Difference between revisions of "Java-Business-Application/C2/Creating-a-Java-web-project/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 414: | Line 414: | ||
|- | |- | ||
| 07.27 | | 07.27 | ||
− | | | + | | http://spoken-tutorial.org/NMEICT- Intro |
|- | |- | ||
Line 426: | Line 426: | ||
|- | |- | ||
| 07.48 | | 07.48 | ||
− | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद. |
|} | |} |
Revision as of 11:06, 9 July 2014
Title of script: Creating-a-Java-web-project
Author: Manali Ranade
Keywords: Java-Business-Application
Time | Narration
|
---|---|
00.00 | Creating a Java Web Project वरील पाठात आपले स्वागत. |
00.06 | या पाठात शिकणार आहोत, |
00.09 | Java वेब प्रोजेक्ट बनवणे. |
00.12 | डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर(Deployment Descriptor)ची माहिती, |
00.15 | web.xml फाईलची माहिती. |
00.19 | त्यासाठी वापरणार आहोत, |
00.20 | उबंटु वर्जन 12.04 |
00.23 | नेटबीन्स IDE 7.3 |
00.26 | JDK 1.7 |
00.28 | फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0 |
00.32 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00.35 | ह्या पाठासाठी तुम्हाला, |
00.39 | Netbeans IDE मधून Core Java वापरण्याचे आणि |
00.42 | HTML चे ज्ञान असावे. |
00.44 | नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.50 | आता नेटबीन्स IDE द्वारे साधे जावा वेब प्रोजेक्ट कसे बनवायचे ते बघू. |
00.56 | त्यासाठी नेटबीन्स IDE वर जाऊ. |
01.01 | IDEच्या डाव्या कोप-यात वरती File खालील New Project वर क्लिक करा. |
01.08 | New Project विंडो उघडेल. |
01.12 | कॅटॅगरीजमधून Java Web निवडा आणि Projects मधून Web Application निवडा. |
01.18 | Next क्लिक करा. |
01.20 | पुढे उघडलेल्या विंडोवर |
01.23 | Project Name म्हणूनMyFirstProject टाईप करा. |
01.27 | प्रोजेक्ट लोकेशन आणि प्रोजेक्ट फोल्डर आहे तोच ठेवा. |
01.31 | Next क्लिक करा. |
01.35 | GlassFish server हा सर्व्हर सिलेक्ट करा. |
01.39 | येथे Context Path हा MyFirstProjectआहे जे प्रोजेक्टचे नाव आहे. |
01.47 | ह्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. |
01.50 | Next क्लिक करा. Finishवर क्लिक करा. |
01.55 | Projectsटॅब वर क्लिक करा. |
01.58 | येथे अनेक नोडस बघू शकतो. तसेच My First Project नावाचे वेब ऍप्लिकेशन तयार झाले आहे. |
02.08 | सध्या या सर्व नोडस बद्दल विचार करणार नाही. |
02.11 | परंतु त्यामधील घटक बघण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
02.16 | आता डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर कशाला म्हणतात ते पाहू. |
02.21 | वेब ऍप्लिकेशनचा डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर पुढील माहिती देतो: |
02.25 | क्लासेस, रिसोर्सेस आणि ऍप्लिकेशनचे कॉनफिगरेशन, |
02.31 | वेबवरील मागण्यांना सेवा देताना वेब सर्व्हर ते कसे वापरतो. |
02.37 | वेब सर्व्हरकडे ऍप्लिकेशनसाठी मागण्या येतात. |
02.42 | त्या मागणीची URL मॅप करण्यासाठी डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर वापरला जातो . |
02.48 | या मागणीची पूर्तता करणा-या कोडला हा URL मॅप केला जातो. |
02.52 | डिप्लॉयमेंट डिसक्रिप्टर ही web.xml नावाची फाईल आहे. |
02.57 | आता IDE वर जाऊ. |
03.00 | येथे उपलब्ध असलेल्या नोडस मधून web.xml फाईल शोधता येत नाही. |
03.07 | ती शोधण्यासाठी IDEच्या डावीकडे वरती Fileवर क्लिक करा. नंतर New File वर क्लिक करा . |
03.16 | कॅटॅगरीज मधून वेब निवडा. |
03.19 | File Typesमधून Standard Deployment Descriptor(web.xml) निवडा. |
03.25 | Next क्लिक करा. |
03.27 | आणि Finishक्लिक करा. |
03.30 | IDE च्या डावीकडे असलेल्या Filesटॅब वर क्लिक करा. |
03.34 | वेब नोडच्या WEB-INF फोल्डरखाली web.xml फाईल आपल्याला दिसेल . |
03.42 | आता तुम्ही Source कोड बघू शकता. |
03.46 | येथे आपल्याकडे xml हेडर आहे. |
03.50 | तसेच web-app नोड आहे. |
03.53 | आता ऍप्लिकेशन कार्यान्वित करून बघू. |
03.57 | त्यासाठी MyFirstProject वर राईट क्लिक करा . |
04.02 | Clean and Buildवर क्लिक करा . |
04.04 | हे पूर्वी कंपाईल केलेल्या फाईल्स आणि इतर तयार झालेली आऊटपुटस डिलीट करेल. |
04.10 | तसेच ऍप्लिकेशन पुन्हा कंपाईल करेल. |
04.14 | पुन्हा MyFirstProject वर राईट क्लिक करा. नंतरRun क्लिक करा. |
04.20 | आता सर्व्हर उघडून चालू होईल आणि त्यावर My first Project उघडेल. |
04.27 | ब्राऊजर विंडो उघडेल आणि Hello World असे दाखवेल. |
04.32 | कारण प्रोजेक्ट कार्यान्वित केल्यावर वेब ऍप्लिकेशन हे पेज दाखवत आहे. |
04.39 | आता मिळालेल्या पेजचे URL बघा. |
04.44 | ते localhost colon 8080 slash MyFirstProject असे आहे. |
04.49 | MyFirstProject प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यास, डिफॉल्ट रूपात HelloWorld! लिहिलेले JSP पेज मिळते. |
04.57 | आता IDEवर परत जाऊ. |
05.00 | WEB-INF फोल्डरखाली index dot jsp ही फाईल बघू शकतो. |
05.07 | index.jspवर डबल क्लिक करा . |
05.10 | येथे सोर्स कोड बघू शकतो. |
05.12 | हे केवळ HTML टॅग्ज असलेले साधे JSP पेज आहे. |
05.17 | त्याला JSP पेज असे शीर्षक आणि Hello World असे हेडिंग आहे. |
05.24 | वेब ऍप्लिकेशन कार्यान्वित केल्यावर सर्व्हर डिफॉल्ट रूपात index.jsp प्रदान करतो. |
05.30 | लक्षात घ्या, पूर्वी आपणContextPath ही संकल्पना पाहिली होती. |
05.36 | आपण MyFirstProjectनावानेच ContextPath सेट केला होता. |
05.41 | आता ब्राऊजरवर परत जाऊ. |
05.44 | URL म्हणून localhost colon 8080टाईप करून एंटर दाबा. |
05.50 | Glassfish server सर्व्हर होमचे पेज दिसेल. |
05.56 | येथे संगणकावरील सर्व्हरचा डिफॉल्ट रूपातील पत्ता 8080 आहे . |
06.01 | ह्या Glassfish serverच्या इन्स्टन्सवर कदाचित अनेक ऍप्लिकेशन्स कार्यान्वित होत असतील. |
06.08 | विशिष्ट ऍप्लिकेशन ऍक्सेस करण्यासाठी URL मधे ऍप्लिकेशनचे नाव लिहा. |
06.15 | म्हणजेच, आपल्याला इन्स्टन्सवर ठेवलेल्या विशिष्ट ऍप्लिकेशनचे नाव लिहावे लागते. |
06.21 | त्यासाठी टाईप करा slash MyFirstProject . |
06.26 | आणि एंटर दाबा. |
06.27 | अशाप्रकारे Hello World दिसेल. |
06.31 | थोडक्यात, |
06.32 | या पाठात , |
06.35 | साधे जावा वेब प्रोजेक्ट बनवणे, |
06.38 | वेब प्रोजेक्ट कार्यान्वित करणे, |
06.41 | आणि web.xml फाईलची माहिती घेतली. |
06.44 | स्पोकन ट्युटोरिअल विषयी अधिक माहितीसाठी, |
06.46 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
06.50 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06.54 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06.58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07.00 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07.04 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07.07 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07.13 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07.17 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07.23 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07.27 | http://spoken-tutorial.org/NMEICT- Intro |
07.34 | ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे. |
07.44 | त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे. |
07.48 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद. |