K3b/C2/Introduction-to-K3b/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 K3b चा परिचय करून देणार्‍या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत,
00:08 K3b चा इंटरफेस आणि विविध टूलबार्स.
00:12 'उबंटू लिनक्स' ऑपरेटिंग सिस्टमवर K3b डाऊनलोड आणि इनस्टॉल कसे करावे ? हे शिकणार आहोत.
00:20 K3b वापरून नमुना फाईल बर्न करणे.
00:24 K3b म्हणजे काय?
00:27 K3b हे एक CD/DVD बर्निंग सॉफ्टवेअर आहे.
00:31 हे साधे कार्य जसे की CD बर्न करणे आणि कठीण कार्य जसे eMovix Cds बर्न करणे.
00:39 हे डेटा, ऑडियो किंवा व्हिडिओ CD/DVD तयार करू शकते.
00:45 K3b सर्व डेटा फॉरमॅट्सला समर्थन करते जसे .html, .txt, आणि इतर.
00:54 हे सर्व ऑडियो आणि व्हिडिओ फॉरमॅट्सला समर्थन करते जसे mp3, MPEG, आणि इतर.
01:03 K3b बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया www.k3b.org ला भेट द्या.
01:11 येथे आपण उबंटू लिनक्स 12.04. वर K3b 2.0.2 वापरत आहोत.
01:20 ह्या ट्युटोरियलसाठी ड्राईव्हमध्ये CD किंवा DVD निविष्ट केली आहे का याची खात्री करून घ्या.
01:28 जर आपल्याकडे K3b इन्स्टॉल्ड नसेल, तर उबंटू सॉफ्टवेअर सेंटर वापरून करू शकता.
01:34 उबंटू सॉफ्टवेअर सेंटर च्या माहितीसाठी स्पोकन ट्यूटोरियल ची वेबसाईट पहा.
01:41 ह्या ट्यूटोरियलसाठी, आम्ही डेस्कटॉप वर Myk3bCD म्हणून एक फोल्डर तयार केला आहे.
01:50 ह्या फोल्डरमध्ये 4 राइटर, 1 इंप्रेस आणि 2 कॅल्कच्या फाईल्सदेखील सेव्ह केल्या आहेत.
01:58 सराव करताना, आपण आपल्या पसंतीचा कोणताही फोल्डर किंवा फाईल वापरू शकतो.
02:03 आता K3b उघडा.
02:06 प्रथम आपल्या संगणकावर, डेस्कटॉपवरील डाव्या कोपर्‍यात असलेले गोल बटण Dash Home वर क्लिक करा.
02:14 'सर्च' बॉक्स दिसेल.
02:16 k3b टाईप करा.
02:19 K3b चा आयकॉन दिसेल.
02:22 ऍप्लिकेशन उघडण्यास त्यावर क्लिक करा.
02:26 K3b विंडो उघडेल.
02:29 K3b च्या इंटरफेससह ओळख करून घेऊ.
02:34 K3b इंटरफेसमधील मेन मेनू वर, विविध पर्याय आहेत.
02:40 मेन मेनू खाली शॉर्ट कट आयकॉन्स उपलब्ध आहेत, जसे
02:45 New Project, Open, Save, Format आणि Filter.
02:50 K3b हे दोन मुख्य पॅनल्समध्ये विभाजित आहे, वरचा आणि खालचा.
02:57 वरचा पॅनलदेखील दोन पॅनल्समध्ये विभाजित आहे.
03:01 आपल्या संगणकावरील डावा पॅनल मुख्य फोल्डर्स दर्शवितो ...
03:06 आणि उजवा पॅनल संबंधित उप-फोल्डर्स (sub-folders) दर्शवितो.
03:13 K3b मध्ये वापरल्या जाणार्‍या सर्वात सामान्य प्रक्रियेसाठी खालच्या पॅनलमध्ये शॉर्ट कट आयकॉन्स दर्शविले आहेत.
03:21 ह्या पॅनेलमध्ये, सामान्यत: वापरत असलेल्या प्रक्रियांचे शॉर्ट कट आयकॉन्स जोडू शकतो.
03:28 एक नवीन व्हिडिओ CD project तयार करण्यास, शॉर्ट कट आयकॉन जोडू.
03:34 खालच्या पॅनलवर कर्सर नेऊन ठेवा.
03:38 कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करा.
03:41 New Video CD Project वर क्लिक करा.
03:45 पॅनलवर New Video CD Project साठी शॉर्ट कट आयकॉन दिसते.
03:51 डेटा सीडी बर्न करू.
03:54 बॉटम पेनमधील New Data Project वर डबल-क्लिक करा.
03:59 किंवा, New Project वर जाऊन ड्रॉप-डाऊन सूचीवर क्लिक करा.
04:04 New Data Project निवडा.
04:07 डाव्या पॅनलमधून, Home आणि Desktop निवडा.
04:13 आता Myk3bCD फोल्डर निवडा.
04:18 हे वरच्या उजव्या पॅनलवर सर्व फाईल्स आणि फोल्डर्स उघडेल.
04:24 बर्न करण्यास डेटा फाईल निवडू.
04:29 ह्या फोल्डरमधून Writer4 फाईल निवडू.
04:33 Writer4 फाईल ड्रॅग करून खालच्या पॅनलवर ड्रॉप करा.
04:39 पुढे जाण्यापूर्वी आपण ड्राइव्हमध्ये CD किंवा DVD निविष्ट केली आहे का याची खात्री करून घ्या.
04:47 Burn वर क्लिक करा.
04:49 पुन्हा Burn वर क्लिक करा.
04:53 तीन विविध टॅब्ससह एक विंडो दिसते.
04:56 डिफॉल्ट सेटिंग्ज तसेच ठेऊ.
04:59 Default Settings वर क्लिक करा.
05:02 आता आपण बर्निंग आणि प्रोग्रेसचा स्टेटस पाहू शकतो.
05:08 एकदा का बर्निंग पूर्ण झाले की, CD आपोआप बाहेर येते.
05:13 सोपे आहेना ?
05:16 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:21 या ट्युटोरियलमध्ये आपण इंटरफेस आणि त्याच्या टूलबार्सबद्दल शिकलो.
05:27 K3b डाऊनलोड आणि इनस्टॉल करणे हेदिखील शिकलो.
05:32 K3b मध्ये विविध वैशिष्ट्य वापरू.
05:35 CD वर फाईल बर्न करू.
05:39 तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे.
05:41 CD वर ऑडियो फाईल बर्न करा.
05:45 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
05:48 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
05:51 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
05:58 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:01 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:05 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
06:11 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट " हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:15 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:34 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana