Linux/C2/The-Linux-Environment/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Linux Environment आणि ते कुशलतेने हाताळण्याचे मार्ग यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 या पाठासाठी UBUNTU किंवा कोणतीही लिनक्स सिस्टीम वापरावी.
00:13 तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सुरू करणे तसेच कमांडस्, फाईल सिस्टीम आणि shell या बद्दल थोडी माहिती आहे असे आपण समजू या.
00:22 जर तुम्हाला या संकल्पनांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ती स्पोकन ट्युटोरियलच्या संकेतस्थळावर इतर पाठांमध्ये उपलब्ध आहे.
00:32 या पाठासाठी UBUNTU Linux 10.10 वापरू.
00:36 तसेच लक्षात टेवा की लिनक्स केस सेन्सेटिव्ह आहे. जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत वापरलेल्या सर्व कमांडस लोअर केसमध्ये असतील.
00:46 सिस्टीमने युजर कमांडस् चा लावलेला अर्थ व दिलेला प्रतिसाद Linux Environment वर अवलंबून असतो.
00:55 सोपेपणासाठी Shellसेटींगमध्ये बदल करतात.
00:58 कसे ते पाहू.Shell कशा प्रकारे काम करेल हे shell Variables ठरवतात.
01:04 Shell Variables चे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. Environment Variables आणि Local Variables.
01:12 Environment Variables नावाप्रमाणेच युजरच्या एकूण Environment मध्ये उपलब्ध असतात.
01:19 शेलने निर्माण केलेल्या subshell मध्येही हे Variable उपलब्ध असतात.
01:24 नावाप्रमाणेच Local Variables ची उपलब्धता मर्यादित असते.
01:31 हे shell द्वारे बनवलेल्या subshell मध्ये उपलब्ध नसतात.
01:36 या ट्युटोरियलमध्ये आपण मुख्यत्वे Environment Variables बद्दल चर्चा करणार आहोत. आता प्रथम आपण shell variables च्या व्हॅल्यू कशा घालायच्या ते पाहू या.
01:48 Shell मधीलVariables बघण्यासाठी set ही कमांड देऊ या.
01:53 टर्मिनलवर टाईप करा. set space vertical-bar more आणि एंटर दाबा.
02:00 आपण चालू Shell मधील सर्वVariables बघू शकतो.
02:04 उदाहरणार्थ HOME हे Environment Variable आणि त्याला दिलेली व्हॅल्यू बघा.
02:15 पुढील सूची बघण्यासाठी एंटर दाबा. आणि सूचीतून बाहेर पडण्यासाठी q हे बटण दाबा.
02:21 set या कमांडचा मोठा आऊटपुट स्क्रीनवर पाठवताना एकावेळी एका स्क्रीनवर मावेल एवढाच मजकूर more या पर्यायामुळे पाठवला जातो.
02:38 केवळ Environment Variable बघण्यासाठी env ही कमांड कार्यान्वित करू या.
02:45 टर्मिनलवर टाईप करा env space vertical-bar more आणि एंटर दाबा.
02:52 Shellया variableकडे लक्ष द्या. याची व्हॅल्यू slash bin slash bash आहे.
03:00 सूचीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही q हे बटण दाबू शकता.
03:07 आता लिनक्समधील इतर काही महत्त्वाच्या Environment variables ची चर्चा करू या.
03:11 येथे आपण bash shell चा वापर करणार आहोत.
03:15 विविध shells युजर्सच्या सोयीनुसार बनवलेल्या असतात.
03:19 व्हेरिएबलमध्ये काय व्हॅल्यू साठवली आहे हे पाहण्यासाठी echo कमांड वापरली जाते. या कमांडचा पुढे dollar sign व व्हेरिएबलचे नाव लिहितात.
03:30 आपण SHELL variable प्रथम बघणार आहोत.
03:35 या मध्ये चालू Shell चे नाव संचित केले जाते.
03:37 SHELL variable ची व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर echo space dollar SHELL कॅपिटलमध्ये असे टाईप करून एंटर दाबा.
03:55 सध्या आपण slash bin slash bash या शेलमध्ये कार्यरत आहोत.
04:02 दुसरे variable आहे HOME
04:05 login केल्यावर आपण ज्या डिरेक्टरीमध्ये असतो ती userच्या नावावर आधारित असते.
04:11 त्या डिरेक्टरीला होम डिरेक्टरी असे म्हणतात आणि HOME variable मध्ये हे उपस्थित असते.
04:17 व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर echo space dollar HOME कॅपिटलमध्ये टाईप करून एंटर दाबा.
04:29 PATH variable हे पुढील Environment variable आहे.
04:32 कमांड फाईल शोधण्यासाठी shell ज्या डिरेक्टरीज बघते त्यांची यादी PATH या व्हेरिएबल मध्ये असते.
04:40 आता PATH variableची व्हॅल्यू बघू या.
04:43 टर्मिनलवर echo space dollar PATH कॅपिटलमध्ये ही कमांड टाईप करा.
04:51 माझ्या संगणकावर या डिरेक्टरीज दाखविल्या जात आहेत.
05:04 प्रत्येक सिस्टीमप्रमाणे यात थोडा बदल असू शकतो.
05:07 colon या डिलिमिटर द्वारे डिरेक्टरीज ही सूची वेगळी केली आहे. shell त्या क्रमाने executable commandsचा शोध घेतो.
05:18 आपण आपली स्वतःची डिरेक्टरी या सूचीत समाविष्ट करू शकतो जेणे करून आपली डिरेक्टरी देखील shell द्वारे शोधली जाईल.
05:25 आपली स्वतःची डिरेक्टरी समाविष्ट करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा.
05:29 PATHकॅपिटलमध्ये 'equal-to' dollar PATHकॅपिटलमध्ये colon slash home slash 'the name of my own home directory' आणि एंटर दाबा.
05:54 आता जर आपण पुन्हा PATH variable ची व्हॅल्यू बघितली
06:04 तर PATH variable मध्ये आपली डिरेक्टरी समाविष्ट झालेली असेल.
06:10 बघा आता आपली डिरेक्टरी येथे उपस्थित आहे.
06:16 अजून एक उत्सुकता वाढविणारे variable म्हणजे LOGNAME.
06:20 हे सध्याच्या userचे नाव संचित करते.
06:24 या variable ची व्हॅल्यू बघण्यासाठी टाईप करा echo space dollar LOGNAMEआणि एंटर दाबा.
06:35 टर्मिनलमधील डॉलरच्या चिन्हाला prompt म्हणतात. येथे आपण सर्व कमांडस टाईप करतो.
06:42 ती primary prompt string आहे. जी Environment variable PS1 मध्ये ठेवली जाते.
06:47 येथे secondary prompt string देखील आहे.
06:50 जर कमांडला एका ओळीपेक्षा जास्त जागा लागत असेल तर दुस-या ओळीपासून 'Greater Than' चिन्ह prompt म्हणून दिसते.
07:00 ही Secondary prompt string असून ती Environment variable PS2 मध्ये ठेविली जाते.
07:05 Secondary command prompt ची व्हॅल्यू बघण्यासाठी टर्मिनलवर echo space dollar PS2 असे टाईप करून एंटर दाबा.
07:20 आपण आपली Primary prompt string बदलू शकतो. जसे की prompt म्हणून at the rate - @ हे चिन्ह.
07:28 हे करण्यासाठी टाईप करा PS1 equal-to '@' आणि एंटर दाबा.
07:41 आता prompt म्हणून dollar च्या चिन्हाऐवजी आपल्याला @ हे चिन्ह दिसेल.
07:50 आपण अजून एक गंमत करू शकतो. जसे की आपण prompt म्हणून user name ही दर्शवू शकतो.
07:56 त्यासाठी केवळ टाईप करा PS1 equal-to within quotes dollar LOGNAME कॅपिटलमध्ये आणि एंटर दाबा.
08:12 आता माझे user name येथे prompt म्हणून दिसत आहे.
08:16 हे पूर्ववत करण्यासाठी केवळ टाईप करा PS1 equal-to dollar within quotes आणि एंटर दाबा.
08:28 आपण अनेक Environment variables ना व्हॅल्यूज दिलेल्या आहेत.
08:32 परंतु एक लक्षात ठेवा की हे बदल केवळ चालू सत्रासाठी मर्यादित असतात.
08:37 जसे आपण आत्ताच आपली डिरेक्टरी PATH variable मध्ये समाविष्ट केली होती.
08:40 जर आपण टर्मिनल बंद करून पुन्हा उघडले किंवा एक नवे टर्मिनल उघडून त्यात echo कमांड कार्यान्वित करून PATH variable ची व्हॅल्यू तपासली,
09:00 तर आपण केलेले बदल आता तेथे उपस्थित नाहीत हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल.
09:05 आपण हे बदल कायम स्वरूपाचे कसे करता येतात हे पुढील Advanced Tutorial मध्ये बघू या.
09:13 अनेकदा आपण काही काळापूर्वी वापरलेल्या कमांडस आपल्याला पुन्हा पुन्हा कार्यान्वित कराव्या लागतात. मग तेव्हा काय करायचे? आपल्याला संपूर्ण कमांड पुन्हा टाईप करावी लागते का?
09:22 नाही. त्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत.
09:26 प्रथम जर आपण कीबोर्डवरील up arrow चे बटण दाबले तर आपल्याला टाईप केलेली शेवटची कमांड दिसेल.
09:33 तेच बटण दाबत राहिल्यास त्यामागील कमांड एकेक करून दिसतील.
09:37 तर मागील कमांड बघण्यासाठी down arrowचे बटण दाबा.
09:42 परंतु अनेक कमांडस मधून स्क्रॉल करत राहणे थोडे कंटाळवाणे होते त्यापेक्षा चांगला मार्ग म्हणजे history कमांड होय.
09:52 command prompt वर history टाईप करा.
09:58 आणि एंटर दाबा. आपल्याला पूर्वी कार्यान्वित झालेल्या कमांडची सूची दिसेल.
10:04 मोठ्या सूचीऐवजी शेवटच्या केवळ १० नोंदी बघण्यासाठी
10:08 history space 10 असे टाईप करून एंटर दाबा.
10:20 लक्षात घ्या की सूचीमध्ये पूर्वी कार्यान्वित केलेल्या प्रत्येक कमांडला एक क्रमांक दिलेला आहे.
10:27 एखादी कमांड पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी
10:32 केवळ टाईप करा उद्गार चिन्ह (!) आणि त्यापुढे त्या कमांडचा क्रमांक उदाहरणार्थ 442 जे या ठिकाणी echo space dollar PATH ही कमांड कार्यान्वित करेल.
10:51 जर तुम्हाला शेवटची कमांड पुन्हा कार्यान्वित करायची असेल तर केवळ दोन वेळा उद्गारचिन्ह टाईप करा. आणि एंटर दाबा.
11:03 आपण पुढे tilde substitution बद्दल जाणून घेणार आहोत. होम डिरेक्टरीचे संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी tilde (~) या चिन्हाचा वापर केला जातो.
11:12 आता तुमच्या होम डिरेक्टरीमध्ये testtree नावाची डिरेक्टरी आहे. त्या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी cd space tilde slash testtree ही कमांड टाईप करा.
11:25 cd tilde minus किंवा cd minus ही कमांड current directory मधून आधी वापरलेल्या डिरेक्टरीत जाण्यासाठी उपयोगी पडते.
11:35 आता आपण testtree या डिरेक्टरी मध्ये आहोत आणि त्या आधी आपण होम या डिरेक्टरीमध्ये होतो.
11:41 आता cd space minus टाईप करून एंटर दाबा. आपण होम या डिरेक्टरीमध्ये परत जाऊ.
11:47 हीच कमांड पुन्हा कार्यान्वित करा. आता आपण पुन्हा testtree या डिरेक्टरी मध्ये आलो आहोत.
11:55 शेवटची पण थोडी महत्त्वाची alias ही कमांड आता आपण बघणार आहोत.
11:59 आपल्याला मोठी कमांड परत परत कार्यान्वित करण्याची गरज भासू शकते.
12:04 येथे आपण या कमांडला दुसरे एखादे छोटे नाव देऊ शकतो व कमांड कार्यान्वित करताना त्या दुस-या नावाचा उपयोग करू शकतो.
12:11 समजा आपल्याकडे डिरेक्टरीची मोठी हायरार्की आहे. त्यात आपण संगीत ऐकण्यासाठी सतत जात असतो. आपण त्याला अशा प्रकारे दुसरे छोटे नाव देऊ शकतो.
12:20 alias space cdMusic equal-to within double quotes cd space slash home slash arc slash files slash entertainment slash music असे टाईप करून एंटर दाबा.
12:47 आता प्रत्येक वेळी या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी केवळ cdMusic टाईप करून एंटर दाबा.
12:55 बघा आता आपण Music या डिरेक्टरीत आहोत.
12:58 आता prompt वर cd space minus ही कमांड टाईप करून तुम्ही मागील चालू डिरेक्टरीमध्ये जाऊ शकता.
13:08 हायरार्कीला दिलेले दुसरे नाव काढून टाकण्यासाठी केवळ unalias space cdMusic असे टाईप करू एंटर दाबा.
13:20 आता पुन्हा जर आपण cdMusic ही कमांड टर्मिनलवर कार्यान्वित केली तर आपल्याला command not found अशी error दाखवेल.
13:30 समजा चालू डिरेक्टरी मध्ये test1 आणि test2 या दोन फाईल्स आहेत.
13:38 आणि जर आपण rm आणि test1 ही कमांड कार्यान्वित केली तर test1 ही फाईल डिलिट होईल.
13:45 आपल्या माहित आहे की rm या कमांडसोबत i हा पर्याय डिलिट करण्याच्या प्रक्रियेला interactive बनवतो.
13:52 आता आपण alias या कमांडनी alias बनवू शकतो. alias rm equal-to, now within quotes “rm space hyphen i”
14:03 आता आपण जेव्हा rm ही कमांड कार्यान्वित करू तेव्हा प्रत्यक्षात rm space i कमांड कार्यान्वित होईल.
14:13 अशा प्रकारे आपण पाहिले की test1 ही फाईल डिलिट झाली परंतु test2 डिलिट करण्यापूर्वी सिस्टीम आपल्याला परवानगी विचारते.
14:20 आपण या ट्युटोरियलमध्ये Environment variable, history आणि alias याबद्दल शिकलो
14:25 हा पाठ येथे संपत आहे.
14:28 हे प्रॉजेक्ट "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
14:36 *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14:39 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते.
14:42 सहभागासाठी धन्यवाद.
14:28 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
14:36 *यासंबंधी माहिती साईटवर उपलब्ध आहे.
14:39 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे.
14:42 ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pravin1389