OpenFOAM/C2/Simulating-flow-in-a-Lid-Driven-Cavity/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:53, 6 September 2017 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या openFoam वापरून Simulating Flow in a Lid Driven Cavity वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण जाणून घेणार आहोत-
00:09 Lid Driven Cavity चे स्ट्रक्चर,
00:12 जॉमेट्री मेशिंग करणे.
00:14 प्रॉब्लेम सोडवणे आणि Paraview मधे रिझल्टसचे पोस्ट प्रोसेसिंग करणे.
00:17 स्प्रेडशीटवर रिझल्टचा आलेख बघणे आणि प्रमाणित करणे.
00:21 या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 10.04,
00:27 ओपनफोम वर्जन 2.1.0, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
00:32 Lid driven cavity ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी 2D टेस्ट आहे.
00:36 या केसमधे CFD कोडचे प्रमाणीकरण करू.
00:39 ही Lid Driven Cavity ची आकृती आहे.
00:41 बाऊंडरी कंडिशन्स तशाच राहतील.
00:44 एक स्थलांतर होणारी आणि तीन स्थिर वॉल्स.
00:46 आपण हे Reynolds no (Re) = 100 साठी सोडवत आहोत.
00:50 स्थलांतर होणा-या वॉलचा वेग 1 मीटर प्रति सेकंद आहे.
00:54 इन्स्टॉलेशन संबंधित पाठातील Lid Driven Cavity साठीचा पाथच आपण येथे घेऊ.
01:00 आता कमांड टर्मिनल उघडू.
01:02 त्यासाठी तुमच्या कीबोर्डवरील Ctrl+Alt+t ही बटणे एकत्रितपणे दाबा.
01:08 कमांड टर्मिनलमधे, lid driven cavity चा पाथ टाईप करा,
01:12 आणि "run" टाईप करून एंटर दाबा.
01:15 cd (space) tutorials टाईप करून एंटर दाबा.
01:20 cd (space) incompressible टाईप करून एंटर दाबा.
01:26 cd (space) icoFoam (लक्षात घ्या F कॅपिटल आहे) टाईप करून एंटर दाबा.
01:33 cd (space) cavity टाईप करून एंटर दाबा.
01:38 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
01:41 फाईल स्ट्रक्चरमधे 0 , constant आणि system हे तीन फोल्डर दिसतील.
01:46 आता cd (space) constant टाईप करून एंटर दाबा.
01:52 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
01:55 constant फोल्डरमधे polyMesh नावाचा फोल्डर आणि फ्लुइडचे भौतिक गुणधर्म सांगणारी फाईल आहे.
02:01 आता cd (space) polymesh टाईप करून एंटर दाबा.
02:08 PolyMesh मधे 'blockMeshDict' नावाची फाईल आहे.
02:12 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
02:15 तुम्ही blockMeshDict फाईल पाहू शकता.
02:17 blockMeshDict फाईल उघडण्यासाठी, gedit space blockMeshDict टाईप करून एंटर दाबा.

(लक्षात घ्या M आणि D येथे कॅपिटल आहेत)

02:30 हे blockMeshDict ही फाईल उघडेल.
02:32 हे capture area मधे ड्रॅग करून घेऊ.
02:36 ह्यामधे lid driven cavity चे कोऑर्डिनेटस,
02:41 ब्लॉकिंग आणि मेशिंग पॅरामीटर्स,
02:44 आणि बाऊंडरी पॅचेस यांचा समावेश आहे.
02:47 येथे arcs तसेच मर्ज करण्यासाठी पॅचेस उपलब्ध नसल्यामुळे, edges आणि mergePatchPairs हे घटक रिकामे ठेवू शकतो.
02:56 आता हे बंद करा.
02:58 कमांड टर्मिनलवर cd (space) .. (dot) (dot) टाईप करून एंटर दाबा.
03:04 असे दोन वेळा करा. हे तुम्हाला cavity फोल्डरवर घेऊन जाईल.
03:09 आता cd (space) system टाईप करून एंटर दाबा.
03:15 आता "ls" टाईप करून एंटर दाबा. ह्यामधे तीन फाईल्स आहेत-
03:22 controlDict, fvSchemes आणि fvSolutions.
03:26 controlDict मधे स्टार्ट/एंड टाईमच्या कंट्रोल पॅरामीटर्सचा समावेश आहे.
03:30 fvSolution मधे रन टाईममधे वापरल्या गेलेल्या discritization स्कीम्सचा समावेश आहे.
03:35 आणि fvSchemes मधे सॉल्व्हर्स, टॉलरन्स इत्यादीच्या समीकरणांचा समावेश आहे.
03:40 आता पुन्हा cd (space) (dot dot) .. टाईप करून एंटर दाबा.
03:46 आता cd ( space ) 0 (zero) टाईप करून एंटर दाबा.
03:53 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
03:57 यामधे दाब, वेग, तापमान इत्यादी बाऊंडरी कंडिशन्सच्या प्रारंभिक व्हॅल्यूजचा समावेश आहे.
04:03 cd ( space ) (dot dot) . . टाईप करून cavity फोल्डरवर परत जा.
04:09 आता जॉमेट्री mesh करावी लागेल.
04:11 येथे coarse मेश वापरत आहोत.
04:14 जॉमेट्री मेश करण्यासाठी टर्मिनलवर blockMesh असे टाईप करा.
04:18 blockMesh टाईप करून एंटर दाबा. (लक्षात घ्या M कॅपिटल आहे).
04:25 मेशिंग पूर्ण झाले आहे.
04:27 blockMesh फाईलमधे काही एरर्स असतील तर त्या टर्मिनलवर दाखवल्या जातील.
04:31 जॉमेट्री बघण्यासाठी paraFoam टाईप करून एंटर दाबा. लक्षात घ्या 'F' कॅपिटल आहे.
04:40 हे paraview विंडो उघडेल.
04:44 आता ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डाव्या बाजूला असलेल्या Apply वर क्लिक करा.
04:49 lid driven cavity ची जॉमेट्री आपण पाहू शकतो. आता हे बंद करा.
04:58 टर्मिनलवर "checkMesh" टाईप करून मेश चेक करा.
05:04 लक्षात घ्या 'M' कॅपिटल आहे. एंटर दाबा.
05:08 तुम्हाला मेशशी संबंधित अनेक सेल्स, skewness आणि इतर पॅरामीटर्स दिसतील.
05:15 स्लाईडसवर परत जाऊ.
05:17 येथे icoFoam हा सॉल्व्हर वापरत आहोत.
05:20 icoFoam हा न्यूटोनियन फ्लुइडसचा इनकाँप्रीसिबल फ्लोसाठीचा Transient सॉल्व्हर आहे.
05:26 टर्मिनलवर परत जाऊ.
05:29 टर्मिनलवर टाईप करा "icoFoam".
05:33 लक्षात घ्या येथे 'F' कॅपिटल आहे. एंटर दाबा.
05:37 येथे टर्मिनल विंडोमधे कार्यान्वित होणारी Iterations बघता येतात.
05:40 प्रॉब्लेम सोडवून झाल्यावर जॉमेट्री आणि रिझल्टस बघण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा paraFoam.
05:54 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डाव्या बाजूला असलेल्या,
05:57 Apply वर क्लिक करा. ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूवरील प्रॉपर्टीजखाली स्क्रॉल करा.
06:02 आपल्याला मेश पार्टस, व्हॉल्युम फिल्डस इत्यादी घटक दिसतील.
06:07 Lid driven cavity चे वेगवेगळे बाऊंडरी रिजन्स बघण्यासाठी मेश पार्टसमधील हे बॉक्सेस चेक किंवा अनचेक करा.
06:15 आता यानंतर, डाव्या बाजूला वरती ऍक्टीव्ह व्हेरिएबल कंट्रोलवरील ड्रॉपडाऊन मेनूमधे, solid color हा पर्याय बदलून p किंवा कॅपिटल U निवडा. ज्या दाब, वेग यासारख्या इनिशियल कंडिशन्स आहेत.
06:31 मी कॅपिटल 'U' निवडत आहे. वेगाची इनिशियल कंडिशन दाखवली जाईल.
06:37 paraview विंडोच्या वरील भागात VCR कंट्रोल दिसेल.
06:44 play बटणावर क्लिक करा.
06:47 आता हा lid driven cavity साठी वेगाचा अंतिम रिझल्ट आहे.
06:52 ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या डावीकडे वरती color legend वर क्लिक करून ते टॉगल करून बघा.
07:03 हा U चा color legend आहे.
07:07 आपल्याला मिळालेले रिझल्टस प्रमाणित करणे गरजेचे आहे.
07:09 त्यासाठी U आणि V हे वेग प्लॉट करू.
07:12 असे करण्यासाठी Filters मधे जाऊन खाली स्क्रॉल करा. Data Analysis पर्यायांतून Plot Over line पर्याय निवडा.
07:21 त्यावर क्लिक करा.
07:23 X , Y आणि Z अक्ष दिसतील.
07:25 एकेक करून X आणि Y अक्ष निवडा.
07:31 मी X अक्ष निवडून Apply वर क्लिक करत आहे.
07:37 दाब आणि वेग यांचा आलेख बघू शकतो.
07:42 हे नॉन डायमेंशनल ऍनालिसीस असल्यामुळे रेनॉल्डस नंबर =100 साठी u/U v/s y/L आलेख काढणे गरजेचे आहे.
07:52 प्लॉट डेटामधे हे करण्यासाठी Y अक्षावर क्लिक करा.
07:58 आणि APPLY वर क्लिक करा.
08:01 आपण आलेख बघू शकतो.
08:03 आता मेनूबारमधे फाईल मेनूमधील Save Data वर क्लिक करा.
08:09 तुमच्या फाईलला योग्य नाव द्या.
08:11 मी याला "cavity" नाव देत आहे.
08:15 ही फाईल ".csv" (dot csv) म्हणून सेव्ह करणार आहोत.
08:19 आता OK क्लिक करून पुन्हा OK क्लिक करा.
08:23 आता ओपन फोम डिरेक्टरीच्या cavity फोल्डरवर जाऊ.
08:29 खाली स्क्रॉल करा. cavity.csv फाईल आपण बघू शकतो.
08:34 हे ओपन ऑफिस किंवा लिबर ऑफिस स्प्रेडशीटमधे उघडा.
08:39 लिबर ऑफिस स्प्रेडशीटमधून U0 (u वेग) आणि उजवीकडील पॉईंटस 1(Y-अक्ष) हे कॉलम्स दुस-या स्प्रेडशीटमधे कॉपी पेस्ट करा.
08:48 आता या दोन कॉलम्सचे विभाजन करा म्हणजेच u zero बाय कॅपिटल U आणि points 1 बाय कॅपिटल L
08:59 आणि मेनूबारमधे वरच्या बाजूला असलेल्या लिबर ऑफिस चार्टमधे याचा रिझल्ट प्लॉट करा.
09:08 आता स्लाईडसवर परत जाऊ.
09:10 मिळालेले रिझल्ट हे या आकृतीसारखेच असतील.
09:16 हे रिझल्टस Lid Driven Cavity by : Ghia et al. (1982) या प्रसिध्द झालेल्या शोध निबंधात तसेच Fluent यांच्या रिझल्टसशी प्रमाणित करा.
09:24 या पाठात आपण शिकलो:
09:26 Lid Driven cavity चे फाईल स्ट्रक्चर
09:28 सोडवलेली lid driven cavity.
09:30 मिळालेल्या सोल्युशन्सचे पोस्ट प्रोसेसिंग
09:32 आणि व्हॅलिडेशन.
09:34 असाईनमेंट म्हणून, lid driven cavity मधील काही पॅरामीटर्स बदला.
09:38 जसे की, 0 फोल्डरमधील वेगाचा आकार.
09:41 constant फोल्डरमधील ट्रान्सपोर्ट प्रॉपर्टीजमधील Kinematic viscosity .
09:45 आणि u/U आणि y/L चे रिझल्ट प्लॉट करा.
09:50 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:54 यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09:57 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
10:00 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:
10:02 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
10:05 ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.
10:09 अधिक माहितीसाठी कृपया: contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:15 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
10:27 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
10:30 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali