OpenModelica/C2/Developing-an-equation-based-model/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Developing an equation based model वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत OMEdit मधील textual मॉडल कसे तयार करावे आणि ते सिम्युलेट कसे करावे?
00:14 व्हेरिएबल्स आणि इक्वेशन्स कसे घोषित करायचे.
00:17 Simulation Setup टूलबॉक्स कसा वापरावा.
00:21 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2 आणि उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम 14.04 वापरत आहे.
00:32 परंतु, ही प्रोसेस Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE मध्ये समान आहे.
00:40 हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी, आपल्याला फिजिकल सिस्टम्सच्या इक्वेशन-आधारित मॉडेलिंग माहित असणे आवश्यक आहे.
00:48 आपण वस्तुमान m च्या बॉलची गती सिम्युलेट करू. जे free fall due to gravity अंतर्गत आहे.
00:54 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बॉलची उंची व्हेरिएबल h द्वारे दर्शविली जाते.
00:59 बॉलची गती व्हेरिएबल v द्वारे दर्शविली जाते.
01:04 Acceleration due to gravity हा g द्वारे दर्शविला जातो आणि तो स्थिर मानला जातो.
01:10 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर केलेल्या व्हेरिएबल्सना सकारात्मक मानले जाते.
01:16 मुक्तपणे खाली येण्याऱ्या बॉडीसाठी equations of motion खालीलप्रमाणे आहेत: dh/dt = v , dv/dt = g
01:27 t = 0 वेळी h ची वॅल्यू 30 m आहे आणि t = 0 वेळी v ची वॅल्यू 0 आहे.
01:37 आता मी OMEdit वर जाते. मी ते आधीच माझ्या सिस्टमवर सुरू केले आहे.
01:43 उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर OMEdit उघडण्यासाठी, Dash Home आयकॉनवर क्लिक करा, जे launcher मध्ये डावीकडे सर्वात वर प्रदर्शित होते.
01:53 search bar मध्ये OMEdit टाईप करा.
01:56 OMEdit आयकॉनवर क्लिक करा.
01:59 OMEdit आयकॉनवर क्लिक केल्यास आपण अशी एक विंडो पाहाल.
02:06 ही विंडो Welcome perspective म्हणून ओळखली जाते.
02:09 OMEdit डीफॉल्टपणे Welcome perspective मध्ये उघडते.
02:14 तळाशी उजव्या कोपऱ्यात, Welcome, Modeling आणि Plotting perspectives साठी बटण्स पाहू शकता.
02:23 Modeling perspective वर क्लिक करा.
02:26 Modeling perspective आता उघडले आहे.
02:29 मी modeling area च्या रूपात डाव्या बाजूला Libraries Browser, खाली Messages Browser आणि शीर्षावर Toolbar दरम्यान क्षेत्राचा संदर्भ घेत आहे.
02:41 toolbar मध्ये file operations, graphical view आणि simulation शी संबंधित बटन्स आहेत.
02:51 जसे आपण पुढे जाऊ, आपण ह्या बटण्सबद्दल अधिक जाणून घेऊ.
02:55 आता, आपण आपल्या स्पोकन ट्युटोरिअल वेबपेजवर Code Files लिंकमध्ये उपलब्ध freeFall class फाईल वापरू.
03:02 कृपया ही फाईल डाऊनलोड करून आपल्या सिस्टमवर सेव्ह करा.
03:07 हा classउघडण्यासाठी, Menu bar मध्ये File मेनूवर जा.
03:13 Open Model/Library File वर क्लिक करा.
03:17 आपण डाऊनलोड केलेली आणि आपल्या सिस्टमवर सेव्ह केलेली freeFall शोधा आणि ती उघडा.
03:24 आपण फाईल उघडण्यासाठी Open Model/Library File नावाचे टूलदेखील वापरू शकता, ज्यास माझे कर्सर निर्देशित करत आहे.
03:34 लक्षात ठेवा की freeFall आयकॉन Libraries Browser मध्ये प्रदर्शित होते.
03:39 Libraries Browser सर्व classes दर्शविते, जे OMEdit च्या सेशनमध्ये लोड केले गेले आहेत.
03:45 freeFall आयकॉन वर राईट-क्लिक करा आणि View Class निवडा.
03:52 class आता Diagram व्ह्यूमध्ये उघडला आहे.
03:56 Diagram व्ह्यूमध्ये class उघडत नसेल तर काळजी करू नका.
04:00 मी आपल्याला वेगवेगळ्या व्ह्यूजमध्ये कसे जायचे ते दाखवेन.
04:04 Modeling area च्या शीर्षस्थानी जा.
04:07 लक्षात घ्या की दुसरे बटण Diagram view साठी आहे.
04:10 तिसरे बटण Text View आहे.
04:13 Text View वर जाण्यासाठी त्यावर क्लिक करा.
04:17 class आता Text view मध्ये उघडला आहे.
04:20 लक्षात घ्या की पहिले बटण Icon View साठी आहे.
04:24 आपण Icon view आणि Diagram view विषयी नंतर अधिक जाणून घेऊ.
04:29 आपण freeFall नावाचा एक नवीन class देखील तयार करू शकता आणि आवश्यक माहिती टाईप करू शकता.
04:36 नवीन class तयार करण्यासाठी, File मेनूवर जा.
04:40 New Modelica Class निवडा.
04:43 दाखविल्याप्रमाणे एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो.
04:46 ह्या डायलॉग बॉक्सच्या Name फील्डमध्ये, freeFall टाईप करा.
04:51 मी वेगळे नाव वापरत आहे freeFall1 कारण freeFall class आधीपासूनच OMEdit मध्ये उघडली आहे.
04:58 लक्षात घ्या की दोन क्लासेसना एकच नाव असू शकत नाही.
05:03 Specialization ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा. Class निवडा. Ok वर क्लिक करा.
05:10 एक नवीन class तयार करण्यात आला आहे.
05:13 आपण नवीन क्लास उघडण्यासाठी, New Modelica class नावाचे टूलदेखील वापरू शकता.
05:20 मी annotation section डिलीट करते.
05:23 आता, आपण येथे आवश्यक माहिती टाईप करू शकता आणि हा class सेव्ह करा.
05:29 हा class सेव्ह करण्यासाठी, मेन्यू बारमधील File मेनूवर जा आणि Save वर क्लिक करा.
05:36 ह्या फाईलसाठी योग्य स्थान निवडा आणि ती सेव्ह करा.
05:41 आता freeFall class वापरून Modelica चे सिंटॅक्स समजून घेऊ.
05:47 तर freeFall class वर जा.
05:49 Modelling area च्या शीर्षस्थानी जा. freeFall टॅबवर क्लिक करा.
05:54 Modelica मधील प्रोग्रॅम्स classes च्या स्वरूपात व्यवस्थित केले आहे.
05:58 class ची पहिली ओळ त्याचे नाव परिभाषित करते.
06:02 ह्या क्लासचे नाव freeFall आहे.
06:05 क्लास कोठे समाप्त होतो हे दर्शविण्यासाठी प्रत्येक क्लासमध्ये end statement असणे आवश्यक आहे.
06:11 ह्या क्लासमध्ये variable declarations आणि equations आहेत.
06:15 मी आपल्याला दाखवते की variables कसे घोषित करायचे.
06:18 Real हे data-type प्रदर्शित करते.
06:21 h हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बॉलची उंची दर्शवते.
06:25 start हे Real variable चे वैशिष्ट्य आहे.
06:29 प्रत्येक data-type कडे विशिष्ट गुणधर्म आहेत, जे व्हेरिएबल्सशी संबंधित उपयुक्त माहिती निर्दिष्ट करतात.
06:36 start चे वैशिष्ट्य व्हेरिएबलची प्रारंभिक वॅल्यू निर्दिष्ट करते.
06:41 h ची प्रारंभिक वॅल्यू 30 युनिट्स आहे.
06:45 unit attribute व्हेरिएबलचे युनिट निर्दिष्ट करते.
06:49 h चे युनिट metre आहे.
06:52 प्रत्येक variable declaration सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
06:57 v हे बॉलची गती दर्शवते. हा Real data-type आहे.
07:02 v ची प्रारंभिक वॅल्यू शून्य आहे. त्याचे युनिट meter per second आहे.
07:09 g हा acceleration due to gravity प्रदर्शित करतो. हा Real data-type आहे. आणि त्याचे युनिट meter per second square आहे.
07:18 parameter हे असे प्रमाण आहे जे सिम्युलेशन मध्ये स्थिर असते.
07:24 9.81 च्या वॅल्यूसह, g ची वॅल्यू संपूर्ण सिम्युलेशनच्या वेळी स्थिर राहते.
07:32 नेगेटिव्ह चिन्ह हे साईन कन्वेंशनच्या वापरामुळे आहे.
07:36 दुहेरी अवतरणातील टेक्स्ट g च्या घोषणेसह लिहिलेले एक comment आहे.
07:42 Comments प्रोग्रामबद्दल उपयुक्त माहिती पुरवतात. ते डॉक्युमेंटेशनसाठी सुद्धा उपयुक्त आहेत.
07:49 आता मी स्लाईड्सवर परत जाते.
07:52 parameter हे असे प्रमाण आहे जे सिम्युलेशनच्या वेळी स्थिर राहते.
07:57 Real, Integer, Boolean आणि String data-types हे Modelica मध्ये समर्थित आहेत.
08:03 start आणि unit attributes आधीच परिभाषित केल्या गेल्या आहेत.
08:07 min attribute एका व्हेरिएबलच्या किमान वॅल्यू निर्दिष्ट करते.
08:10 त्याचप्रमाणे, max attribute हे व्हेरिएबलची कमाल वॅल्यू निर्दिष्ट करते.
08:16 मी OMEdit वर परत जाते.
08:19 ‘equation’ हे क्लासच्या equation section च्या सुरूवातीस चिन्हांकित करते.
08:25 comments प्रविष्ट करण्याचा हा एक वैकल्पिक मार्ग आहे.
08:30 freely falling बॉडीसाठी दोन equations of motion चा इथे समावेश करण्यात आला आहे. जसे आपण आधीच चर्चिले आहे,
08:38 der() हे time derivative साठी Modelica function आहे.
08:43 म्हणून, der(h) हे dh/dt. चे प्रतिनिधित्व करतो.
08:48 आणि der(v) हे dh/dt. चे प्रतिनिधित्व करतो.
08:52 प्रत्येक equation सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
08:57 हा class सिम्युलेट कसा करायचा ते मी तुम्हांला दाखवते.
09:00 टूलबारमध्ये simulate बटणावर क्लिक करा.
09:04 पॉप-अप विंडो बंद करा.
09:07 ही विंडो Plotting perspective म्हणून ओळखली जाते.
09:11 क्लासचे यशस्वी सिम्युलेशन केल्यावर, Plotting perspective स्वयंचलितरित्या उघडते.
09:17 Variables browser क्लासच्या variables आणि parameters शी संबंधित माहिती दर्शविते.
09:24 लक्षात घ्या की तिथे Unit आणि Description नावाचे कॉलम्स आहेत.
09:29 Unit कॉलम व्हेरिएबल्सचे युनिट्स निर्दिष्ट करते, जसे Unit गुणधर्म वापरून परिभाषित केले गेले आहे.
09:37 Description कॉलम variable declarations सह डबल कोट्समध्ये लिहिलेले कमेंट्स प्रदर्शित करते.
09:45 मी आपल्याला plot कसे तयार करायचे हे दाखविते. h निवडा.
09:51 हे y एक्सिसवर h आणि x एक्सिसवर time सह टाईमच्या संदर्भात h चे प्लॉट तयार करते.
10:01 डीफॉल्टपणे, सिम्युलेशन टाईमच्या 0 ते 1 युनिटपर्यंत रन केले जाते.
10:07 time ही युनिट इतर व्हेरिएबल्ससाठी वापरलेल्या units च्या सिस्टमवर अवलंबून असते.
10:13 मी h डी-सिलेक्ट करते.
10:17 आवश्यक ते प्लॉट्स तयार झाल्यानंतर नेहमी रिझल्ट डिलीट करणे हा चांगला सराव असतो.
10:25 हे रिझल्ट डिलीट करण्यासाठी, freeFall वर राईट-क्लिक करा आणि Delete result निवडा.
10:33 रिझल्ट आता डिलीट झाला आहे.
10:36 मी Modeling perspective वर परत जाते.
10:39 उजवीकडे खाली असलेल्या Modeling बटणावर क्लिक करा.
10:43 Modelica मध्ये क्लास मॉडेलसह समानार्थीपणे वापरले जाते.
10:48 तोच प्रभाव निर्माण करण्यासाठी, येथे class ऐवजी model वापरू शकता.
10:54 आता मी आपल्याला दाखवते की सिम्युलेशनसाठी time interval कसा बदलावा.
11:01 टूलबारमध्ये असलेल्या Simulation Setup बटणावर क्लिक करा.
11:06 General टॅबमध्ये, Stop time फील्ड शोधा. तो 5 युनिट्समध्ये बदला.
11:14 Simulate वर क्लिक करा. प्रदर्शित झालेला पॉप-अप विंडो बंद करा.
11:21 मी Variables browser मध्ये पुन्हा एकदा h निवडते.
11:26 हे h v/s time प्लॉट बनवते.
11:29 लक्षात घ्या की टाईम इन्टर्वल 5 युनिट्समध्ये वाढला आहे.
11:33 परंतु, h ची वॅल्यू शून्याने खाली गेली आहे, जे अस्वीकार्य आहे.
11:40 आपण ह्या समस्या नंतरच्या ट्युटोरिअलमध्ये कसे सुधारित करावे ते शिकू.
11:45 मी freeFall वर राईट-क्लिक करून हा रिझल्ट डिलीट करते आणि Delete result निवडते.
11:53 तळाशी उजवीकडे Modeling perspective वर क्लिक करून Modeling perspective वर परत जा.
11:59 इक्वेशनची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येएवढी आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
12:07 ह्या class चे दोन वेरिएबल्स आणि दोन इक्वेशन्स आहेत.
12:11 आता, मी पहिले equation डिलीट करते आणि काय होते ते पाहण्यासाठी, हा क्लास सिम्युलेट करते.
12:18 मी पहिले equation डिलीट केले आहे.
12:21 लक्षात घ्या की freeFall टॅबमध्ये class च्या नावाच्या बाजून एक स्टार दिसतो.
12:28 हे क्लासमधील सेव्ह न केलेले बदल दर्शविते.
12:31 त्यामुळे बदल केल्यानंतर, क्लास सेव्ह करण्याचा हा चांगला सराव आहे.
12:38 हा क्लास सेव्ह करण्यासाठी, File menu वर जा आणि Save वर क्लिक करा.
12:44 आपण फाईल सेव्ह करण्यासाठी टूलबारमधील Save बटणदेखील वापरू शकता, ज्याला माझा कर्सर निर्देशित करतो.
12:53 मी आता Simulate बटणावर क्लिक करून हा क्लास सिम्युलेट करते.
12:59 लक्षात घ्या की Messages browser मध्ये एक एरर मेसेज पॉप अप होतो.
13:04 ते म्हणते, खूप कमी इक्वेशन्स आहेत आणि मॉडेलमध्ये 1 equation आणि 2 variables आहेत. म्हणून हे सिम्युलेट केले जाऊ शकत नाही.
13:14 मी equation त्याच्या जागी परत टाकते आणि टूलबारमध्ये Save बटणावर क्लिक करते.
13:24 क्लास सिम्युलेट करण्यासाठी पुन्हा एकदा Simulate बटणावर क्लिक करा.
13:29 लक्षात घ्या की, क्लास यशस्वीपणे सिम्युलेट झाला कारण इक्वेशन्सची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी आहे.
13:37 पॉप-अप विंडो बंद करा.
13:40 मी स्लाईड्सवर परत जाते.
13:43 der() हे time derivative साठी मॉडेलिका फंक्शन आहे.
13:48 येथे equations साठी कोणताही डेटा फ्लो दिशा नाही आहे.
13:52 उदाहरणार्थ, der(h) = v हे v = der(h) असे लिहिले जाऊ शकते.
14:00 Initial equations section प्रारंभिक कंडीशन्स प्रविष्ट करण्यासाठी वापरले जाते.
14:05 आपण Initial equation बद्दल नंतर अधिक जाणून घेऊ.
14:10 एक असाइनमेंट म्हणून, differential equation dx/dt = -a into x सिम्युलेट करण्यासाठी एक model लिहा, जिथे a = 1, x हे R शी संबंधित आहे आणि टाईम t=0 वर x ची वॅल्यू 5 आहे.
14:28 ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
14:31 खालील लिंकवरील व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट सारांशित करतो.
14:37 आम्ही स्पोकन ट्यूटोरिअलच्या साहाय्याने कार्यशाळा आयोजित करतो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
14:43 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला, NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
14:49 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
14:53 हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana