Difference between revisions of "Java-Business-Application/C2/Servlet-Methods/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
'''Title of script''':''' Servlet-Methods'''
 
 
'''Author: Manali Ranade'''
 
 
'''Keywords: Java-Business-Application'''
 
 
 
 
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
 
+
  
 
|-
 
|-

Revision as of 12:54, 18 July 2014

Time Narration
00:01 ­Servlet Methods वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:08 JSP द्वारे साधा लॉगिन फॉर्म बनवणे
00:13 doGet मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे
00:16 doPost मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे
00:20 doGet आणि doPost मेथडस मधील फरक
00:25 येथे वापरणार आहोत
00:26 उबंटु वर्जन 12.04
00:30 नेटबीन्स IDE 7.3
00:33 JDK 1.7
00:36 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00:39 .तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता
00:43 ह्या पाठासाठी तुम्हाला
00:46 नेटबीन्स IDE मधून Core Java वापरण्याचे आणि
00:49 HTML चे ज्ञान असावे.
00:51 Java Servlets आणि JSPs चे प्राथमिक ज्ञान असावे.
00:56 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
01:00 आपण ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम हे वेब अॅप्लिकेशन बनवून सुरूवात करू.
01:06 प्रथम होम पेज बनवणार आहोत.
01:09 होम पेजमधे साधा लॉगिन फॉर्म समाविष्ट असेल.
01:14 हा नोंदणी झालेल्या युजरला ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमवर लॉगिन करण्याची परवानगी देईल.
01:20 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
01:23 index dot jsp पेजवर जाऊ ज्यात पूर्वीच आपण काही बदल केला होता.
01:30 home पेज बनवण्यासाठी हा बदल केला होता.
01:35 ह्याचे टायटल Home Page असेच ठेवू.
01:38 बॉडीमधे border equal to 1 असलेले टेबल आहे.
01:44 येथे कोड बघू शकता.
01:47 टेबलमधे Welcome to Library Management Systemअसे हेडींग्ज समाविष्ट केले आहे.
01:54 paragraph टॅगमधे This is the Home Page for Library Management System असे समाविष्ट केले आहे.
02:03 आपल्याकडे hyperlinkआहे जी visitorHomePage dot jsp हे पेज उघडेल .
02:11 आपण हे पेज नंतर बनवणार आहोत
02:13 आपल्याकडे साधा लॉगिन फॉर्म आहे.
02:18 हा फॉर्म नोंदलेल्या युजरला लॉगिन करण्याची परवानगी देईल.
02:22 हा फॉर्म बनवण्यापूर्वी तुम्हाला GreetingServlet नावाचे सर्व्हलेट बनवावे लागेल.
02:28 पाठ थांबवा आणि मागील पाठात दाखवल्याप्रमाणे नवे सर्व्हलेट बनवा.
02:35 GreetingServlet हे सर्व्हलेट चे नाव आहे.
02:39 URL पॅटर्न GreetingServletPath हा असला पाहिजे.
02:44 ह्या फॉर्ममधे दोन इनपुट एलिमेंटस आहेत – युजरनेम आणि पासवर्ड .
02:50 तसेच त्यात Sign Inनावाचे सबमिट बटण आहे.
02:55 पुढे paragraphटॅग आहे ज्यात addUser.jspला जाण्यासाठी लिंक आहे.
03:03 हे अशा युजर्ससाठी registration पेज आहे ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही.
03:09 आता GreetingServlet.java वर जाऊ.
03:14 लक्षात घ्या GreetingServlet.java हे org.spokentutorial ह्याच पॅकेजमधे बनवलेले आहे.
03:23 आता हे सर्व्हलेट, रिक्वेस्ट ऑब्जेक्टमधून form डेटा अॅक्सेस करू शकेल.
03:30 हे सर्व्हलेट कंट्रोलर म्हणून कार्य करेल.
03:33 आपण कंट्रोलरबद्दल जाणून घेतल्याचे आठवत असेल.
03:38 आता कंट्रोलर म्हणून सर्व्हलेट काय करते ते पाहू.
03:42 form डेटा हा रिक्वेस्ट ऑब्जेक्टमधे ठेवलेला असतो.
03:46 पहिले कार्य म्हणजे फॉर्म डेटा पॅरॅमीटर्स परत मिळवणे.
03:51 हे आपण रिक्वेस्ट ऑब्जेक्टवरgetParameter मेथड वापरून करणार आहोत.
03:57 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
04:02 doGet मेथडमधे टाईप करा,
04:04 PrintWriter space out equal to response dot getWriter.
04:14 आपण फॉर्म डेटा पॅरॅमीटर्स मिळवू.
04:18 त्यासाठी टाईप करा,
04:20 String space username' equal to request dot getParameter कंसात आणि डबल कोटसमधे userName semicolon.
04:35 हे युजरनेम फॉर्म टॅगमधे युजरनेमसाठी समाविष्ट केलेले नाव आहे.
04:43 तसेच आपण पासवर्ड सुध्दा मिळवू शकतो.
04:48 त्यासाठी टाईप करा, String space पासवर्ड equal to request dot getParameter कंसात आणि डबल कोटसमधे पासवर्ड semicolon.
05:03 पुढे आऊटपुटमधे युजरनेम प्रिंट करणार आहोत.
05:08 त्यामुळे पुढच्या ओळीवर टाईप करा.
05:10 out dot println' कंसात आणि डबल कोटसमधे Hello from GET Method plus username.
05:21 प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी MyFirstProject वर राईट क्लिक करा.
05:27 Clean and Build क्लिक करा.
05:29 पुन्हा MyFirstProject राईट क्लिक करून Run क्लिक करा.
05:35 सर्व्हर सुरू होऊन कार्य करीत आहे.
05:38 MyFirstProject डिप्लॉय झाले आहे.
05:41 आपल्याला ब्राऊजरमधे होम पेज उघडलेले दिसत आहे.
05:45 पेजचे टायटल Home Page आहे.
05:50 अगदी साधे लॉगिन पेज आपल्याला दिसत आहे.
05:54 येथे युजरनेम आणि पासवर्ड देऊ.
05:58 युजरनेम म्हणून arya असे टाईप करू.
06:02 आणि arya*123 असा पासवर्ड देऊ.
06:06 Sign In वर क्लिक करा.
06:09 Hello from GET Method arya असे आऊटपुट मिळेल.
06:15 आता युजर लॉगिन करू शकला कारण आपण कोडमधे कुठलेही व्हॅलिडेशन समाविष्ट केलेले नाही.
06:24 ते पुढील पाठांत करणार आहोत.
06:28 आता URL कडे लक्ष द्या.
06:31 ती localhost colon 8080 slash MyFirstProject slash GreetingServletPath question mark userName equal to arya and password equal to arya *123 अशी आहे.
06:49 आता फॉर्म डेटा पेजवरील माहितीपासून question markने वेगळा केला गेला आहे.
06:56 आपण फॉर्ममधे दिेलेले युजरनेम आणि पासवर्ड URL मधे देखील पाहू शकतो.
07:05 आता हेच POST मेथड वापरून करून बघू.
07:10 त्यासाठी IDE वर जा.
07:12 doGet मेथडसाठी लिहिलेला कोड कॉपी करून तो doPost मेथडमधे पेस्ट करा.
07:20 आता println स्टेटमेंटमधे बदल करून Hello from POST Method असे लिहा.
07:27 आता index dot jsp उघडू.
07:31 येथे form टॅगचे मेथड अॅट्रीब्यूट बदलून ते POST करणे आवश्यक आहे.
07:37 आता ह्या कोडकडे लक्ष द्या.
07:42 येथे form action equal to GreetingServletPath Method equal to POST असे आहे.
07:49 आता प्रोजेक्ट पुन्हा कार्यान्वित करू.
07:53 त्यासाठी MyFirstProjectवर राईट क्लिक करून Run क्लिक करा.
07:58 GET मेथड वापरल्यावर मिळालेले आऊटपुटच येथे मिळेल.
08:04 आता पुन्हा युजरनेम आणि पासवर्ड टाईप करू.
08:08 नंतरSign In क्लिक करा.
08:12 Hello from POST Method arya असे आऊटपुट मिळेल.
08:17 आता URL कडे लक्ष द्या.
08:19 तिथे localhost colon 8080 slash MyFirstProject slash GreetingServletPath असे दिसेल.
08:25 येथे request च्या URL मधे formडेटा दिसत नाही.
08:30 हा doGet आणि doPost मेथडस मधील मुख्य फरक आहे.
08:35 आता GET आणि POST मेथडस कधी वापरायच्या ते जाणून घेऊ.
08:42 GET मेथड वापरतात:
08:44 जेव्हा फॉर्म छोटा असतो आणि डेटा कमी असतो.
08:48 जेव्हा युजरला URLमधे डेटा दाखवायचा असतो.
08:53 POST मेथड वापरतात:
08:55 जेव्हा फॉर्म मोठा असतो डेटा जास्त असतो.
09:00 जेव्हा युजरला URLमधे डेटा दाखवायचा नसतो.
09:06 उदाहरणार्थ: पासवर्डस
09:08 थोडक्यात,
09:10 आपण शिकलो:
09:12 JSP द्वारे साधा लॉगिन फॉर्म बनवणे
09:16 doGet मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे
09:19 doPost मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे
09:22 doGet आणि doPost मेथडस मधील फरक
09:26 पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा पाठ पूर्ण केल्याची खात्री करा.
09:32 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:35 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:38 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:45 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:02 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:09 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:19 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
10:28 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
10:32 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana