Difference between revisions of "Firefox/C4/Add-ons/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 1: | Line 1: | ||
− | |||
− | |||
− | |||
− | + | {|border=1 | |
− | {| | + | ! <center>'''Time'''</center> |
− | ! <center> | + | ! <center>'''Narration'''</center> |
− | ! <center>Narration</center> | + | |
|- | |- |
Revision as of 12:00, 11 July 2014
|
|
---|---|
00.01 | Mozilla Firefox मधील Advanced Firefox Features वरील पाठात स्वागत. |
00.08 | ह्या पाठात आपण Firefox ची प्रगत वैशिष्ट्ये,
* Quick find link * Firefox Sync * Plug-ins या बदद्ल शिकू. |
00.19 | येथे आपण Ubuntu 10.04 वर Firefox 7.0 वापरत आहोत. |
00.26 | Firefox ब्राऊजर उघडू. |
00.29 | डिफॉल्ट रूपात yahoo चे होमपेज उघडेल. |
00.33 | आता Firefox मधे लिंक्स शोधण्याबद्दल जाणून घेऊ. |
00.37 | फायरफॉक्स तुम्हाला बार आणि वेबपेजमधील लिंक्स शोधण्याची सुविधा उपलब्ध करते. |
00.43 | Address बारमधे WWW.Google.co.in टाईप करून एंटर दाबा. |
00.51 | लक्ष द्या, आता कर्सर Google च्या सर्चबारमधे दिसेल. |
00.58 | पुढे सर्चबारच्या बाहेर पेजवर कुठेही कर्सर क्लिक करा . |
01.04 | आता कीबोर्डवरील apostrophe की दाबा. |
01.09 | विंडोच्या डावीकडे खाली कोप-यात Quick find links नावाचा सर्च बॉक्स दिसेल. |
01.16 | बॉक्समधे टाईप करा Bengali . लक्ष द्या, Bengali हायलाईट झालेली दिसेल. |
01.25 | आता तुम्ही वेब पेज मधील लिंक सहज आणि पटकन शोधू शकता. |
01.31 | तुमची सेटींग आणि Preferences वापरून दुस-या कॉम्प्युटरवरून किंवा मोबाईल फोन सारख्या डिव्हाईस वरून फायरफॉक्स ब्राऊजर access करता येईल का? |
01.43 | होय . Firefox sync फीचरद्वारे, Bookmarks, History आणि Installed extensions असा ब्राऊजरचा सर्व डेटा Mozilla server वर सुरक्षितपणे संचित होतो. |
01.55 | आपण आपला कॉम्प्युटर ह्या सर्व्हरवर Sync करून त्यावरील ब्राऊजर डेटा access करू शकतो. |
02.02 | आता Sync फीचर्स सक्षम करू. |
02.06 | मेनूमधील Tools खालील Set up Sync क्लिक करा . Firefox Sync सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल. |
02.15 | Sync प्रथमच वापरत असल्यामुळे Create a new Account क्लिक करा. |
02.21 | Account Details डायलॉग बॉक्स दिसेल. |
02.24 | ह्या पाठासाठी gmail account आधीच तयार केले आहे. |
02.30 | ST.USERFF@gmail.com. इमेल address फिल्डमधे ST.USERFF@gmail.com टाईप करा. |
02.42 | password फिल्डमधे पासवर्ड टाईप करा. |
02.47 | Confirm password फिल्डमधे पुन्हा पासवर्ड टाईप करा. |
02.52 | server फिल्डमधे डिफॉल्ट रूपात Firefox Sync server निवडलेला आहे. |
02.58 | आपण ही सेटींग्ज बदलणार नाही. “Terms of service” आणि “Privacy policy” च्या चेक बॉक्सवर क्लिक करा. |
03.08 | “Next” क्लिक करा. फायरफॉक्स Sync की दाखवेल. |
03.11 | इतर मशीन्स वरून Sync access करण्यासाठी तुम्हाला ही की एंटर करावी लागेल. |
03.18 | “Save” क्लिक करा. Save Sync key डायलॉग बॉक्स दिसेल. |
03.24 | डेस्कटॉपवर ब्राउज़ करा. “Save” क्लिक करा. |
03.28 | Firefox Sync key.html ही HTML फाईल म्हणून डेस्कटॉपवर सेव्ह होईल. |
03.35 | ह्या key ची नोंद करून घेऊन, नंबर सेव करा, म्हणजे तुम्ही त्यास सहजपणे एक्सेस करू शकता . |
03.41 | ही की प्रदान केल्याशिवाय आपले Sync अकाऊंट दुस-या कॉम्प्युटरवरून access करता येणार नाही. |
03.48 | Next क्लिक करा. Confirm you are not a Robot डायलॉग बॉक्स मध्ये, |
03.53 | बॉक्समधे दिसत असलेली अक्षरे टाईप करा. सेटअप पूर्ण झाला आहे. |
03.59 | “Firefox Sync” सेटअप डायलॉग बॉक्सच्या खाली डावीकडे असलेल्या Sync पर्यायावर क्लिक करा. |
04.06 | येथे Sync पर्याया सेट करू शकतो. |
04.09 | ह्या पाठासाठी आपण डिफॉल्ट पर्यायात बदल करणार नाही. “Done” क्लिक करा. |
04.17 | Next क्लिक करा. Firefox सर्व घटक तपासेल. नंतर Finish क्लिक करा. |
04.25 | आपण कॉम्प्युटरवर Firefox Sync सेटअप केले आहे. |
04.29 | आता दुस-या कॉम्प्युटरवरून तुमचा ब्राऊजर डेटा कसा access करायचा? |
04.35 | त्यासाठी दुसरा कॉम्प्युटर किंवा Device टूल Sync करणे गरजेचे आहे. |
04.40 | ह्या पाठासाठी slides वर सूचनांची यादी दाखवणार आहोत. |
04.46 | दुसरा कॉम्प्युटर किंवा Device Sync करण्यासाठी सूचनांचे पालन करा. |
04.52 | दुसरा कॉम्प्युटर किंवा Device मधे फायरफॉक्स ब्राऊजर उघडा. |
04.57 | मेनूवरील Tools' खालील Setup Firefox Sync क्लिक करा. |
05.03 | I have a Firefox Sync Account क्लिक करा. तुमचा email id आणि password टाईप करा. |
05.10 | तुमची Sync की टाईप करून Finish क्लिक करा. |
05.15 | दुसरा कॉम्प्युटर ही Sync झाले आहे. दुसर्या कॉम्प्युटर वरूनही आपला ब्राऊजर डेटा access करू शकतो. |
05.23 | येथे नवे बुकमार्क सेव्ह करता येतात. Preferences बदलता येतात. |
05.28 | हे बदल Sync Manager मधे आपोआप अपडेट होतील. |
05.34 | शेवटी, मूळ कॉम्प्युटर Sync Manager वापरून अपडेटेड डेटाने sync कसा करायचा ते शिकू. |
05.42 | आता मेनूवरील Tools क्लिक करा. |
05.46 | आता Sync हा पर्याय Sync now असा दाखवला जात आहे. |
05.51 | तुमचा डेटा Sync Manager सोबत Sync करण्यासाठी यावर क्लिक करा. |
05.55 | आपण Firefox Sync Account डिलीट करू शकतो किंवा Sync Data काढून टाकू शकतो. |
06.02 | हे कसे करता येईल? अगदी सोपे आहे. |
06.06 | नवा ब्राऊजर उघडा. address बारमधे टाईप करा https://account.services.mozilla.com. एंटर दाबा. |
06.21 | Username मधे ST.USERFF@gmail.com टाईप करा. |
06.28 | पासवर्ड टाईप करून login करा. |
06.33 | Firefox Sync चे वेबपेज उघडेल. |
06.36 | येथे Firefox ची सेटींग्ज आणि डेटा बदलू शकतो. |
06.40 | आता हे पेज log out करू . |
06.43 | आता Plug-ins म्हणजे काय ते जाणून घेऊ. |
06.49 | Plug-in हा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे. जो फायरफॉक्स ब्राऊजरमधे विशिष्ट सुविधा समाविष्ट करतो. |
06.57 | त्यामुळे Plug-ins हे extensions पेक्षा वेगळे आहे. |
07.00 | Plug-ins हा इतर कंपन्यांनी बनवलेला प्रोग्रॅम आहे. |
07.04 | तो Firefox Browser बरोबर एकत्रित काम करतो. |
07.10 | Plug-ins द्वारे व्हिडिओ, Firefox मध्ये multi-media content, power animation पाहता येतात. virus scan करता येतात. |
07.21 | उदाहरणार्थ आपण Flash हे Plug-in व्हिडिओ बघण्यासाठी फायरफॉक्समधे इन्स्टॉल करतो. |
07.28 | फायरफॉक्समधे इन्स्टॉल केलेली Plug-ins पाहू. |
07.33 | मेनूवरील Tools खाली Add-ons सिलेक्ट करा. |
07.38 | Addon Manager टॅब उघडेल. डाव्या पॅनेलवरील Plug-ins क्लिक करा. |
07.45 | आता उजव्या पॅनेलमधे कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेली Plug-ins दिसतील. |
07.50 | Plug-ins इन्स्टॉल कशी करायची? |
07.53 | प्रत्येक Plug-in, संबंधित वेबसाईटवरून डाऊनलोड करून ते आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करता येते. |
08.01 | प्रत्येक Plug-ins ची इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते . |
8.05 | firefox साठी उपलब्ध Plug-ins आणि त्या इन्स्टॉल करण्याच्या सूचनांबद्दल जाणून घेण्यासाठी Mozilla वेबसाईटला भेट द्या. |
08.16 | आता ब्राऊजर बंद करू. |
08.19 | Plug-ins डिसेबल करण्यासाठी Disable क्लिक करा. |
08.24 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08.27 | ह्या पाठात आपण शिकलो,
*Quick find link *Firefox Sync आणि Plug-ins |
08.36 | असाईनमेंट. |
08.38 | Firefox साठी तीन Plug-ins डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. |
08.43 | Firefox Sync अकाऊंट बनवा. दुस-या कॉम्प्युटरवरून तुमचा फायरफॉक्स ब्राऊजर Access करा. |
08.50 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08.56 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09.01 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09.06 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09.10 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09.16 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09.21 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09.28 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09.31 | * spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
09.36 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |