PHP-and-MySQL/C2/Loops-Foreach-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 स्वागत. FOREACH loop,
00:02 हे शेवटचे लूप आज शिकू या.
00:04 हे मूलत: array च्या व्हॅल्युज सोबत काम करते.
00:10 किंवा array च्या घटकांच्या सहाय्याने लूप करते.
00:13 मागील ट्युटोरियलमध्ये मी arrayच्या घटकांना id tags म्हणतात असे म्हटले होते.
00:21 परंतु त्यांना id tags म्हणत नाहीत.
00:24 जेव्हा आपण arrayची व्हॅल्यू एको करतो तेव्हा,
00:29 येथे हे id आहेत. जसे की numerical id, keys किंवा tags
00:35 त्याबद्दल मी माफी मागते.
00:37 आता आपण FOREACH हा लूप बघू या. त्यासाठी आपण एक array बनवू या.
00:42 नंबर्स व्हेरिएबल बनवू. तो एक array बनवून घेऊ या.
00:47 आपण मागील ट्युटोरियलमध्ये हे पाहिले होते आणि आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे नंबर्स आहेत.
00:58 FOREACH लूप अशा प्रकारे आहे.
01:03 आपल्याकडे FOREACH आहे. आता येथे आपली condition असेल. याला काय म्हणायचे ते आपण नंतर ठरवू.
01:13 येथे आपण आपल्या arrayचे नाव म्हणजेच नंबर असे टाईप करू या.
01:21 मग as आणि व्हॅल्यू टाईप करा. अर्थात येथे कुठलेही नाव देता येते.
01:27 आपण येथे व्हॅल्यू हे नाव टाईप केले आहे.
01:32 मग curly brackets मध्ये आपली मुख्य कमांड म्हणजेच echo व्हॅल्यू असे टाईप करा.
01:40 आपण line break ही कमांड येथे शेवटी concatenate करू शकतो. आता हे कार्यान्वित करू या.
01:46 आपला लूप सर्वात सोप्या पध्दतीने echo झाला आहे. आपण array echo करण्यासाठी इतर लूपही वापरू शकतो परंतु ते manually लिहावे लागतील.
02:00 ह्याद्वारे तुम्ही array चा प्रत्येक घटक echo करणे, त्यावर क्रिया करणे वा तो नवीन arrayत संचित करू शकता.
02:07 त्यात फेरफार कसे करायचे हे आता बघू.
02:12 आता आपण2 चा पाढा बनवणार आहोत.
02:17 त्यासाठी प्रथम हे डिलिट करू या.
02:23 येथे आपल्याला arrayतील प्रत्येक आकड्याची दुप्पट हवी आहे आणि बाहेर ती प्रत्यक्ष व्हॅल्यू लिहायची आहे. म्हणून आपण arrayतील प्रत्येक घटकाला 2ने गुणणार आहोत.
02:39 आता येथे नंबर्स असे टाईप करा.
02:44 माफ करा. येथे व्हॅल्यू असले पाहिजे. कारण FOREACH हे घटक व्हॅल्यू या व्हेरिएबल मध्ये संचित केले होते.
02:54 लूपच्या माध्यमातून ही प्रत्येक व्हॅल्यू एकेक करून येथे येईल.
02:58 म्हणजे व्हॅल्यू times 2 is आणि मग पुढे कंसात व्हॅल्यू times 2 असे टाईप करू या.
03:08 हे arithmetical operator आहेत. याबद्दल पूर्वी बघीतले होते.
03:13 mathematical operator पेक्षा arithmetical operator हे अधिक योग्य नाव आहे.
03:18 आता दोन या आकड्याने गुणले जाईल.
03:22 आता हे अजून मजेशीर बनवण्यासाठी आपण multiple नामक
03:28 नवे व्हेरिएबल बनवू.
03:30 आणि वर multiple हे व्हेरिएबल डिक्लेअर करू.
03:33 याची व्हॅल्यू दोन असेल. मी हे केवळ रिप्लेस केले आहे.
03:38 हे मी मला हवे तसे बदलू शकते.
03:41 आता हे लोड करून रिफ्रेश करा.
03:44 येथे ब्रेक पाहिजे होता.
03:46 येथे शेवटी ब्रेक असे टाईप करू या.
03:49 कारण आपण हा रिझल्ट नीट वाचू शकत नव्हतो.
03:52 माफ करा.1 times 2 is 2
03:54 आता 2 times 2 is 4 अशा प्रकारे 10 times 2 is 20
04:00 हे सर्व बरोबर आहे.
04:02 आपण हे बदलू शकतो. आता समजा आपल्याला 10चा पाढा बनवायचा आहे.
04:08 रिफ्रेश करा. माफ करा. मी येथे दोनच्या जागी multiple असे टाईप करण्यास विसरले होते.
04:18 आता आपण हे echo करून बघू.
04:21 हे रिफ्रेश करा. 1 times 10 is 10, 2 times 10 is 20, अशा प्रकारे आपल्याला मिळाले आहे.
04:28 multiple ची व्हॅल्यू बदलून उदाहरणार्थ 12 करू
04:32 तेव्हा आपल्या रिझल्टमध्ये दोन व्हॅल्यूज बदलतात.
04:36 हे बघा. FOREACH लूप आणि array वापरून आपण एक गुणाकाराचा प्रोग्रॅम बनवला. यामध्ये हवी ती संख्या टाकून तीचा पाढा बनवू शकतो.
04:49 अशा प्रकारे हे FOREACH लूप आहे. धन्यवाद.
04:52 भाषांतर मनाली रानडे, व आवाज---यांनी दिला आहे.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana