Firefox/C4/Extensions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Mozilla Firefox मधील Extensions वरील पाठात स्वागत.
00:05 ह्या पाठात शिकणार आहोत- Extensions किंवा Add-ons. Extensions इन्स्टॉल करणे. सुचविलेली Extensions.
00:14 येथे आपण Ubuntu 10.04 वर Firefox 7.0 वापरणार आहोत.
00:20 Firefox ब्राऊजर उघडू.
00:23 डिफॉल्ट रूपात yahoo चे होमपेज उघडेल.
00:27 Extensions किंवा Add-ons म्हणजे काय?
00:29 Extensions मुळे,
00:31 * Firefox ब्राऊजरमधे नवी फीचर्स समाविष्ट करता येतात.
00:35 * उपलब्ध फीचर्समधे सुधारणा करता येते.
00:37 * तुमच्या preferences नुसार ब्राऊजर Customize करता येतो.
00:42 Extension हा फायरफॉक्स ब्राऊजरचा भाग आहे.
00:45 * त्यामुळे ब्राऊजरची क्षमता वाढते.
00:48 आपण अशी extensions इन्स्टॉल करू शकतो,
00:51 # जी जाहिराती किंवा popups रोखेल.
00:54 # वस्तूंच्या किंमतीची तुलना करेल.
00:56 # तसेच हवामानाची अद्ययावत माहिती दाखवेल.
01:00 Grab and Drag extension इन्स्टॉल करू.
01:03 त्या मुळे तुम्हाला वेबपेजेस विविध पध्दतीने स्क्रॉल करता येतील.
01:07 grab and drag फंक्शन Adobe Acrobat प्रमाणेच आहे.
01:12 Menu वरील Tools खालील Add-ons क्लिक करा.
01:16 Add-ons Manager टॅब उघडेल.
01:20 किंवा Add-ons Manager टॅब उघडण्यासाठी CTRL+Shift+A कीज दाबू शकतो.
01:28 Add-ons Manager मधील डाव्या पॅनेलमधे उपलब्ध पर्याय दिसतील.
01:34 डिफॉल्ट रूपात Get Add-ons पर्याय निवडल्याचे लक्षात येईल .
01:39 डाव्या पॅनेलमधील सिलेक्ट केलेल्या पर्यायाची माहिती उजव्या पॅनेलमधे दिसते.
01:45 म्हणजेच येथे Add-ons चे कार्य आणि ते कसे वापरायचे हे सांगितले जाते.
01:51 इन्स्टॉल करण्यायोग्य Add-ons ची यादीही दिलेली असते.
01:55 आता नवे Add-on: Grab and Drag इन्स्टॉल करू.
01:59 प्रथम उजवीकडे वर कोप-यात असलेल्या Search bar मधे Grab and Drag टाईप करून एंटर दाबा.
02:08 उजव्या पॅनेलमधे आपण दिलेल्या नावाशी मिळत्या जुळत्या add-ons ची यादी दिसेल.
02:14 drag हा शब्द असलेले सर्व add-ons येथे दाखवले गेले आहेत.
02:20 सूचीतील पहिले नाव Grab and Drag बरोबर जुळत असल्याचे दिसेल.
02:26 Install वर क्लिक करा.
02:28 बहुतांश सॉफ्टवेअर प्रमाणे काही add-ons साठी देखील end-user license agreements असतात.
02:35 End-User License Agreement च्या डायलॉग बॉक्सवरील Accept and Install क्लिक करा.
02:41 Add-on डाऊनलोडींगचा प्रोग्रेसबार उघडेल.
02:46 पुढे, “add-on will be installed
02:50 when you restart Mozilla Firefox असा मेसेज दिसेल
02:54 Restart Now वर क्लिक करा.
02:57 Firefox ब्राऊजर बंद होऊन पुन्हा उघडेल.
03:01 Add-ons Manager नव्या टॅबमधे उघडेल.
03:05 Extensions टॅबच्या उजव्या पॅनेलमधे Grab and Drag extension दिसेल.
03:11 आधी केल्याप्रमाणेच Scrap Book हे आणखी एक extension इन्स्टॉल करू.
03:18 Scrap Book मुळे तुम्हाला वेबपेजेसचा संग्रह सांभाळता येतो.
03:24 * इन्स्टॉलेशन प्रोग्रेस बार आणि Firefox बंद करून पुन्हा सुरू करण्याचा मेसेज वेगळा दाखवला जाणार नाही.
03:33 * ते Scrap Book बारवर दाखवले जाईल.
03:36 Restart Now वर क्लिक करा.
03:40 Firefox मधे Scrap Book इन्स्टॉल झाले आहे.
03:44 पाठात थांबवून एक assignment करू.
03:48 * Firefox ब्राऊजरमधे Add-ons Manager उघडा.
03:52 * Get Add-ons पर्यायातील Add-ons च्या दिलेल्या यादीतील एक नवा add-on इन्स्टॉल करा .
03:59 *“Add-ons Manager” तील “Extensions” पर्याय वापरुन तुम्ही व्यवस्थापित करा.
04:03 * म्हणजेच add, delete
04:06 * किंवा update करणे.
04:08 Firefox ब्राऊजरमधे Add-ons Manager टॅब वर क्लिक करा.
04:13 डाव्या पॅनेलवरील Extensions वर क्लिक करा.
04:16 उजव्या पॅनेलवर आता कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेली Extensions दिसतील.
04:22 ScrapBook बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ते सिलेक्ट करून More वर क्लिक करा.
04:27 * Scrap Book ची विस्तृत माहिती दिसेल.
04:31 * Extension संदर्भात जाणून घेण्यासाठी वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करा.
04:35 आता डाव्या पॅनेलवरील Extension वर क्लिक करा.
04:40 प्रत्येक Extension साठी preferences सेट करता येतात, अक्षम किंवा ते काढून टाकता येते.
04:46 Grab and Drag सिलेक्ट करून Preferences वर क्लिक करा.
04:49 ह्या डायलॉग बॉक्सद्वारे preferences सेट करू शकतो.
04:53 डायलॉग बॉक्समधून बाहेर पडण्यासाठी Cancel क्लिक करा.
04:57 आता Scrap Book सिलेक्ट करून Preferences क्लिक करा .
05:01 Scrap Book Options आणि Grab and Drag Preferences ह्यांचे डायलॉग बॉक्स वेगळे असल्याचे दिसेल.
05:09 * त्यामुळे प्रत्येक Extension ची वेगवेगळी सेटींग्ज असतात ज्या, बदलता येतात.
05:13 * एखाद्या Extension साठी Preferences चे बटण दिसत नसेल तर,
05:17 * याचा अर्थ त्यासाठी preferences उपलब्ध नाहीत.
05:21 Scrap Book Options डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close क्लिक करा.
05:26 बहुतांश सॉफ्टवेअरप्रमाणेच add-ons ही नियमित अपडेट करता येतात.
05:31 Scrap Book अपडेट करण्यासाठी त्यास सिलेक्ट करून, त्यावर राईट क्लिक करा. नंतर Find Updates क्लिक करा.
05:37 अपडेटस उपलब्ध असल्यास Update बटण दाखवले जाईल.
05:42 add-on अपडेट करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
05:47 Scrap Book साठी अपडेट नसल्याने Update बटण दिसणार नाही.
05:51 आणि शेवटी जर extension चा उपयो ग करायचा नसेल तर Disable बटण क्लिक करा.
05:58 कॉम्प्युटरमधून extension काढून टाकायचे असेल तर Remove क्लिक करा.
06:03 आपण Extensions बद्दल जाणून घेतले.
06:06 Firefox मधे आणखी पर्याय उपलब्ध करून कामे सुरळीत करण्यासाठी Extensions वापरतात.
06:13 * विविध Add-ons बद्दल जाणून घेण्यासाठी Get Add-ons वापरू शकतो.
06:18 * जे उपयोगी Add-ons असतील ते सिलेक्ट करून इन्स्टॉल करू शकतो.
06:24 Firefox Extensions बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Firefox वेबसाईटला भेट द्या.
06:31 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:34 ह्या पाठात Extensions म्हणजे काय, Extensions इन्स्टॉल करणे, Extensions सुचवणे हे शिकलो.
06:42 असाईनमेंट.
06:45 * WebMail Notifier हे extension शोधा.
06:49 * ते कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करा.
06:52 * ह्या extension ची फीचर्स आणि अकाऊंटमधील न वाचलेले मेल्स बघण्यासाठी त्यांचा कसा उपयोग होतो ते शोधा.
07:01 * extension डिसेबल करा.
07:03 * नंतर Firefox मधून काढून टाका.
07:07 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:10 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:13 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:23 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:27 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:33 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:37 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:48 * spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
07:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
08:00 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana