PHP-and-MySQL/C2/Arithmatic-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 basic arithmetic operators वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:03 आपण प्रथम बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार बघणार आहोत.
00:09 हे अशा प्रकारे लिहिले जाते. बेरीज, वजाबाकी, गुणाकारासाठी asterisk आणि भागाकारासाठी forward slash
00:17 आपल्याकडे दोन variables असतील.
00:20 आपण num1नामक variable बनवून त्याला 10ही value देऊ. आणि num2या व्हेरिएबलला 2 ही value देऊन ते सेव्ह करू या.
00:30 हे दोन्ही दशांश चिन्ह नसलेले integer numbers आहेत.
00:34 आता समजा आपल्याला num1 आणि num2 यांची बेरीज करायची आहे.
00:40 मग आपण num1 अधिक num2 हे उत्तर echo करू या.
00:44 हे तपासून बघू.
00:47 येथे 12दिसत आहे. num1 आणि num2 म्हणजेच10 and 2यांची बेरीज केल्यावर त्याचे उत्तर 12 येते.
00:55 आता वजाबाकी करून बघू या. आपण येथे केवळ चिन्ह वजाने बदलू.
01:01 Refresh केल्यावर येथे 8 हे उत्तर दिसेल.
01:05 आता गुणाकार करू या. 10 X 2 = 20 आणि आपल्याला 20 हे उत्तर मिळालेले आहे.
01:11 पुढे 10 / 2 म्हणजेच 10 च्या निम्मे = 5.
01:18 आता आपल्याला याच्या शेवटी काही समाविष्ट करायचे असल्यास ते आपण कसे करू शकतो.
01:24 समजा याला num2 ने भागायचे आहे.
01:27 मला असे वाटते की हे operation अशा प्रकारे होईल. येथे num1आणि num2म्हणजे 10 and 2 यांची बेरीज होईल आणि उत्तर 12 मिळेल. 12 ला 2 ने भागले जाईल.
01:39 आता 12 / 2 म्हणजेच आपल्याला 6 उत्तर मिळेल.
01:43 परंतु येथे प्रत्यक्षात काय होते आहे तर num2 / num2 = 1 हे उत्तर मिळाले जे num1 मध्ये मिळवले गेले.
01:56 म्हणजेच आपल्याला 6 ऐवजी 11 हे उत्तर मिळाले.
02:00 याचे कारण असे की भागाकाराची क्रिया बेरजेच्या क्रियेच्या आधी होते. गुणाकाराचेही तसेच असते.
02:10 अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी आपण कंस समाविष्ट करू या.
02:16 कंस कसे कार्य करेल? तर कंसातील क्रिया आधी केली जाईल. नंतर भागाकार केला जाईल जो एखादा integer किंवा variable असू शकतो.
02:29 म्हणजेच येथे num1 + num2 म्हणजेच 10 + 2 = 12 हे उत्तर मिळेल याला 2 ने भागल्यावर आपल्याला 6 हे उत्तर मिळेल.
02:39 त्यासाठी रिफ्रेश करा. आपल्याला योग्य उत्तर मिळाले आहे.
02:43 हे काही basic arithmetic operators आहेत, जे वापरण्यासाठी अगदी सोपे आहेत.
02:48 तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा हे नीट कार्य करते की नाही हे तपासून बघण्यासाठी तुमची आकडेमोड calculator द्वारे तपासून पहा.
02:55 लवकरच आपण अजून अशा प्रकारच्या काही क्रिया बघणार आहोत.
02:58 एकने वाढणा-या increment arithmetic operator बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
03:05 याचा सराव करा आणि तुम्हाला नीट समजले आहे याची खात्री करून घ्या.
03:09 सहभागाबद्दल धन्यवाद. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Sneha