Difference between revisions of "Git/C2/Overview-and-Installation-of-Git/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 307: | Line 307: | ||
|- | |- | ||
| 06:41 | | 06:41 | ||
− | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून | + | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |
|} | |} |
Revision as of 12:22, 16 June 2016
|
|
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Overview and Installation of Git वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत:
|
00:17 | या पाठासाठी इंटरनेटची गरज आहे. |
00:22 | तुमच्याकडे उबंटु लिनक्स किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम्स असावी. |
00:28 | या पाठासाठी वर नमूद केलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम्सपैकी कुठल्याही एकीचे ज्ञान असावे. |
00:36 | प्रथम वर्जन कंट्रोल सिस्टीम म्हणजेच VCS जाणून घेऊ. |
00:39 | वर्जन कंट्रोल सिस्टीम ही बॅकप प्रणाली प्रमाणे असते. |
00:44 | ही डॉक्युमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रॅम आणि वेबसाईटमधील बदलांचे व्यवस्थापन करते. |
00:51 | तुम्ही पूर्वी केलेल्या बदलांविषयी तपशील पुरवते. |
00:55 | VCS ही रिविजन कंट्रोल, सोर्स कंट्रोल आणि सोर्स कोड मॅनेजमेंट (SCM) म्हणूनही ओळखली जाते. |
01:03 | RCS, Subversion आणि Bazaar ही VCS ची काही उदाहरणे आहेत. |
01:11 | पुढे Git पासून सुरूवात करू. |
01:13 | Git हे एक डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सॉफ्टवेयर आहे. |
01:16 | हे एक मुक्त आणि open source software आहे. |
01:19 | हे फाईल किंवा फाईलच्या संचामधे केलेल्या बदलांची नोंद ठेवते. |
01:24 | हे अनेक डेव्हलपर्सना एकत्रितपणे कार्य करण्याची मुभा देते. |
01:28 | हे प्रोजेक्टसची अनेक वर्जन्स संचित करून त्यांचे व्यवस्थापन करते, |
01:32 | प्रोजेक्टच्या प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करते. |
01:37 | Git ची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत: |
01:42 | मागे जाऊन आपण आपल्या कामाची मागील वर्जन्स मिळवू शकतो. |
01:47 | आपण सर्व बदलांची संपूर्ण हिस्ट्री पाहू शकतो. |
01:52 | Git द्वारे दिल्या गेल्या सूचनांच्या सहाय्याने गोंधळ किंवा समस्या सोडवता येऊ शकतात. |
01:58 | काही डेटा नष्ट झाल्यास कुठल्याही client रिपॉझिटरी मधून परत मिळवता येऊ शकतो. |
02:05 | Git चा उपयोग प्रोग्रॅमर्स, वेब डेव्हलपर्स, प्रोजेक्ट मॅनेजर्स, लेखक असे इतर अनेकजण करू शकतात. |
02:14 | * ज्या कोणाला टेक्स्ट फाईल्स, शीटस, डिझाईन फाईल्स, ड्रॉईंग्ज इत्यादींची वर्जन्स ट्रॅक करावी लागतात. |
02:22 | * ज्या लोकांना एखाद्या कामावर किंवा प्रोजेक्टवर एकत्रितपणे काम करावे लागते. |
02:28 | Git कसे कार्य करते ते पाहू. |
02:31 | वास्तविक पाहता Git संपूर्ण प्रोजेक्टचा स्नॅपशॉट संचित करते. |
02:36 | स्नॅपशॉट घेणे हे त्याक्षणी सर्व फाईल्सचे चित्र घेण्यासारखे आहे. |
02:42 | काही फाईल्समधे कुठलेही बदल केलेले नसल्यास Git त्या पुन्हा संचित करत नाही. |
02:47 | त्या आधीच्या वर्जनशी लिंक केल्या जातात. |
02:50 | फेल्यूअरच्या स्थितीत डेटा स्नॅपशॉटवरून मिळवला जातो. |
02:56 | या मालिकेत सांगितल्या गेलेल्या वैशिष्ट्यांची झलक पाहू- |
03:01 | * Git च्या मूलभूत कमांडस |
03:04 | * git चेकआउट कमांड |
03:06 | * Git चे परीक्षण, तुलना आणि |
03:09 | * Git मधील टॅगिंग. |
03:11 | पुढील काही भागात आपण शिकणार आहोत:
|
03:22 | Git हे उबंटु लिनक्सवर उबंटु सॉफ्टवेयर सेंटरच्या सहाय्याने इन्स्टॉल करता येते. |
03:27 | उबंटु सॉफ्टवेयर सेंटरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या साईटवरील लिनक्सचे पाठ बघा. |
03:35 | माझ्या सिस्टीमवर Git चे इन्स्टॉलेशन आधीच पूर्ण झाले आहे. आता ते तपासून पाहू. |
03:42 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा: git space hyphen hyphen version. एंटर दाबा. |
03:50 | Git चा वर्जन नंबर आपण बघू शकतो. |
03:53 | याचा अर्थ Git यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे. |
03:57 | विंडोज OS वर Git इन्स्टॉल करण्याबद्दल जाणून घेऊ. |
04:01 | वेब ब्राउजर उघडा आणि www.git-scm.com या लिंकवर जा. |
04:09 | डावीकडील Downloads या लिंकवर क्लिक करा. |
04:13 | विंडोजसाठी Git डाउनलोड करण्यासाठी विंडोजच्या आयकॉनवर क्लिक करा. |
04:17 | Save As चा डायलॉग बॉक्स उघडेल. Save File बटणावर क्लिक करा. |
04:22 | डिफॉल्ट रूपात Downloads फोल्डरमधे इन्स्टॉलर फाईल डाउनलोड होईल. |
04:26 | Git इन्स्टॉल करण्यासाठी "exe" फाईलवर डबल क्लिक करा. |
04:30 | उघडलेल्या डायलॉग बॉक्समधील Run वर क्लिक करून Yes वर क्लिक करा. |
04:35 | Next क्लिक करा. "General Public License" च्या पानावरील Next वर क्लिक करा. |
04:41 | डिफॉल्ट रूपात Git प्रोग्रॅम फाईल्समधे इन्स्टॉल केले जाते. Next वर क्लिक करा. |
04:46 | इन्स्टॉल करायचे घटक आपण निवडू शकतो. |
04:49 | Additional icons च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
04:52 | नंतर Next वर क्लिक करा. पुन्हा Next वर क्लिक करा. |
04:57 | येथे Git कमांडस रन करण्याचे पर्याय निवडू शकता. |
05:00 | मी Use Git Bash only हा पर्याय निवडणार आहे. Next क्लिक करा. |
05:04 | मी डिफॉल्ट रूपात निवडलेला हा पर्याय तसाच ठेवत आहे. Next क्लिक करा. |
05:09 | Git इन्स्टॉल होत आहे. हे इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून असल्याने काही वेळ घेईल. |
05:15 | इन्स्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी Finish वर क्लिक करा. |
05:19 | आता Git रिलीज नोट आपोआप उघडेल. ती बंद करू. |
05:24 | डेस्कटॉपवर Git Bash शॉर्टकट आयकॉन दिसेल. ते उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. |
05:32 | किंवा 'Start' मेनूतील All programs मधील Git वर क्लिक करा. नंतर Git Bash वर क्लिक करा. |
05:41 | आता Git Bash उघडेल. |
05:44 | हे इन्स्टॉल केलेल्या Git चा वर्जन नंबर दाखवेल. |
05:48 | अशाप्रकारे Git यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे. |
05:51 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
05:55 | थोडक्यात,
आपण या पाठात शिकलो:
|
06:10 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:18 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
06:29 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:41 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |