Difference between revisions of "ExpEYES/C2/Introduction-to-ExpEYES-Junior/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 388: | Line 388: | ||
|- | |- | ||
|10:17 | |10:17 | ||
− | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. | + | |या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
Revision as of 07:50, 19 May 2016
Time | Narration | |
00:01 | नमस्कार. Introduction to ExpEYES Junior वरील पाठात आपले स्वागत. | |
00:07 | आपण शिकणार आहोत:
| |
00:19 | तसेच आपण शिकणार आहोत:
| |
00:26 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
| |
00:35 | * अँड्रॉईड वर्जन 5.0.2
| |
00:45 | ह्या पाठासाठी शालेय स्तरावरील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे. | |
00:51 | प्रथम ExpEYES म्हणजे काय हे जाणून घेऊ.
| |
01:06 | ExpEYES Junior डिव्हाईस असे दिसते.
| |
01:24 | हे डिव्हाईस USB पोर्टद्वारे सिस्टीमला जोडता येऊ शकते. | |
01:28 | ही ExpEYES Junior ची काही खास वैशिष्टये आहेत. | |
01:33 | * ह्या डिव्हाईस द्वारे विद्युतदाब मोजता येतो, विद्युत तरंगाचा आकार व आलेख बघता येतो.
| |
01:48 | * याचे इनपुट/आऊटपुट ऍनालॉग रेझोल्युशन 12 बिटचे आहे.
| |
02:00 | हे डिव्हाईस ऑनलाईन कसे खरेदी करायचे ते पाहू. | |
02:03 | फायरफॉक्स वेब ब्राउजर उघडा. ऍड्रेसबारमधे टाईप करा: http://expeyes.in/hardware-availability आणि एंटर दाबा. | |
02:18 | डिव्हाईस खरेदी करण्याच्या संदर्भातील सर्व माहिती असलेले वेबपेज उघडेल. | |
02:22 | वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सवर सॉफ्टवेअरच्या उपलब्धतेबद्दल जाणून घेऊ. | |
02:28 | * ExpEYES Junior चे सॉफ्टवेअर Python भाषेत लिहिलेले आहे.
| |
02:41 | हे सॉफ्टवेअर -
| |
02:48 | उबंटु लिनक्स OS वर इन्स्टॉल करण्यापासून सुरूवात करू. | |
02:52 | आपण उबंटु सॉफ्टवेअर सेंटरमधून हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतो. | |
02:57 | किंवा फायरफॉक्स वेब ब्राउजर उघडा. ऍड्रेसबारमधे टाईप करा: http://expeyes.in | |
03:08 | पानावरील SOFTWARE टॅबवर क्लिक करा. Software Installation चे पान उघडेल. | |
03:15 | expeyes.deb या लिंकवर क्लिक करा.
सेव्ह फाईलचा डायलॉग बॉक्स उघडेल. Save File पर्याय निवडून OK क्लिक करा. | |
03:26 | डाऊनलोड झालेल्या फाईलवर क्लिक करा. | |
03:29 | ही फाईल उबंटु सॉफ्टवेअर सेंटरमधे उघडेल. Install वर क्लिक करा. | |
03:35 | Authenticate हा डायलॉग बॉक्स उघडेल. सिस्टीमचा पासवर्ड टाईप करून Authenticate वर क्लिक करा. | |
03:42 | इन्स्टॉल होण्यासाठी हे काही वेळ घेऊ शकते. | |
03:45 | सॉफ्टवेअर इंटरफेस उघडण्यासाठी Dash Home वर क्लिक करा. सर्च बारमधे टाईप करा: "expeyes junior". | |
03:54 | ExpEYES Junior चा आयकॉन दिसेल. इंटरफेस उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. | |
04:00 | आता नेटबुकवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू. | |
04:03 | Lubuntu सॉफ्टवेअर सेंटरच्या सहाय्याने ExpEYES Junior हे सॉफ्टवेअर नेटबुकवर इन्स्टॉल करता येते. | |
04:10 | सॉफ्टवेअर सेंटरच्या आयकॉनवर राईट क्लिक करा. Open पर्याय निवडा. Lubuntu सॉफ्टवेअर सेंटरची विंडो उघडेल. | |
04:19 | Search a package च्या बॉक्समधे टाईप करा "expeyes". Expeyes चा आयकॉन दिसेल. तो सिलेक्ट करा. | |
04:28 | स्टेटस बारवरील Add to the Apps Basket वर क्लिक करा. | |
04:33 | मेनूबारवरील Apps Basket वर क्लिक करा. Apps Basket विंडो उघडेल. | |
04:41 | पॅकेज सूचीतून Expeyes निवडा. Install Packages वर क्लिक करा. | |
04:48 | Authenticate हा डायलॉग बॉक्स उघडेल. सिस्टीम पासवर्ड टाईप करा Authenticate वर क्लिक करा. | |
04:56 | इन्स्टॉलिंग पॅकेजेस हा डायलॉग बॉक्स उघडेल. इन्स्टॉल होण्यास थोडा वेळ घेईल. | |
05:03 | USB केबलच्या सहाय्याने हे डिव्हाईस नेटबुकला जोडा. | |
05:08 | नेटबुकमधील या सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडण्यासाठी स्टार्टवर क्लिक करा. एज्युकेशन पर्याय निवडा. | |
05:15 | त्यातील ExpEYES Junior निवडा. सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल. | |
05:21 | आता हे सॉफ्टवेअर एँड्रॉईडवर इन्स्टॉल करू. | |
05:25 | तुमच्या एँड्रॉईडवर वाय फाय किंवा डेटा पॅक उपलब्ध असल्याची खात्री करा. | |
05:31 | ExpEYES Junior हे डिव्हाईस OTG केबलच्या सहाय्याने तुमच्या मोबाईलला जोडता येते. | |
05:38 | मोबाईलवरील Home वर क्लिक करा. गुगल प्ले स्टोअरवर जा. | |
05:44 | APPS वर क्लिक करा. ऍप्सचे पान उघडेल. | |
05:48 | उजव्या बाजूला कोप-यात वरती असलेल्या भिंगावर क्लिक करा. | |
05:53 | "expeyes" टाईप करून ExpEYES वर क्लिक करा. INSTALL वर क्लिक करा. | |
05:59 | लायसन्स ऍग्रीमेंट ऍक्सेप्ट करा. डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल. | |
06:05 | डाऊनलोड झाल्यावर OPEN वर क्लिक करा. | |
06:09 | ExpEYES Experiments चा डायलॉग बॉक्स उघडेल. | |
06:12 | Use by default for this USB device च्या चेकबॉक्स वर क्लिक करा. | |
06:17 | OK वर क्लिक करा. इंटरफेस उघडेल. | |
06:21 | हे सॉफ्टवेअर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर इन्स्टॉल करू. | |
06:27 | तुमचा डिफॉल्ट वेब ब्राउजर उघडा. ऍड्रेसबारमधे expeyes.in ही URL टाईप करून एंटर दाबा.
ExpEYES चे पान उघडेल. | |
06:40 | SOFTWARE टॅबवर क्लिक करा. एमएस विंडोज पर्यायासाठी खाली स्क्रॉल करा. | |
06:45 | विंडोजवर इन्स्टॉल करण्यासाठी Python इंटरप्रीटर आणि आवश्यक लायब्ररीज इन्स्टॉल करणे गरजेचे आहे. | |
06:52 | पुढील ड्रायव्हर्स आणि फाईल्स डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. : http://www.ftdichip.com/Drivers/CDM/CDM20814_Setup.exe | |
06:57 | मी डाऊनलोडस लायब्ररीमधे आधीच सर्व फाईल्स डाऊनलोड करून घेतल्या आहेत. | |
07:02 | expeyes-3.0.0 या झिप फाईलवर राईट क्लिक करून Extract Here या पर्यायावर क्लिक करा. फाईल एक्स्ट्रॅक्ट केली जाईल. | |
07:14 | expeyes-3.0.0 या फोल्डरवर डबल क्लिक करा. | |
07:21 | आता eyes-junior फोल्डरवर डबल क्लिक करा. फाईल्सची सूची दिसेल. | |
07:27 | croplus फाईलवर जा. त्यावर राईट क्लिक करून Properties पर्याय निवडा. croplus Properties ची विंडो उघडेल. | |
07:36 | Change वर क्लिक करा. Python पर्याय निवडून OK क्लिक करा. | |
07:44 | प्रॉपर्टीज विंडोमधील OK क्लिक करा. आता croplus फाईलवर डबल क्लिक करा. | |
07:51 | Python exe ही फाईल कार्यान्वित होताना दिसेल. सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल. | |
07:59 | विंडोज 8/8.1वर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना सेटिंगमधे unsigned driver installation एनेबल करायचे लक्षात ठेवा. | |
08:10 | USB पोर्टद्वारे हे डिव्हाईस सिस्टीमला जोडू शकतो. जोडले गेल्यावर सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल. | |
08:19 | आता हे डिव्हाईस आणि इंटरफेस वापरून एक प्राथमिक प्रयोग करून बघणार आहोत. | |
08:25 | या प्रयोगात बाह्य आणि अंतर्गत स्त्रोतांच्या विद्युतदाबाची तुलना करणार आहोत. | |
08:33 | या प्रयोगासाठी विद्युदाबाचा बाह्य स्त्रोत म्हणून बॅटरीची आवश्यकता आहे. बॅटरीचा विद्युतदाब “3V” आहे. | |
08:44 | या प्रयोगासाठी Ground(GND) टर्मिनल आणि A1 टर्मिनल बॅटरीला जोडले आहे. | |
08:50 | इंटरफेसवर A1 टर्मिनलवरचा विद्युतदाब दाखवण्यासाठी A1 वर क्लिक करा. “+3.15V” हा विद्युतदाब दिसत आहे. | |
09:00 | ही जोडणी उलटी केल्यास “-3.14V” एवढा विद्युतदाब दिसत आहे. | |
09:06 | बॅटरीच्या जागी विद्युतदाबाचा अंतर्गत स्त्रोत म्हणून PVS चा वापर करू शकतो. ह्या प्रयोगासाठी A1 हे PVS ला जोडले आहे. | |
09:17 | इंटरफेसच्या उजव्या बाजूला Set PVS साठी 3V ही व्हॅल्यू सेट करा आणि एंटर दाबा. PVS चा दाखवला जाणारा विद्युतदाब 3.001V एवढा आहे. | |
09:31 | डाव्या कोप-यात वरती A1 वर क्लिक करा. दाखवला जाणारा A1 चा विद्युतदाब “3.008V” एवढा आहे. | |
09:40 | थोडक्यात, | आपण शिकलो:
|
09:49 | * तसेच लिनक्स, नेटबुक, एँड्रॉईड आणि विंडोजवर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे.
| |
10:03 | असाईनमेंट म्हणून -
तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. | |
10:09 | ExpEYES Junior ह्या डिव्हाईसची रचना व विकास Inter-University Accelerator Centre, New Delhi च्या PHOENIX प्रकल्पाखाली केला गेला आहे. | |
10:17 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
| |
10:25 | प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
| |
10:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. | |
10:43 | सहभागासाठी धन्यवाद. |