Ruby/C2/Control-Statements/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 07:42, 26 June 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Control-Statements

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00.01 रुबी मधील कंट्रोल स्टेटमेंटस वरील पाठात आपले स्वागत.
00.06 यात शिकणार आहोत,
00.08 if स्टेटमेंट
00.09 elsif स्टेटमेंट
00.11 else आणि
00.12 case स्टेटमेंटस.
00.14 त्यासाठी वापरणार आहोत,
00.15 उबंटु वर्जन 12.04
00.18 रुबी 1.9.3
00.21 या पाठासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असावे.
00.24 तुम्हाला लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00.30 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.34 सुरूवात करण्यापूर्वी, मागे आपण “ttt” नामक डिरेक्टरी बनवली होती.
00.38 त्या डिरेक्टरीवर जाऊ.
00.41 आणि त्यानंतर ruby hyphen tutorial, control hyphen statements
00.47 आता त्या फोल्डरमधे आहोत. पुढे जाऊ.
00.52 रुबीमधे इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे:
00.56 if " कंडिशन"
00.58 रुबी कोड
00.59 end
01.01 त्याचे उदाहरण पाहू.
01.03 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा.
01.08 if hyphen statement dot rb असे नाव द्या.
01.12 माझ्याकडे हे if स्टेटमेंटचे उदाहरण आहे.
01.15 पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता.
01.19 ह्या पाठात if स्टेटमेंट घोषित केले आहे.
01.23 प्रथम my_num हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 2345 ही व्हॅल्यू दिली.
01.31 नंतर if स्टेटमेंट घोषित केले आहे.
01.34 if स्टेटमेंट मधे puts मेथड समाविष्ट केली आहे जी आऊटपुट दाखवेल.
01.39 if स्टेटमेंट my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे का ते तपासेल.
01.43 असेल तर दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवली जाईल.
01.47 टर्मिनलवर जाऊन टाईप करा.
01.51 ruby space if hyphen statement dot rb
01.57 The value of my_num is greater than 0”. असे आऊटपुट दिसेल.
02.02 हे आऊटपुट if कंडिशन true असल्याचे सिध्द करते.
2.07 आता रुबीमधे तुमचे if स्टेटमेंट लिहू शकता.
02.12 पुढे if-else स्टेटमेंट पाहू.
02.16 else वापरण्याचा सिंटॅक्स असा आहे:
02.18 if कंडिशन
02.19 रुबी कोड
02.20 else
02.21 रुबी कोड
02.22 end
02.24 आता उदाहरण पाहू.
02.26 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा.
02.30 त्यालif hyphen else hyphen statement dot rb नाव द्या.
02.37 माझ्याकडे if-else स्टेटमेंटचे उदाहरण आहे .
02.40 पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता.
02.44 ह्या उदाहरणात if-else स्टेटमेंट घोषित केले आहे.
02.48 प्रथम my_num हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्यास -1 ही व्हॅल्यू दिली आहे.
02.55 नंतर if स्टेटमेंट घोषित केले.
02.58 if स्टेटमेंट my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे का ते तपासेल.
03.03 असेल तर दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवली जाईल.
03.06 नसेल तर हे else स्टेटमेंटवर जाईल.
03.10 आणि त्यात दिलेली स्ट्रिंग आपल्याला दाखवेल.
03.13 आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा.
03.18 ruby space if hyphen else hyphen statement dot rb
03.26 आणि आऊटपुट बघा.
03.27 The value of my_num is lesser than 0” आऊटपुट असे दिसेल.
03.32 हे else स्टेटमेंट कार्यान्वित झाल्याचे दाखवत आहे.
03.35 आता तुम्ही if-else स्टेटमेंट रुबीमधे लिहू शकता.
03.41 आता if-elsif स्टेटमेंट पाहू.
03.45 elsifचा सिंटॅक्स असा आहे:
03.48 if कंडिशन रुबी कोड
03.50 elsif कंडिशन रुबी कोड
03.52 else रुबी कोड
03.54 end
03.55 त्याचे उदाहरण पाहू.
03.58 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा.
04.01 त्याला if hyphen elsif hyphen statement dot rb असे नाव द्या.
04.07 माझ्याकडे हे if-elsif- स्टेटमेंटचे उदाहरण आहे.
04.10 पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता.
04.14 ह्या उदाहरणात if-elsif- स्टेटमेंट घोषित केले आहे.
04.19 येथे सुद्धा my_num हे व्हेरिएबल घोषित करून त्याला -1 ही व्हॅल्यू दिली आहे.
04.25 नंतर if स्टेटमेंट घोषित केले आहे.
04.28 हे if स्टेटमेंट my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे का ते तपासेल.
04.32 असल्यास दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवेल.
04.35 हे true नसल्यास ते elsif भागामधे जाईल.
04.39 आता हे my_num ची व्हॅल्यू -1 आहे का ते तपासेल.
04.43 trueअसल्यास येथे दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवेल.
04.46 my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त किंवा -1 नसेल तर ते else वर जाईल.
04.54 पण my_num = -1 असल्यामुळे हे else ब्लॉकवर जाणार नाही.
05.00 आणि हे कंडिशनल स्टेटमेंटमधून बाहेर पडेल.
05.03 आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा
05.07 ruby space if hyphen elsif hyphen statement dot rb
05.15 आणि आऊटपुट बघा.
05.17 The value of my_num is -1 and is lesser than 0” आऊटपुट असे दिसेल .
05.23 आता आपल्या फाईलमधे जाऊन my_num ची व्हॅल्यू 5 करा.
05.29 कोड सेव्ह करून तो टर्मिनलवर कार्यान्वित करा.
05.35 येथे if कंडिशनची पूर्तता झाल्यामुळे तेथील स्ट्रिंग आऊटपुट म्हणून प्रिंट होईल.
05.42 “The value of my_num is greater than 0”
05.45 फाईलमधे जाऊन my_num ची व्हॅल्यू -5 करा.
05.50 कोड सेव्ह करून टर्मिनलवर कार्यान्वित करा.
05.55 येथे else कंडिशनची पूर्तता झाली आणि else ब्लॉक मधील puts स्टेटमेंट कार्यान्वित झाले.
06.03 आता रुबीमधे तुमचे if- elsif स्टेटमेंट बनवू शकता .
06.08 यानंतर आता आपण केस स्टेटमेंट पाहू.
06.12 केस स्टेटमेंट हे एखाद्या विशिष्ट निवडीसाठी कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहे.
06.17 हे स्टेटमेंट समजून घेण्यासाठी case स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू.
06.22 case स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे:
06.24 case व्हेरिएबल
06.26 when "व्हॅल्यू 1"
06.28 रुबी कोड
06.29 when "व्हॅल्यू 2”
06.30 रुबी कोड
06.31 else
06.32 रुबी कोड
06.34 end
06.35 त्याचे उदाहरण पाहू.
06.37 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा.
06.41 case hyphen statement dot rb असे नाव द्या.
06.44 माझ्याकडे हे केस स्टेटमेंटचे उदाहरण आहे.
06.48 पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता.
06.52 ह्या उदाहरणात मी केस स्टेटमेंट घोषित केले आहे.
06.55 येथे हे प्रिंट स्टेटमेंट आहे जे टर्मिनलवर एक प्रश्न प्रिंट करेल.
07.01 नंतर मी gets, कॉल करीन जे standard input मधून एक ओळीचा डेटा स्वीकारेल.
07.09 घेतलेला input data मी new line characters वापरून chomp करीन.
07.15 त्याचा रिझल्ट domain नामक व्हेरिएबलमधे संचित होईल.
07.18 नंतर येथे case स्टेटमेंट घोषित केले आहे.
07.22 त्यामधे when स्टेटमेंट घोषित केले आहे.
07.25 हे येथे दिलेली स्ट्रिंग आणि domainची व्हॅल्यू सारखी आहे का ते तपासेल.
07.30 प्रथम हे domain ची व्हॅल्यू “UP” आहे का ते तपासेल.
07.34 असल्यास “Uttar Pradesh” प्रिंट करेल आणि केस स्टेटमेंट मधून बाहेर पडेल.
07.39 domain जर “UP” नसेल तर त्याची व्हॅल्यूMP” आहे का ते तपासेल.
07.44 असल्यास “Madhya Pradesh” असे प्रिंट करेल आणि हे असे चालू राहिल.
07.48 domain ची व्हॅल्यू जुळेपर्यंत त्याचे तपासणे चालू राहिल.
07.53 असे करताना else स्टेटमेंट आढळल्यास,
07.56 वरील कुठलीही कंडिशन true न झाल्याने,
07.59 elseपुढील रुबी कोड कार्यान्वित करेल.
08.03 आपल्या उदाहरणात हे “Unknown” असे प्रिंट करेल.
08.07 फाईल सेव्ह करा. टर्मिनलवर जाऊन टाईप करा
08.11 ruby space case hyphen statement dot rb.
08.18 टर्मिनलवर असे दिसेल Enter the state you live in:” .
08.22 UP” टाईप करून आऊटपुट बघा.
08.25 Uttar Pradesh” असे आऊटपुट दिसेल .
08.28 पुन्हा त्याच पध्दतीने रुबी फाईल कार्यान्वित करा.
08.31 ह्यावेळी प्रॉम्प्ट वर “KL” टाईप करून आऊटपुट बघा.
08.36 Kerala” असे आऊटपुट दिसेल.
08.38 पुन्हा एकदा फाईल कार्यान्वित करा.
08.41 ह्यावेळी “TN” टाईप करून आऊटपुट बघा.
08.47 Unknown” असे आऊटपुट दिसेल .
08.50 कारण कुठल्याही caseची पूर्तता झाली नाही. त्यामुळे डिफॉल्ट else स्टेटमेंट कार्यान्वित झाले.
08.58 आता रुबीमधे तुमचे case स्टेटेमेंट लिहू शकता.
09.03 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09.07 थोडक्यात.
09.08 पाठात शिकलो,
09.10 if स्टेटमेंट
09.12 elseचा वापर
09.13 if-elsif आणि
09.15 case स्टेटमेंटस
09.17 असाईनमेंट:
09.18 रुबी प्रोग्रॅम लिहा,
09.20 जो युजरला एक नंबर टाईप करण्यास सांगेल.
09.23 नंतर योग्य कंट्रोल-स्टेटमेंट वापरून
09.26 दिलेल्या संख्येचा 2हा अवयव आहे का ते तपासा.
09.29 असल्यास “The number entered is a multiple of 2” असे प्रिंट करा.
09.35 नसल्यास संख्येचा 3हा अवयव आहे का ते तपासा.
09.38 असल्यास “The number entered is a multiple of 3” असे प्रिंट करा.
09.43 नसल्यास 4 हा अवयव आहे का ते तपासा.
09.47 असल्यास “The number entered is a multiple of 4” असे प्रिंट करा.
09.51 नसल्यास “The number is not a multple of 2, 3 or 4” असे प्रिंट करेल.
09.56 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10.00 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.03 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10.07 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10.09 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.13 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.16 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10.21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.26 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.32 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana