Difference between revisions of "Ruby/C2/Ruby-Methods/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 526: | Line 526: | ||
|- | |- | ||
| 09:04 | | 09:04 | ||
− | | | + | | धन्यवाद. |
|} | |} |
Revision as of 16:35, 3 July 2014
Title of script: Ruby-Methods
Author: Manali Ranade
Keywords: Ruby
Time | Narration
|
---|---|
00:01 | Ruby Methodsवरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | या पाठात शिकणार आहोत, |
00:07 | मेथड म्हणजे काय? |
00:09 | मेथडचा सिंटॅक्स. |
00:11 | आणि काही उदाहरणे पाहू. |
00:13 | आपण उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि रूबी 1.9.3 वापरणार आहोत. |
00:21 | या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे. |
00:28 | आता मेथडसची ओळख करून घेऊ. |
00:31 | मेथड म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट करणारा स्वयंपूर्ण प्रोग्रॅम. |
00:37 | इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेज मधील फंक्शनप्रमाणेच रुबीतील मेथड आहे. |
00:42 | मेथडच्या नावाची सुरूवात लोअर केसमधील अक्षरांनी होणे आवश्यक आहे. |
00:45 | मेथडस कॉल करण्यापूर्वी त्या घोषित करणे आवश्यक आहे. |
00:49 | आता मेथडचा सिंटॅक्स पाहू. |
00:52 | कीवर्ड def च्या पुढे मेथडचे नाव देऊन मेथडस घोषित करता येतात. |
00:57 | अर्ग्युमेंटसद्वारे मेथडला व्हॅल्यूज पास करून, त्यावर कार्य केले जाते. |
01:02 | रुबी कोड सेक्शन हे मेथडचे मुख्य अंग योग्य ते कार्य करून देते. |
01:09 | मेथडचे मुख्य अंग हे वरती त्याच्या घोषणेने सुरू होऊन खाली end कीवर्डने संपते. |
01:16 | ह्याला अर्ग्युमेंटस असलेली मेथड म्हणतात. |
01:19 | मेथडचा आणखी एक सिंटॅक्स असा आहे- |
01:23 | कीवर्ड def च्या पुढे मेथडचे नाव आणि अर्ग्युमेंटची रिकामी सूची. |
01:28 | त्यानंतर रुबी कोड सेक्शन जो मेथडचे मुख्य अंग असतो . |
01:32 | आणि end कीवर्ड ज्याने मेथड संपते. |
01:36 | ह्याला अर्ग्युमेंटस नसलेली मेथड म्हणतात. |
01:39 | मेथड कशी वापरायची ते पाहू. |
01:42 | मी gedit एडिटरमधे प्रोग्रॅम आधीच टाईप करून ठेवला आहे. |
01:46 | तो उघडू. |
01:48 | येथे फाईलचे नाव method hyphen without hyphen argument dot rb आहे. |
01:55 | मी ही फाईल rubyprogram नामक फोल्डरमधे सेव्ह केली आहे. |
01:59 | ह्या प्रोग्रॅममधे मेथडद्वारे दोन अंकांची बेरीज करणार आहे. |
02:03 | प्रोग्रॅम समजून घेऊ. |
02:05 | येथे a हे ग्लोबल व्हेरिएबल घोषित केले आहे. |
02:08 | आणि त्याला 5 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे. |
02:13 | ग्लोबल व्हेरिएबलच्या नावाच्या आधी dollar चिन्ह ($) दिलेले असते. |
02:17 | रुबी प्रोग्रॅम मधे ग्लोबल व्हेरिएबल्स कुठुनही ऍक्सेस करता येते. ते कुठे घोषित केले आहे यास महत्त्व नाही. |
02:25 | येथे कुठलेही अर्ग्युमेंट नसलेली add मेथड घोषित केली आहे. |
02:31 | येथे युजरला दुसरी संख्या द्यायला सांगणार आहोत. |
02:35 | युजर व्हॅल्यू देईल. |
02:38 | gets मेथड कंसोल वरून स्ट्रिंग फॉरमॅटमधे इनपुट घेईल. |
02:44 | त्यामुळे ते to_i मेथडद्वारे इंटीजरमधे बदलणे आवश्यक आहे. |
02:50 | रूपांतरित व्हॅल्यू नंतर b व्हेरिएबल मधे संचित होईल. b हे लोकल व्हेरिएबल आहे. |
02:56 | ते व्हेरिएबल ज्या मेथड मधे घोषित केले आहे त्यातच उपलब्ध असते. |
03:01 | येथे ग्लोबल व्हेरिएबल a आणि व्हेरिएबल b च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत. |
03:07 | नंतर तो रिझल्ट sum ह्या व्हेरिएबलमधे संचित करू. |
03:10 | नंतर sum प्रिंट करणार आहोत. |
03:13 | स्ट्रिंगमधे व्हेरिएबल समाविष्ट करण्याची ही एक पध्दत आहे . |
03:18 | येथ sum मधील व्हॅल्यू ही स्ट्रिंग म्हणून परत दिली जाते. व बाहेरच्या स्ट्रिंगमधे लिहिली जाते. |
03:25 | end ने मेथडचा शेवट होतो. |
03:28 | मेथडस दोन प्रकारच्या असतात. |
03:31 | User-defined method – जसे की add मेथड. |
03:35 | Pre-defined method - जसे print, gets आणि to_i मेथड्स. |
03:42 | येथे add मेथड कॉल करणार आहोत. |
03:45 | बेरजेची क्रिया केली जाईल. रिझल्ट प्रिंट केला जाईल. |
03:50 | Saveवर क्लिक करा. |
03:53 | आधी सांगितल्याप्रमाणे हा प्रोग्रॅम rubyprogram फोल्डरमधे सेव्ह होईल. |
03:59 | आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
04:02 | Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
04:07 | स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल. |
04:11 | प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी rubyprogram सबडिरेक्टरीमधे जाणे आवश्यक आहे . |
04:16 | टाईप करा cd space Desktop/rubyprogram आणि एंटर दाबा. |
04:26 | टाईप करा ruby space method hyphen without hyphen argument dot rb आणि एंटर दाबा. |
04:40 | Enter the second number असे दाखवले जाईल. |
04:44 | मी 4 टाईप करत आहे. आता एंटर दाबा. |
04:48 | आपल्याला Sum of two numbers 5 and 4 is 9 हे आऊटपुट मिळेल. |
04:53 | आता अर्ग्युमेंटस असलेल्या मेथडचे उदाहरण पाहू . |
04:58 | मी हा प्रोग्रॅम आधीच gedit एडिटरमधे लिहून ठेवला आहे. तो उघडा. |
05:03 | आपल्या फाईलचे नाव method hyphen with hyphen argument dot rb असे आहे. |
05:10 | मी ही फाईल rubyprogram ह्या फोल्डरमधे सेव्ह केली आहे. |
05:15 | हा प्रोग्रॅम समजून घेऊ. |
05:18 | येथे addनामक मेथड घोषित केली आहे. a, b ही add ह्या मेथडची अर्ग्युमेंटस आहेत. |
05:26 | येथे a आणि b च्या व्हॅल्यूजची बेरीज होईल. |
05:29 | आणि मेथडच्या कॉलला बेरीज परत करेल. |
05:31 | end ने मेथडचा शेवट होईल. |
05:35 | येथे युजरला इनपुट द्यायला सांगणार आहोत. |
05:38 | युजर a आणि bची व्हॅल्यू टाईप करेल. |
05:41 | त्या व्हॅल्यूज अनुक्रमे व्हेरिएबल a आणि bमधे संचित होतील. |
05:46 | येथे add ही मेथड कॉल करणार आहोत. |
05:49 | नंतर a आणि b ही अर्ग्युमेंटस देणार आहोत. |
05:52 | बेरजेची क्रिया झाल्यावर add ही मेथड जी व्हॅल्यू देईल ती c मधे संचित होईल. |
05:59 | येथे c मधे संचित असलेली बेरीज प्रिंट करणार आहोत. |
06:03 | कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा. |
06:07 | प्रथम टर्मिनल क्लियर करण्यासाठी क्लियर टाईप करून एंटर दाबा. |
06:14 | आपण आधीपासूनच rubyprogram ह्या सबडिरेक्टरीत आहोत. |
06:17 | मागील कमांडसाठी दोन वेळा अप ऍरो की दाबा . |
06:22 | method hyphen without hyphen arguments dot rb च्या जागी method hyphen with hyphen arguments dot rb टाईप करा |
06:32 | आणि एंटर दाबा. |
06:35 | Enter the values of a and b दाखवले जाईल. |
06:38 | मी 8 आणि 9 टाईप करणार आहे. |
06:41 | टाईप करा 8 आणि एंटर दाबा. |
06:43 | टाईप करा 9 आणि एंटर दाबा. |
06:46 | पुढील आऊटपुट मिळेल. |
06:47 | Sum of two numbers 8 and 9 is 17. |
06:52 | आता रुबी मेथडचे एक महत्त्वाचे फीचर बघू. |
06:56 | टेक्स्ट एडिटरमधील प्रोग्रॅममधे जाऊ . |
06:59 | return कीवर्ड डिलीट करा. |
07:02 | Save वर क्लिक करा. |
07:05 | कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा. |
07:09 | मागील कमांड साठी अप ऍरो की दाबा. एंटर दाबा. |
07:14 | Enter the values of a and b दाखवले जाईल. |
07:18 | मी 10 आणि 15 टाईप करणार आहे. |
07:21 | 10टाईप करून एंटर दाबा. 15 टाईप करून एंटर दाबा. |
07:27 | पुढील आऊटपुट मिळेल. |
07:29 | Sum of two numbers 10 and 15 is 25. |
07:33 | returnहा कीवर्ड डिलीट केल्यावरही प्रोग्रॅम कुठलीही एरर न देता कार्यान्वित झाला. |
07:40 | याचे कारण रुबी मेथड कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आपोआप रिटर्न करतो. |
07:46 | रुबीच्या मेथडसमधे return हा कीवर्ड ऐच्छिक आहे. |
07:50 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत. |
07:53 | स्लाईडस वर जाऊ. |
07:55 | थोडक्यात, |
07:57 | या पाठात शिकलो, |
07:59 | मेथडस म्हणजे काय? |
08:01 | अर्ग्युमेंटस नसलेल्या आणि |
08:04 | अर्ग्युमेंटस असलेल्या मेथडचा सिंटॅक्स |
08:06 | मेथड कडून मिळणारी रिटर्न व्हॅल्यू. |
08:08 | आता असाईनमेंट. |
08:10 | चौरसाचे क्षेत्रफळ काढणारा प्रोग्रॅम लिहा. |
08:13 | त्यासाठी मेथड वापरा. |
08:14 | युजरकडून इनपुट घ्या. |
08:17 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:20 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:23 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:28 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:30 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:33 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:36 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:44 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:49 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:55 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:00 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
09:04 | धन्यवाद. |