Jmol-Application/C2/Modify-Display-and-View/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Jmol अप्लिकेशनमधील Modify Display and View वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 आपण शिकणार आहोत,
00:11 स्क्रिनवर मॉडेल रोटेट, झूम, मूव्ह आणि स्पिन करणे.
00:17 दृश्य बदलणे.
00:19 डिसप्लेचा प्रकार बदलणे.
00:22 अणू आणि बॉण्ड्सचा आकार आणि रंग बदलणे.
00:26 एक्सेस आणि बाऊंडबॉक्ससहित इमेज प्रदर्शित करणे.
00:30 विविध फाईल स्वरुपात इमेज सेव करणे.
00:34 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला,
00:36 Jmol अॅप्लिकेशन विंडो आणि
00:40 modelkit फंक्शन वापरून, मॉडेल्स तयार आणि संपादित करणे माहित असले पाहिजे.
00:45 नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:51 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे.
00:53 उबंटू OS वर्जन 12.04
00:58 Jmol वर्जन 12.2.2 आणि
01:02 "Java" वर्जन 7.
01:05 मी पॅनेलवर 2-chloro-1-propanol च्या मॉडेलसह एक नवी Jmol विंडो उघडली आहे.
01:12 स्ट्रक्चरचे चांगले दृश्य मिळवण्यासाठी मॉडेल रोटेट आणि झूम करू शकता.
01:18 मॉडेल रोटेट करण्यासाठी, टूलबारवरील “Rotate molecule” आयकॉनवर क्लिक करा.
01:24 मॉडेलवर क्लिक करा आणि, लक्ष द्या कर्सर हाताच्या चिन्हामध्ये बदलेल.
01:29 माऊस बटण दाबून ठेऊन, माऊस पॅनेलवर ड्रॅग करा.
01:34 तुम्ही पाहू शकता मॉडेल रोटेट होत आहे.
01:37 झूम-ईन आणि झूम-आऊट करण्यासाठी, पॅनेलवर कर्सर नेऊन ठेवा.
01:42 झूम-आऊट करण्यासाठी माऊस व्हिल वरच्या दिशेने आणि झूम-ईन करण्यासाठी खालच्या दिशेने हलवा.
01:49 पॅनलवर मॉडेल हलविण्यासाठी, मॉडेल वर कर्सर नेऊन ठेवा.
01:54 कीबोर्डवरील शिफ्ट बटण दाबून ठेवा.
01:57 डबल क्लिक करा आणि माऊस ड्रॅग करा.
02:00 सविस्तर वर्णनासाठी पॉप-अप मेनूमधील Mouse Manual पहा.
02:06 पॉप-अप मेनू उघडा आणि “About” पर्यंत खाली स्क्रोल करा नंतर Jmol 12.2.2” निवडा आणि Mouse Manual वर क्लिक करा.
02:17 जर तुम्ही इंटरनेटशी जुडलेले असाल तर,
02:19 स्क्रीनवर एका वेब पेजसह “Mouse manual” दिसते .
02:24 पॉप-अप मेनूच्या बाहेर येण्यासाठी, पॅनलवर क्लिक करा.
02:28 पॅनेलवर रेणूला आपोआप स्पिन करण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा.
02:34 Spin” पर्यंत खाली स्क्रोल करा आणि “On” पर्यायावर क्लिक करा .
02:40 आपण पाहू शकतो की पॅनलवर मॉडेल फिरत आहे.
02:44 स्पिन बंद करण्यासाठी,
02:46 पुन्हा पॉप-अप मेनू उघडा,
02:49 Spin” पर्यंत खाली स्क्रोल करा आणि
02:51 “Off” वर क्लिक करा.
02:54 असाईनमेंट म्हणून,
02:56 2-chloro-3-Iodo-pentane चे मॉडेल तयार करणे.
03:00 पॉप-अप मेनूमध्ये “Spin” पर्याय शोधणे.
03:04 स्पिनची दिशा “Z” अक्ष आणि 'दर' “40” मध्ये बदला.
03:10 हिंट म्हणून: पॉप-अप मेनूमधील Set Z Rate चा वापर करा.
03:16 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे.
03:22 आता आपण View मेनूबद्दल जाणून घेऊ .
03:25 विविध एंगल्समधूल मॉडेल पाहण्यासाठी मेनूबारवर “View” मेनू आहे.
03:31 'View' मेनूवर क्लिक करा.
03:33 मेनू खाली स्क्रोल करा आणि दिलेल्या विविध पर्यायांमधून निवडा.
03:38 उदाहरणार्थ, मी “Top” व्ह्यूव निवडेन.
03:42 'Top' पर्यायावर क्लिक करा.
03:45 स्किनवरील इमेज वरून रेणू कसा दिसेल हे दर्शवते.
03:50 आपण हे व्ह्यूव, इमेज म्हणून विविध फाईल फॉरमॅट्समध्ये सेव्ह करू शकतो.
03:55 Save current view as an image” आयकॉनवर क्लिक करा.
03:59 Save” डायलॉग बॉक्स दिसेल.
04:03 फाईल फॉरमॅट् निवडण्यासाठी, “Image Type” वरील पर्याय खाली स्क्रोल करा.
04:09 मी JPEG फॉरमॅट् निवडेन.
04:13 तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करायची आहे तो उघडा.
04:17 मला ही Desktop वर पाहिजे.
04:19 Desktop निवडा आणि Open बटणावर क्लिक करा.
04:24 File Name टेक्स्ट बॉक्समध्ये , टाईप करा “2-chloro-1-propanol”.
04:30 Files of Type” वर जा आणि jpg निवडा .
04:35 Save बटणावर क्लिक करा.
04:38 आता डेस्कटॉपवर इमेज JPEG फॉरमॅट्मध्ये सेव होईल .
04:44 रेणूमॉडेलच्या प्रदर्शनची पद्धत वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते .
04:50 आवश्यक असल्यास, रेणूमधील अणू आणि बॉन्ड्सचे आकार आणि रंग बदलू शकतो.
04:57 रेणूमधील सर्व अणूंना बदलण्यासाठी पर्याय आहेत किंवा सेट निवडा .
05:03 पॅनेलवर मॉडेलचे मूलभूत प्रदर्शन ball आणि stick आहे.
05:09 CPK Space fill” मध्ये प्रदर्शन बदलण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा.
05:15 संपूर्ण रेणू बदलण्यासाठी , “Select” वर जा आणि All वर क्लिक करा .
05:22 पुन्हा पॉप-अप मेनू उघडा .
05:25 Style पर्यंत खाली स्क्रोल करा , सब-मेनूमधून Scheme निवडा.
05:30 आणि CPK Spacefill पर्यायावर क्लिक करा .
05:35 स्क्रीनवरील मॉडेल CPK Spacefill मॉडेलमध्ये परिवर्तीत झाले आहे.
05:40 आता पुन्हा ball आणि stick मॉडेलला परिवर्तीत करू.
05:44 आधी केलेल्या पद्धतींचे अनुसरण करू.
05:48 पॉप-अप मेनू उघडा.
05:50 Style” पर्यंत खाली स्क्रोल करा, Scheme निवडा आणि Ball and Stick वर क्लिक करा .
05:56 मॉडेल आता ball and stick स्टाईल डिसप्लेमध्ये परिवर्तीत झाले आहे .
06:01 पॉप-अप मेनू तसेच, मेनूबारवरील Display मेनू वापरून बॉण्ड्सचे आकार बदलता येऊ शकतात.
06:08 Display मेनूवर क्लिक करा आणि Bond निवडा.
06:12 angstrom युनिटमधील सब-मेनूमध्ये विविध आकार व्यासमध्ये बाँड्सचे पर्याय आहेत.
06:19 उदाहरणार्थ, मी “0.1 Angstrom” निवडून त्यावर क्लिक करेन.
06:26 बाँड्सच्या जाडीमध्ये होत असलेल्या बदलाकडे लक्ष द्या.
06:30 आपण अणू आणि बॉण्ड्सचे देखील रंग बदलू शकतो.
06:34 मला मॉडेलमधील सर्व कार्बन अणू, पिवळ्या रंगामध्ये बदलायचे आहेत.
06:39 हे करण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा आणि Select वर जा.
06:44 Element पर्यंत खाली स्क्रोल करा आणि Carbon वर क्लिक करा.
06:48 पुन्हा पॉप-अप मेनू उघडा आणि Color निवडा.
06:52 नंतर Atoms निवडा आणि Yellow पर्यायावर क्लिक करा .
06:57 मॉडेलमधील सर्व Carbons पिवळ्या रंगाचे दिसतील.
07:02 बॉण्ड्सचे रंग कसे बदलायचे हे पाहू.
07:06 पॉप-अप मेनू उघडा आणि All निवडा.
07:10 पुन्हा पॉप-अप मेनू उघडा.
07:12 Color पर्यंत खाली स्क्रोल करा, सब-मेनूमधून Bonds निवडा.
07:16 खाली स्क्रोल करा आणि Blue पर्यायावर क्लिक करा.
07:20 आता सर्व बॉण्ड्स निळे आहेत.
07:23 “X,Y" आणि "Z” अक्ष आणि बाऊनडिंग बॉक्समधून, इमेज प्रदर्शित करू शकतो.
07:31 पॉप-अप मेनू उघडा, Style निवडा.
07:34 Axes पर्यायापर्यंत खाली स्क्रोल करा.
07:37 सब-मेनूमधून Pixel Width निवडा.
07:40 मी पिक्सल विड्थ म्हणून 3 px. निवडेन.
07:44 आता सर्व अक्षांसहित स्किनवर मॉडेल आहे.
07:49 इमेजभोवती बाऊंड बॉक्स काढण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा.
07:54 Style पर्यंत खाली स्क्रोल करा, पर्यायामधून Boundbox निवडा.
07:59 Pixel width निवडा आणि पिक्सल विड्थवर क्लिक करून 3 px निवडा.
08:05 स्क्रिनवर आपल्याकडे, बाऊंड बॉक्समध्ये अक्षासह 2-chloro-1-propanol चे मॉडेल आहे.
08:12 बाऊंड बॉक्स स्पष्टपणे पाहण्यास, आपल्याला झूम ईन किंवा झूम आऊट करावे लागेल.
08:17 इमेज सेव करा आणि प्रोग्रामच्या बाहेर या.
08:21 थोडक्यात.
08:23 या पठात शिकलो,
08:26 स्क्रिनवर मॉडेल रोटेट, झूम, मुव्ह आणि स्पिन करणे.
08:31 विविध एंगल्समधून मॉडेल पाहणे.
08:34 डिसप्लेचा प्रकार बदलणे.
08:36 अणू आणि बॉण्ड्सचे रंग बदलणे.
08:39 आपण हे देखील शिकलो,
08:41 एक्सेस आणि बाउंड बॉक्ससह मॉडेल प्रदर्शित करणे.
08:44 विविध फाईल स्वरुपात इमेज सेव करणे.
08:48 असाईनमेंटसाठी
08:50 3-amino-1-propanol चे मॉडेल तयार करणे.
08:53 डिसप्लेला “Sticks” मध्ये बदलणे.
08:56 मॉडेलमध्ये सर्व हायड्रोजन्स हिरव्या रंगात बदलणे.
09:00 सर्व बॉण्ड्स पिवळ्या रंगात बदलणे.
09:04 तुमच्या असाईनमेंटचे आऊटपुट असे दिसले पाहिजे.
09:12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:19 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth(बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download(डाऊनलोड) करूनही पाहू शकता.
09:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:26 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:29 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:34 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:44 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:57 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana