PhET/C3/Radioactive-Dating-Game/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:04, 9 January 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Radioactive Dating Game या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात, Radioactive Dating Game या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघू.
00:17 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04 जावा वर्जन 1.8.0 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे.


00:32 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिक आणि रसायनशास्त्राचे ज्ञान असावे.
00:37 सिम्युलेशनच्या सहाय्याने आपण शिकू:


Radioactive decay आणि half life

Decay rates

रेडिओऍक्टिव्हिटीचे मापन

Radioactive dating

00:51 कृपया या पाठाबरोबर दिलेल्या अतिरिक्त सामग्रीचा संदर्भ पहा.
00:55 आता सुरूवात करूया.
00:58 सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.
01:02 मी डाउनलोड्स फोल्डरमधे Radioactive Dating Game सिम्युलेशन आधीच डाउनलोड केलेले आहे.
01:10 jar फाईल उघडण्यासाठी टर्मिनल उघडा.
01:14 टर्मिनल प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा.


01:22 java space hyphen jar space radioactive-dating-game underscore en dot jar टाईप करून एंटर दाबा.


01:36 ब्राउजरमधे html फॉरमॅटमधे फाईल उघडेल.
01:41 हा Radioactive Dating Game सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
01:46 आता हा इंटरफेस समजून घेऊ.
01:49 इंटरफेसमधे चार स्क्रीन आहेत:

Half Life

Decay Rates

Measurement

Dating Game

02:00 आपण येथे Half Life चा स्क्रीन बघत आहोत.
02:04 स्क्रीनच्या वरच्या भागात Isotope versus Time असा आलेख आहे.
02:09 Time च्या एककांकडे लक्ष द्या.
02:12 स्क्रीनच्या उजवीकडे आपल्याला Choose Isotope हे पॅनेल दिसेल.
02:17 यात अस्थिर केंद्रकाचा स्थिर केंद्रकात क्षय (डिके) होणारे तीन पर्याय दिलेले आहेत.
02:25 मध्यभागी Bucket o’ Atoms असलेले सिम्युलेशन पॅनेल आहे.
02:31 लक्षात घ्या डिफॉल्ट रूपात C-14 निवडलेले असल्यामुळे त्यात C-14 अणू आहेत.
02:38 बकेटच्या खाली “Add 10” हे बटण उपलब्ध आहे.
02:44 Stable and Unstable Nuclei

स्ट्राँग अणुकेंद्रकीय बल प्रोटॉन्समधील विद्युतचुंबकीय प्रतिकर्षणावर मात करते.

02:54 या बलाशी संबंधित असलेली उर्जा म्हणजे बंधन उर्जा(बाईंडिंग एनर्जी).
03:00 बंधन उर्जा जितकी कमी असेल तितका अणुकेंद्रक अधिक अस्थिर असतो.
03:06 अशा अस्थिर अणुकेंद्रकाला किरणोत्सर्गी म्हटले जाते.
03:12 सिम्युलेशन पॅनेलखाली Play/Pause आणि त्याच्यापुढे Step बटण आहे.
03:19 सिम्युलेशन पॅनेलमधे निळ्या रंगाचे Reset All Nuclei हे बटण आहे.
03:25 हे तुम्हाला तुम्ही निवडलेला आयसोटोप घेऊन पुन्हा मूळ स्थितीवर घेऊन जाईल.
03:30 उजव्या पॅनेलखाली पांढऱ्या रंगाचे Reset All बटण आहे.
03:35 हे या स्क्रीनवरील सिम्युलेशन रिसेट करून सर्व सेटिंग्ज डिफॉल्ट रूपात आणेल.
03:41 Isotope विरूध्द time या आलेखाचे निरीक्षण करा.
03:45 5000 वर्षांच्या खुणेजवळ Half Life नावाची एक लाल उभी तुटक रेषा आहे.
03:52 C-14 चे half-life 5730 वर्षे आहे.
03:58 y अक्षावर निळ्या N-14 चिन्हाच्या वर लाल C-14 चे चिन्ह दिसेल.
04:06 C-14 अणू वरील ओळीत आणि N-14 अणू खालील ओळीत दिसतील.
04:13 आयसोटोप लेबलच्या डावीकडे लाल वर्तुळ आहे.
04:17 C-14 आणि N-14 अणूंची संख्या hash चिन्हाद्वारे दर्शवली आहे जी वर्तुळाच्या डाव्या बाजूला दिसेल.
04:26 Radioactive Decay

Radioactive Decay म्हणजे अस्थिर अणूकेंद्रकाचे स्थिर केंद्रकात उत्स्फूर्त रूपांतरण होय.

04:36 यात सबऍटोमिक कण आणि त्यांची उर्जा रेडिएशन म्हणून उत्सर्जित केली जाते.
04:43 त्याचे प्रकार असे आहेत:

अल्फा क्षय

बिटा क्षय

गॅमा क्षय

04:52 Half-life म्हणजे रेडिओऍक्टिव्ह पदार्थातील निम्म्या अणुकेंद्रकांचा क्षय होण्यास लागणारा वेळ.
05:01 सिम्युलेशनवर परत जाऊया.
05:04 Add 10 बटणावर क्लिक करून लगेच पॉज बटणावर क्लिक करा.
05:10 सिम्युलेशन पॅनेलमधे दहा C-14 अणू समाविष्ट होतील.
05:15 जवळजवळ लगेचच लाल C-14 अणूचा क्षय होण्यास सुरूवात होऊन ते निळ्या रंगाचे N-14 अणू होतील.
05:22 आलेखावर दोन ओळींमधे हलणाऱ्या अणूंकडे लक्ष द्या.
05:28 जसजसे N-14 चे अणू वाढत जातील तसतसे हे वर्तुळ निळ्या रंगात बदलेल.
05:34 पॉज बटणाच्या उजवीकडील Step बटणावर क्लिक करत रहा.
05:42 आता हे वर्तुळ अर्धे लाल व अर्धे निळे दिसत आहे.
05:47 आता आलेखात 5 निळे N-14 अणू दिसत आहेत.
05:54 सिम्युलेशन पॅनेलमधे देखील पाच C-14 चे अणू आणि पाच N-14 चे अणू दिसत आहेत.
06:01 ही half-life ची व्याख्या आहे.
06:04 Add 10 वर पुन्हा क्लिक केल्यास सिम्युलेशन पॅनेलमधे आणखी दहा C-14 चे अणू समाविष्ट होतील.
06:12 वेगवेगळ्या कालावधीनंतर उर्वरित C-14 अणूंच्या संख्येचा अंदाज लावा.
06:18 इतर केंद्रकांसाठी हेच सिम्युलेशन कार्यान्वित करा.
06:23 Decay Rates च्या टॅबवर क्लिक करून स्क्रीनवर जा.
06:28 Half Life स्क्रीनप्रमाणेच या इंटरफेसची रचना आहे.
06:33 कृपया हा स्क्रीन त्याचप्रकारे समजून घ्या.
06:37 आता Measurement च्या टॅबवर क्लिक करून त्या स्क्रीनवर जा.
06:42 उजव्या पॅनेलमधे Choose an Object खालील Tree हा पर्याय वापरू जो डिफॉल्टरूपात निवडलेला आहे.
06:50 डावीकडे वरती Probe Type खालील Carbon-14 आणि Objects हे डिफॉल्टरूपातील पर्याय वापरू.
06:59 उजव्या कोपऱ्यात खाली Plant Tree बटणावर क्लिक करा.
07:04 लगेचच Pause बटणावर क्लिक करा.
07:07 डाव्या कोपऱ्यात वर Probe Type च्या वर 100% असे दिसेल.
07:14 सिम्युलेशन पुढे नेण्यासाठी पॉज बटणाच्या उजवीकडील Step बटणावर क्लिक करत रहा.
07:23 आलेखाच्या वरती % of C-14 हे डिफॉल्ट रूपात निवडलेले आहे.
07:29 आलेखाखालील पांढरा बॉक्स झाड लावल्यापासून ते किती वर्षांचे आहे हे दर्शवतो.
07:35 लाल रेष झाडामधील उर्वरित C-14 ची टक्केवारी दर्शवते.
07:41 आलेखावरील C-14 to C-12 ratio या दुसऱ्या रेडिओ बटणावर क्लिक करा.
07:48 आता लाल रेष झाडातील C-14 आणि C-12 यांचे गुणोत्तर दर्शवेल.
07:53 आलेखावरील % of C-14 या रेडिओ बटणावर पुन्हा क्लिक करा.
07:58 वरती डावीकडील %, झाड आणि आलेखावरील वर्षांची संख्या यांचा मागोवा घ्या.
08:09 जेव्हा झाडाचा हिरवा रंग नष्ट होऊन त्याची सर्व पाने झडतात आणि पानगळ थांबते त्यावेळच्या वर्षांची आणि C-14 ची टक्केवारी यांची नोंद करा.
08:20 वरील डाव्या विंडोमधे अंदाजे 50% दिसण्यासाठी Play किंवा Step बटणावर क्लिक करा.
08:35 जेव्हा झाडामध्ये 50% C-14 दिसेल तेव्हा असलेल्या वर्षांची नोंद करा.
08:42 Rock आणि Uranium-238 या रेडिओ बटणांवर क्लिक करा.
08:50 Erupt Volcano आणि Cool rock बटणांवर क्लिक करा.
08:58 थंड झालेल्या ज्वालामुखीच्या खडकातील U-238 ची पातळी मोजा.
09:04 आयसोटोपच्या पदार्थातील पातळीची हवेतील पातळीबरोबर तुलना करण्यासाठी Air radio बटणावर क्लिक करा.
09:12 आता शेवटच्या Dating Game टॅबवर क्लिक करून त्या स्क्रीनवर जा.
09:17 या स्क्रीनवर C-14, U-238 किंवा इतर कस्टम अणुकेंद्रकांची पातळी मोजता येते.
09:25 जमिनीवर आणि जमिनीखालील काही पदार्थ दिसतील ज्यावर आपण ही पातळी मोजण्यासाठी प्रोब ठेवू शकतो.
09:34 Radioactive Dating

कार्बनचे दोन आयसोटोप्स आहेत: C-12 आणि C-14.

09:41 दोन्ही आयसोटोप कार्बन डाय ऑक्साईड बनतात आणि सजीव ते घेतात.
09:47 सजीवाच्या मृत्युनंतर नवीन कार्बन घेणे थांबते. त्यामुळे C-14 चा स्तर तसेच C-14 चे C-12 शी असलेले गुणोत्तर खाली येते.
09:57 Radioactive Dating-Continued

रेडिओएक्टिव्ह डेटिंगमध्ये C-14 च्या C-12 शी असलेल्या गुणोत्तराची तुलना ही नुकत्याच मृत झालेल्या नमुन्याशी केली जाते.

10:06 हे सजीव मृत होऊन किती काळ झाला याचा अंदाज दर्शवते.
10:10 युरेनियम लेड डेटिंगचा वापर खडक, पुरातत्व वस्तू इत्यादींसाठी केला जातो.
10:17 आधीच्या स्क्रीनप्रमाणेच आपल्याला वरती आलेख दिसेल.
10:22 आपण खालीलप्रमाणे डिफॉल्ट रूपात निवडलेले पर्याय ठेवूया:

Probe Type खाली Carbon-14

Objects आणि

% of C-14

10:33 आता प्रोब ड्रॅग करून डावीकडे जमिनीवर असलेल्या प्राण्याच्या कवटीवर ठेवा.
10:40 कवटीच्या पुढे एक पॉप अप बॉक्स उघडलेला दिसेल.
10:45 Estimate age of Animal Skull” हे टेक्स्ट आणि त्याच्याखाली एका रिकाम्या बॉक्सपुढे “years” असे लिहिलेले दिसेल.
10:53 त्याच्या खाली Check Estimate हे बटण आहे.
10:57 डावीकडे वरती Probe Type च्या वर 98.2% असे दिसेल.
11:04 आलेखाच्या वरती दोन्हीकडील टोकांचा हिरवा बाण ड्रॅग करा.
11:09 बाणाच्या वरील पांढऱ्या बॉक्समधे, % of C-14 अंदाजे 98.2% असावे.
11:18 आलेखाच्या वरील पांढऱ्या बॉक्समधे t equals 123 yrs असे दिसेल.
11:26 Estimate age of Animal Skull खालील रिकाम्या बॉक्समधे 123 टाईप करा.
11:33 Check Estimate बटणावर क्लिक करा.
11:36 Estimate चा पॉप अप बॉक्स बंद होईल.
11:40 त्याजागी 123 years लिहिलेला हिरवा टेक्स्ट बॉक्स उघडेल आणि त्यापुढे एक हिरवा smiley दिसेल.
11:48 कवटीतील उरलेल्या C-14 च्या % ची मोजणी करून आपण कवटीचे वय मोजले आहे.
11:56 असाईनमेंट म्हणून,

डेटिंग गेम स्क्रीनमधील सर्व घटकांच्या वयाचा अंदाज घ्या.

12:03 अस्थिर अणु केंद्रकांच्या टक्केवारीशी वय वर्षाशी सहसंबंध प्रस्थापित करा.
12:08 वय वर्षांचा आणि पदार्थाच्या जमिनीतील खोलीशी सहसंबंध प्रस्थापित करा.
12:13 प्राण्यांच्या अवशेषांसाठी C-14 तर खडक व इतर वस्तूंसाठी U-238 वापरायचे लक्षात ठेवा.
12:20 थोडक्यात,


12:22 या पाठात, Radioactive Dating Game हे PhET सिम्युलेशन कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक बघितले.


12:31 तसेच आपण शिकलो:

Radioactive decay आणि half life,

Decay rates,

रेडिओ ऍक्टिव्हिटीचे मापन,

Radioactive dating.

12:46 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
12:52 हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


12:55 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


13:04 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


13:08 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
13:12 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


13:20 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


13:28 अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


13:33 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.


13:37 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali