PHP-and-MySQL/C2/Variables-in-PHP/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 PHP variables वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 प्रथम आपण काही गोष्टी समजून घेऊ या.
00:07 PHP variables हे वापरण्यास अतिशय सोपे असल्यामुळे मला खात्री आहे की ती तुम्हाला सहज समजतील.
00:14 ती declare करणे आवश्यक नसते तसेच ती लिहायला सोपी असतात.
00:18 आपण स्क्रिप्टच्या मधेच व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू समाविष्ट करू शकतो.
00:23 तसेच आवश्यकतेनुसार ही व्हेरिएबल्स आपोआपच आपला data टाईप बदलू शकतात.
00:28 अशा प्रकारे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रूपात ती declare करणे किंवा त्यांना व्हॅल्यू देणे आवश्यक नसते.
00:36 उदाहरणादाखल आपले PHP टॅग्ज बनवून त्यांच्यामध्ये आपले घटक भरू या.
00:41 आता प्रथम dollar चे चिन्ह लिहून मग पुढे आपल्या व्हेरिएबलचे नाव देऊ या.
00:48 नावाची सुरूवात आपण अंकाने म्हणजेच 1 सारख्या आकड्याने ने सुरू करू शकत नाही.
00:53 आपण underscoreकिंवा letter ने सुरूवात करू शकतो.
00:57 underscores, अक्षरे व अंक याशिवाय कुठलीही special characters नावात चालत नाहीत. शिवाय अंकाने सुरूवात होऊ शकत नाही.
01:06 त्यामुळे हे व्यवस्थित चालू शकते.
01:09 आपणnameनामक व्हेरिएबल बनवू या. ज्याची व्हॅल्यू ही double quotes मध्ये असलेली string व्हॅल्यू असेल, जसे आपणecho फंक्शन मध्ये केले होते.
01:21 समजा माझे नाव Alex आहे.
01:23 पुढील ओळीवर dollar चिन्हाच्या सहाय्याने age नामक अजून एक व्हेरिएबल बनवू या. त्याची व्हॅल्यू 19असेल आणि ही व्हॅल्यू double quotes मध्ये असणार नाही.
01:33 याचे कारण असे की हा एक integer आहे.
01:36 तुम्ही याचा उपयोग decimal values साठी देखील करू शकता. येथे 19.5 म्हणजेच साडे एकोणीस देखील असू शकते.
01:43 हे आपोआप decimal मध्ये बदलून घेतले जाते.
01:48 आता आपण केवळ integer वापरणार आहोत. अशाप्रकारे आपल्याकडे nameहे string आणि age हे integer व्हेरिएबल आहे.
01:57 आता echo करून पाहू.
02:00 त्यासाठी echo, व्हेरिएबलचे नाव आणि शेवटी line terminator म्हणून सेमीकोलनची आवश्यकता आहे.
02:06 आता आपली व्हेरिएबल नामक फाईल उघडा.
02:11 Alexअसे echoझाले आहे. कारण आपण येथे echo name असे म्हटले होते.
02:16 आता आपण age echo करून पाहू.
02:19 हे केवळinteger व्हेरिएबल आहे जे आपण येथे echo केले होते.
02:24 अजून एक म्हणजे व्हेरिएबल्स अगदी सोप्या पध्दतीने string मध्ये concatenate करता येतात.
02:30 कदाचितconcatenation हा चुकीचा शब्द असू शकतो. ते आपल्याला string मध्ये सहजपणे समाविष्ट करता येतात.
02:37 जर तुम्हाला concatenation म्हणजे काय हे माहित नसेल तर त्याचा अर्थ एका ओळीत दोन गोष्टी किंवा दोन strings एकमेकांना जोडणे.
02:46 concatenation चे एक उदाहरण बघू या. 'concat', नंतर '.' आणि त्यानंतर 'ination'.
02:56 आता echo केल्यावर concatination असे दिसेल.
02:59 हे करून बघा.
03:03 यावर आधारित संपूर्णपणे वेगळे ट्युटोरियल आहे. त्यामुळे आत्तासाठी echo करताना आपण हे एका व्हेरिएबलच्या रूपात समाविष्ट करण्याची गरज नाही.
03:14 तुम्हाला जर हे समजले नसेल तर काळजी करू नका. हे अतिशय सोपे आहे.
03:18 येथे असे लिहू या "My name is" नंतर name व्हेरिएबल" आणि नंतर " my age is" आणि शेवटी age व्हेरिएबल.
03:24 आता हे सर्व एका stringमध्ये, एका echoमध्ये आहे. आपल्याकडे 'My name is' हे प्लेन टेक्स्ट आहे.
03:32 name व्हेरिएबल कॉल केल्यावर त्याची व्हॅल्यू येथे दिसेल. आणि age व्हेरिएबल कॉल केल्यावर त्याची व्हॅल्यू येथे दिसेल.
03:40 आता रिफ्रेश केल्यावर आपल्याला दिसेल "My name is Alex". हे आपले व्हेरिएबल आहे. " my age is 19" आणि हे आपले व्हेरिएबल आहे.
03:48 अशा प्रकारे हे stringमध्ये समाविष्ट करणे अतिशय सोपे आहे.
03:52 व्हेरिएबलशी संबंधित एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असणे पुरेसे आहे.
03:56 boolean, decimal सारखे व्हेरिएबलचे इतर टाईप्स आहेत. आपण '19.5' हे डेसिमलचे उदाहरण पाहिले होते.
04:06 dollar चिन्हासोबत ही व्हेरिएबल्स सुध्दा डिक्लेयर करता येतात.
04:10 याचा अभ्यास करा आणि नीट समजून घ्या. पुढील ट्युटोरियलमध्ये आपण advanced functionality बद्दल अधिक जाणून घेऊ.
04:19 सहभागाबद्दल धन्यवाद. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana