LibreOffice-Suite-Base/C2/Create-queries-using-Design-View/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Create Queries using Design View

Author: Manali Ranade

Keywords: Base


Time Narration
00:00 बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत.
00:06 Design View च्या सहाय्याने query बनवणे.
00:10 Query Design विंडोच्या सहाय्याने टेबल समाविष्ट करणे.
00:13 फिल्ड सिलेक्ट करणे. aliases आणि सॉर्टिंगचा क्रम ठरवणे. तसेच queryद्वारे माहिती शोधण्यासाठी निकष प्रदान करणे.
00:23 त्यासाठी आपल्या Library database चे उदाहरण पाहू.
00:29 Library database मध्ये आपण पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे.
00:37 तसेच आपल्याकडे सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवणारे टेबल आहे.
00:45 आता आपण नवी query बनवू. जी सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची दाखवेल.
00:54 म्हणजेच सभासदांना दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांविषयीची माहिती मिळवू या.
01:03 आपण Library database उघडू या.
01:07 डाव्या बाजूच्या पॅनेलवरील Queries च्या आयकॉनवर क्लिक करा.
01:13 उजव्या बाजूच्या पॅनेलवरील Create Query in Design view वर क्लिक करा. आता आपल्याला Query Design नावाची नवी विंडो दिसेल.
01:28 आणि तसेच Add Table or Query नामक छोटी popup विंडो दिसेल .
01:39 येथे आपण query साठी आवश्यक असलेला data चा सोर्स निवडू शकतो.
01:46 सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या query मध्ये तिनही टेबल्स असणे आवश्यक आहे.
01:57 त्यासाठी सूचीतील Books या टेबलवर क्लिक करा. नंतर popup विंडोच्या उजव्या बाजूला असलेल्या Add बटणावर क्लिक करा.
02:11 अशाच प्रकारे आपण BooksIssued table आणि Members table सुद्धा समाविष्ट करू या.
02:19 तिनही टेबल्स आपल्याला background मधीलquery design विंडोमध्ये दिसतील.
02:26 आता popup विंडो बंद करू या.
02:31 त्यामुळे query design विंडो पुढे येईल.
02:39 विंडोच्या वरच्या अर्ध्या भागात तीन टेबल्स दिसतील.
02:46 तिनही टेबल्स मध्ये योग्य असे अंतर करून घेऊ.
02:53 त्यासाठी Members table वर क्लिक करून ते उजव्या बाजूच्या कोप-यात drag करून drop करा.
03:01 नंतर BooksIssued table वर क्लिक करून ते मध्यभागात drag करून drop करा.
03:11 आता आपल्याला टेबल्स जोडणा-या लाईन्स दिसतील ज्या आपण पूर्वी प्रस्थापित केलेल्या relationships दाखवितात.
03:23 relationships चा तपशील बघण्यासाठी आपण या लाईन्सवर डबल क्लिक करू.
03:30 आता आपण Query design विंडोच्या खालील अर्धा भाग बघू या.
03:37 या भागात सेल्स असलेल्या अनेक rows आहेत. query बनवण्यासाठी आपण यात data भरणार आहोत.
03:48 प्रथम आपण Field column बघू या.
03:53 येथे आपल्याला रिझल्ट मध्ये दाखवायच्या fields ची निवड करता येते.
04:01 त्यासाठी प्रथम विंडोच्या वरच्या अर्ध्या भागातील Books table मधून Title field वर डबल क्लिक करा.
04:12 पुढे Members table मधील Name field
04:17 आणि नंतर BooksIssued table मधीलIssue Date field
04:24 तसेच Return date, actual return date

आणि शेवटी checkedin field निवडा.

04:34 विंडोच्या खालच्या अर्ध्या भागातील पहिल्या row मध्ये ही फिल्डस दिसतील.
04:44 तसेच तिस-या row मध्ये या फिल्डशी संबंधित टेबल्सची नावे दिसतील.
04:50 दुस-या row मधील Alias कडे लक्ष द्या.
04:57 येथे आपण निवडलेल्या फिल्डसाठी अर्थपूर्ण नाव टाईप करू या.
05:04 image मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण aliases टाईप करू या.
05:11 आता आपले aliases टाईप करून झाले आहेत.
05:15 पुढे Sort row कडे लक्ष द्या.
05:21 येथे आपण query च्या उत्तरातील क्रमवारी ठरवू शकतो.
05:26 दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा क्रम घटनाक्रमाप्रमाणे ठरवू.
05:34 म्हणजेच आपला रिझल्ट Issue Date वर चढत्या क्रमाने सॉर्ट करू या.
05:43 त्यासाठी Issue Date फिल्डखाली आणि Sort rowमधील रिकाम्या सेलवर क्लिक करा आणि मग Ascending वर क्लिक करा.
05:56 आता आपण पुढील Visible row वर जाऊ या.
06:02 फिल्डस check किंवा un-check करून स्क्रीनवर दाखवली जावीत का नाही हे ठरवू.
06:11 आपल्याला दिसेल default रूपात सर्व फिल्ड checked केलेली आहेत.
06:17 पुढे आपण Function row वर जाऊ. याचा वापर complex queries बनवण्यासाठी होतो. आत्तासाठी हे आपण सोडून देऊ.
06:27 आणि आपण Criterion row वर जाऊ या.
06:32 येथे आपण रिझल्ट मर्यादित ठेवण्यासाठी simple किंवा complex निकष ठरवू शकतो.
06:40 उदाहरणार्थ सभासदांना दिली गेलेली आणि अद्याप परत न आलेली पुस्तके यासाठी आपणquery करू शकतो.
06:49 म्हणजेच checked in न केलेली पुस्तके.
06:54 CheckedIn field खालील आणि या row मधील रिकाम्या सेलवर क्लिक करून Equals Zero असे टाईप करा.
07:06 आता आपण ही query कार्यान्वित करू.
07:10 त्यासाठी आपण कीबोर्ड वरील शॉर्टकट F5 चा वापर करू शकतो. किंवा वरील भागातील Edit menu तील Run Query वर क्लिक करू शकतो.
07:27 तुम्हाला विंडोच्या वरच्या अर्ध्या भागात काही डेटा दिसत आहे का?
07:32 हा आपल्या queryचा रिझल्ट आहे.
07:36 आपल्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती Issue Date च्या क्रमानुसार दिसत आहे. तसेच आपल्याला दिसेल की एकही पुस्तक checked in केलेले नाही.
07:51 आता आपण खालील query design area मध्ये जाऊन त्यात हवा तो बदल करू शकतो.
08:00 उदाहरणार्थ आपण Checked In चा निकष काढून टाकू.
08:07 आता F5 चे बटण दाबून query कार्यान्वित करा.
08:15 यावेळी ही query आपल्याला मोठी सूची दाखवेल.
08:23 पुढे Control S दाबून आपण ही query सेव्ह करू या. एक छोटी popup विंडो उघडेल.
08:34 येथे आपल्या queryला अर्थपूर्ण नाव देऊ या.
08:38 History of Books Issued to Members असे टाईप करा.
08:46 नंतर Ok बटणावर क्लिक करून विंडो बंद करा.
08:52 सेव्ह केलेली query उघडण्यासाठी आपण मुख्य बेस विंडोमध्ये queryच्या नावावर डबल क्लिक करू शकतो.
09:01 अशा प्रकारे Design View च्या सहाय्याने आपण यशस्वीरित्या query बनवली आहे.
09:09 आता assignment करू.
09:12 सभासद Nisha Sharma यांना दिलेल्या पुस्तकांची सूची बनवा. त्यांचा क्रम Issue Date नुसार म्हणजेच घटनाक्रमाने ठेवा.
09:24 अशा प्रकारे आपण Creating Queries in Design View वरील स्पोकन ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:31 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
09:33 Design View च्या सहाय्याने query बनवणे. Query Design विंडोच्या सहाय्याने टेबल समाविष्ट करणे.
09:41 फिल्ड सिलेक्ट करणे. aliases आणि सॉर्टिंगचा क्रम ठरवणे. तसेच queryसाठी निकष प्रदान करणे.
09:49 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
10:10 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Sneha