Inkscape/C3/Create-a-3-fold-brochure/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:47, 29 November 2015 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Create a 3-fold brochure” या इंकस्केप वरील पाठात आपले स्वागत.


00:05 आपण शिकणार आहोत –
00.08 * guidelines वापरणे, सेट करणे
00:10 * 3-fold brochure साठी सेटींग्ज
00:12 * ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना.
00:15 तसेच लेयर्सच्या वापराचे महत्व जाणून घेऊ.
00:18 या पाठासाठी वापरणार आहोत,


00:21 * उबंटु लिनक्स 12.04 OS
00:24 * इंकस्केप वर्जन 0.48.4
00:28 हा 3 fold brochure चा नमुना आहे. ते उघडल्यावर 3 फोल्डस दिसतील.
00:34 येथे एकूण सहा भाग आहेत.
00:37 बाहेरच्या बाजूला 1, 5 आणि 6 हे भाग आहेत.
00:42 ब्रोशरच्या आतल्या बाजूला 2, 3 आणि 4 हे भाग आहेत.
00:46 असा ब्रोशर कसा बनवायचा हे जाणून घेऊ.
00:51 इंकस्केप उघडा.
00:53 File मेनूखालील Document Properties वर जा.
00:56 प्रथम काही प्राथमिक सेटिंग्ज करू.
00:59 हे पर्याय निवडा-
01.00 * Default units साठी mm
01.03 * Page Size साठी A4
01.05 * Orientation साठी Landscape
01.07 * Custom Size Units साठी mm.
01.11 कॅनव्हास 3 फोल्डसमधे विभागावा लागेल.
01.14 येथे कॅनव्हासची width 297 आहे.
01.18 म्हणून 297 चे 3 भाग म्हणजे प्रत्येक भागाची width 99 असली पाहिजे.
01.27 Document Properties चा डायलॉग बॉक्स बंद करा.
01.30 कॅनव्हासच्या डावीकडील guideline वर क्लिक करून ड्रॅग करा.
01.35 या guideline वर डबल क्लिक करा.
01.37 डायलॉग बॉक्स उघडेल.
01.41 'X' ची व्हॅल्यू 99 करून OK क्लिक करा.
01.45 कॅनव्हासच्या डावीकडून आणखी एकदा guideline वर क्लिक करून ड्रॅग करा.
01.50 डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
01.53 येथे 'X' ची व्हॅल्यू 198 करा.
01.56 आपल्या कॅनव्हासचे तीन समान भाग झाले आहेत.
02.01 ह्या गाईडलाईन्स प्रत्येक फोल्ड कुठे सुरू होतो आणि संपतो हे सांगतात.
02.06 ही फाईल दोनदा सेव्ह करा.
02.08 पहिली ब्रोशरच्या आतील बाजूसाठी
02.11 आणि दुसरी बाहेरच्या बाजूसाठी.
02.13 File मेनूखालील Save as क्लिक करा.
02.16 मी ही फाईल डेस्कटॉपवर Brochure-OUT.svg नावाने सेव्ह करते.
02.22 पुन्हा File मेनूखालील Save as क्लिक करा.
02.26 यावेळी फाईलला Brochure-IN.svg नाव देऊन Save वर क्लिक करा.
02.33 आता एक आतील तर दुसरी बाहेरील भागासाठी अशा दोन फाईल्स आहेत.
02.39 Brochure-IN.svg पासून सुरूवात करू.
02.43 हे ब्रोशर तयार करताना वेगळ्या घटकांसाठी वेगळे लेयर्स वापरणे इष्ट होईल.
02.50 पाठाच्या शेवटी आपल्याला ह्याचा फायदा समजेल.
02.54 प्रथम ब्रोशरच्या आतील बाजूच्या म्हणजेच 2, 3 आणि 4 या भागाची रचना करू.
03.00 Bezier tool वापरून कॅनव्हासच्या मध्यभागी ग्राफिक इलस्ट्रेशन काढा. त्याला निळा रंग द्या.
03.09 stroke काढून टाका.
03.14 नवा लेयर बनवून त्याला तुमच्या पसंतीचे नाव द्या.
03.19 150X150 पिक्सेल्सचे वर्तुळ काढा.
03.26 त्याला हिरवा रंग द्या.
03.28 वर्तुळाची दुसरी प्रत बनवा. अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराची आणखी पाच वर्तुळे बनवा.
03.36 दाखवल्याप्रमाणे ग्राफिक इलस्ट्रेशनच्या सभोवती ती ठेवा.
03.40 या वर्तुळाच्या आत काही इमेजेस समाविष्ट करू.
03.44 त्यासाठी काही इमेजेस मी एडिट करून Documents फोल्डरमधे सेव्ह करून ठेवल्या आहेत.
03.50 तुमच्यासाठी या इमेजेस Code files लिंकवर उपलब्ध आहेत.
03.56 पाठ थांबवून या लिंकवर क्लिक करा आणि इमेजेस योग्य फोल्डरमधे सेव्ह करा.
04.02 पाठ पुन्हा सुरू करा.
04.04 File खालील Import वर क्लिक करा. Image1 निवडा.
04.09 ती पहिल्या वर्तुळावर ठेवा.
04.12 हेच सर्व इतर पाच इमेजेससाठी करा.
04.17 Align and Distribute पर्याय वापरून हे अलाईन करा.
04.20 तुमचा कॅनव्हास असा दिसला पाहिजे.
04.25 पुढे नवा लेयर बनवा.
04.28 Bezier tool सिलेक्ट करून एक बाण काढा.
04.34 त्याला राखाडी रंग द्या.
04.38 stroke काढून टाका.
04.41 Filters मेनूखालील Shadows and Glows मधील Drop Shadow वर क्लिक करा.
04.47 इफेक्ट बघण्यासाठी Preview चा चेक बॉक्स निवडा.
04.50 Apply वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
04.55 दाखवल्याप्रमाणे बाण पहिल्या वर्तुळावर ठेवा.
05.01 या बाणाच्या आणखी दोन प्रती बनवा.
05.05 आणि ते दाखवल्याप्रमाणे अनुक्रमे दुस-या आणि तिस-या वर्तुळावर ठेवा.
05.10 आता सर्व ग्राफिक घटक करून झाले आहेत.
05.13 आता संबंधित टेक्स्ट समाविष्ट करू.
05.15 नव्या लेयरमधे पहिल्या बाणावर “Introduction” असे टाईप करा.
05.20 दुस-या बाणावर “Features” असे टाईप करा.
05.24 तिस-या बाणावर “Usage” असे टाईप करा.
05.28 आता प्रत्येक भागात काही टेक्स्ट समाविष्ट करायचे आहे.
05.33 लिबर ऑफिस रायटर फाईलमधे आधीच सेव्ह करून ठेवलेले टेक्स्ट कॉपी आणि पेस्ट करू.
05.40 ही फाईल सेव्ह केलेल्या फोल्डरमधे आहे.
05.43 ती शोधून त्यातील टेक्स्ट कॉपी करा.
05.47 दाखवल्याप्रमाणे हे नव्या लेयरवर पेस्ट करा.
05.50 Text and Font पर्यायातून फाँटचा आकार कमी म्हणजे 15 करून अलाईन करा.
05.55 ellipse टूल वापरून हिरव्या रंगाचे बुलेट तयार करा.
05.59 आणि ते पहिल्या वाक्याच्या डावीकडे ठेवा.
06.02 हीच क्रिया सर्व वाक्यांसाठी करा.
06.05 आता ब्रोशरचा आतील भाग तयार झाला आहे.
06.08 SVG फाईल CTRL + S दाबून सेव्ह करा.
06.12 आता फायनल ब्रोशरमधे तुम्हाला हवे असलेले लेयर्स लपवू किंवा दाखवू शकता.
06.18 आता हीच फाईल PDF मधे सेव्ह करू.
06.21 File खालील Save As क्लिक करा.
06.24 फाईलचे एक्सटेन्शन बदलून PDF करा.
06.29 Save क्लिक करा.
06.31 नवा डायलॉग बॉक्स उघडेल.
06.34 प्रिंट करण्यासाठी रेझोल्युशन 300 आवश्यक आहे.
06.37 वेबसाठी हे 72 ठेवू शकता.
06.40 आपण 300 ठेवू.
06.42 OK क्लिक करा.
06.44 आता बाणांची अपारदर्शकता बदलू.
06.47 Arrow लेयरवर जाऊन लेयरची अपारदर्शकता बदलून 70 करा.
06.52 तसेच ink-blots हा नवा लेयर समाविष्ट करा.
06.58 फाईल SVG आणि PDF फॉरमॅटमधे सेव्ह करा.
07.04 फरक समजून घेण्यासाठी दोन 'pdf' फाईल्सची तुलना करा.
07.08 आता ब्रोशरच्या बाहेरची बाजू तयार करू.
07.12 File वर जाऊन Open वर क्लिक करा.
07.14 Brochure-OUT.svg निवडा.
07.18 आता पहिला, चौथा आणि पाचव्या भागाची रचना करू.
07.22 लक्षात ठेवा वेगवेगळ्या घटकांसाठी वेगळ्या लेयर्सचा वापर करायचा आहे.
07.28 दाखवल्याप्रमाणे Bezier tool वापरून डाव्या वरच्या कोप-यात ग्राफिक इलस्ट्रेशन काढा.
07.33 त्याला निळा रंग द्या आणि stroke काढून टाका.
07.36 तुमच्या फोल्डरमधील सेव्ह केलेला Spoken Tutorial चा लोगो इंपोर्ट करा.
07.40 त्याचा आकार कमी करून ते पहिल्या भागात डाव्या कोप-यात वरती ठेवा.
07.46 “Spoken Tutorial” असे टाईप करून ते लोगोच्या उजव्या बाजूला अलाईन करा.
07.51 फाँटचा आकार 25 करा.
07.54 टेक्स्टच्या खाली एक वर्तुळ काढून त्याला पिवळा रंग द्या.
07.58 'Inkscape' चा लोगो इंपोर्ट करा.
08.00 तो पिवळ्या वर्तुळाच्या वर ठेवा.
08.03 लोगोखाली “Inkscape” टाईप करून त्याच्या फाँटचा आकार 45 ठेवा.
08.09 मी स्पोकन ट्युटरियल प्रोजेक्टची माहिती आणि संबंधित लोगो समाविष्ट केले.
08.15 तुम्हीही असेच करा.
08.17 मी सर्व घटक
08.19 Text and font
08.21 आणि Align and Distribute वापरून अलाईन केले आहेत.
08.24 आता बाहेरच्या बाजूचे ब्रोशर तयार झाले आहे.
08.28 File मेनूखालील
08.29 Save As वर क्लिक करा.
08.31 फॉरमॅट बदलून SVG करा आणि Save क्लिक करा.
08.37 हीच क्रिया पुन्हा करा.
08.39 एक्सटेन्शन बदलून PDF करा.
08.41 Save क्लिक करा.
08.43 आपले ब्रोशर पूर्ण झाले आहे.
08.46 विविध घटकांसाठी वेगवेगळ्या लेयर्स वापरल्यास त्यांचा रंग आणि अपारदर्शकता सोयीनुसार बदलता येतात.
08.54 हेच ब्रोशर मी आणखी दोन रंगसंगतीत तयार केले आहे.
09.00 थोडक्यात,
09.02 पाठात शिकलो:
09.04 * guidelines वापरणे, सेट करणे
09.07 * ‘‘‘3-fold brochure’’’ साठी सेटींग्ज
09.09 * ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना.
09.11 तसेच,
09.12 लेयर्सचे महत्व जाणून घेऊन,
09.14 एकच ब्रोशर विविध रंगसंगतीत मिळवले.
09.18 ही असाईनमेंट करा.
09.20 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी 3-fold brochure बनवा.
09.24 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल.
09.29 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.35 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.42 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.


09.45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09.50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.


09.54 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09.57 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana