Linux/C2/Working-with-Linux-Process/Marathi
From Script | Spoken-Tutorial
(Redirected from Linux/C2/Working-with-Linux-Process /Marathi)
Time | Narration |
00:00 | Working with Linux process वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत |
00:05 | आपण Ubuntu 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार आहोत. |
00:09 | लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी सुरू करायची व कमांड्स विषयी तुम्हाला प्राथमिक माहिती आहे असे आपण मानू या. |
00:16 | जर आपल्याला यासंबंधी माहिती हवी असेल तर http://Spoken-Tutorial.org येथील उपलब्ध ट्युटोरियलमध्ये पाहू शकता. |
00:28 | कमांडस् या Lowercase मध्ये असतात. तसेच त्या Case Sensitive देखील असतात. |
00:38 | प्रोसेस म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ या. |
00:42 | लिनक्समध्ये चालणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच प्रोसेस. |
00:46 | कमांडस स्विकारत असलेली चालू शेल देखील एक प्रोसेस आहे. |
00:51 | टाइप केलेल्या कमांड्सही कार्यान्वित होताना प्रोसेसच असतात. |
00:56 | या ट्युटोरियलमध्ये आपण बघत असलेला व्हिडिओ देखील एक प्रोसेस आहे. |
01:00 | Spoken Tutorial ची वेबसाईट व चालू ब्राउजरही एक प्रोसेसच आहे. |
01:05 | चालू शेल स्क्रिप्टस् सुध्दा प्रोसेसच आहे. |
01:11 | एखादा कार्यान्वित केलेला प्रोग्रॅम अशी आपण प्रोसेसची व्याख्या करू शकतो. |
01:17 | प्रोसेसेस ह्या आपल्यासारख्याच असतात. त्यांचा जन्म व अंतही होतो. त्यांना पालक व मुले असू शकतात. |
01:28 | प्रथम आपण shell process बदल जाणून घेऊ. |
01:31 | login केल्याबरोबर लिनक्स kernel द्वारे शेल प्रोसेस सुरू होते. |
01:36 | आता इतके सांगणे पुरेसे आहे की लिनक्स kernel हा लिनक्स Operating System चा गाभा आहे. |
01:43 | लिनक्स Operating System चालवणारे अत्यावश्यक घटक kernel मधे असतात. User commands द्वारे निर्माण होणा-या सर्व प्रोसेसना शेल जन्म देते. |
01:53 | आता आपण टर्मिनल उघडू या. |
01:57 | आपल्याला टर्मिनलवर डॉलरच्या चिन्हाच्या रूपात command prompt दिसेल. |
02:03 | हे शेल प्रोसेसचे काम आहे. |
02:07 | आता कोणतीही कमांड जसे की date टाईप करून Enter दाबा. |
02:13 | असे केल्यावर shell process, date नामक प्रोसेस तयार करेल. |
02:18 | शेल प्रोसेस डेट प्रोसेसला जन्म देत असल्याने शेल प्रोसेस ही डेट प्रोसेसची पालक म्हणजे parent ठरते तर डेट प्रोसेस ही शेल प्रोसेसची child म्हणजे बालक ठरते. |
02:30 | एकदा date प्रोसेसने सिस्टीमची तारीख व वेळ दर्शविली की ती नष्ट होते. |
02:40 | एक शेल दुसरी शेल प्रोसेस तयार करू शकते. नवीन प्रोसेस तयार करण्याच्या या प्रकाराला spawning of process म्हणतात. |
02:50 | दुसरी शेल प्रोसेस तयार करण्यासाठी टर्मिनलवर जाऊन केवळ shटाईप करून एंटर दाबा. |
03:00 | आपल्याला टर्मिनलवर नवीन prompt दिसेल. आता आपल्या shell 1 म्हणजेच original शेलने नवी shell तयार केली आहे. तिला आपण shell 2 संबोधू या. |
03:13 | आता आपण नव्या command prompt वर कमांड कार्यान्वित करू शकतो. या नव्या command prompt वर ls ही कमांड कार्यान्वित करा. |
03:20 | आता command prompt वर ls टाईप करा आणि एंटर दाबा. आपल्याला फाईल्स आणि डिरेक्टरीजची सूची दिसेल. |
03:32 | आता ls नामक नवीन प्रोसेस तयार झाली आहे. |
03:35 | इथे Shell2 ही ls ची parentआहे तर shell1 ही ls ची grandparent आहे. तसेच lsही shell2 ची child व shell2 ही shell1 ची childआहे. |
03:56 | Shell2 नष्ट करण्यासाठी नवीन promptवर exit टाईप करा आणि एंटर दाबा. |
04:04 | अशा प्रकारे Shell2 नष्ट होईल आणि आपण आपल्या ओरिजनल promptवर परत येऊ. |
04:12 | प्रोसेसेस व आपल्यातील साम्य पुढेही दाखवता येईल. आपल्याला जसे आपले नाव, पालकांचे नाव, PAN क्रमांक, जन्मतारीख अशी व्यक्तिगत माहिती असते, |
04:26 | त्याचप्रमाणे प्रोसेसेसचे सुध्दा गुणधर्म असतात जसे की PID म्हणजे (process ID) PPID म्हणजे (parent process ID), start time इत्यादी. |
04:38 | बहुतांश गुणधर्म कर्नेल द्वारे प्रोसेस टेबलमध्ये राखले जातात. |
04:43 | प्रत्येक प्रोसेस PID नावाच्या एका पूर्णांकाने ओळखली जाते. हा अंक कर्नेल द्वारे दिला जातो. |
04:51 | Parent प्रोसेसचा PID हा त्या प्रोसेसने spawn केलेल्या P1 प्रोसेसचा PPID असतो. |
05:00 | चालू शेलचा PID बघण्यासाठी command prompt वरecho space आणि dollar dollar असे टाईप करून एंटर दाबा. |
05:11 | एक संख्या दिसेल तो आपल्या चालू shell चा PID आहे. |
05:23 | प्रोसेस बद्दल बोलताना आपण ज्या कमांडचा सर्वात जास्त वापर करतो ती म्हणजे psकमांड |
05:29 | ps म्हणजेच प्रोसेस स्टेटस कमांड चालू प्रोसेसेस दर्शविते. |
05:34 | ही कमांड कुठल्याही पर्यायाशिवाय कार्यान्वित केली तर काय होते ते पाहू. |
05:40 | आता command prompt वर ps टाईप करून एंटर दाबा. |
05:47 | युझर प्रोग्रॅम चालू असताना त्याच्या मालकीच्या प्रोसेसेसची यादी आपल्याला ह्याप्रकारे पाहता येते. |
05:54 | आपण CMD या शीर्षकाखाली प्रोसेसचे नाव बघू शकता. |
05:58 | याशिवाय आपल्याला PID तसेच TTY किंवा console, ज्यावर ही प्रोसेस चालू आहे ते बघता येते. |
06:06 | TIME खाली प्रोसेसने संगणकाच्या प्रोसेसरचा घेतलेला एकूण वेळही दिसतो. |
06:12 | माझ्या मशिनवर या दोन प्रोसेसेस दिसत आहेत. |
06:16 | पहिली bash,म्हणजे आपण वापरत असलेली shell प्रोसेस आणि दुसरी म्हणजे स्वतः ps प्रोसेस आहे. |
06:25 | दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की shell प्रोसेसचा PID आणि echo space dollar dollar या कमांडने दिलेला PID सारखाच आहे. |
06:35 | नवी shell किंवा subshell बनवल्याने काय होते ते बघण्यास टर्मिनलवर sh कमांड द्या. |
06:42 | आता नवीन ओळीवर नवा prompt येईल. तेथे ps टाईप करून एंटर दाबा. |
06:51 | आता आपल्याला तीन प्रोसेसेसची सूची दिसेल. त्या सूचीत sh ही प्रोसेस समाविष्ट झाली आहे. |
06:57 | येथे पुन्हा लक्षात घ्या की bash प्रोसेसचा PID वरील प्रमाणे तोच राहिला आहे. |
07:05 | ps ह्या कमांडसोबत अनेक पर्यायही आहेत. पहिला पर्याय सूचीतील प्रोसेसेसचे गुणधर्म दर्शवतो. |
07:13 | आता prompt वर ps space minus fटाईप करून एंटर दाबा. हे आपल्याला वरीलप्रमाणे प्रोसेसेसची सूची दर्शवेल. |
07:28 | bash, sh आणि ps minus f |
07:31 | फरक एवढाच आहे की आता सूचीत अधिक गुणधर्म दिसत आहेत. |
07:36 | युजरचे नाव UID खाली मिळते. प्रोसेसचा PPID म्हणजेच पेरेंट प्रोसेसचा PID ही दर्शवला जातो. |
07:45 | उदाहरणार्थ bash प्रोसेस ही sh प्रोसेसची पेरेंट प्रोसेस आहे. त्यामुळे bash प्रोसेसची PID आणि sh प्रोसेसची PPID सारखीच आहे. |
08:00 | त्याचप्रमाणे जसे sh प्रोसेस ही ps प्रोसेसची पेरेंट प्रोसेस असल्यामुळे sh प्रोसेसची PID आणि ps minus f या प्रोसेसची PPID सारखी आहे. |
08:17 | C हा नंबर प्रोसेसचे युटिलायझेशन म्हणजेच प्रोसेसने प्रोसेसरचा वापरलेला वेळ पूर्णांक टक्क्यांत सांगतो. |
08:26 | वापर अत्यंत कमी असल्यामुळे आपल्याला इथे शून्य दर्शवत आहे. |
08:32 | Stream फिल्ड आपल्याला प्रोसेस केव्हा सुरू झाली ते दर्शवते. ps कमांड समजून घेताना आपण इतर फिल्डबद्दल जाणून घेतले होते. |
08:42 | प्रोसेसेस दोन प्रकारच्या असतात. पहिली म्हणजे userप्रोसेस. या प्रोसेसेस userकडून सुरू केल्या जातात. |
08:49 | उदाहरणार्थ ps कमांड किंवा टर्मिनलवर बहुतांशी कार्यान्वित केलेल्या कमांड. |
08:54 | आणि दुसरी प्रोसेस म्हणजे सिस्टीम प्रोसेस. या प्रोसेसेस सिस्टीम सुरू करताना किंवा user login करताना सिस्टीम द्वारे सुरू केल्या जातात. |
09:05 | bash हे सिस्टीम प्रोसेसचे एक उदाहरण होऊ शकते. |
09:09 | कधी कधी आपल्याला सर्व म्हणजेच दोन्ही, सिस्टीम आणि युजर प्रोसेस बघायच्या असतात. |
09:17 | तेव्हा आपण minus e किंवा minus capital A या पर्यायांचा उपयोग करतो. |
09:23 | आता टर्मिनलवर जा आणि command prompt वरps space minus e टाईप करून एंटर दाबा. |
09:32 | आपल्याला प्रोसेसची मोठी सूची दिसेल. |
09:35 | मल्टिपेज डिस्प्ले मिळवण्यासाठी command prompt वर टाईप करा. |
09:40 | ps space minus e space vertical bar space more आणि एंटर दाबा. |
09:52 | more पर्यायामुळे एका वेळी स्क्रीनवर मावतील एवढ्याच प्रोसेस दाखवल्या जातात. |
09:58 | एंटर या बटणाच्या सहाय्याने आपण प्रोसेसेसची सूची स्क्रॉल करू शकतो. |
10:03 | या सूचीतील पहिली प्रोसेस ही आपली उत्सुकता वाढविणारी आहे तिला init प्रोसेस म्हणतात. |
10:09 | या प्रोसेसपासून बहुतांशी इतर सर्व प्रोसेस तयार होतात. |
10:12 | ह्या प्रोसेसचा PID एक असतो. |
10:16 | prompt वर परत येण्यासाठी q दाबा. |
10:24 | तर ह्या ट्युटोरियलमधे आपण प्रोसेस म्हणजे काय ते शिकलो. शेल प्रोसेस, प्रोसेसेसची उत्पत्ती, त्यांचे गुणधर्म व प्रकार माहित करून घेतले. |
10:37 | आपण ps कमांडही शिकलो. अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:45 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:55 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:07 | *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |