PERL/C3/Downloading-CPAN-module/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Downloading CPAN modules वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत आवश्यक CPAN modules Ubuntu Linux Operating System आणि Windows Operating System वर कसे डाउनलोड करणे.
00:17 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज 7, पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर
00:32 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:36 हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यास, तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:41 नसल्यास संबंधित पर्ल ट्यूटोरियल्ससाठी स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईट वर जा.
00:48 प्रथम, आपण शिकू की Ubuntu Linux OS मध्ये CPAN modules कसे डाउनलोड करणे.
00:55 टर्मिनल वर जाऊ.
00:57 टाइप करा sudo space cpan आणि एंटर दाबा. गरज असल्यास पासवर्ड टाइप करा.
01:06 जर cpan तुमच्या सिस्टम वर इनस्टॉल नसेल तर, तुम्हाला इन्स्टलेशन प्रक्रीयेसाठी प्रॉंप्ट करेल.
01:13 कृपया स्टेप्स सह पुढे जा. इन्स्टलेशन प्रक्रीये साठी तुमचे कंप्यूटर इंटरनेटशी जुडलेले असावेत.
01:21 आपण पाहु शकतो की प्रॉंप्ट cpan शी बदलला आहे.
01:26 उदाहरण साठी, मला CSV फाइल मधून काही डेटा एक्सट्रॅक्ट करून पर्ल प्रोग्रॅम मध्ये वापरायचे आहे.
01:35 ह्या साठी, आपण Text colon colon CSV मॉड्यूल वापरुया.
01:40 वापरण्याधी, आपल्याला Text colon colon CSV मॉड्यूल इनस्टॉल करावे लागेल.
01:46 टर्मिनल वर जाऊ.
01:48 टाइप करा: install Text colon colon CSV आणि एंटर दाबा.
01:55 आपण ह्या मॉड्यूलचे संबंधित पॅकेजसचे इन्स्टलेशन पाहु शकतो.
02:00 इन्स्टलेशन तुमच्या इंटरनेटच्या गतीवर अवलंबून काही वेळ घेईल.
02:06 आता, तपासू की मॉड्यूल यशस्वीरित्या इनस्टॉल झाले आहे की नाही.
02:12 cpan मधून बाहेर पाडण्यास 'q' की दाबा.
02:16 टाइप करा: "instmodsh" आणि एंटर दाबा.
02:23 सर्व मॉड्यूल इनस्टॉल करण्यास टाइप करा 'l'.
02:28 येथे, आपण Text colon colon CSV पाहु शकतो हे दाखवते की मॉड्यूल आपल्या सिस्टम वर इनस्टॉल झाले आहे.
02:38 बाहेर पाडण्यास टाइप करा 'q'.
02:41 आता, मी आधीपासून सेव केलेले candidates.csv उघडेल.
02:47 टाइप करा: gedit candidates.csv आणि एंटर दाबा.
02:53 येथे, आपण कॉमा विभाजक सह कॅन्डिडेट्सचे नेम, येज, जेंडर आणि इमेलचे तपशील पाहू शकतो.
03:02 आता मी csvtest.pl फाइल उघडेल ज्याच्यात मी एक पर्ल प्रोग्राम लिहिले आहे जो हा प्रोग्राम वापरतो.
03:11 हा प्रोग्राम name field वॅल्यू extract करेल जे csv फाइल मध्ये संग्रहित आहेत.
03:18 use स्टेट्मेंट Text colon colon CSV मॉड्यूल लोड करते.
03:23 मी लोकल वेरियबल dollar file वर "candidates.csv" फाइल डिक्लेर केले आहे.
03:29 पुढचे स्टेट्मेंट फाइलला READ मोड मध्ये उघडेल.
03:34 Text colon colon CSV हे class आहे आणि आपण new सह constructor ला कॉल करून एक instance तयार करू शकतो.
03:42 ही लाइन एक object सेट्टिंग तयार करते जे विभाजक कॅरक्टर कॉमा (,) आहे.
03:48 येथे, "while" loop "getline()" method वापरून लाइन बाय लाइन डेटा फेच करतो.
03:54 "getline" method एक array वर reference रिटर्न करतो.
03:58 आपल्याला वॅल्यू मिळण्यासाठी dereference करावे लागेल.
04:02 Index of zero हे csv फाइल मध्ये name field दर्शवतो.
04:07 Print स्टेट्मेंट csv फाइल मधून नेमसना प्रिंट करते.
04:11 आता, फाइल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
04:15 प्रोग्राम कार्यान्वित करू.
04:18 टर्मिनल वर परत जाऊन टाइप करा: perl csvtest.pl आणि एंटर दाबा.
04:27 येथे, आपण आउटपुट म्हणून नेम फील्ड पाहु शकतो.
04:32 पुढे, आपण पाहु की Windows Operating System मध्ये आवश्यक CPAN कसे डाउनलोड करणे.
04:39 जेव्हा पेर्ल इनस्टॉल केले जाते तेव्हा PPM म्हणजे Perl Package Module नामक एक उपयुक्तता आपोआप इनस्टॉल होऊन जाते.
04:48 PPM वापरण्यास, तुमचे कंप्यूटर इंटरनेटशी जूडलेले असावे.
04:53 ही उपयुक्तता Windows Operating System वर आवश्यक करण्यासाठी वापरले जाऊ शकते:मॉड्यूल शोधण्यास , इनस्टॉल करण्यास, काढण्यास, अपग्रेड करण्यास.
05:04 आता, Windows OS मध्ये कमांड विंडो उघडू.
05:09 command window उघडण्यासाठी, Start वर क्‍लिक करून टाइप करा "cmd" आणि एंटर दाबा.
05:17 तुमच्या विंडोज ओएस मशीनवर पर्ल इनस्टॉल झाले की नाही हे तपासण्यास टाइप करा: perl hyphen v
05:25 तुम्ही तुमच्या मशीन वर पर्ल वर्जन नंबर पाहु शकता.
05:30 जर पर्ल इनस्टॉल नाही झाले तर Perl Installation ट्यूटोरियल साठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.
05:36 हे तुम्हाला सांगेल की Windows OS वर पर्ल इनस्टॉल कसे करायचे.
05:41 “DOS” प्रॉंप्ट वर टाइप करा: ppm install Text colon colon CSV आणि एंटर दाबा.
05:49 कृपया लक्षात ठेवा, मॉड्यूल नेम केस सेन्सेटिव्ह असतात.
05:53 आपण पाहु शकतो की इन्स्टलेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. इन्स्टलेशन पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा.
06:00 मी वर्तमान कार्यरत डाइरेक्टरी वर candidates.csv आणि csvtest.pl फाइल कॉपी केली आहे.
06:08 आता पर्ल प्रोग्राम execute करू.
06:11 command window मध्ये, टाइप करा: perl csvtest.pl आणि एंटर दाबा.
06:18 येथे आउटपुट आहे.
06:21 आपण ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
06:26 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकलो आवश्यक CPAN modules Linux आणि Windows वर कसे डाउनलोड करणे.
06:34 येथे तुमच्या साठी असाइनमेंट आहे.Date colon colon Calc मॉड्यूल इनस्टॉल करण्याचे प्रयत्न करा. मॉड्यूल शोधण्यासाठी दिलेल्या वेबसाइटचे वापर करा.
06:47 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
06:54 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
07:03 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
07:06 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:18 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana