Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C3/Edit-Curves-and-Polygons/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 185: Line 185:
 
|-
 
|-
 
|05:11
 
|05:11
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Latest revision as of 23:09, 28 October 2015

Time Narration
00:01 लिबर ऑफिस ड्रॉच्या Editing Curves आणि Polygons वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात कर्व्हज आणि पॉलिगॉन्स एडिट कसे करायचे याबद्दल शिकणार आहोत.
00:13 यासाठी तुम्हाला लिबर ऑफिस ड्रॉचे प्राथमिक ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:23 येथे आपण उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू.
00:32 आपले Routemap चे ड्रॉईंग पुन्हा उघडू.
00:37 मागील भागात कर्व्हज आणि पॉलिगॉन्स काढायला शिकलो. आता ते एडिट करायला शिकू.
00:42 आता School Campus च्या आकारात बदल करू.
00:48 ह्यासाठी Edit Points टूलबार वापरू.
00:52 मेन मेनूवरील View वर क्लिक करा. Toolbars सिलेक्ट करून Edit Points वर क्लिक करा.
01:00 एडिट पॉईंटसचा टूलबार उघडेल.
01:04 आता School Campus चा पॉलिगॉन सिलेक्ट करा.
01:09 Edit Points टूलबारवरील Points आयकॉनवर क्लिक करा.
01:12 आकृतीमधे हिरव्या रंगाचे सिलेक्शन हँडल्स बदलून आता ते निळ्या रंगाचे एडिट पॉईंटस होतील. हे तुम्ही एडिट पॉईंटमधे असल्याचे दाखवते.
01:23 Edit Points टूलबारवरील Insert points आयकॉनवर क्लिक करा.
01:29 आता ड्रॉ पेजवर जा. कर्सर अधिकच्या चिन्हात बदललेला दिसेल.
01:35 हे अधिकचे चिन्ह School Campus या पॉलिगॉनच्या डाव्या बाजूवर न्या.
01:41 माऊसचे डावे बटण दाबून ते उजव्या बाजूला ड्रॅग करा आणि सोडून द्या. आपण बिंदू समाविष्ट केला आहे.
01:51 Edit Points टूलबारमधील पर्याय आता वापरता येतील.
02:00 Symmetric Transition वर क्लिक करा.
02:03 बिंदूच्या पुढे ठिपके असलेली कंट्रोल लाईन दिसेल.
02:07 शाळेच्या परिसराचा आकार बदलण्यासाठी कंट्रोल लाईन बाहेरच्या बाजूला ड्रॅग करा. आकार बदललेला दिसेल.
02:16 Edit Points टूलबारमधून बाहेर पडण्यासाठी Points वर क्लिक करा.
02:21 आता शाळेचा परिसर उजव्या बाजूने मोठा करणार आहोत.
02:26 विशेषतः फक्त उजवीकडील वरच्या बाजूचा शेवटचा बिंदू हलवू.
02:30 School Campus चा पॉलिगॉन सिलेक्ट करा.
02:34 Edit Points टूलबार उघडू.
02:38 आकृतीवर निळ्या रंगाचे एडिट करण्यासाठीचे बिंदू दिसतील. हा बिंदू निवडू.
02:45 Edit Points टूलबारवरील Move points वर क्लिक करा.
02:50 आपण निवडलेला बिंदू गडद निळ्या रंगाचा झालेला दिसेल.
02:54 आता हा बिंदू उजवीकडे ड्रॅग करू.
02:58 गरजेनुसार आकृती योग्य जागी ठेवण्यासाठी आपण ग्रीडचा उपयोग करू शकतो.
03:03 अशाप्रकारे School Campus चा आकार बदलला आहे.
03:09 हा पाठ थांबवून ही असाईनमेंट करा.
03:12 एक कर्व्ह काढून Edit Points टूलबारवरील सर्व पर्याय वापरून बघा. Edit Points टूलबारवर कौशल्य मिळवण्यासाठी खूप सराव गरजेचा आहे.
03:25 शेवटी नकाशावरील सर्व आकृत्यांचा एकत्रित संच करू. कीबोर्डवरील Ctrl + A ही बटणे दाबा आणि काँटेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करा.
03:35 Group हा पर्याय निवडा. आता सर्व आकृत्यांचा ग्रुप झाला आहे.
03:43 अशाप्रकारे नकाशा पूर्ण झाला आहे. बिल्डिंगला रंग देखील देता येईल. रेषांच्या सहाय्याने रस्ते, ट्रॅफिक सिग्नल्स आणि इतर गोष्टी आवश्यकतेप्रमाणे समाविष्ट करा.
03:56 हा नमुन्यादाखल तयार केलेला रंगीत routemap आहे.
04:00 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. येथे कर्व्हज आणि पॉलिगॉन्स मधे बदल करण्याबद्दल जाणून घेतले.
04:10 आणखी एक असाईनमेंट. या स्लाईडवर दाखवल्याप्रमाणे नकाशा बनवा.
04:16 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:27 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04:37 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
04:45 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:00 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
05:11 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana