Difference between revisions of "PHP-and-MySQL/C2/Functions-Advanced/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Functions Advanced''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: PHP and MySQL''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <cent…')
 
Line 8: Line 8:
  
 
{| style="border-spacing:0;"
 
{| style="border-spacing:0;"
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Time</center>
 
! <center>Narration</center>
 
! <center>Narration</center>
  

Revision as of 10:43, 24 July 2014

Title of script: Functions Advanced

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Time
Narration
0:02 Advanced Function वरील पाठात calculator program तयार करायला शिकू या.
0:11 इनपुट व्हॅल्यू देऊन गणिती क्रियांद्वारे आऊटपुट व्हॅल्यू देणारी फंक्शन आपण पाहू.
0:19 आपण लिहित असलेल्या फंक्शनला 'calc' म्हणू.
0:26 प्रथमblock तयार करू. येथे 'number1', 'number2' आणि 'operator' असे टाईप करा.
0:35 आता पहिले दोन व्हेरिएबल्स हे युजर इनपुटवर अवलंबून, पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या आहेत. तिसरे व्हेरिएबल '+' , '-' '*' or '/' यापैकी एक string value आहे.
0:52 फंक्शनच्या आत आपण code लिहू या. येथे आत switch statement लिहू.
1:00 आता switch लिहून पुढे switchकंडिशन म्हणजे 'op' असे टाईप करू या.
1:08 ह्यासाठी block तयार करून येथे case = कोटस् मध्ये plus चे चिन्ह काढा.
1:18 पुढे 'total' नामक नवे व्हेरिएबल बनवून बरोबरचे चिन्ह काढून 'num1' अधिक 'num2' असे टाईप करा.
1:31 खाली break लिहून semicolon द्या. ह्यासाठी switch statement आणि function एकत्रित वापरणे चांगले.
1:43 अशाप्रकारे तुम्ही विविध गोष्टी एकत्रित वापरू शकता.
1:51 आपण 'plus' साठी case बनवली आहे. जेव्हा 'op' , '+' असा दिला जाईल तेव्हा 'num1' अधिक 'num2' मिळेल.
2:03 आता खाली जाऊन वजाबाकीची case बनवू या. त्यासाठी total = 'num1' - 'num2' असे टाईप करा.
2:17 आता खाली break असे लिहा.
2:20 हा code खाली कॉपी करू.
2:23 येथे '*' आणि '/' लिहा. खाली देखील चिन्हे बदला.
2:34 जर आपल्याला समजण्यात काही अडचण असेल तर e-mail द्वारे संपर्क साधा.
2:45 आणि शेवटी default केससाठी 'unknown operator' असे echo करू या.
2:51 हे समजून घेऊन फंक्शन कॉल करू या.
2:56 आपले calc फंक्शन इनपुट म्हणून दोन संख्या आणि अधिक, वजा, गुणिले किंवा भागिले यापैकी एक ऑपरेटर घेते.
3:12 तुम्ही arithmetic operator वरील ट्युटोरियल बघितले असेलच.
3:20 येथे आत switch statement आहे. ज्यात हा इनपुट केलेला 'op' लक्षात घेऊन त्यानुसार स्विच होतो. उदाहरणार्थ '+' असल्यास बेरीज करणे. हे कार्यक्षम व लिहिण्यास सोपेही आहे.
3:42 जर व्हेरिएबलची व्हॅल्यू '+' असेल ते 'total' नामक व्हेरिएबल बनवेल.
3:48 याची व्हॅल्यू इनपुट केलेल्या दोन्ही संख्याची बेरीज असेल.
3:56 जर व्हेरिएबलची व्हॅल्यू minus असेल तर 'total' व्हेरिएबल मध्ये number 1 - number 2 लिहिला जाईल. असेच गुणाकार व भागाकारासाठी केले जाईल. प्रत्येक केससाठी 'total' हा व्हेरिएबल एकदाच बनवला जाईल.
4:21 आता हे कार्यान्वित करा. आपल्याला काही दिसणार नाही कारण आपण फंक्शन call केलेले नव्हते.
4:32 calc लिहून कंसात योग्य त्या व्हॅल्यूज भरून फंक्शन call करा.
4:40 येथे केवळ10, 10 आणि 'plus' चे चिन्ह द्या. म्हणजे आपल्याला 20 हे उत्तर मिळेल. रिफ्रेश करून काय होते ते बघू या. काहीच झाले नाही. असे का?
4:55 कारण उत्तर echo केलेले नाही. केवळ व्हेरिएबल सेट केला.
5:01 येथे calc फंक्शनद्वारे मिळणारे आऊटपुट echo करू. येथे रिफ्रेश करूनही काहीच झालेले नाही.
5:11 आपल्याला काही दिसले नाही. कारण आपण आऊटपुट return केलेले नाही. त्यामुळे येथे 'return total' टाईप करायला हवे.
5:23 फंक्शन हे व्हेरिएबल असल्यामुळे त्याची व्हॅल्यू total ही सेट करावी लागते.
5:32 returnच्या पुढे जे लिहितो ती व्हॅल्यू फंक्शनला मिळते.
5:39 म्हणून येथे 'return total' टाईप करून, तेच नंतर प्रत्येक केसमध्ये पेस्ट करणार आहोत.
5:47 अर्थातच हे आपणunknown operator साठी करणार नाही. कारण आपल्याला operator समजलेलाच नाहीये.
5:57 हे रिफ्रेश करूनही काही मिळाले नाही. कां बरे?
6:04 कारण आपण हे फंक्शनच्या आत echoकेले ते चुकले.
6:10 ह्या फंक्शनचा कंस येथे सुरू होतो आणि येथे संपतो.
6:14 आपण हे echo स्टेटमेंट त्याच्या खाली लिहूया. आणि मग रिफ्रेश करू. येथे 20 दिसत आहे. आपल्या फंक्शनद्वारे 10 + 10 असे 20 हे उत्तर मिळाले.
6:37 आता 13, 7 आणि भागिले ह्या व्हॅल्यू घेऊन काय होते ते पाहू.
6:46 येथे मोठा अपूर्णांक मिळेल. आपण योग्य फंक्शन बनवले आहे. दोन संख्या आणि ऑपरेटर मिळाला आहे.
6:59 switch statement ते तपासून त्यावर संबंधित क्रिया करते.
7:06 ऑपरेटर न मिळाल्यास unknown operator अशी एरर देतो.
7:11 समजा aनामक चुकीचा ऑपरेटर घेतला तर रिफ्रेश केल्याक्षणी आपल्याला unknown operator असा रिझल्ट मिळेल. आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. फंक्शनमधे आपण इनपुट करू शकतो. return कमांडच्या सहाय्याने व्हॅल्यू मिळवू शकतो.
7:31 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana