Java-Business-Application/C2/Database-and-validation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:36, 23 July 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Database-and-validation

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration


00:01 Database आणि validation वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:08 डेटाबेसशी संवाद साधणे.
00:10 फिल्डस व्हॅलिडेट करणे.
00:12 आपण वापरणार आहोत,
00:13 उबंटु वर्जन 12.04
00:15 नेटबीन्स IDE 7.3
00:19 JDK 1.7
00:21 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00:24 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता
00:28 ह्या पाठासाठी तुम्हाला,
00:31 Java Servlets आणि JSPsचे प्राथमिक ज्ञान,
00:35 नेटबीन्स IDE मधून MySQL डेटाबेसला जोडणे,
00:39 डेटाबेस आणि टेबल्स बनवता येणे आवश्यक आहे.
00:42 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
00:52 आपण MySQL सर्व्हर सुरू केला आहे.
00:55 त्यामधे लायब्ररी नावाचा डेटाबेस बनवला आहे.
01:00 त्यामधे युजर्स नावाचे टेबल तयार केले आहे.
01:04 ह्या टेबलमधे आधीच काही व्हॅल्यूज समाविष्ट करून ठेवल्या आहेत.
01:08 आता आपण त्या बघू.
01:10 त्यासाठी युजर्सवर राईट क्लिक करून View Data वर क्लिक करा.
01:15 खालील Output बटणावर क्लिक करा.
01:19 आपण येथे 15 युजर्स बघू शकतो.
01:23 आपण FirstName, Surname, Age, Gender, Email, Username आणि Password बघू शकतो.
01:31 आता Java Database Connectivity Driver म्हणजेच JDBC ड्रायव्हर लोड करू .
01:39 त्यासाठी Projects टॅबवर क्लिक करा .
01.42 Libraries वर राईट क्लिक करून Add Library वर क्लिक करा.
01.46 नंतर MySQL JDBC Driver वर क्लिक करा .
01.50 आणि Add Library वर क्लिक करा.
01.53 हे JDBC ड्रायव्हर लोड करेल.
01.56 आता पूर्वी केल्याप्रमाणे प्रोजेक्ट कार्यान्वित करा.
02.00 आता arya हे युजरनेम आणि arya123* पासवर्ड टाईप करा.
02.06 Sign In वर क्लिक करा.
02.08 आपण successGreeting पेज बघू शकतो.
02.12 लॉगआऊट करण्यासाठी here वर क्लिक करा.
02.15 आता IDE वर परत जा.
02.17 आपण GreetingServlet dot java वर जाऊ.
02.21 doPost मेथड वर जाऊया.
02.23 getParameter मेथडच्या सहाय्याने requestद्वारे युजरनेम आणि पासवर्ड मिळेल.
02.31 पुढे JDBC कनेक्शन कोड बघणार आहोत.
02.35 आपण Connection , PreparedStatement आणि Resultset ऑब्जेक्टसना null ने इनिशियलाईज केले आहे.
02.44 नंतर प्रोगॅममधे ड्रायव्हर रजिस्टर करू.
02.48 नंतर डेटाबेसचे कनेक्शन करू.
02.52 कनेक्शन ऑब्जेक्टवर prepareStatement मेथड कार्यान्वित करू.
02.58 युजर्स टेबलमधून युजरची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी देऊ.
03.03 युजरनेम आणि पासवर्ड फॉर्ममधे भरल्याप्रमाणे आहे का ते तपासू.
03.09 येथे, प्रश्नचिन्ह डेटाबेसमधील प्रत्येक फिल्ड दाखवते.
03.15 प्रश्नचिन्हाच्या जागी व्हॅल्यू देण्यासाठी setString मेथड कार्यान्वित करू.
03.22 हे PreparedStatement ऑब्जेक्टद्वारे करू.
03.26 PreparedStatement ऑब्जेक्टवरexecuteQuery मेथड कार्यान्वित करू
03.33 तो रिझल्ट ResultSet ऑब्जेक्टमधे संचित होईल.
03.37 यशस्वीरित्या लॉगिन केल्यावर successGreeting पेज दाखवू.
03.43 त्यासाठी RequestDispatcher इंटरफेस वापरू.
03.48 RequestDispatcher ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी requestवर getRequestDispatcher मेथड वापरू.
03.56 नंतर RequestDispatcher ऑब्जेक्टवर forward मेथड कार्यान्वित करू.
04.02 अशाप्रकारे successGreeting dot jspकडे पाठवणार आहोत.
04.07 स्लाईडस वर परत जा.
04.10 RequestDispatcher इंटरफेसबद्दल जाणून घेऊ.
04.15 हा इंटरफेस request दुस-या रिसोर्सकडे पाठवण्याची सुविधा देतो.
04.22 हे रिसोर्सेस html, servlet, किंवा jsp असू शकतात.
04.26 आता IDE वर जाऊ.
04.29 आता successGreeting dot jspवर जाऊ.
04.33 You have successfully logged inहा मेसेज दाखवत आहोत.
04:38 ब्राऊजरवर जाऊ.
04.41 डेटाबेस मधे समाविष्ट नसलेले युजरनेम आणि पासवर्ड टाईप करू.
04.47 मी abc हे युजरनेम आणि abc123* हा पासवर्ड टाईप करत आहे.
04.56 नंतर Sign In वर क्लिक करा.
04.59 त्याच पेजवर एरर मेसेज दिसेल.
05.03 Please correct the following error!!! Invalid username or password
05.09 त्यासाठीचा कोड पाहू.
05.12 IDE वर परत जा.
05.14 GreetingServlet dot javaवर जा.
05.17 हे व्हॅलिडेशन अपयशी ठरल्यास एरर मेसेज दाखवेल.
05.22 प्रथम errorMsgsची सूची इनिशियलाईज करू.
05.27 setAttribute मेथडच्या सहाय्याने errorMsgs हे व्हेरिएबल request स्कोपमधे सेट करू.
05.35 येथे errorMsgs हे अॅट्रिब्यूट नेम आहे.
05.39 आपण id हे स्ट्रिंग व्हेरिएबल nullने इनिशियलाईज केले आहे.
05.44 नंतर आपण युजर डेटाबेसमधे उपलब्ध आहे का ते तपासू.
05.48 असल्यास त्याची व्हॅल्यू id ह्या व्हेरिएबलमधे संचित करू.
05.53 अन्यथा Invalid username किंवा password ही एरर errorMsgs च्या सूचीत समाविष्ट करू.
06.00 एरर मेसेजेसची सूची रिकामी नसेल तर index dot jspवर एरर मेसेजेस दाखवू.
06.09 त्यामुळे हे index dot jsp कडे पाठवावे लागेल.
06.13 RequestDispatcherद्वारे दुस-या पेजकडे कसे रिडायरेक्ट करायचे हे आपण आधीच पाहिले आहे.
06.20 लक्षात घ्या आपण हा कोड try catch blockमधे exception हँडलिंगसाठी समाविष्ट केला होता.
06.27 आता errorMsgs हे व्हेरिएबल index dot jspमधून कसे मिळवायचे ते पाहू.
06.34 प्रथम errorMsgsह्या अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू.
06.38 हे requestवर getAttribute मेथडच्या सहाय्याने केले आहे .
06.44 लक्षात घ्या जावा कोड opening tag म्हणजेच less than चिन्ह percentage चिन्ह आणि closing tag म्हणजेच percentage चिन्ह आणि greater than चिन्ह ह्यामधे समाविष्ट केले आहे.
06.57 कोडच्या ह्या ब्लॉकला scriptlet म्हणतात.
07.02 प्रत्येक वेळी JSP कॉल केली असता ह्यातील Java कोड कार्यान्वित केला जातो.
07.08 जर errorMsgsची व्हॅल्यू nullनसेल तर हा मेसेज दाखवू.
07.15 Please correct the following errors.
07:18 नंतर errorMsgsच्या सूचीमधे आयटरेट करू.
07.23 नंतर सूची रूपात एरर मेसेजेस दाखवू.
07.27 अशाप्रकारे index dot jspवर एरर मेसेजेस दाखवू.
07.32 आता डेटाबेसमधे युजर कसा समाविष्ट करायचा ते पाहू.
07.37 डेटाबेसमधे, युजर समाविष्ट करण्यापूर्वी युजर टेबलसाठी मॉडेल बनवणे आवश्यक आहे .
07.44 मॉडेल म्हणजे काय ते पाहू.
07.48 मॉडेल म्हणजेः
07.49 सॉफ्टवेअर अॅप्लिकेशमनधील डेटाची लॉजिकल रचना.
07.55 setters आणि getters सह अॅट्रिब्यूटस असलेला जावा क्लास.
08.00 मॉडेलमधे अॅट्रिब्यूटस स्वतंत्र, एक एकटे न मानता त्याच्याकडे एकसंधपणे पाहिले जाते.
08.07 नेटबीन्स IDE वर परत जा.
08.11 मी आधीच User dot javaमॉडेल बनवले आहे.
08.16 आपणpackage org dot spokentutorial dot modelमधे हा Java class बनवला आहे.
08.24 आपल्याकडे firstName, surname, age, gender, email, username, password ही अॅट्रिब्यूट्स आहेत.
08.33 आपण ते emptyव्हॅल्यूजने इनिशियलाईज केले आहे .
08.37 आपल्याकडे parameterized कन्स्ट्रक्टर आहे.
08.41 तसेच default कन्स्ट्रक्टर आहे.
08.44 आपण getFirstName मेथड घोषित केली आहे.
08.47 तसेच setFirstName मेथड घोषित केली आहे.
08.51 अशी प्रत्येक अॅट्रिब्यूटसाठी set आणि get मेथड घोषित केली आहे.
08.57 ब्राऊजरवर जा.
08.59 रजिस्टर करण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा.
09.03 रजिस्ट्रेशन पेजमधील सर्व फिल्डस टाईप करा.
09.07 नंतरAdd User वर क्लिक करा.
09.10 आपल्याला Add User सक्सेस पेज मिळेल.
09.14 Your request to add harshita was successful हा मेसेज मिळेल.
09.20 येथे harshita हे आपण दिलेले युजरनेम दिले आहे.
09.24 आता हे कसे केले ते पाहू.
09.28 त्यासाठी IDE वर परत जा.
09.30 AddUserServlet dot javaवर जा.
09.35 ह्या स्टेप्स GreetingServlet dot javaसाठी केल्याप्रमाणेच आहेत.
09.40 प्रथम getParameter मेथडद्वारे फॉर्मचे पॅरामीटर्स मिळतील.
09.46 व्हेरिएबल युजर हा User मॉडेलचा इन्स्टन्स असून त्यातील विविध अॅट्रिब्यूटस इनिशियलाईज करू.
09.53 setAttribute मेथडच्या सहाय्याने user हे व्हेरिएबलrequest स्कोपमधे सेट करू.
10.01 फॉर्म भरताना कुठलीही एरर नसल्यास, युजर टेबलमधे व्हॅल्यूज समाविष्ट करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
10.10 नंतरsuccess User पेजकडे पाठवू.
10.15 आता successUser dot jspवर जा.
10.19 प्रथम User dot java इंपोर्ट केले आहे.
10.24 JSPमधे कोडच्या ओळीला directive म्हणतात.
10.28 JSP डायरेक्टीव्हची सुरूवात opening tag म्हणजेच less than चिन्हpercentage चिन्ह आणि at the rate चिन्ह आणि शेवट closing tagने म्हणजेच percentage चिन्ह आणि greater than चिन्हाने होतो.
10.42 हे पेज डायरेक्टीव्ह आहे.
10.45 पेज डायरेक्टीव्हमधे इंपोर्ट केलेल्या सर्व पॅकेजेसची सूची आहे.
10.50 User ह्या अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळेल. जी युजर ऑब्जेक्ट म्हणून संचित करू.
10.57 नंतर येथे सक्सेस मेसेज आहे.
11.00 येथे आपण युजरनेम मिळवलेले आहे.
11.04 request ऑब्जेक्टवरgetUsername() मेथड वापरू.
11.09 आपण हे scriptlet टॅग्ज वापरून केले आहे.
11.12 आता ब्राऊजरवर जा .
11.15 डेटाबेसमधे आधीच उपलब्ध असलेला युजर समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.
11.20 आता मी पुन्हा harshita समाविष्ट करत आहे.
11.24 आपण Please correct the following errors!!1 Duplicate entry 'harshita' for key usernameहा एरर मेसेज बघू शकतो.
11.33 आता पुन्हा एकदा युजर रजिस्टर करू.
11.37 येथे मी आता फॉर्म भरला आहे.
11.40 मी Age फिल्डमधे चूक केली आहे.
11.44 ग्राह्य अंकाऐवजी मी ab टाईप केले आहे .
11.48 आताAdd Userवर क्लिक करा.
11.51 आपल्याला The age must be a positive integer हा एरर मेसेज दिसेल .
11.57 आता हे कसे केले ते पाहू.
12.00 IDEवर परत जा.
12.03 AddUserServlet dot java उघडा.
12.08 येथे errorMsgsची सूची बनवली आहे.
12.11 नंतर setAttribute मेथडच्या सहाय्याने request scopeमधे errorMsgs हे व्हेरिएबल सेट करू.
12.18 नंतर इंटिजर टाईपचे ageUser हे व्हेरिएबल घोषित करून ते -1ने इनिशियलाईज केले आहे.
12.26 try catch block मधे parseInt मेथड वापरली आहे.
12.31 जी संख्येचे अक्षरी रूप घेऊन त्याची इंटिजर व्हॅल्यू परत करेल.
12.37 येथे आपण age फिल्डमधील संचित धन पूर्णांक तपासून घेत आहोत.
12.44 तपसणी अपयशी ठरल्यास errorMsgs च्या सूचीत ही एरर समाविष्ट करू.
12.51 The age must be a positive integer.
12.54 डेटा व्हॅलिडेट करण्यासाठी अशाचप्रकारे सर्व फिल्डस तपासणे आवश्यक आहे.
13.01 errorMsgs सूची रिकामी नसल्यास हे errorMsgs आपण addUser dot jsp वर दाखवू.
13.09 हे RequestDispatcherद्वारे कसे करायचे ते आधीच पाहिले आहे.
13.15 आता addUser dot jspवर जा.
13.19 येथेही प्रथम User dot java इम्पोर्ट केले आहे.
13.24 scriptlet टॅग्जमधे आपण User टाईपचे ऑब्जेक्ट बनवले आहे.
13.31 नंतर getAttribute मेथडद्वारे errorMsgs ह्या अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू.
13.38 ही व्हॅल्यू null आहे का ते तपासू.
13.43 जर ही व्हॅल्यू null नसेल तर index dot jspसाठी केल्याप्रमाणे एरर मेसेज दाखवू.
13.51 अन्यथा User मॉडेलच्या सहाय्याने requestद्वारे User अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू.
13.59 आपल्याकडे फॉर्म आहे.
14.01 फॉर्म टॅगमधे AddUserServlet ही अॅक्शन आणि POST ही मेथड आहे.
14.07 First Nameहे पहिले फिल्ड आहे ज्याचा इनपुट टाईपtext आहे. firstName हे नाव आणि user dot getFirstName ही व्हॅल्यू आहे.
14.18 येथे firstNameला empty स्ट्रिंग ही व्हॅल्यू देऊन इनिशियलाईज करत आहोत.
14.24 आपल्याला हेच इतर फिल्डससाठीही करायचे आहे.
14.28 आपल्याकडे submit बटण आहे ज्याची व्हॅल्यू Add User आहे.
14.33 अशाप्रकारे addUser.jsp मधील फिल्डस व्हॅलिडेट करू.
14.38 तुम्ही Add User पेजवर वेगवेगळ्या एरर्स करून बघू शकता.
14.42 आता डेटाबेसमधे युजर harshita समाविष्ट झाली आहे का ते बघू.
14.49 आता user टेबलवर जा. डेटाबेसमधे युजर harshita समाविष्ट झाल्याचे बघू शकतो.
14.56 पाठात आपण शिकलो:
14.58 डेटाबेस जोडणे आणि
15.00 फिल्ड व्हॅलिडेट करणे.
15.02 प्रॉजेक्टची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
15.07 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
15.11 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
15.15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
15.17 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15.20 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
15.23 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
15.29 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
15.32 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15.38 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15.48 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
15.57 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
16.02 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana