Difference between revisions of "Git/C2/The-git-checkout-command/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 298: | Line 298: | ||
|- | |- | ||
| 07:08 | | 07:08 | ||
− | | आपण काय करू शकतो? | + | | आपण काय करू शकतो? मागील फाईल कमिटसच्या सहाय्याने डिलिट झालेल्या फाईल्स परत मिळवता येतात. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 570: | Line 566: | ||
|- | |- | ||
| 13:27 | | 13:27 | ||
− | | | + | | Git रिपॉझिटरीमधून फाईल काढून टाकणे. * काढून टाकलेली फाईल परत मिळवणे. |
|- | |- | ||
| 13:32 | | 13:32 | ||
− | | | + | | फाईलमधे केलेले बदल रद्द करणे आणि * आधीच्या रिविजनवर परत जाणे. |
|- | |- |
Revision as of 18:31, 2 March 2017
|
|
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या git checkout command वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत: * Git रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे. |
00:12 | Git रिपॉझिटरी मधून फाईल काढून टाकणे. |
00:16 | काढून टाकलेली फाईल परत मिळवणे. |
00:18 | फाईलमधे केलेले बदल रद्द करणे आणि |
00:21 | आधीच्या रिविजनला परत जाणे. |
00:25 | या पाठासाठी वापरणार आहोत: उबंटु लिनक्स 14.04 |
00:31 | Git 2.3.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर. |
00:36 | तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर वापरू शकता. |
00:40 | या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे. |
00:47 | नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:52 | आता Git रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ. |
00:58 | टर्मिनल उघडण्यास Ctrl+Alt+T ही बटणे दाबा. |
01:02 | आपण मागील पाठात तयार केलेल्या "mywebpage" या Git रिपॉझिटरी मधे जाऊ. |
01:09 | टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा. |
01:14 | येथे मी html फाईल्सचाच वापर करून दाखवणार आहे. |
01:19 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही फाईलचा प्रकार निवडू शकता. |
01:23 | आपण आता दोन html फाईल्स बनवणार आहोत. |
01:27 | त्यासाठी टाईप करा: gedit space mystory.html space mynovel.html space ampersand. |
01:37 | प्रॉम्प्ट मुक्त करण्यास आपण & (एँपरसँड) वापरले आहे. एंटर दाबा. |
01:43 | मी आधीच तयार करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंटमधून काही कोड कॉपी करून या फाईल्समधे पेस्ट करणार आहे. |
01:50 | या फाईल्स सेव्ह करा. |
01:53 | प्रथम Git स्टेटस तपासण्यास टर्मिनलवर git space status टाईप करून एंटर दाबा. |
02:03 | हे untracked फाईल्स दाखवत आहे. |
02:06 | आपण अनट्रॅक्ड फाईल्स tracking साठी समाविष्ट करणार आहोत. |
02:10 | टाईप करा:git space add space dot आणि एंटर दाबा. |
02:17 | git add dot कमांड सर्व अनट्रॅक्ड फाईल्स staging area मधे समाविष्ट करेल. |
02:23 | आता "mystory.html" आणि "mynovel.html" या दोन फाईल्स staging area मधे समाविष्ट झाल्या आहेत. |
02:32 | आता पुन्हा एकदा Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा. |
02:40 | आता Git रिपॉझिटरीच्या staging area मधे दोन्ही फाईल्स समाविष्ट झाल्याचे दिसेल. |
02:47 | आता mystory.html आणि mynovel.html या फाईल्सवर जाऊ. |
02:54 | आता कोडच्या अजून काही ओळी या दोन्ही फाईल्समधे समाविष्ट करणार आहोत. |
03:00 | मी माझ्या रायटर डॉक्युमेंटमधून हे कॉपी-पेस्ट करणार आहे. |
03:05 | पुन्हा एकदा फाईल सेव्ह करून बंद करा. |
03:08 | Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा. |
03:16 | हे “Changes not staged for commit” आणि “modified: mynovel.html" आणि "mystory.html” हा मेसेज दाखवेल. |
03:26 | याचा अर्थ आपण केलेले बदल staging area मधे समाविष्ट झालेले नाहीत. |
03:32 | आता या टप्प्यापर्यंतचे आपले काम commit करू. |
03:36 | त्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen a space hyphen m space डबल कोटसमधे “Added two files” आणि एंटर दाबा. |
03:50 | लक्षात ठेवा कमिट करण्यापूर्वी आपण बदल केलेल्या फाईल्स staging area मधे समाविष्ट केल्या नव्हत्या आणि |
03:57 | आधीच्या पाठात पाहिल्याप्रमाणे committing message दाखवण्यासाठी एडिटर उघडला नव्हता. |
04:03 | याचे कारण येथे आपण हायफन a आणि हायफन m हे फ्लॅग्स वापरले आहेत. |
04:10 | हे फ्लॅग्स कशासाठी आहेत? |
04:13 | स्लाईडसवर परत जाऊ. |
04:15 | हायफन a या फ्लॅगमुळे बदल केलेल्या सर्व फाईल्स staging area मधे समाविष्ट होतात. |
04:21 | hyphen a चा उपयोग केल्यास staging area मधे बदल केलेल्या फाईल्स समाविष्ट करण्यासाठी git add कमांड स्वतंत्रपणे वापरण्याची गरज नसते. |
04:30 | Hyphen m या फ्लॅगचा उपयोग कमांड लाईनवरच commit मेसेज देण्यासाठी होतो. |
04:36 | hyphen a आणि hyphen m हे फ्लॅग्स आपण hyphen am असे वापरू शकतो. |
04:42 | टर्मिनलवर परत जाऊ. |
04:45 | Git लॉग तपासण्यास git space log टाईप करून एंटर दाबा. |
04:52 | आपण commits ची सूची बघू शकतो. |
04:54 | सर्वात नवीन कमिटस सूचीत प्रथम दाखवलेले दिसतील. |
04:58 | याचा अर्थ कमिटसची सूची कालक्रमानुसार दाखवली जाते. |
05:03 | Git रिपॉझिटरीमधे चुकीची फाईल समाविष्ट झाली असेल तर ती सहजपणे काढून टाकता येते. |
05:10 | समजा आपल्याला mypage.html ही फाईल काढून टाकायची आहे. |
05:16 | टाईप करा:git space rm space hyphen hyphen cached space mypage dot html आणि एंटर दाबा. |
05:26 | ही कमांड staging area मधून mypage.html ही फाईल काढून टाकेल. |
05:32 | आता Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा. |
05:40 | हे mypage.html ही फाईल अनट्रॅक्ड असल्याचे दाखवत आहे. |
05:45 | आता फाईल सिस्टीममधून फाईल डिलिट करण्यासाठी टाईप करा- |
05:49 | rm space mypage dot html आणि एंटर दाबा. |
05:55 | ही कमांड mywebpage या फोल्डरमधून ही फाईल पूर्णपणे काढून टाकेल. |
06:00 | आता ही फाईल Git रिपॉझिटरीमधून काढली गेली आहे का ते तपासू. |
06:06 | त्यासाठी टाईप करा:git space status आणि एंटर दाबा. |
06:12 | हे “deleted: mypage.html” असा मेसेज दाखवत आहे. |
06:16 | आता फाईल्सची सूची मिळवण्यास "ls" टाईप करून एंटर दाबा. |
06:21 | mypage.html ही फाईल आपल्याला दिसत नाही कारण की काढून टाकली गेली आहे. |
06:28 | आता या स्थितीत आपला कोड फ्रीज करू या. |
06:32 | कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen am space डबल कोटसमधे “Deleted mypage.html” आणि एंटर दाबा. |
06:45 | Git log बघण्यासाठी git space log टाईप करा आणि एंटर दाबा. |
06:51 | बाहेर पडण्यास तुमच्या कीबोर्डवरील q हे बटण दाबा. |
06:55 | येथे आपण कमिट मेसेजमधे सर्वात नवीन कमिट पाहू शकतो. |
06:59 | समजा आपण mypage.html ही फाईल चुकून डिलिट केली आणि आता ती परत हवी आहे. |
07:08 | आपण काय करू शकतो? मागील फाईल कमिटसच्या सहाय्याने डिलिट झालेल्या फाईल्स परत मिळवता येतात. |
07:13 | आपली फाईल “Added two files” असा मेसेज असलेल्या दुस-या कमिट च्या सहाय्याने परत मिळवू. |
07:20 | दुस-या commit hash चे पहिले पाच आकडे सिलेक्ट करा. |
07:24 | आणि Ctrl + Shift + C ही बटणे दाबून ते कॉपी करा. |
07:28 | पहिले पाच आकडे पुरेसे आहेत. |
07:31 | परंतु तुम्हाला हवे असल्यास पाच पेक्षा अधिक आकडे देखील कॉपी करू शकता. |
07:36 | git space checkout space टाईप करून commit hash पेस्ट करण्यासाठी Ctrl + Shift + V ही बटणे दाबा. |
07:45 | आता "mypage.html" हे फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा. |
07:51 | Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा. |
07:58 | आता आपण mypage.html ही फाईल बघू शकतो. |
08:02 | या टप्प्यापर्यंतचे आपले काम कमिट करू. |
08:05 | आपण कुठलीही फाईल समाविष्ट किंवा डिलिट करतो तेव्हा आपले काम कमिट करणे अतिशय महत्वाचे असते. |
08:12 | टाईप करा:git space commit space hyphen am space “Restored mypage.html” आणि एंटर दाबा. |
08:22 | फाईलची सूची मिळवण्यास ls टाईप करून एंटर दाबा. |
08:28 | आपण mypage.html ही फाईल परत मिळवली आहे. |
08:33 | पुढे आपण फाईलमधे केलेले बदल कसे रद्द करायचे ते पाहू. |
08:38 | फाईल उघडण्यासाठी टाईप करा gedit space mypage.html space mystory.html space ampersand आणि एंटर दाबा. |
08:50 | आपण mypage.html आणि mystory.html मधे काही बदल करू. |
08:58 | दोन्ही फाईल्समधे काही ओळी समाविष्ट आणि डिलिट करा. |
09:03 | नंतर फाईल्स सेव्ह करून बंद करा. |
09:06 | काही वेळेला केलेले बदल आपल्याला नको असतात . |
09:11 | म्हणजेच आपल्याला आपल्या कामाच्या मागील स्थितीत परत जायचे आहे. |
09:16 | हे कसे करायचे ते पाहू. |
09:19 | प्रथम git space status टाईप करून एंटर दाबा आणि Git स्टेटस तपासा. |
09:27 | हे काही फाईल्समधे बदल केले असल्याचे दाखवते. |
09:30 | आता टाईप करा:git space checkout space dot आणि एंटर दाबा. |
09:37 | ही कमांड आपल्या कामातील अगदी नवीन बदल डिलिट करेल. |
09:41 | Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा. |
09:48 | हे “nothing to commit” असे दाखवत आहे. |
09:51 | आता फाईलमधे केलेले बदल अजूनही तसेच आहेत की नाही हे तपासू. |
09:57 | टाईप करा:gedit space mypage.html space mystory.html & आणि एंटर दाबा. |
10:07 | आपण केलेले बदल रद्द झालेले दिसतील. फाईल बंद करा. |
10:13 | Git लॉग तपासण्यास git space log टाईप करून एंटर दाबा. |
10:20 | हे commits ची सूची दाखवेल. |
10:23 | अधिक पहाण्यासाठी डाऊन ऍरोचे बटण दाबा. |
10:26 | बाहेर पडण्यासाठी q हे कीबोर्डवरील बटण दाबा. |
10:30 | commits ची सूची एका ओळीत बघायची असल्यास टाईप करा: git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा. |
10:42 | येथे आपण commits ची सूची त्यांच्या commit hash आणि कमिट मेसेजसहित एका ओळीत पाहू शकतो. |
10:48 | आपण आपल्या कामाच्या मागील रिविजनवर कसे जाऊ शकतो? |
10:53 | सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे चार commits आहेत. |
10:56 | म्हणजेच आपल्याकडे आपल्या कामाची चार रिविजन्स आहेत. |
11:01 | समजा आपल्याला “Initial commit” या टप्प्यावर परत जायचे आहे. |
11:05 | त्यासाठी टाईप करा: git space checkout space, पुढे Initial commit चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
11:15 | फाईलची सूची मिळवण्यास ls टाईप करून एंटर दाबा. |
11:19 | येथे केवळ mypage.html ही एकच फाईल दिसेल कारण या टप्प्यावर आपल्याकडे केवळ हीच फाईल होती. |
11:28 | Git लॉग तपासण्यास git space log टाईप करून एंटर दाबा. |
11:34 | आपण केवळ Initial commit हे पहिलेच कमिट पाहू शकतो. |
11:39 | चालू रिविजनवर परत जाण्यासाठी टाईप करा:git space checkout space master आणि एंटर दाबा. |
11:48 | पुढील पाठांमधे आपण master या संज्ञेबद्दल अधिक जाणून घेऊ. |
11:53 | Git log तपासण्यास पुन्हा एकदा टाईप कराः |
11:57 | git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा. |
12:03 | आता सर्व म्हणजेच चारही commits पाहू शकतो. आता आपण सर्वात नव्या stage वर आहोत. |
12:10 | अशाप्रकारे आपण आपल्या कामाच्या कुठल्याही टप्प्यावर जाऊ शकतो. |
12:14 | मागील रिविजनवर जाण्याची आणखी एक पध्दत आहे. |
12:18 | टाईप करा:git space reset space hyphen hyphen hard. |
12:23 | नंतर Initial commit चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
12:29 | Git लॉग तपासण्यास git space log टाईप करून एंटर दाबा. |
12:35 | आत्ता आपण Initial commit या टप्प्यावर असल्याचे दाखवत आहे. |
12:39 | आता सर्वात नव्या रिविजनवर जाण्याचा प्रयत्न करू. |
12:43 | आधीसारखेच टाईप करा:git space checkout space master आणि एंटर दाबा. |
12:51 | आपण सर्वात नव्या रिविजनवर परत जाऊ शकत नाही. |
12:55 | त्याऐवजी आपल्याला “Already on master” असा मेसेज मिळाला आहे. |
12:58 | याचा अर्थ ही आपली सर्वात नवी रिविजन आहे. |
13:02 | लक्षात ठेवा git reset hyphen hyphen hard, ही कमांड वापरल्यावर आपण सर्वात नव्या stage वर पुन्हा परत जाऊ शकत नाही. |
13:11 | त्यामुळे या कमांडचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. |
13:15 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
13:18 | थोडक्यात, आपण या पाठात शिकलो : * Git रिपॉझिटरी मधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे. |
13:27 | Git रिपॉझिटरीमधून फाईल काढून टाकणे. * काढून टाकलेली फाईल परत मिळवणे. |
13:32 | फाईलमधे केलेले बदल रद्द करणे आणि * आधीच्या रिविजनवर परत जाणे. |
13:39 | असाईनमेंट- आपण मागील पाठाच्या असाईनमेंटमधे बनवलेल्या Git रिपॉझिटरीमधे जा. |
13:46 | तुमच्या टेक्स्ट फाईलमधे काही बदल करा. |
13:49 | केलेले बदल कमिट करा. |
13:52 | तुमच्या जुन्या रिविजनवर परत जाण्याचा प्रयत्न करा. |
13:55 | पुन्हा तुमच्या टेक्स्ट फाईलमधे काही बदल करा आणि ते बदल रद्द करण्याचा प्रयत्न करा. |
14:02 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
14:11 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
14:18 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
14:22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
14:29 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
14:34 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |