Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C4/Access-data-sources/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''Access Data Source'''
 
  
'''Author: Manali Ranade'''
 
  
'''Keywords: Base'''
+
{|border=1
 
+
|'''Time'''
 
+
|'''Narration'''
 
+
{| style="border-spacing:0;"
+
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-

Revision as of 16:49, 15 July 2014


Time Narration
00:00 LibreOffice Base वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 आपण शिकणार आहोत,
00:08 इतर डेटा सोर्सेस access करणे
00:10 .odb databases रजिस्टर करणे
00:15 डेटा सोर्सेस बघणे
00:17 आणि Writer मध्ये डेटा सोर्सेसचा वापर.
00:22 Base मधे इतर डेटा सोर्सेस कसे access करायचे ते पाहू.
00:28 Libre Office हे Base डेटाबेसेस व्यतिरिक्त इतर डेटा सोर्सेस access करण्याची मुभा देते.
00:37 ते इतर Libre Office documents मध्ये जोडण्याची परवानगी देते.
00:43 उदाहरणार्थ LibreOffice Base मधून स्प्रेडशीट किंवा साधे टेक्स्ट डॉक्युमेंट access करू शकतो.
00:53 आणि ते LibreOffice Writer डॉक्युमेंट मध्ये जोडू शकतो.
00:58 उदाहरणार्थ LibreOffice Calc च्या सहाय्याने एक spreadsheet बनवू.
01:06 Start मेनूतील All Programs वर क्लिक करून LibreOffice Suite मेनू उघडा.
01:16 जर LibreOffice आधीच उघडलेले असेल तर नवी स्प्रेडशीट उघडण्यासाठी File मेनूतील New आणि नंतर Spreadsheet वर क्लिक करा.
01:30 spreadsheet मध्ये येथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे sample data टाईप करू. <pause>
01:46 ही स्प्रेडशीट डिरेक्टरी लोकेशनमध्ये ‘LibraryMembers’ नावाने सेव्ह करा.
01:54 ही फाईल नंतर आपल्या उदाहरणात वापरायची असल्याने हे लोकेशन लक्षात ठेवा.
02:02 Calc window बंद करू.
02:07 ही स्प्रेडशीट Base मधून कशी access करायची ते पाहू.
02:15 Windows Start मेनूतून Base उघडा.
02:25 जर LibreOffice आधीच उघडलेले असेल तर File मेनूतील New आणि नंतर Database वर क्लिक करा.
02:36 ह्याने Database Wizard उघडेल.
02:39 येथे ‘Connect to an existing database’ वर क्लिक करू.
02:45 नंतर dropdown वर क्लिक करा.
02:48 Base ला access करता येणारे विविध डेटाबेस सोर्सेस ह्या सूचीत पाहू शकतो.
02:55 येथे Spreadsheet वर क्लिक करू.
02:59 Next वर क्लिक करू.
03:02 browse च्या सहाय्याने पूर्वी सेव्ह केलेली spreadsheet शोधू.
03:10 spreadsheet ला पासवर्ड असल्यास तो प्रदान करणे आवश्यक आहे.
03:16 येथे त्याची गरज नाही.
03:19 Next वर क्लिक करा.
03:22 आता डेटा सोर्स म्हणून ही spreadsheet रजिस्टर करू.
03:27 एडिट करण्यासाठी ती उघडा.
03:32 Finish वर क्लिक करा.
03:36 येथे database चे नाव देऊ या. टाईप करा LibraryMembers.
03:44 लक्ष द्या, ही ODF डेटाबेस म्हणून सेव्ह होत आहे. आपला नेहमीचा टाईप .odb आहे.
03:56 ही spreadsheet असलेल्या जागीच सेव्ह करा.
04:01 अशाप्रकारे Base मध्ये spreadsheet डेटा सोर्स म्हणून रजिस्टर केली.
04:07 आता आपण मुख्य Base window मध्ये आहोत.
04:11 डाव्या पॅनेलमधील Tables icon वर क्लिक करा.
04:16 ‘Sheet1’, Sheet2, आणि Sheet3 ह्या टेबल्सकडे लक्ष द्या.
04:23 Sheet1 उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. हा spreadsheet मधील डेटा आहे.
04:31 Spreadsheet access करण्याच्या पध्दतीत आपण येथून कुठलेही बदल करू शकत नाही.
04:39 येथे केवळ डेटा पाहता येतो, queries आणि उपलब्ध डेटाच्या आधारे रिपोर्ट बनवू शकतो.
04:47 बदल करायचे असल्यास ते थेट Spreadsheet मधेच करावे लागतात.
04:54 .odb डेटाबेसेस रजिस्टर करणे.
04:59 OpenOffice.org सारखे इतर काही प्रोग्रॅम आहेत जे .odb databases बनवू शकतात.
05:11 LibreOffice Base मध्ये वापरण्यासाठी ते प्रथम बेसमध्ये रजिस्टर करणे आवश्यक आहे.
05:19 कुठलाही .odb database रजिस्टर करण्यासाठी Base उघडणे आवश्यक आहे.
05:28 Tools, Options, LibreOffice Base आणि Databases निवडा.
05:36 Registered Databases खाली New क्लिक करा.
05:42 डेटाबेस कुठे आहे ते शोधा. रजिस्टर केलेले नाव बरोबर असल्याची खात्री करा.
05:51 Ok वर क्लिक करा.
05:55 आता LibreOffice मध्ये Data sources कसे बघायचे ते शिकू.
06:01 त्यासाठी Base मध्ये आपण रजिस्टर केलेल्या spreadsheet चा वापर करू.
06:07 ही LibreOffice Writer किंवा Calc मध्ये वापरू शकतो.
06:12 उदाहरणार्थ LibreOffice Writer मध्ये कशी बघायची ते शिकू.
06:19 प्रथम Base window मधून Writer उघडा.
06:24 File खालील New आणि नंतर Text document वर क्लिक करा.
06:33 आपण Writer window मध्ये आहोत.
06:36 उपलब्ध डेटा सोर्सेस बघण्यासाठी वरील View मेनू आणि Data Sources वर क्लिक करा.
06:46 किंवा F4 हे बटण दाबा.
06:52 आता डावीकडे वरती रजिस्टर केलेल्या databases ची सूची दिसेल ज्यामध्ये आत्ता बनवलेल्या LibraryMembers चा समावेश आहे.
07:03 database बघण्यासाठी database name च्या डावीकडे असलेल्या प्लस चिन्हावर क्लिक करून ते उघडू.
07:14 आपण Tables उघडू.
07:18 येथे Sheet1, 2 आणि 3 आहेत.
07:24 Sheet 1 वर क्लिक करा.
07:28 Writer window च्या उजवीकडे वरती डेटा दिसत आहे.
07:36 हा डेटा आपल्या Writer document मध्ये कसा वापरायचा ते पाहू.
07:43 समजा वरील टेबलमधील सर्व डेटा वापरायचा आहे. येथील सर्व records सिलेक्ट करा.
07:55 पहिल्या record मधील पहिल्या कॉलमच्या डावीकडील gray cell वर क्लिक करा.
08:05 नंतर Shift दाबून शेवटच्या रेकॉर्डमधील पहिल्या कॉलमच्या डावीकडील gray cell वर क्लिक करा.
08:17 सर्व डेटा हायलाईट झालेला दिसेल.
08:21 आता क्लिक करून हे Writer document मध्ये खाली drag करून सोडून द्या.
08:30 पुढे Insert Database columns असे शीर्षक असलेली popup window दिसेल.
08:37 येथे वरील Table option वर क्लिक करा.
08:42 नंतर सर्व फिल्डस डावीकडून उजवीकडे स्थलांतरित करण्यासाठी double arrow वर क्लिक करा.
08:52 येथे अनेक पर्याय दिसतील.
08:56 आता Ok वर क्लिक करा.
09:00 संपूर्ण डेटा असलेले टेबल document मध्ये आले आहे.
09:05 पुढे स्वतंत्र फिल्डस कशी समाविष्ट करायची ते पाहू.
09:13 Writer document च्या वरील भागात जाऊन दोन वेळा Enter दाबा. पुन्हा डावीकडे वर जा.
09:22 येथे टाईप करा Member Name colon.
09:28 नंतर उजवीकडे वर असलेल्या डेटा सोर्सेस भागातील Name ह्या column वर क्लिक करा.
09:36 नंतर क्लिक करून टाईप केलेल्या text पुढे drag करून drop करा.
09:43 tab दाबा आणि Phone number colon असे टाईप करा.
09:51 आता पुढील क्रिया माहीतच आहे.
09:55 टाईप केलेल्या टेक्स्टपुढे Phone ह्या column वर drag करून drop करा.
10:04 पहिले record हायलाईट करण्यासाठी त्याच्या डावीकडील gray cell वर क्लिक करा.
10:13 नंतर Data to Fields ह्या icon वर क्लिक करा.
10:19 तो वरील Formatting toolbar च्या खाली असलेल्या Table Data toolbar मध्ये मिळेल.
10:27 आता Writer document मध्ये टेबलमधील data बघता येईल.
10:35 दुसरे record मिळवण्यासाठी केवळ वेगळा रेकॉर्ड हायलाईट करा आणि ‘Data to Fields’ हा icon पुन्हा वापरा.
10:46 अशाप्रकारे LibreOffice documents मध्ये डेटा सोर्सेस वापरण्यास शिकलो.
10:54 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:01 आपण शिकलो,
11:05 इतर डेटा सोर्सेस access करणे
11:07 .odb databases रजिस्टर करणे
11:12 डेटा सोर्सेस बघणे
11:14 Writer मध्ये डेटा सोर्सेसचा वापर.
11:19 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:23 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:30 ह्या प्रॉजेक्टचे संयोजन http://spoken-tutorial.org ने केले आहे.
11:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:40 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
11:44 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana