Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/File-Upload-Part-1/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
'''Title of script''': File-Upload-Part-1
+
{| border=1
 
+
| '''Time'''
'''Author: Manali Ranade'''
+
|'''Narration'''
 
+
'''Keywords: '''PHP-and-MySQL
+
 
+
 
+
 
+
{| style="border-spacing:0;"
+
! <center>Time</center>
+
! <center>Narration</center>
+
 
+
 
+
  
  

Revision as of 14:41, 18 July 2014

Time Narration


0:00 नमस्कार. ह्या पाठात php upload स्क्रिप्ट बनवण्याविषयी जाणून घेऊ.
0:05 हे upload dot php फाईलमधे लिहित आहोत. हे जरा advanced असेल.
0:10 आपण index dot php वापरू. युजरला फाईल सबमिट करण्यासाठी फॉर्म देऊ. त्यासाठी html code वापरू.
0:20 upload dot php मधे ही फाईल प्रोसेस करू. फाईलची माहिती जसे की name, type, size, temporary stored name आणि error messages मिळवू.
0:33 आपण error messages द्वारे एरर तपासू शकतो.
0:38 फाईल प्रोसेस करू. ती वेबसर्व्हरवर विशिष्ट डिरेक्टरीमधे सेव्ह करू.
0:45 पाठाच्या दुस-या भागात, मी विशिष्ट फाईल टाईप कसे तपासायचे हे सांगेन म्हणजे तुम्हाला ती सुरक्षित ठेवता येईल.
0:54 फाईल साईज कसा चेक करायचा ते शिकू म्हणजे तुम्हाला किमान किंवा कमाल फाईल देता येईल.
01:04 मी 'uploaded' हा फोल्डर बनवून त्यात index आणि upload dot php फाईल्स बनवल्या आहेत.
01:13 uploaded फाईल्स येथे संचित केल्या जातील.
01:17 uploaded फाईल्स सुरूवातीला ह्या फोल्डरमधे न जाता वेबसर्व्हरवरील temporary एरिया मधे जातात.
01:25 html साठी फॉर्म बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी form action आहे. आपल्याकडे 'upload dot php' ही specific action आहे. येथे ही फाईल बनवली आहे.
01:38 आपणPOST ही मेथड सेट केली आहे. हे GET व्हेरिएबलमधे संचित करण्याची गरज नाही.
01:45 कारण वेबसाईटवर पाठवला जाणारा binary data, सुरक्षिततेसाठी आपल्याला युजरला दाखवायचा नाही.
01:53 तसेच GET व्हेरिएबलला शंभर अक्षरांची मर्यादा आहे.
01:58 शंभर अक्षरांची फाईल फारच छोटी होईल.
02:04 आपल्याकडे आणखी एक parameter आहे ज्याबद्दल पूर्वी ऐकले नसेल.
02:11 ते म्हणजे enctype, encoding type म्हणजेच हे कसे encode करणार आहोत.
02:20 टाईप करा multi-part forward slash form data.
02:28 थोडक्यात हा फॉर्म डेटा स्वरूपात सबमिट करू. binary data म्हणजेच शून्य आणि एक ज्याबद्दल मी आधीच सांगितले आहे.
02:40 ठीक आहे. आपल्याला type मिळाला ज्यात हे encodeकरायचे आहे. येथे फॉर्म संपवणार आहोत.
02:50 फाईलसाठी इनपुटच्या स्वरूपात काही elements ची गरज आहे.
02:57 हा type म्हणून file सेट करू आणि myfile असे नाव देऊ.
03:04 नंतर paragraph break दिल्यावर submit बटणाची गरज आहे,
03:12 हे कसे दिसते पाहू. हे बंद करू.
03:18 file uploadवर क्लिक करा. काहीतरी चुकले. Input मधे दोन वेळा 'u' हे अक्षर टाईप केले होते.
03:27 मागे जाऊ. आपल्याला input मिळाले आहे.
03:31 येथे browse करू शकतो. येथे काही files बघू शकतो ज्या आपण upload करू शकतो.
03:36 आता हे आपल्यासाठी अधिक सोपे बनवू.
03:45 येथे Upload a fileलिहून रिफ्रेश करा. हे पेज चांगले दिसत आहे.
03:50 header मिळाले आणि uploadकरायची फाईल येथे मिळू शकते. गरज वाटल्यास येथे नाव टाईप ही करू शकतो.
03:58 तसेच upload बटणाद्वारे upload dot php सबमिट होईल.
04:04 फॉर्मद्वारे सबमिट केलेली फाईल प्रोसेस करण्याची पध्दत upload dot php मधे लिहावी लागेल.
04:13 ही पध्दत म्हणजे dollar underscore FILES चा वापर. खरे तर हे बरोबर नाही.
04:19 हे बरोबर नाही हे सांगणारे उदाहरण मी एको करून सांगू शकते.
04:27 upload वर क्लिक केल्यावर Array असे आऊटपुट मिळेल. कारण हा Array आहे.
04:33 आता हा multidimensional arrayअसल्यामुळे कंसाच्या पहिल्या सेटमधे uploaded फाईलचे नाव लिहू. आणि जेथून ती आली त्या input box चे नाव येथे आहे. - myfile
04:49 येथे myfile वापरू. आणि दुस-या कंसात आपण अनेक गोष्टी लिहू शकतो. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे फाईलचे नाव.
04:59 upload form वर परत जाऊन intro dot avi निवडा. ती येथे दिसत आहे.
05:06 upload वर क्लिक करा. पुढील पेजवर intro dot avi दिसेल.
05:11 लक्षात ठेवा, हे upload dot php फाईलमधे आहे.
05:16 ठीक आहे. हे व्हेरिएबलमधे सेव्ह करू.
05:22 पुढे आपण फाईलचा प्रकार बघणार आहोत. ते येथे लिहू.
05:30 dollar underscore files आणि myname हा reference वापरणार आहोत.
05:38 येथे आत type असणार आहे. हे बघता येण्यासाठी एको करू.
05:45 रिफ्रेश करून रिसेंड करा. येथे myfile असायला हवे.
05:54 पुन्हा रिसेंड करा. video slash avi हे आऊटपुट दिसेल. हे तुम्ही htmlमधे पाहिले असेल.
06:00 उदाहरणार्थ image slash png किंवा image slash jpeg, image slash bmp , video slash avi आणि video slash mpeg किंवा इतर फॉरमॅट असू शकतात.
06:11 आपण बघू शकतो ही एक avi file आहे. हे 'type' मधे मिळाले आहे.
06:18 हे सर्व type ह्या व्हेरिएबलमधे संचित करू.
06:22 पुढे size बद्दल जाणून घेऊ. वेळ वाचवण्यासाठी हा कोड खाली कॉपी पेस्ट करू. type च्या जागी size लिहून एको करू.
06:30 सबमिट केलेल्या फाईलची e-property मिळवणे असे सोपे आहे.
06:35 पेज रिफ्रेश करा. resend वर क्लिक केल्यावर फाईलचा size दिसेल.
06:40 ही संख्या राऊंड ऑफ केल्यास अंदाजे million येते. - एक million bytes
06:47 million bytes म्हणजे एक megabyte असते. myfile चा आकार एक mega byte आहे.
06:54 म्हणजे येथे million बाईटस म्हणजेच megabyte डेटा मिळाला आहे.
06:58 आता हे व्हेरिएबल sizeमधे सेव्ह करू.
07:05 पुढचे महत्त्वाचे आहे 'temporary name'.
07:09 हे थोडे वेगळ्या पध्दतीने लिहिले जाते. tmp जे temp चे संक्षिप्त रूप आहे underscore आणि name.
07:18 हे एक directory देते. आपण फाईलसाठी फोल्डर निवडेपर्यंत ती ह्यामधे तात्पुरती संचित होते.
07:25 पेज रिफ्रेश करा.
07:27 Resend क्लिक करा. ती xampp मधे संचित झाली कारण आपण हे application वापरत आहोत.
07:33 apache वापरत असल्यास स्वतः phpत संचित होईल.
07:37 येथे apache आणि त्याच्यापुढे temporary फाईल नेम असेल.
07:41 हे randomly generated नाव आहे ज्याचे extension tmp आहे.
07:45 परंतु हे आत्ता निरूपयोगी आहे.
07:48 हे temp file मधे संचित करू. 'temp' हे संक्षिप्त नाव देऊ.
07:55 आणि शेवटचे 'error'. हे जर सर्व ठीक असेल तर हे शून्य एको करेल.
08:00 पुन्हा copy-paste आणि येथे error असे लिहा.
08:03 शून्य हे आऊटपुट मिळाले पाहिजे. कारण सर्व योग्य लिहिलेले आहे.
08:07 आणि ही व्हॅल्यू कधीच negative असणार नाही.
08:12 शून्यपेक्षा जास्त असल्यास हे एरर कोड दर्शवते. म्हणजेच येथे एरर आहे.
08:21 आता हे error व्हेरिएबलमधे संचित करणार आहोत.
08:28 आतासाठी एवढेच. दुस-या भागात फाईलtemporary storage area मधून दिलेल्या जागी कशी upload करायची ते बघू.
08:39 तिथे errors आहेत का हे बघण्यासाठी error व्हेरिएबल वापरू.
08:45 एरर असल्यास त्या एको करू. त्यासाठी एरर कोड वापरू.
08:49 एरर नसल्यास ही temp घेऊन 'move uploaded' फाईल फंक्शनद्वारे येथे वेबसर्व्हरवर बनवलेल्या uploaded directory मधे संचित करू.
09:01 नंतर मी तुम्हाला काही विशिष्ट गोष्टी सांगेन. उदाहरणार्थ फाईल jpeg असल्यास किंवा साईज मोठा असल्यास upload नाकारणे.
09:10 दुस-या भागात भेटू. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Pratik kamble, Ranjana