयंत्र बंधण्याकरिता कमीत कमी खर्च २०,००० रु ते २३,००० रु आहे.
03:39 वरील रक्कम प्रत्येक ठिकाणी वेग वेगळे असु शकते.
03:43 काही बँका बायोगॅस संयंत्र बांधण्यास कृषी कर्ज उपलब्ध करून देतात.
03:48 बायोगॅस संयंत्र बांधून झाल्यानंतर सरकारकडून देखील सबसिडी दिली जाते.
03:54 जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायत द्वारे सरकार आदिवासी भागात अतिरिक्त सब्सिडीस देतात.
04:00 बायोगॅस संयंत्र, शौचल्य म्हणजे टॉयलेटला जोडले तर अतिरिक्त १२०० रुपये सबसिडी दिली जाते.
04:08 तपशील - बायोगॅस संयंत्र बंधण्याकरिता लागणारा खर्च, बँकेत कर्जासाठी अर्ज कसे करणे, आणि सब्सिडी याच श्रेणीतील ट्युटोरियलमध्ये शिकवले जातील.
04:20 आता बायोगॅसचे फायदे पाहू.
04:24 बायोगॅस व बायोगॅस संयंत्राचा वापर अतिशय उपयुक्त आहेत.
04:28 बायोगॅस हे एक पर्यावरणपूरक, गैर-प्रदूषण, ऊर्जाचे पुनर्वापरयोग्य स्रोत आहे.
04:34 LPG, रॉकेल आणि जळण हे सगळे वापरण्यापेक्षा बायोगॅस हे अतिशय चांगले आहे.
04:39 एकदा बायोगॅस संयंत्र बांधल्यानंतर हे मोफत मिळू शकते.
04:44 बायोगॅस संयंत्र मानवी व गुरेढोरे मल मुत्राचे, त्याच बरोबर कृषि कचरा, स्वंपाकघरातला कचरा उरलेले अन्न या सर्वांच्या व्यवस्थापनासाठी मदत करते.
04:54 तसेच माती आणि पाणीचे प्रदूषण कमी करते आणि प्रतिबंधात्मक आरोग्यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावते.
05:02 आता आपण वेळ वाचवण्याचे काही फायदे पाहू.
05:05 बायोगॅसच्या वापरामूळे, जो वेळ आपण जळण गोळा करण्यात घालवत होतो तो वेळ खूप वाचू शकतो.
05:11 बायोगॅसचा उपयोग आरोग्यासाठी सुधा खूप म्हात्वाचा आहे कारण त्यामुळे धूर होत नाही.
05:17 स्वयंपाक घरात भिंतीवर कोळशाचे काळे जाळे जमा होत नाही तसेच तो फार आरोग्यदायी आहे.
05:23 लाकडी जळण वापरल्यामुळे जळमाठ खूप खूप प्रमाणात वाढतो.
05:27 पुढे, आपण पाहू बायोगॅस संयंत्राचे इतर उत्पादने काय आहेत?
05:32 आपल्याला बायोगॅस संयंत्राद्वारे तयार झालेल्या खताकडून प्राकृतिक खत मिळू शकते.
05:38 खताचा ओला कचरा थेट शेतात खत म्हणून वापरले जाऊ शकते.
05:44 हे खत सुखवून पाउडर बनवून नंतर शेतात वापरण्यासाठी साठवून ठेवू शकतो.
05:50 तयार झालेली शेतातील पावडर मोठ्या शहरांतील शेतकरी, फळांच्या बागेचे मालक आणि वृक्ष रोपवाटिकामध्ये नैसर्गिक खत म्हणून विकले जाऊ शकते.
06:00 हे खत गांडुळांच्या मदतीने सेंद्रीय खते तयार करण्यास देखील वापरले जाऊ शकते.
06:05 हे एका सोप्या पद्धतीने केले जाते ज्याला गांडूळखत म्हणतात.
06:10 शेतामध्ये हे सेंद्रीय खत वापरल्यामुळे, शेतकऱ्याचे खूप पैसे वाचतील.
06:16 आणि पुन्हा एकदा हे सेंद्रीय खत विकल्यामुळे कुटुंबात आर्थिक मदत होते.
06:22 सहसा, कौटुंबिक प्रकारे बायोगॅस संयंत्राद्वारे जो बायोगॅस निर्माण होतो तो स्वंपाक बनवण्यासाठी वापरला जातो.
06:29 तसेच आंघोळीसाठी आणि इतर कारणांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात गरम करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.
06:36 काही ग्रामीण लघुउद्योजक विविध प्रक्रियांमध्ये उर्जा पुरवण्यासाठी बायोगॅसचा वापर करतात.
06:42 आता बायोगॅस वापरकर्ता कुटुंबाचे प्रशंसापत्र पाहू.
06:47 नमस्कार, माझे नाव सुभाष बालचंद्र मडगावकर ही माझी पत्नी शुबधा.
06:52 माझ्या कुटुंबात ४ सदस्य आहेत आणि आमच्याकडे ३ गुरेढोरे देखील आहे.
06:57 पुर्वी आम्हाला लाकूड गोळा करण्यास खूप लांब जंगलात जावे लागत होते. कधी कधी तर आम्हाला विकतही घ्यावे लागत होते.
07:04 आता आम्ही गेल्या १० वर्षा पासून बायोगॅस संयंत्र वापरत आहोत.
07:09 बायोगॅस वापरल्यामुळे आता आम्हाला लाकूड गोळा करण्यास लांब जंगलात जावे लागत नाही आणि विकतही घ्यावे लागत नाही.
07:16 आम्हाला आता स्वंपक करतांना धुराचा वास घ्यावा लागत नाही आणि स्वंपक घर स्वछ आणि नीट असते.
07:23 बायोगॅस वापरण्यास सोपे आहे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी स्वंपक बनवण्यास पुरेसे आहे.
07:30 थोडक्यात. ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो बायोगॅस बद्दल, कसे उत्पादन केले जाते आणि त्याचे उपयोग.
07:38 आपण हे देखील शिकलो बायोगॅस संयंत्राबद्दल, बायोगॅस संयंत्र बंधण्याकरिता लागणारा खर्च आणि बायोगॅस वापरण्याचे फायदे
07:47 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
07:56 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
08:02 मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana