Ruby/C3/for-and-each-Looping-Statements/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 08:47, 26 June 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: for-and-each-Looping-Statements

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00.01 रुबीमधील for आणि each लूप्स वरील पाठात स्वागत.
00.05 या पाठात शिकणार आहोत,
00.07 loop” म्हणजे काय?
00.08 रुबीमधील वेगवेगळे लूप्स.
00.11 for” लूपचा वापर,
00.12 each” लूपचा उपयोग.
00.14 येथे वापरणार आहोत,
00.16 उबंटु वर्जन 12.04
00.19 रुबी 1.9.3
00.22 ह्या पाठासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असायला हवे.
00.25 तसेच लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00.30 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.34 आता रुबीमधे “loop” चा उल्लेख कशाच्या संदर्भात होतो ते पाहू.
00.38 loop म्हणजे कमांड किंवा कमांडसचा संच जो ठराविक वेळा कार्यान्वित होतो.
00.44 रुबी मधे खालील प्रमुख लूपिंग स्टेटमेंटस आहेत.
00.47 for
00.48 each
00.49 while
00.49 until
00.50 ह्या पाठात for आणि each लूप्सचा वापर शिकू.
00.55 सुरूवात करण्यापूर्वी तुमच्या होम डिरेक्टरीमधे पुढील फोल्डर्स बनवा.
01.02 ttt, ruby hyphen tutorial, looping hyphen statements.
01.07 येथे दाखवल्याप्रमाणे सब फोल्डर्स बनवा.
01.11 आता आवश्यक फोल्डर्स बनवले आहेत.
01.13 आता पुढे जाऊ.
01.15 रुबीमधील for लूपचा सिंटॅक्स असा आहे:
01.19 for “variable” in “a collection of objects”
01.22 रुबी कोड
01.23 end
01.25 उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
01.28 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
01.32 त्याला “for hyphen loop dot rb” हे नाव द्या.
01.36 मी आधीच “for” लूपचे उदाहरण तयार केले आहे.
01.39 हे उदाहरण समजून घेताना तुम्ही हा कोड टाईप करू शकता.
01.44 ह्या उदाहरणात मी “for” लूप घोषित केले आहे.
01.47 आपल्याकडे 1 ते 20 अंकांचा संच आहे.
01.50 आपण “i” हे व्हेरिएबल “for” लूपमधे घोषित केले आहे.
01.55 “i” हे व्हेरिएबल 1 ते 20च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल.
02.00 for” लूप कमांड 1 ते 20अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
02.07 for” लूपमधे लिहिलेली puts” मेथड आऊटपुट दाखवते .
02.14 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा
02.17 ruby space for hyphen loop dot rb आणि आऊटपुट बघा.
02.22 1 ते 20 अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून दाखवला जाईल .
02.26 ह्या उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी “for” लूप घोषित केलेले आहे.
02.31 ह्यामधे 1 ते 20 मधील सर्व अंक समाविष्ट आहेत.
02.35 पुढे आपण नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी “for” लूप कसे वापरायचे ते पाहू.
02.41 कोडचा पुढील भाग टाईप करा.
02.44 नॉन इनक्लुझिव्ह म्हणजे ऑब्जेक्टसच्या संचातील शेवटचा घटक त्यामधे समाविष्ट नसतो.
02.49 येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी “"for” लूप वापरले आहे.
02.55 तुम्हाला दिसेल की 20 हा अंक आऊटपुटमधे प्रिंट झाला नाही.
02.59 दोन अंकांमधे 3 टिंब दिलेली असल्यास शेवटचा अंक समाविष्ट नसतो.
03.04 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा ruby space for hyphen loop dot rb
03.13 आऊटपुट बघा.
03.17 पुन्हा अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून मिळेल. त्यात 20 ह्या अंकाचा समावेश नसेल.
03.22 आता तुम्हाला “for” लूप लिहीता येईल.
03.27 रुबीमधील “each” लूपचा सिंटॅक्स असा आहे:
03.31 a collection of objects” dot each do item
03.36 रुबी कोड end
03.38 उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
03.42 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
03.46 त्याला each hyphen loop dot rb हे नाव द्या.
03.50 मी each लूपचे उदाहरण आधीच तयार केले आहे.
03.53 हे उदाहरण समजून घेताना तुम्ही हा कोड टाईप करू शकता.
03.58 या उदाहरणात each लूप घोषित केले आहे.
04.03 आपल्याकडे 1 ते 20 अंकांचा संच आहे.
04.06 आपण eachलूपमधे “i” नामक व्हेरिएबल घोषित केले आहे.
04.11 “i” हे व्हेरिएबल 1 ते 20च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल.
04.17 each लूप कमांड 1 ते 20अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
04.23 each लूपमधे लिहिलेली puts मेथड आपल्याला आऊटपुट दाखवते.
04.30 आता टर्मिनल उघडून टाईप करा ruby space each hyphen loop dot rb
04.39 आऊटपुट पहा.
04.43 1 ते 20 अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून मिळेल.
04.46 वरील उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी each लूप घोषित केले आहे.
04.51 ह्यामधे 1 ते 20 मधील सर्व अंक समाविष्ट आहेत.
04.54 पुढे नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी each लूप कसे वापरायचे ते पाहू.
05.00 कोडचा पुढील भाग टाईप करा.
05.04 नॉन इनक्लुझिव्ह म्हणजे ऑब्जेक्टसच्या संचातील शेवटचा घटक त्यामधे समाविष्ट नसतो.
05.10 येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी each लूप वापरले आहे.
05.16 तुम्हाला दिसेल की 20 हा अंक आऊटपुटमधे प्रिंट झाला नाही.
05.20 दोन अंकांमधे 3 टिंब वापरल्यास शेवटचा अंक समाविष्ट होत नाही.
05.25 आता टर्मिनल उघडून टाईप करा ruby space each hyphen loop dot rb
05.34 आऊटपुट पहा.
05.39 आता तुम्ही तुमचे each लूप लिहू शकाल.
05.44 लूपचा कोणता प्रकार निवडायचा हे कसे ठरवता येते?
05.48 for लूपची रचना आठवा.
05.53 पहिल्या उदाहरणात, आपण 1 ते 20 अंकांसाठी for लूप वापरून आयटरेट केले.
05.59 टर्मिनलवर ruby space for hyphen loop dot rb कार्यान्वित करून आऊटपुट बघा.
06.08 gedit मधे कोड बघा.
06.11 जेव्हा for लूप कॉल केले जाते, रुबी प्रत्यक्षात each मेथड कॉल करत असते.
06.16 each किंवा for कॉल केल्याने तोच आऊटपुट मिळतो.
06.21 जर for लूप कॉल केल्याने each लूप कॉल होत असेल तर each लूप वापरणे योग्य ठरते.
06.28 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06.30 थोडक्यात,
06.32 या पाठात शिकलो
06.33 for लूपचा उपयोग
06.35 each रचनेचा उपयोग
06.38 for ऐवजी each च्या वापराचे कारण.
06.41 वरील लूप रचनांचा वापर केलेली उदाहरणे.
06.45 असाईनमेंट.
06.47 योग्य लूपचा वापर करून रुबी प्रोग्रॅम लिहा,
06.50 जो 1 ते 20 अंकातील समसंख्या आऊटपुट म्हणून दाखवेल.
06.56 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07.00 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07.03 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07.11 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.14 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07.23 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.26 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.33 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana