Difference between revisions of "BASH/C3/Using-File-Descriptors/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 281: | Line 281: | ||
|- | |- | ||
| 06.19 | | 06.19 | ||
− | | '''exec 3 | + | | '''exec 3 lesser than symbol output dot txt''' ह्या ओळीमुळे फाईल वाचण्यासाठी उघडली जाईल. |
|- | |- |
Latest revision as of 16:28, 11 February 2015
Title of script: Using file descriptors Author: Manali Ranade Keywords: video tutorial, Bash shell, file descriptors
Visual Cue | Narration |
00.01 | नमस्कार. Using file descriptors वरील पाठात आपले स्वागत. |
00.08 | या पाठात शिकणार आहोत. |
00.11 | * आऊटपुट फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करणे |
00.14 | * इनपुट फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करणे |
00.17 | * फाईल डिस्क्रीप्टर (fd)संपवणे |
00.19 | * ह्यांची संबंधित उदाहरणे. |
00.23 | ह्या पाठासाठी BASH मधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे. |
00.29 | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.35 | ह्या पाठासाठी आपण वापरू, |
00.38 | * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि |
00.43 | * GNU BASH वर्जन 4.2 |
00.46 | पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00.54 | सुरूवातीला प्राथमिक ओळख करून घेऊ. |
00.56 | आपण मागील पाठात फाईल डिस्क्रीप्टर्स बद्दल आधीच जाणून घेतले होते. |
01.02 | * stdin, stdout आणि stderrसाठी 0, 1 आणि 2 ही स्टँडर्ड फाईल डिस्क्रीप्टर्स आहेत. |
01.15 | * फाईल डिस्क्रीप्टर्स i/o redirectionसाठी वापरली जातात. |
01.20 | आऊटपुट फाईलला फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करण्याचा सिंटॅक्स असा आहे: |
01.25 | exec [ फाईल डिस्क्रीप्टर] greater than symbol filename |
01.31 | त्याचे उदाहरण पाहू. |
01.33 | मी fdassign dot shनावाच्या फाईलमधे कोड लिहिला आहे. |
01.43 | पहिली ओळ ही shebang lineआहे. |
01.49 | exec कमांड चालू shell processमधे बदल करते. |
01.56 | नवीन प्रोसेस सुरू करण्याऐवजी चालू shell च्या जागी कार्यान्वित केले जाते. |
02.04 | आपल्याला माहित आहे की 0, 1 आणि 2 ही स्टँडर्ड फाईल डिस्क्रीप्टर्स आहेत. |
02.09 | कुठल्याही नव्या उघडलेल्या फाईलसाठी आपल्याकडे 3 ते 9 हे अतिरिक्त फाईल डिस्क्रीप्टर्स आहेत. |
02.19 | येथे 3 हा फाईल डिस्क्रीप्टर आहे. |
02.22 | यामुळे आऊटपुट, output dot txt ह्या फाईलमधे लिहिला जाईल. |
02.30 | "Welcome to BASH learning" ही स्ट्रिंग output dot txt ह्या फाईलकडे पाठवली जाईल. |
02.36 | हे 3 ह्या फाईल डिस्क्रीप्टरद्वारे केले जाईल. |
02.42 | हे स्ट्रिंग फाईलकडे रिडायरेक्ट करण्यासारखे आहे. |
02.49 | प्रत्येक नवी स्ट्रिंग फाईलमधे जोडली जाईल. |
02.52 | उदाहरणार्थ, |
02.54 | आपण output dot txt फाईलमधे सिस्टीमची तारीख जोडणार आहोत. |
03.00 | सिंटॅक्स असा आहे: date SPACE greater-than symbol ampersand sign 3 |
03.13 | येथे फाईल डिस्क्रीप्टर संपवू. |
03.16 | या ओळीनंतर डिस्क्रीप्टर output dot txt या फाईलमधे काही लिहू शकणार नाही. |
03.23 | कोड कार्यान्वित करून आऊटपुट पहा. |
03.26 | CTRL+ALT+T ह्या बटणांच्या सहाय्याने टर्मिनल उघडा. |
03.34 | टाईप करा: chmod space plus x space fdassign dot sh |
03.41 | टाईप करा: dot slash fdassign dot sh |
03.46 | cat space output dot txtटाईप करून आऊटपुट तपासा. |
03.56 | आपण Welcome to BASH learning ही स्ट्रिंग आणि सिस्टीमची चालू तारीख बघू शकतो. |
04.05 | एडिटरवर जा. |
04.11 | आता डिस्क्रीप्टर संपल्यानंतर शेवटी echo कमांड टाईप करा. |
04.17 | टाईप करा: echo डबल कोटसमधे Hi, कोटस नंतर space greater than symbol ampersand sign 3 |
04.31 | Save क्लिक करा. |
04.35 | आता पुन्हा एकदा स्क्रिप्ट कार्यान्वित करून काय होते ते पाहू. |
04.38 | टर्मिनलवर जाऊन दोन वेळा अप ऍरो दाबून dot slash fdassign dot sh कमांड मिळवा. |
04.50 | एंटर दाबा. |
04.52 | एरर मेसेज दिसेल. |
04.55 | Bad file descriptor |
04.58 | एरर दुरूस्त करू. |
05.00 | एडिटरवर जा. |
05.03 | कोडची शेवटची ओळ कट करून date कमांड खाली पेस्ट करा. |
05.11 | Save क्लिक करा. |
05.13 | कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा. |
05.19 | मागील dot slash fdassign.sh कमांडवर जा. |
05.24 | एंटर दाबा. |
05.26 | आता output dot txt ही फाईल उघडू. |
05.29 | टाईप करा: cat space output dot txt |
05.41 | आपण आऊटपुट बघू शकतो. |
05.43 | शेवटी Hi ही स्ट्रिंग दाखवली गेली आहे. |
05.49 | आता आपण इनपुट फाईलला फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करू. |
05.54 | त्याचे उदाहरण पाहू. |
05.56 | आपल्याकडे fdread dot sh नावाची फाईल आहे. |
06.03 | त्यातील कोड समजून घेऊ. |
06.07 | ही exec कमांड आहे. |
06.13 | येथे output dot txt ही फाईल वाचू. |
06.19 | exec 3 lesser than symbol output dot txt ह्या ओळीमुळे फाईल वाचण्यासाठी उघडली जाईल. |
06.30 | cat कमांड फाईलमधील घटक दाखवेल. |
06.35 | आणि शेवटी आपण फाईल डिस्क्रीप्टर पूर्ण केला आहे. |
06.39 | आता ही shell स्क्रिप्ट कार्यान्वित करू. |
06.42 | टर्मिनलवर प्रॉम्प्ट क्लियर करून घ्या. |
06.47 | टाईप करा: chmod space plus x space fdread dot sh |
06.55 | टाईप करा dot slash fdread dot sh |
07.01 | आपण टर्मिनलवर आऊटपुट बघू शकतो. |
07.05 | output dot txt ह्या फाईलमधले घटक दाखवले आहेत. |
07.10 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07.13 | स्लाईडसवर जा . |
07.16 | थोडक्यात, |
07.17 | पाठात शिकलो, |
07.19 | * आऊटपुट फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करणे |
07.22 | * इनपुट फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करणे |
07.26 | * फाईल डिस्क्रीप्टर संपवणे. |
07.28 | असाईनमेंट म्हणून, |
07.30 | test dot txt फाईलमधे फाईल डिस्क्रीप्टर्सच्या सहाय्याने काही ओळी एकापुढे एक जोडा. |
07.36 | फाईल डिस्क्रीप्टर्सच्या सहाय्याने फाईलमधील घटक दाखवा. |
07.41 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07.45 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07.48 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07.53 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07.58 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08.02 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
08.10 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08.14 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08.22 | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08.28 | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
08.33 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
08.37 | सहभागासाठी धन्यवाद. |