Difference between revisions of "Biogas-Plant/C3/Construction-of-the-Dome/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| Border = 1 | <center>'''Time''' </center> | <center> '''Narration'''</center> |- | 00:02 | नमस्कार डायजेस्टर टॅंकच्या ''...")
 
Line 421: Line 421:
 
| तारेचे घुमट आता तयार झाले आणि डायजेस्टर टॅंक वर ठेवू शकता.
 
| तारेचे घुमट आता तयार झाले आणि डायजेस्टर टॅंक वर ठेवू शकता.
 
|-
 
|-
|21:53
+
| 21:53
 
|सर्कावण्या आधी १० इंचाची लोखंडी स्टील रॉडला पायाच्या रिंग पासून काढा.
 
|सर्कावण्या आधी १० इंचाची लोखंडी स्टील रॉडला पायाच्या रिंग पासून काढा.
 
|-
 
|-
|22:01
+
| 22:01
 
| याची खात्री कराकी, तारेची जाळी घट्ट बांधली आहे.  
 
| याची खात्री कराकी, तारेची जाळी घट्ट बांधली आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  22:07
 
|  22:07
|हे '''बायोगॅस सयंत्राच्या घुमट बांधण्याच्या''' ट्यूटोरियलच्या अंतिम टपप्यात पोचलो आहोत.
+
| हे '''बायोगॅस सयंत्राच्या घुमट बांधण्याच्या''' ट्यूटोरियलच्या अंतिम टपप्यात पोचलो आहोत.
 
|-
 
|-
 
|  22:14
 
|  22:14
| '''बायोगॅस सयंत्रावर घुमट स्थित करण्याचे''' हे पुढील ट्यूटोरियलमध्ये स्पष्ट केले आहे.
+
| बायोगॅस सयंत्रावर घुमट स्थित करण्याचे हे पुढील ट्यूटोरियलमध्ये स्पष्ट केले आहे.
 
|-
 
|-
 
|  22:22
 
|  22:22
| थोडक्यात, ह्या ट्यूटोरियलमध्ये,  
+
| थोडक्यात, ह्या ट्यूटोरियलमध्ये,  
आपण  टप्या टप्याने '''घुमटाच्या बांधकामाची प्रक्रीया''' शिकलो.  
+
आपण  टप्या टप्याने घुमटाच्या बांधकामाची प्रक्रीया शिकलो.  
 
|-
 
|-
 
| 22:30
 
| 22:30

Revision as of 00:15, 13 June 2016

Time
Narration
00:02 नमस्कार

डायजेस्टर टॅंकच्या घुमट बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.

00:10 खालील ट्यूटोरियल्स-
  • खड्डा खोदणे आणि
  • बायोगॅस संयंत्राचे पाया बांधणे, Spoken-tutorial.org वेबसाइटवर उपलब्ध आहे.
00:22 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण टप्या टप्याने घूमटाच्या बांधकामाची प्रक्रीया शिकू.
00:29 घूमट म्हणजे काय?
00:32 घूमटाची रचना कमान सारखी आहे जी डायजेस्टर टंकवर स्थिर असते, जेथे बायोगॅस गोळा केला जातो.
00:42 घूमटाचे बांधकाम करणे हे अतिशय आवडीचे व म्हात्वाची प्रक्रिया आहे.
00:47 बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू खालील प्रमाणे आहेत.
  • स्टील रोड्स
  • तारेची जाळी आणि
  • स्टील वाइयर
01:00 ह्या वैशिष्ट्यांची माहिती बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणार्या साहित्यांच्या ट्यूटोरियलमध्ये उल्लेखित आहे.
01:09 चला सुरु करू
01:11 प्रथम, ७ फूट आणि ६ इंच व्यासाचा एक वर्तुळ, चुना पावडरने आखा.
01:23 आता वर्तुळाच्या परिघावर १२ चिन्हे चिन्हांकीत करा आणि दाखवल्याप्रमाणे त्यांना १ ते १२ अंक द्या.
01:37 हे १२ चिन्हे एकमेकांशी दोन फूट अंतरापासून लांब असले पाहिजे.
01:47 नंतर, १२ अंक चिन्हांकित केलेल्या सर्व बाजूंना १० -इंचाचे स्टील रॉड हातोडीने आत ठोका.
01:57 १० इंचाचे स्टील रॉड हातोडीने २ इंचापर्यंत जमिनीत ठोका.
02:06 लक्षात ठेवा की ते नंतर काढावे लागतील.
02:11 पुढे १२ फूट लांबी स्टील रॉडचा वापर करा.
02:18 त्याच बरोबर १२ फूट लांबीचा स्टील रॉड घेऊन, आधीच्या १० इंच स्टील रॉडने ठोकून घेतलेल्या वर्तुळाच्या भौती बाहेरून एक वर्तुळ काढून घ्या.
02:33 आता मी तुम्हाला पोकळ रॉड वापरून वर्तुळ कसा बनवायचा हे सांगेन.
02:40 पोकळ टोक असलेले लोखंडी रॉड वापरा.
02:45 या लोखंडी रॉडने, एक वर्तुळाकार आकार तयार करण्यासाठी १२ फूट स्टील रॉडला वाकवा.
02:53 मग दाखवल्याप्रमाणे, हा वर्तुळाकार आकाराचा स्टील रॉड, लहान १० इंच स्टील रॉडच्या भौती ठेवा.
03:03 वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आपल्यला दोन १२ फुटचे रॉड लागतील.
03:11 येथे दर्शवल्याप्रमाणे, आता स्टील वाइयर वापरून वर्तुळ आकाराचे स्टील रॉड १० इंचाचे स्टील रॉडला बांधा.
03:25 काळजी घ्याकी गाठ फार घट्ट बांधली आहे आणि स्टील रॉडचे वर्तुळ अतिशय स्थिर आहे.
03:32 हा घूमटाचा पाया आहे.
03:37 घूमटाचा पाया इतका मजबूत असणे आवश्यक आहे की तो प्लास्टर घूमटाचे भार सहन करू शकेल.
03:47 येथे दर्शवल्याप्रमाणे, आता वर्तुळाच्या मध्यभागी एक ४ फूट आणि २ इंच लांबी बांबूची काठी हातोडीने ठोका.
04:00 हातोडीने बांबूची काठी २ इंचापर्यंत जमिनीत ठोका.
04:07 काळजी घ्याकी हे स्वत: हून उभे राहू शकते आणि नंतर सहज पणे काढले जाऊ शकते.
04:17 ह्या बांबूच्या काठीने घुमटाच्या प्रतिमेला तात्पुरते समर्थन केले पाहिजे.
04:27 आता घुमटाची प्रतिमा बांधण्यासाठी सुरु करूया.
04:33 पुन्हा एकदा, कमान सारखा आकार तयार करण्यासाठी पोकळ लोखंडी रॉड वापरा आणि एक १२ फूट लांबी स्टील रॉड वाकवा.
04:43 हि कमान घूमटाला अर्धवर्तुळाकृतीत आकार देईल.
04:51 त्यामुळे, खात्री करा की जेव्हा एका बाजूने वकवल्यावर कमान संतुलनामध्ये आहे.
05:01 त्याचप्रमाणे, कमान तयार करण्यसाठी अजून दोन १२ फुटचे रॉड वाकवा.
05:09 आता मी आकृती वापरुन परिघावर कमान कश्याप्रकारे ठेवायचे हे स्पष्ट करते.
05:19 कमानीचा एक बाजूचा शेवटचा टोक रोड नंबर १, आणि दुसर्या बाजूचा शेवटचा टोक रोड नंबर ७ वर सुरक्षितपणे ठेवा.
05:34 हे कमानीची परिपूर्ण सममिती खात्री करेल आणि हे केंद्रात बांबूच्या काठीच्या आधारावर स्थिर राहील.
05:46 कमानाला १० इंच स्टील रोड आणि वर्तुळाकार रिंग बरोबर एकत्र बांधण्यासाठी स्टील वाइयर वापरा.
06:00 येथे दाखवल्याप्रमाणे, बांधण्यासाठी स्टील वाइयरला गाठी सारखे बांधा.
06:09 तसेच कमानीच्या शेवटच्या विरुद्ध दिशेला देखील करा.
06:17 पुढे आपण आणखी दोन कमानी बांधूया.
06:24 दुसरा कमान रॉड नंबर ३ आणि रॉड नंबर ९ वर सुरक्षितपणे ठेवा.
06:35 आणि तिसरा कमान रॉड नंबर ५ आणि रॉड नंबर ११ ला ठेवा.
06:44 १२ फूट स्टील रॉड कमानीचा पाया ६० अंशाच्या वेगवेगळ्या कोनावर असावा.
06:57 आता आपल्याकडे घूमटाच्या प्रतिमेसाठी तीन कमानी आहेत.
07:03 पुढे, काळजीपूर्वक हे स्टील रॉड असे सरकवा ज्याने शीर्षस्थानी थोडे अंतर राहील.
07:18 दर्शवल्याप्रमाणे स्टीलच्या तारा वापरून स्टील रॉड बांधा.
07:26 तीन कमानी छेदनबिंदू त्रिकोणासारखे दिसेल.
07:34 त्रिकोणाची बाजू अंदाजे २.५ इंचाची असावी.
07:40 चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे, गाठ बांधल्यानंतर प्रतिमेची वरची बाजु अशी दिसली पाहिजे .
07:51 येथे पाहू, गवंडीने दखवल्याप्रमाणे - बांबू रॉड वापरून उघड्या त्रिकोणाचा भाग दाखवतो.
08:04 ह्या जागेत येथे १ इंच व्यासाचा ग्यास पाईप फिट होईल.
08:15 कमान एकदा लाऊन झाले की, उरलेल्या १२ फूट स्टील रॉडने वर्तुळाकार रिंग उभारुया.
08:25 या चित्राच्या मदतीने, प्रथम आपण शिकुया की रिंग कश्या प्रकारे बनवायच्या.
08:34 आता पर्यंत अशी प्रतिमा आपण बांधली आहे-
08:40 वर्तुळाकार पाया आणि अर्ध-वर्तुळाकार कमान.
08:48 दाखवल्याप्रमाणे, आपल्याला ८ वर्तुळाकार रिंग अशा प्रकारे कमानी वर स्थीर करण्याची गरज आहे.
09:00 ह्या रिंग एकसमान अशा ठेवा की, प्रतेकामध्ये ८ इंचाचे अंतर विभागलेले राहिल.
09:13 वर्तुळाकार रिंग बनवण्यासाठी, वरून सुरू करा आणि हळूवार खाली या.
09:22 वर्तुळाकार रिंग करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा-
09:29 प्रतिमेवर स्टील रॉडची लांबी वर्तुळाकार रिंगच्या स्थानावर अवलंबून असते.
09:39 जसे आपण वरून खली जाऊ तशी लांब स्टील रॉडची आवशकता लागेल.
09:50 रिंग स्थिर करण्यासाठी, आवश्यक लांबी मिळण्यासाठी प्रथम आपल्याला स्टील रॉड कापावे लागतील.
10:01 चला मग करूया.
10:04 पहिल्या रिंग साठी, जी वरून सर्वात छोटी रिंग आहे त्याला अंदाजे ४ फुट आणि ७ इंच स्टील रॉड लागेल व गाठ बांधण्यासाठी २ फुट जास्त लागेल.
10:25 ह्या वर्तुळाकार रिंगचा व्यास १० इंचाचा असावा.
10:33 दुसऱ्या रिंग साठी अंदाजाने ७ फुट १ इंच स्टील रॉड लागेल.
10:45 रिंगचा व्यास १ फुट ७ इंचाचा असावा.
10:55 तिसऱ्या रिंग साठी ९ फुट ८ इंच स्टील रॉड लागेल.
11:07 रिंगचा व्यास २ फुट ५ इंच असावा.
11:16 चवथ्या रिंग साठी १२ फुट आणि ३ इंच स्टील रॉड लागेल.
11:26 रिंगचा व्यास ३ फुट ३ इंच असावा.
11:36 पाचव्या रिंग साठी १४ फुट आणि १० इंच लांबी स्टील रॉड लागेल.
11:46 रिंगचा व्यास ४ फुट १ इंच असावा.
11:58 साहाव्या रिंग साठी १७ फुट ४ इंच लांबी स्टील रॉड लागेल.
12:08 रिंगचा व्यास ४ फुट १० इंचाचा असावा.
12:17 लक्षात ठेवा- आधी सांगितलेल्या पहिल्या वर्तुळाकार रिंगप्रमाणे, सर्व ८ रिंग साठी स्टील वाइयर बरोबर रॉड्सला बांधण्यासाठी २ फुट जास्त वाइयर घेतली होती.
12:38 आणि सर्व्या ८ रिंगचा व्यास ६ इंच न धरता मोजले आहे.
12:49 आता येते ७ वी आणि ८ वी रिंग.
12:55 दोन्ही, वर्तुळाकार रिंग आणि घुमटाचा प्रवेश करण्यासाठी देखील वापरले जाते.
13:07 या दोन रिंगचे मोजमाप खालील प्रमाणे आहेत-
13:12 सातव्या रिंग साठी २० फुट आणि १० इंच लांबी स्टील रॉड लागेल.
13:23 आणि आठव्या रिंग साठी २३ फुट ५ इंच लांबी स्टील रॉड लागेल.
13:37 लक्षात ठेवाकी ह्यात वाकवलेल्या रॉडची मोजमाप धरले आहे.
13:45 जसे तीन परिपूर्ण रिंग घुमटाच्या प्रतिमेवर ठेवले जाते, एक महत्वाची गोष्ट करावी लागते जी-
13:59 ४ फुट लांबीचे ६ बांबू कांड्या वाकवलेल्या स्तिथित घूमटेच्या प्रतिमेवर ठेवा.
14:12 लक्षात ठेवाकी बांबू कांड्या पायाच्या केंद्रा पासून एकसमान असली पाहिजे.
14:22 आणि वर्तुळाकार रिंग किंवा कमानीच्या विरोधात घट्टपणे आधारित असेल पाहिजे.
14:31 या काठ्या घुमटाच्या प्रतिमेला आधार देतील.
14:40 लक्षात ठेवा, आधी सांगितल्या प्रमाणे मोजमाप केले असले तर-

आपल्याला प्रतेक वर्तुळाकार रिंग मध्ये ८ इंच एकसमान अंतरावर मिळेल.

14:56 हे खात्री करण्यासाठी २ होल असणारी १ फुट स्टील पट्टी घ्या.
15:06 ह्या दोन होलचे अंतर ८ इंचाचा असावे.
15:13 आणि इथे दाखवल्याप्रमाणे, २ वर्तुळाकार रिंगच्या मध्ये घट्ट असले पाहिजे.
15:21 तसेच तुम्ही काही बारीक फरक दुर्लक्ष करू शकता.
15:29 सव्हया वर्तुळाकार रिंग ठेवल्यानंतर एक महत्वाची गोष्ट केली पाहिजे, प्रतिमेवर रॉड उभे स्थिर केले पाहिजे.
15:43 मी समजावते हे कसे शक्य आहे.
15:48 दोन अर्ध्या कमानीच्या मध्ये -

५ फुट ५ इंचेचा स्टील रॉड दोन मुख्य कमानाना दोन भागात स्थिर करा.

16:04 या चित्रात दाखवल्या प्रमाणे, रॉडला रिंगच्या पाया पासून पहिल्या रिंग पर्यंत स्टीलच्या ताराणे बांधा.
16:17 तसेच अर्ध्या-कामानाला अजून दोन स्टील रॉड ४ फुट ७ इंचाचे भागा आणि ५ फुट ५ इंच स्टील रॉड स्थिर करा.
16:37 दाखवल्याप्रमाणे, या दोन रॉडला रिंगच्या पाया पासून दुसऱ्या रिंग पर्यंत स्टीलच्या तारेणे बांधा.
16:49 लक्ष्यात घ्या- ५ व्या आणि ६ व्या १० इंचाचा हातोडीने ठोकलेल्या स्टील रॉडने पुढील गोष्टी करा:
17:01 ४ फुट ७ इंच लांबीचा स्टील रॉड वाकवून ६ व्या रिंगला बांधा.
17:12 चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे, हे सर्व आपण घुमटामध्ये प्रवेश करण्यासाठी केले आहे.
17:23 काळजी घ्या की दोन्ही गोष्ठीमध्ये-

वर्तुळाकार रिंगला स्टील वाइयरने सोप्या पद्धतीने बांधण्यासाठी वरती ३ इंच जास्त जागा सोडली आहे.

17:39 आता आपण शेवटच्या २ वर्तुळाकार रिंग म्हणजेच ७ व्या आणि ८ व्या रिंग स्थिर करूया.
17:50 तसेच काळजी घ्या- ६ व्या आणि ८ व्या रिंगच्या मध्ये फट आहे किंवा घुमटाच्या आत जाण्यासाठी जागा आहे .
18:02 ही जागा इतकी मोठी हवी आहे की त्यातून गवंडी आत जाऊ शकतो.
18:10 या फटचे अंतर अंदाजे-
  • २ फुट रुंदी आणि
  • २ फुट उंची असावी.
18:18 वरील सांगितल्या प्रमाणे, जागा तयार करण्यासाठी ७ वी आणि ८ वी रिंग वापरा.
18:28 चित्रात दाखवल्याप्रमाणे, ७ वा रॉड वाकवा ज्याने आत जाण्याची वरची बाजू बनेल, आणि ८ वा रॉड वाकवा ज्याने खालची बाजू बनेल.
18:43 चित्रात दाखवल्याप्रमाणे, खालच्या बाजूचे अंतर किंवा आत जाण्याची जागा बनेल.
18:54 आता, ७ वी आणि ८ वी रिंगला वाकवून स्टील वाइयर बरोबर घट्ट बांधा.
19:05 पुढे घुमटाची प्रतिमा तारेच्या जाळीने झाका.
19:13 तारेची जाळीचा आवश्यक आकार कापण्यासाठी कात्रीचा वापर करा.
19:21 वरपासून खालपर्यंत तारेची जाळी घट्ट झाकण्यासाठी सुरू करा.
19:31 प्रतिमेला जाळी बांधण्यासाठी, जाळी घट्ट ताणून स्टील तारेने बांधून घ्या.
19:39 हे धातूचा हुक वापरुन केले जाऊ शकता.
19:46 तारेच्या जाळीचे थर घट्ट बांधण्यासाठी-
  1. दोन थरांच्या छिद्रामध्ये हुक समाविष्ट करा.
19:56 तारेच्या जाळीला ताणून हुकला फिरवून घ्या आणि एकाच वेळी त्यात गुंतवून घ्या.
20:06 तारेची जाळी नीट घट्ट ताणली नाही तर, नंतर घुमटाचा प्लास्टर करताना त्याच्यावर तडा येऊ शकतो.
20:20 लक्षात ठेवा, प्रतिमेच्या मागच्या बाजूला अतिरिक्त ४ -५ इंच जाळी सोडने.
20:31 ह्या कारणासाठी डायजेस्टर टंक वरील घुमट स्थिर करणे ह्याच्यात स्पष्ट केले जाईल.
20:39 पूर्ण प्रतिमा झाकण्यासाठी ३ बंडल तरांची जाळी वापरा.
20:47 अंदाजे घूमटावर ३ थर बांधली जाईल.
20:55 तारांच्या जाळीचे अनेक थर लवल्यामुळे घूमटाला प्लास्टर करताना सिमेंट घट्टपणे ठेवण्यास मदत होईल.
21:06 घुमटाच्या प्रवेशावर तारेची जाळी झाकून झाल्यावर कात्रीने कापून घ्या.
21:15 आपण येथे पाहू शकता गवंडी घुमटाच्या त्याच अंतराद्वारे किंवा प्रवेशद्वारा आत जात आहे.
21:24 तारेची जाळी एकदा स्थिर झाल्यावर, आधारासाठी आत ठेवलेल्या बांबूची काठ्या काढून टाका.
21:32 कृपया लक्षात ठेवा काठ्या काढतांना घुमटाच्या प्रतिमेला अडथळा येनार नाहीना.
21:41 हे काळजी पूर्वक आणि सावकाश करा.
21:45 तारेचे घुमट आता तयार झाले आणि डायजेस्टर टॅंक वर ठेवू शकता.
21:53 सर्कावण्या आधी १० इंचाची लोखंडी स्टील रॉडला पायाच्या रिंग पासून काढा.
22:01 याची खात्री कराकी, तारेची जाळी घट्ट बांधली आहे.
22:07 हे बायोगॅस सयंत्राच्या घुमट बांधण्याच्या ट्यूटोरियलच्या अंतिम टपप्यात पोचलो आहोत.
22:14 बायोगॅस सयंत्रावर घुमट स्थित करण्याचे हे पुढील ट्यूटोरियलमध्ये स्पष्ट केले आहे.
22:22 थोडक्यात, ह्या ट्यूटोरियलमध्ये,

आपण टप्या टप्याने घुमटाच्या बांधकामाची प्रक्रीया शिकलो.

22:30 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केला आहे
22:40 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
22:49 मी रजनी भोसले स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.

सहभागासाठी धन्यवाद

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana