Difference between revisions of "BASH/C2/Command-Line-arguments-and-Quoting/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 450: | Line 450: | ||
|- | |- | ||
| 08:01 | | 08:01 | ||
− | | टाईप करा '''echo''' space सिंगल | + | | टाईप करा '''echo''' space सिंगल कोटसमधे '''Username is dollar USER''' (कॅपिटलमधे ) |
|- | |- |
Revision as of 15:55, 10 December 2014
Title of script: Command line arguments and Quoting in BASH
Author: Manali Ranade
Keywords: BASH, Quoting, Arguments
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Command line arguments and Quoting in BASH वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात शिकणार आहोत, |
00:11 | * कमांड लाईन अर्ग्युमेंटस आणि |
00:13 | * कोटिंग (Quoting) |
00:15 | ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
|
00:20 | नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:26 | ह्या पाठासाठी आपण वापरू, |
00:29 | * उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:33 | * GNU Bash वर्जन 4.1.10 |
00:37 | सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00:43 | * Shell स्क्रिप्ट, कमांड लाईनवरून अर्ग्युमेंटस स्वीकारते. |
00:46 | * कॉल केलेल्या प्रोग्रॅममधे अर्ग्युमेंट पास केले जाते. |
00:52 | * प्रोग्रॅममधे कितीही अर्ग्युमेंटस पास करता येतात. |
00:57 | तुमच्या कीबोर्डवरील Ctrl Alt आणि T बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडू. |
01:06 | मी कोड arg.sh ह्या फाईलमधे आधीच लिहून ठेवला आहे. |
01:12 | टर्मिनलवर ही फाईल उघडण्यासाठी टाईप करा |
01:16 | gedit space arg.sh space ampersand sign |
01:23 | प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी ampersand चे चिन्ह वापरले आहे. |
01:27 | एंटर दाबा. |
01:30 | टेक्स्ट एडिटर उघडेल. |
01:33 | आता कोड समजून घेऊ. |
01:36 | ही shebang लाईन आहे. |
01:39 | ही ओळ शून्यावे अर्ग्युमेंट प्रिंट करेल. |
01:43 | येथे $0 (डॉलर शून्य) हे shell स्क्रिप्टचे नाव प्रिंट करेल. |
01:48 | म्हणजेच शून्यावे अर्ग्युमेंट हे प्रोग्रॅमचे नावच असते. |
01:55 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू आणि पाहू. |
01:59 | टर्मिनलवर जा. |
02:01 | प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यास टाईप करू. |
02:05 | chmod space plus x space arg.sh |
02:12 | एंटर दाबा. |
02:14 | टाईप करा dot slash arg.sh |
02:18 | एंटर दाबा. |
02:19 | Zeroth argument is arg.sh असे आऊटपुट दाखवले जाईल. |
02:26 | आता एडिटर वर जाऊन येथे दाखवलेल्या तीन ओळी टाईप करा. |
02:33 | $1(डॉलर एक)हे कमांड लाईनवरून प्रोग्रॅममधे पाठवलेले पहिले अर्ग्युमेंट दाखवते. |
02:40 | $2 (डॉलर दोन) हे प्रोग्रॅममधे पाठवलेले दुसरे अर्ग्युमेंट दाखवते. |
02:44 | आणि $3 (डॉलर तीन) हे तिसरे अर्ग्युमेंट दाखवते. |
02:48 | Save वर क्लिक करा. |
02:49 | प्रोग्रॅम कार्यान्वित करून बघू. |
02:52 | अपअॅरो की दाबून एंटर दाबा. |
02:57 | आपण बघू शकतो की शून्यावे अर्ग्युमेंट प्रिंट झालेले आहे. |
03:00 | पण पहिले, दुसरे, तिसरे ही अर्ग्युमेंटस रिकामी आहेत. |
03:05 | कारण कमांड लाईन अर्ग्युमेंटस ही प्रोग्रॅम कार्यान्वित होते वेळी देण्यात आली होती. |
03:11 | म्हणून अपअॅरो की दाबा आणि टाईप करा: sunday monday आणि tuesday. |
03:18 | एंटर दाबा. |
03:21 | आपण बघू शकतो की Sunday Monday आणि Tuesday हे पहिले, दुसरे, तिसरे अर्ग्युमेंट आहे. |
03:28 | एडिटर वर जा आणि एंटर दाबा. |
03:33 | येथे दाखवल्याप्रमाणे ही ओळ टाईप करा. |
03:37 | महिरपी कंसात $12 (डॉलर बारा) हे बारावे अर्ग्युमेंट दाखवते. |
03:41 | 9पेक्षा मोठे अर्ग्युमेंट लिहिण्यासाठी महिरपी कंस वापरणे गरजेचे आहे. |
03:46 | अन्यथा bash अर्ग्युमेंट म्हणून केवळ दशक स्थानावरील अंक घेईल. |
03:53 | आणि अपेक्षित आऊटपुट मिळणार नाही. |
03:57 | Save वर क्लिक करा. |
03:59 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
04:01 | टर्मिनलवर जा. |
04:04 | प्रॉम्प्ट क्लियर करू. |
04:07 | आता प्रोग्रॅममधे 12 किंवा 13 अर्ग्युमेंटस देणे गरजेचे आहे. |
04:12 | टाईप करा dot slash arg.sh space 1 to 13 आणि एंटर दाबा. |
04:23 | आपण बघू शकतो की 12 हे 12वे अर्ग्युमेंट आहे. |
04:27 | एडिटरवर जाऊ. |
04:30 | आणि येथे दाखवलेली ओळ टाईप करा. |
04:34 | $# (डॉलर हॅश)मुळे आपल्याला प्रोग्रॅममधे पास केलेल्या अर्ग्युमेंटसची एकूण संख्या दिसेल. |
04:40 | Save वर क्लिक करा. |
04:43 | कार्यान्वित करू. |
04:44 | टर्मिनल वर जा. |
04:46 | हे कार्यान्वित करू. अप अॅरो की दाबून एंटर दाबा. |
04:52 | आपण बघू शकतो की एकूण 13 अर्ग्युमेंटस आहेत. |
04:57 | एडिटरवर जाऊ. |
05:00 | एंटर दाबा आणि येथे दाखवलेली ओळ टाईप करा. |
05:04 | $* (डॉलर अॅस्टेरिक) मुळे सर्व अर्ग्युमेंटस एका ओळीवर प्रिंट होतील. |
05:10 | आपण हे साध्या for लूपद्वारे तपासून बघू. |
05:14 | कार्यान्वित करताना for लूपचे विश्लेषण करू. |
05:18 | Save वर क्लिक करा. टर्मिनलवर जा. |
05:22 | प्रॉम्प्ट क्लियर करू. |
05:26 | आता टाईप करा, dot slash arg.sh space sunday monday and tuesday |
05:35 | एंटर दाबा. |
05:38 | तुम्ही बघू शकता अर्ग्युमेंटसची एकूण संख्या 3आहे कारण प्रोग्रॅममधे 3 अर्ग्युमेंटस पास केलेली होती. |
05:46 | मागे सांगितल्याप्रमाणे $* मुळे सर्व अर्ग्युमेंटस एका ओळीवर प्रिंट होतील. |
05:54 | आणि हे for लूप साठीचे आऊटपुट आहे. |
05:57 | आपण बघू शकतो की सर्व अर्ग्युमेंटस एका ओळीवर प्रिंट झालेली आहेत. |
06:02 | प्रोग्रॅमवर परत जा आणि येथे दाखवलेल्या ओळी टाईप करा. |
06:09 | $@ (डॉलर अॅट) मुळे सर्व अर्ग्युमेंटस प्रिंट होतील. |
06:13 | ह्यावेळी प्रत्येक अर्ग्युमेंट वेगळ्या ओळीवर प्रिंट होईल. |
06:20 | हे आणखी एक for लूप आहे जे प्रत्येक अर्ग्युमेंट वेगळ्या ओळीवर प्रिंट करेल. |
06:26 | कसे ते पाहू. Save वर क्लिक करा. |
06:29 | टर्मिनल वर जा. |
06:32 | अपअॅरो की दाबा. |
06:34 | एंटर दाबा. आता तुम्ही फरक पाहू शकता. |
06:39 | ही अर्ग्युमेंटस$@ द्वारे प्रिंट केली आहेत. |
06:43 | $@ हे प्रत्येक अर्ग्युमेंट वेगळ्या ओळीवर प्रिंट करते. |
06:47 | हे दुस-या forलूपचे आऊटपुट आहे. |
06:52 | आता BASH मधील कोटिंगबद्दल जाणून घेऊ. |
06:55 | स्लाईडसवर जाऊ. |
06:57 | कोटसचे तीन प्रकार आहेत. |
06:59 | डबल कोट |
07:00 | सिंगल कोट |
07:02 | बॅकस्लॅश |
07:03 | * Double quote मुळे व्हेरिएबल्स आणि कमांडस त्यांच्या व्हॅल्यूने लिहिल्या जातात. |
07:09 | * उदाहरणार्थ डबल कोट्समधे echo Username is dollar USER |
07:13 | * हे तुमच्या सिस्टीमचे username दाखवेल. |
07:17 | टर्मिनल वर जा. |
07:20 | प्रॉम्प्ट क्लियर करू. |
07:23 | टाईप करा echo space डबल कोटस मधे Username space is dollar USER (कॅपिटलमधे ). |
07:34 | एंटर दाबा. |
07:35 | हे सिस्टीम चे username दाखवत आहे. |
07:39 | सिस्टीम नुसार आऊटपुट मधे बदल होईल. |
07:42 | स्लाईडस वर जाऊ. |
07:46 | * सिंगल कोटसमधे दिल्या गेलेल्या स्ट्रिंगमधील प्रत्येक कॅरॅक्टरचा अर्थ शब्दशः तसाच ठेवतो. |
07:53 | * हे सर्व कॅरॅक्टर्सचे विशिष्ट अर्थ काढून टाकण्यासाठी वापरले जाते. |
07:58 | टर्मिनल वर जा. |
08:01 | टाईप करा echo space सिंगल कोटसमधे Username is dollar USER (कॅपिटलमधे ) |
08:10 | एंटर दाबा. |
08:12 | Username is $USERहे आऊटपुट मिळेल. |
08:16 | या उदाहरणात हे सिंगल कोटसमधील सर्व कॅरॅक्टर्स प्रिंट करेल. |
08:23 | हे $USER ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू घेणार नाही. |
08:28 | स्लाईडसवर जाऊ. |
08:31 | * बॅकस्लॅश एका कॅरॅक्टरचा विशिष्ट अर्थ काढून टाकतो. |
08:37 | *BASH मधे हे एस्केप कॅरॅक्टर म्हणून वापरले जाते. |
08:42 | टर्मिनल वर जा. |
08:44 | टाईप करा echo space डबल कोटमधे Username is backslash dollar USER (कॅपिटलमधे ) |
08:55 | आपण डबल कोटचा वापर केला असल्यामुळे,echo कमांड username दाखवेल असे अपेक्षित आहे. |
09:02 | ही कमांड वापरण्यासाठी एंटर दाबा. |
09:06 | Username is $USER असे आऊटपुट मिळाले आहे. |
09:10 | या उदाहरणात backslash ने (Dollar) $ ह्या चिन्हाचा विशिष्ट अर्थ काढून टाकला आहे. |
09:16 | येथे $USER ही कुठल्या विशिष्ट फंक्शनॅलिटी शिवाय असलेली केवळ एक स्ट्रिंग आहे. |
09:22 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
09:25 | स्लाईडस वर जाऊ. |
09:27 | थोडक्यात, |
09:28 | आपण शिकलो, |
09:31 | * कमांड लाईन अर्ग्युमेंटस |
09:33 | * डबल कोट, सिंगल कोट आणि बॅकस्लॅश ही फंक्शनॅलिटी |
09:39 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:42 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:45 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
|
09:56 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:00 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
10:07 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
|
10:10 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken tutorial.org\NMEICT-Intro |
10:24 | हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
10:30 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |