Difference between revisions of "PHP-and-MySQL/C2/Common-Errors-Part-1/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Common Errors-1''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: PHP and MySQL''' {| style="border-spacing:0;" ! Visual Clue ! <center>Narration</center…') |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 7: | Line 7: | ||
− | {| | + | {| border=1 |
− | ! | + | ! Time |
− | ! | + | ! Narration |
|- | |- |
Revision as of 10:48, 24 July 2014
Title of script: Common Errors-1
Author: Manali Ranade
Keywords: PHP and MySQL
Time | Narration |
---|---|
0:00 | नमस्कार. हे आपले ट्युटोरियल थोडेसे स्पष्टीकरणाच्या स्वरूपात आहे. |
0:07 | PHP मध्ये प्रोग्रॅमिंग करताना होणा-या common errors आपण जाणून घेणार आहोत. |
0:13 | त्यापैकी ब-याचशा self explanatory आहेत. |
0:17 | मी असे म्हणेन की 50% errors ह्या आपण काहीतरी चुकीचे टाईप केल्यामुळे किंवा काहीतरी टाईप करण्यास विसरल्यामुळे होतात. |
0:32 | जसे की semicolon टाईप न करणे, जादा bracket समाविष्ट करणे किंवा अशाच काही चुका प्रत्येक जण करतो. |
0:41 | आता येथे मी काही पेजेस तयार केली आहेत. ह्यात काही errors आहेत ज्या सामान्यतः आपल्याला आढळतात. |
0:47 | ही संपूर्ण यादी नाही. परंतु आपण काही बेसिक errorsबघूया. |
0:51 | एकेक करून तुम्हाला माहिती देण्यासाठी मी context editorतयार ठेवला आहे. |
1:00 | प्रथम मी तुम्हाला हे html पेज दाखवणार आहे. |
1:06 | येथे echo कमांड मध्ये html code समाविष्ट केला आहे. |
1:10 | हे पेज कार्यान्वित केले तर आपल्याला ही Parse error मिळेल. |
1:17 | आणि येथे हा मेसेज दिसेल. |
1:21 | येथे लक्ष द्या- expecting either a comma or a semicolon |
1:27 | तसेच line number दिला जाईल. जेव्हा Parse error मिळते तेव्हा नेहमी ओळीचा क्रमांक दिला जातो. |
1:34 | येथे ओळ क्रमांक 5 दिसत आहे. |
1:36 | जर आपण खाली 5व्या ओळीवर आलो तर येथे line 5 column 19 (Ln5, Col19); अशी सर्व माहिती दिसेल. |
1:45 | ही 5 वी ओळ आहे. |
1:46 | आता ह्यामध्ये आपल्याला काहीही चुकीचे दिसत नाही. |
1:50 | php मध्ये echoकमांडचा अशा पध्दतीने अर्थ लावला जातो. सुरूवात, नंतर double quotes आणि शेवट. म्हणजे येथे सुरूवात असेल आणि येथे शेवट असेल. |
2:06 | प्रत्यक्षात आपण येथे html code चा समावेश केला असल्यामुळे येथे मध्येच आपण double quotesवापरले आहेत. याचा अर्थ echo कमांड अशी वाचली जाईल. येथे सुरूवात असेल आणि येथे शेवट असेल. |
2:17 | याबद्दल आपण एको फंक्शन वरील ट्युटोरियलमध्ये जाणून घेतले होते. |
2:21 | या ओळीवर एरर मिळाली कारण की पहिल्यांदा double quotes अशा ठिकाणी दिला गेला आहे जिथे तो असायला नको. |
2:31 | तांत्रिक दृष्ट्या ही एरर phpला सापडलेली नाही म्हणून ती येथे दिसायला नको. |
2:36 | ही एरर आपल्याला असे सांगते की येथे semicolon असणे आवश्यक आहे. साधारणतः याचा वापर आपण एकोच्या शेवटी करतो. म्हणजेच हा semicolon येथे असणे अपेक्षित आहे. |
2:49 | परंतु येथे semicolon चा वापर अगदीच निरर्थक आहे. |
2:52 | त्याऐवजी आपण single quote चा वापर करणे आवश्यक आहे. |
2:58 | आता जर हे आपण सेव्ह करून कार्यान्वित केले तर आपल्याला 6 व्या ओळीवरची एरर दर्शवली जाईल. |
3:08 | आपल्याला कळेल की 6 व्या ओळीवर किंवा त्याच्या जवळपास बदल आवश्यक आहे. आपण अशाही काही एरर बघणार आहोत ज्या नक्की कुठल्या ओळीवर आहेत ते दर्शवत नाही. |
3:19 | आणि आता हे बघा आपला html code यशस्वीरित्या चालला आहे. याचा काही खास उपयोग नाही. परंतु आपण ते आता समजून घेतले आहे. |
3:28 | आता पुढे semicolonया अजून एका कॉमन एररबद्दल जाणून घेऊ. |
3:33 | आपण येथे semicolon ही फाईल उघडू. या येथे आपल्याला expecting a semicolon अशी parse error मिळाली आहे. |
3:39 | आता आपल्याला semicolonची गरज कशासाठी आहे? हा code तर आपल्याला ठीक दिसतो आहे. आपल्याकडे ही दोन व्हेरिएबल्स आहेत ज्यांची व्हॅल्यू Alex ही आहे. |
3:47 | आपण या दोन व्हेरिएबल्सची तुलना करत आहोत. म्हणजे येथे double equals असणे आवश्यक आहे. |
3:52 | म्हणजे जर ही कंडिशन true असेल तर हा मेसेज एको होईल. |
3:55 | आता आपण येथे 9 व्या ओळीवर जाऊ या. |
3:58 | हा अत्यंत साधा code आहे. तो जर कठीण असता तरी आपण line 9वर गेलो असतो. |
4:07 | आता येथे बघितल्यावर 9 व्या ओळीवर काहीच चूक दिसत नाही. |
4:10 | परंतु काहीतरी चूक नक्की आहे. phpमध्ये pages एकेका ओळीने वाचली जातात. |
4:19 | आपण बघत असलेल्या या code मध्ये आणि आधीच्या code मध्ये काहीच फरक नाही. |
4:23 | हे compileहोऊन कार्यान्वित होईल. परंतु हे इथे खाली आहे तसेच ते वर सुध्दा आहे. त्यामुळे यानंतर semicolon अपेक्षित आहे. |
4:34 | आपण हे केल्यास हा codeबरोबर होईल. आपण semicolon इथे घातला आहे जरी प्रत्यक्षात डोळ्यांना तो इथे बरा दिसतो. |
4:42 | आपण येथे हे खाली आणू आणि हा code पुन्हा कार्यान्वित करू. |
4:53 | बघा आपले पेज यशस्वीरित्या कार्यान्वित झाले आहे. |
4:57 | अर्थातच हे आपण येथे नेले तरी देखील हा पूर्वीसारखाच valid code आहे. |
5:02 | या ओळीमध्ये एरर आहे असे phpमध्ये खात्रीने सांगता येत नाही. |
5:07 | सामान्यतः असे म्हणता येईल की पूर्वीच्या ओळींमध्ये एरर असल्यामुळे current line कार्यान्वित करता येत नाही. |
5:13 | ह्या ओळीत semicolon दिला गेलेला नसल्याने ही लाईन काम करत नाही. त्यामुळे आपल्याला दिसते की ही एरर line 9मध्ये दाखवली गेली आहे. |
5:29 | अशा प्रकारे आपण दोन बेसिक errors बद्दल जाणून घेतले. |
5:33 | जर तुम्हाला अशा प्रकारची एरर मिळाली तर ज्या ओळीवर एरर आहे केवळ तीच ओळ न तपासता |
5:40 | त्याच्या आधीची ओळही तपासून बघा. आणि त्या तिथे दुरूस्ती करता येते का ते बघा. |
5:47 | गरज असल्यास प्रत्येक अक्षरही तपासून बघा. |
5:50 | तुमच्यासारखे अनेक जण जे अशा प्रकारच्या चुका करतात, त्यांना मला मदत करायला नक्की आवडेल. |
5:56 | संकोच न करता तुम्ही मला शंका विचारू शकता. परंतु त्यापूर्वी तुम्ही तुमचे काम दोन तीन वेळा तपासून पहा. |
6:04 | पुढील भागात आपण इतर errors ही जाणून घेऊ या. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे.सहभागाबद्दल धन्यवाद. |