STEMI-2017/C2/Introduction-to-Kallows-Device/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search


Time
NARRATION
00:01 नमस्कार. Kallows STEMI Kit वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत-

ECG लीडस्, B.P. cuff आणि SpO2 जोडणे, ECG काढणे, रक्तदाब आणि SpO2 तपासणे.

00:22 या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे Kallow’s STEMI Kit असावे.
00:28 STEMI Kit मधे

मेटल केसिंगमधील अँड्रॉईड टॅब, Mobmon डिव्हाईस 12.0, ब्लू टूथ B.P. मॉनिटर

00:39 ECG इलेक्ट्रोडस्

SPO2 प्रोब, वाय-फाय प्रिंटर, पॉवर स्ट्रीप यांचा समावेश होतो.

00:48 हे Mobmon डिव्हाईस आहे.
00:52 ह्याला डाव्या बाजूला चार्जिंग पोर्टसहित पॉवर बटण आहे.
00:58 आणि मागच्या बाजूला SpO2 आणि ECG ports पोर्टस आहेत.
01:03 केबलचे हे टोक Mobmon डिव्हाईसवरील ECG पोर्टला जोडा.
01:10 जोडणी झाल्यावर त्याच्या दोन्ही बाजूला दिलेल्या स्क्रूच्या सहाय्याने जोडणी नीट झाल्याची खात्री करा.
01:17 आता SpO2 प्रोबबद्दल जाणून घेऊ.
01:21 हा प्रोब पुढील घटकांनी बनला आहे-

Oximetry प्रोब/केबल, सेन्सर

01:29 आता SpO2 प्रोब कसा जोडायचा ते पाहू.
01:34 oximetry प्रोब/केबल Mobmon डिव्हाईसवरील SpO2 कनेक्टरला जोडा.
01:41 जोडणी पूर्ण झाल्यावर हे असे दिसेल.
01:45 रुग्णाचे बोट चित्रात दाखवल्याप्रमाणे सेन्सरच्या अगदी शेवटपर्यंत गेले असले पाहिजे.
01:54 सेन्सर लावण्याची जागा निवडताना तो हात किंवा पाय खालील साधनांना जोडलेला नसावा-

an arterial catheter, blood pressure cuff किंवा intravascular infusion line.

02:09 सामान्यतः oximetry प्रोब जोडणीच्या जागा आहेत-

प्रौढांसाठी किंवा लहान मुलांसाठी- बोट, पायाचे बोट आणि बाह्य कर्ण किंवा कानाची पाळी.

02:23 अर्भकांसाठी- पाऊल किंवा हाताचा तळवा आणि पायाचे मोठे बोट किंवा अंगठा.
02:31 कृपया याची नोंद घ्या- पुन्हा वापरण्याजोगे सेन्सर्स एकाच ठिकाणी चार तासापर्यंत वापरले जाऊ शकतात. त्वचा नीट असल्याची खात्री करण्यासाठी त्या स्थानांची नियमितपणे पाहणी करत रहा.
02:47 ओले किंवा खराब झालेले सेन्सर्स वापरू नका. इलेक्ट्रो सर्जरी दरम्यान किंवा इतर इलेक्ट्रिकल डिव्हाईस लावताना भाजण्याची शक्यता असते.
03:00 SpO2 सेन्सर्सच्या अयोग्य वापरामुळे टिशूचे नुकसान होऊ शकते किंवा भाजू शकते.
03:08 सेन्सरचा उपयोग करताना, त्याची जोडणी करताना, काढताना किंवा संचयन करताना ते अनावश्यकपणे पिळू नका किंवा त्यावर अतिरिक्त जोर लावू नका.
03:20 सेन्सर खूप घट्ट लावला असल्यास किंवा प्रकाश स्त्रोत जसे की, शस्त्रक्रियेदरम्यान वापरला जाणारा दिवा, बिलिरुबीन दिवा किंवा सूर्यप्रकाश यांमधून येणा-या खूप जास्त प्रकाशामुळे हृदयाच्या ठोक्यांचा सिग्नल नष्ट होऊ शकतो.
03:37 आता Blood Pressure cuff ची जोडणी करण्याबद्दल जाणून घेऊ.
03:42 cuff कनेक्टर ब्लूटूथ डिव्हाईस NIBP कनेक्टरला जोडा.
03:49 रुग्णाच्या हात/पाय यांच्या मापानुसार योग्य cuff size निवडा. सामान्यतः cuff ची रुंदी खांद्यापासून कोपरापर्यंत अंतराच्या दोन तृतीयांश असावी.
04:04 चित्रात दाखवल्याप्रमाणे रुग्णाच्या शक्यतो डाव्या हातावर (brachial artery वर) NIBP cuff गुंडाळा.
04:14 योग्य व्यवस्थापनासाठी रुग्णाच्या हातावर NIBP cuff घट्ट गुंडाळणे गरजेचे आहे.
04:21 ब्लूटूथ बीपी मॉनिटर सुरू करण्यासाठी Start बटण दाबा.
04:26 कृपया लक्षात ठेवा: साधनांचा उपयोग अयोग्य पध्दतीने केल्यास चुकीचे मोजमाप मिळू शकते. जसे की,

रुग्णाच्या हातावर cuff खूपच सैल गुंडाळणे , अयोग्य cuff size चा वापर, cuff हृदयाच्या समान पातळीवर न ठेवणे, छिद्र असलेला cuff किंवा ट्युब वापरणे रुग्णाची अति हालचाल

04:52 SpO2 सेन्सर आणि B.P cuff रुग्णाच्या एकाच हातावर लावू नये.

हे उपद्रवी अलार्म टाळण्यासाठी आहे.

05:03 काळजी घ्या की, NIBP मोजताना cuff ची ट्युब मुडपलेली किंवा दाबलेली असू नये.
05:12 शेवटी ECG leads कसे जोडायचे ते पाहू.
05:18 त्वचेची चांगल्याप्रकारे तयारी आणि इलेक्ट्रोडस् योग्य पध्दतीने स्थापित केलेले असल्यास चांगल्या प्रतीचा ECG मिळवता येऊ शकतो.
05:27 रुग्णाची चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी या गोष्टी करणे आवश्यक आहे -

इलेक्ट्रोडचा भाग स्वच्छ करणे आणि छातीवरील केस काढून टाकणे

05:37 त्वचेचा epidermal लेयर काढून टाकण्यासाठी स्पिरीटच्या सहाय्याने हलक्या हाताने स्वच्छ करा. त्वचा फिकट लालसर होईल.

इलेक्ट्रोडचा भाग कोरडा होऊ द्या.

05:50 इलेक्ट्रोडच्या पृष्ठभागावर कोरडे झालेले जेल असल्यास ते काढून टाका. इलेक्ट्रोडस सपाट, स्नायू नसलेल्या आणि केस नसलेल्या भागावर लावा.
06:01 चांगल्या दर्जाचे म्हणजेच अतिशय प्रवाही असे ताजे जेल वापरा.

चांगला संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इलेक्ट्रोडच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात जेल लावा.

06:15 लक्षात ठेवा:

इलेक्ट्रोडस, लीडस आणि केबल्सचे उघडे भाग इतर विद्युत प्रवाह नेणा-या भागांच्या संपर्कात येणार नाहीत याची खात्री करा.

06:27 खराब झालेले electrode leads वापरू नका.
06:31 खात्री करा की, electrodes सैल बसलेले नाहीत. यामुळे कृत्रिम सिग्नल तयार होऊन हार्ट रिदम अलार्म वाजून उपद्रव निर्माण होऊ शकतो.
06:43 पुढील प्रकारे इलेक्ट्रोडस् लावले गेले पाहिजेत.

RA : Right intraclavicular area

LA : Left intraclavicular area

06:56 V1 : sternum च्या उजव्या बाजूच्या कडेला चौथ्या इंटरकोस्टल स्पेसवर

V2 : sternum च्या डाव्या बाजूच्या कडेला चौथ्या इंटरकोस्टल स्पेसवर

07:10 V3 : V2 आणि V4 च्या मधे पाचव्या बरगडीवर

V4: डाव्या midclavicular लाईनवरील पाचवी इंटरकोस्टल स्पेस

07:22 V5: डावीकडील anterior axillary लाईनवरील पाचवी इंटरकोस्टल स्पेस

V6: डावीकडील midaxillary लाईनवरील पाचवी इंटरकोस्टल स्पेस


07:36 RL : inguinal ligament च्या थोडा वरील Right lower abdominal quadrant

LL: inguinal ligament च्या थोडा वरील Left Lower abdominal quadrant

07:53 पॉवर कॉर्ड आणि रुग्णाला लावलेली केबल एकमेकांवरून जाणार नाही याची खात्री करा.
07:59 एका बाजूला असलेले पॉवर ऑन/ऑफचे बटण दाबून Mobmon डिव्हाईस सुरू करा.
08:05 लाईव्ह स्टीम पेजमधील ECG बघण्यासाठी STEMI डिव्हाईसवरील ECG टॅब निवडा.
08:15 थोडक्यात,
08:16 या पाठात आपण शिकलो -

ECG leads, BP cuff आणि SpO2 प्रोब जोडणे. ECG घेणे आणि रक्तदाब व SpO2 तपासणे

08:31 STEMI INDIA

संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे

तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे हे आहे.

08:45 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.

09:00 हा पाठ

STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे. हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya