LibreOffice-Suite-Base/C2/Enter-and-update-data-in-a-form/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 LibreOffice Base च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
00:09 form मध्ये data, Enter आणि update करणे.
00:12 मागील ट्युटोरियलमध्ये आपण form मध्ये form controls कसे समाविष्ट करायचे ते शिकलो.
00:19 या ट्युटोरियलमध्ये formच्या सहाय्याने data, Enter आणि update कसा करायचा ते शिकू या.
00:27 ते करण्यापूर्वी आपल्या formच्या डिझाईनमध्ये अजून केवळ तीन बदल करणे आवश्यक आहेत.
00:36 LibreOffice Base हा प्रोग्रॅम चालू नसल्यास तो प्रथम सुरू करा.
00:51 आणि आपला Library databaseउघडा.
00:54 त्यासाठी File मेनू मधील Open वर क्लिक करा.
00:58 आता आपण Library database मध्ये आहोत.
01:02 आणि आपण Books Issued to Members हा form उघडू या.
01:07 त्यासाठी डावीकडील पॅनेलमधील Forms च्या आयकॉनवर क्लिक करा आणि नंतर उजव्या बाजूच्या पॅनेलमधील Books Issued to Membersवर राईट क्लिक करा.
01:20 आणि मग Edit वर क्लिक करा.
01:24 आता आपण form design window मध्ये आहोत.
01:28 प्रथम form चा आकार आपल्याला आवडेल असा योग्य तो करून घेऊ.
01:36 त्यासाठी आपण आपल्या form window ची लांबी आणि उंची कमी करू या.
01:43 form window च्या बाजू क्लिक करून ड्रॅग व ड्रॉप या पध्दतीचा वापर करू.
01:51 नंतर आपण form च्या हेडिंगचा font बदलू या.
01:57 वरील Formatting toolbar मधून font बदलून तो Arial Black आणि आकार बदलून तो 12 करा.
02:12 शेवटी form controls च्या Tab Order कडे लक्ष द्या.
02:19 यामुळे आपल्याला form controls मध्ये, कीबोर्डवरील टॅब बटणाचा वापर करून navigate करता येते.
02:29 उदाहरणार्थ वरपासून खालपर्यंत.
02:33 याला tab order असे म्हणतात.
02:37 बेस tab order वरपासून खालपर्यंत अशी सेट करतो.
02:47 परंतु आपण काही text boxes काढल्या असल्यामुळे, तसेच दोन नवीन list boxes आणि चार बटणे टाकली असल्यामुळे tab order चुकली असण्याची शक्यता आहे.
03:00 मग आपण ती आत्ताच सेट करू या.
03:05 सामान्यतः विंडोच्या तळाशी असलेल्या Form Design toolbar मध्ये पहा व
03:16 Activation order अशी tooltip असणारा आयकॉन शोधा.
03:25 त्या आयकॉनवर क्लिक करा.
03:29 आता आपल्याला Tab Order असे शीर्षक असलेली छोटी popup window दिसेल.
03:38 या form controls चा योग्य क्रम ठरवण्यासाठी आपण items वर क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतो.
03:46 किंवा आपण Move upकिंवा Move down या बटणांचा वापर करू शकतो.
03:52 मग येथे दर्शवलेल्या image प्रमाणे Tab Order सेट करा. <pause>
04:04 आपले हे करून झाले की हे बदल सेव्ह करण्यासाठी Ok बटणावर क्लिक करा.
04:12 आता आपला form सेव्ह करण्यासाठी Control आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
04:19 आणि मग आपली form विंडो बंद करू या.
04:24 अशा प्रकारे आपले Form design चे काम पूर्ण झाले आहे.
04:29 आता आपण आपला Form तपासून पाहू.
04:33 मुख्य बेस विंडोतील Books Issued to Members ह्या Formवर डबल क्लिक करून तो उघडू या.
04:42 आता हा Form, data भरण्यासाठी उघडला आहे.
04:47 Form to track Books issued to Members या हेडिंगकडे लक्ष द्या.
04:54 आणि येथे bookIds आणि memberIds ऐवजी आपल्याला book titles आणि member names दिसत आहेत.
05:03 तसेच हे BooksIssued या Tableचे पहिले record आहे. book title च्या समोरील An Autobiography हायलाईट झालेले दिसेल.
05:15 आणि Member name समोरील Nisha Sharma हायलाईट झालेले आहे.
05:21 तसेच आपण उर्वरित fields ही बघू शकतो.
05:25 Formच्या तळाशी असलेल्या Navigation toolbar icons चा वापर करून आपण सर्व recordsमध्ये फिरू शकतो. <pause>
05:45 आता आपण दुस-या record वर जाऊ या.
05:49 येथे आपल्याला दिसेल की Jacob Robin यांनी Macbeth हे पुस्तक घेतले आहे. आणि आपण असे समजू या की ते आता ते पुस्तक परत करत आहेत.
06:01 मग आता या record मध्ये ही माहिती update करू या.
06:07 उदाहरणार्थ त्यासाठी आपण actual return date, 7/7/11 असे टाईप करा,
06:17 आणि Checked In हे field तपासा.
06:21 ही माहिती सेव्ह करण्यासाठी आपण समाविष्ट केलेले Save Record हे बटण दाबणार आहोत.
06:30 आपल्याला दिसेल की हे बटण आता greyed out झाले आहे. म्हणजेच ते आता आपल्याला वापरता येणार नाही.
06:38 पण जर आपण या record मध्ये परत बदल केला तर ते बटण पुन्हा वापरण्यास योग्य होईल.
06:45 आता आपण Undo changes हे बटण तपासून पाहू.
06:50 त्यासाठी Conquest of Self' असे book title असलेल्या record वर क्लिक करा आणि नंतर Actual Return Date या field मध्ये 5/7/11 असे टाईप करून त्यात बदल करा.
07:06 Save record आणि Undo changesही दोन्ही बटणे enable झालेली दिसतील.
07:15 आता Undo changes या बटणावर क्लिक करू. काय झाले ते बघा.
07:22 आपण केलेले बदल जाऊन आता ते पूर्वीसारखे झाले आहे. आपल्याला दिसेल की Conquest of Self ऐवजी Macbeth हायलाईट झाले असून त्याची Actual return date 7/7/11 आहे.
07:37 आता आपण Delete Record या बटणावर क्लिक करू या. म्हणजेच हे दुसरे record डिलिट करण्याचा प्रयत्न करू या.
07:47 बेस हे डिलिट करण्याबाबत सावधगिरी बाळगत असल्यामुळे ते आपल्याला सूचना म्हणून त्याबद्दल परवानगी विचारते.
07:55 आत्तासाठी Yes हे बटण दाबून पुढे जाऊ या.
08:02 आपल्याला दिसेल की record खरेच डिलिट झाले असून ते स्क्रीनवर दिसत नाही. त्याऐवजी आपल्याला पुढील record दिसत आहे.
08:13 शेवटी नवीन record समाविष्ट करण्यासाठी form वरील शेवटचे बटण म्हणजेच New record या बटणावर क्लिक करा.
08:22 आपण येथे काही values टाईप करू या.
08:26 IssueId हे auto generating field असल्यामुळे आपण ते सोडून देऊ.
08:33 आणि image मध्ये दर्शवल्याप्रमाणे आपण येथे data समाविष्ट करू या. <pause>
08:42 या entriesसेव्ह करण्यासाठी Save Record या बटणावर क्लिक करा.
08:47 आता हे Save झाले आहे. अशा प्रकारे आपण data, enter आणि update करून form तपासून बघितला आहे.
08:54 आता assignment करू या. members ची माहिती दर्शवणारा form Design करा.
09:00 form योग्य आकाराचा बनवा.
09:03 font bold करा.
09:07 Save आणि New record ही बटणे समाविष्ट करा.
09:10 अशा प्रकारे आपण Base मधील Form Data वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:17 आपण काय शिकलो ते थोडक्यात.
09:20 Form मध्ये Data, Enter आणि update करणे.
09:23 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
09:34 सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
09:44 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Sneha