Firefox/C3/Popups/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 मोझिला फायरफॉक्समधे Pop-up आणि Image optionsसेट करण्याच्या पाठात स्वागत.
00:07 या पाठात शिकूया Pop up आणि image preferences सेट करणे,
00:13 आणि टूलबार Customize करणे.
00:15 Pop-up विंडोज, किंवा pop-ups या विंडोज, आपल्या परवानगीशिवाय उघडतात.
00:21 त्या विविध आकारात असतात परंतु त्या संपूर्ण स्क्रीन व्यापत नाहीत.
00:27 काही pop-ups करंट फायरफॉक्स विंडोच्या वर तर काही खाली उघडल्या जातात. म्हणजेच (pop-unders)
00:37 Pop-ups हे काही वेळा त्रासदायक ठरतात. आणि ह्याच मुख्य कारणाने आपल्याला त्यास अक्षम करायचे आहे.
00:42 या पाठात आपण Ubuntu 10.04 वर Firefox version 7.0 वापरणार आहोत.
00:50 आता Firefox ब्राउजर उघडू.
00:53 URL बार मध्ये टाईप करा ‘w w w dot pop up test dot com’
01:01 एंटर दाबा.
01:03 ही साईट pop up म्हणजे काय हे दाखवेल.
01:07 ‘multi-popup test’ ह्या लिंकवर क्लिक करा.
01:12 तुम्हाला सहा pop ups दिसतील.
01:20 Back वर क्लिक करा.
01:22 आणखी दोन pop-ups उघडतील. ते कसे तापदायक आहे ते पहा?
01:28 फायरफॉक्स आपणास pop-ups आणि pop-unders हे दोन्ही नियंत्रित करण्याची परवानगी देते. हे Edit मेनूतील Preferences द्वारे केले जाते.
01:37 विंडोजच्या युजर्सनी Tools मेनूतील Options वर क्लिक करा.
01:43 Preferences विंडोमधे Content टॅबवर क्लिक करा.
01:48 Block pop-up windows पर्याय डिफॉल्ट रूपात आधीच सुरू केलेला असतो.
01:53 नसल्यास तो निवडावा .
01:56 आता तुम्हाला pop-upsचा त्रास होणार नाही.
02:02 तुम्ही Firefox Preference विंडो Close वर क्लिक करून बंद करू शकता.
02:09 तुम्ही exceptions ही निवडू शकता.
02:12 Exceptions म्हणजे अशा साईटस ज्यातील pop-ups ला आपली संमती असते.
02:17 Editमधील Preferences वर क्लिक करा.
02:20 विंडोजच्या युजर्सनी प्रथम Tools आणि नंतर Options वर क्लिक करावे.
02:26 exceptions समाविष्ट करण्यासाठी, Block pop-up windows फिल्डच्या पुढील Exceptionsबटणावर क्लिक करा.
02:34 एक dialog box उघडेल.
02:37 Address of website फिल्डमधे टाईप करा, ‘w w w dot google dot com’
02:44 Allow बटणावर क्लिक करा.
02:46 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
02:50 preferencesचा डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close क्लिक करा.
02:55 google.com शिवाय इतर सर्व साईटसचे pop-ups रोखले जातील.
03:01 URL बार मध्ये ‘w w w dot pop up test dot com’ टाईप करून एंटर दाबा.
03:09 ‘multi-popup’ test लिंकवर क्लिक करा.
03:12 एकही popup दिसणार नाही.
03:15 आपला popup blocker व्यवस्थित काम करीत आहे.
03:20 Imagesडाऊनलोड करण्यासाठी वेळ आणि bandwidth लागते.
03:24 फायरफॉक्समधे निवडकimagesचे डाऊनलोड रोखता येण्याची सोय आहे.
03:30 Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
03:33 Windows युजर कृपया प्रथमTools आणि नंतर Options वर क्लिक करा.
03:39 Preferences च्या डायलॉग बॉक्समधे Content टॅब निवडा.
03:44 Load images automatically चेक बॉक्स अक्षम करा.
03:49 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
03:53 Search बार मध्ये Flowers टाईप करून एंटर दाबा.
04:00 google होम पेजवरील 'Images' वर क्लिक करा.
04:04 दिसणाऱ्या पहिल्या image link वर क्लिक करा.
04:08 image load झाली नाही.
04:12 Firefox, टूलबार customize करण्यासाठी अनेक पर्याय प्रदान करते.
04:18 आपल्याला एखादा टूलबार hide करायचा आहे. उदाहरणार्थ Menu bar.
04:23 Menu bar च्या रिकाम्या भागावर राईट क्लिक करा.
04:27 आणि ते अनचेक करा. झाले!
04:30 Menu bar परत आणण्यासाठी टूलबारच्या रिकाम्या भागावर पुन्हा राईट क्लिक करा.
04:36 Menu bar पर्याय निवडा.
04:40 Firefox, टूलबार customize करण्यासाठी अनेक advancedपर्याय देते. त्यापैकी काही पाहू.
04:46 आता टूलबारवर एक आयकॉन समाविष्ट करू. जो एका क्लिकने वेब पेज प्रिंट करेल.
04:54 टूलबारच्या रिकाम्या भागावर राईट क्लिक करा.
04:58 Customize वर क्लिक करा.
05:00 Customize Toolbar डायलॉग बॉक्स उघडेल.
05:04 आपण डायलॉग बॉक्समधे Print icon बघू शकतो.
05:09 तो icon टूलबारवर ड्रॅग करा.
05:12 Doneवर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
05:17 टूलबारवरील Print icon वर क्लिक करा.
05:21 हे , Print dialog box उघडेल.
05:25 आत्ता print करायचे नसल्याने,
05:28 Cancel वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
05:32 तुम्ही टूलबार्सना समाविष्ट तसेच काढून टाकु शकता.
05:35 त्यासाठी टूलबारवर राईट क्लिक करून Customize निवडा.
05:40 Add new toolbar बटणावर क्लिक करा.
05:44 नव्या टूलबारला नाव द्या. जसे की, Sample Toolbar.
05:50 OK वर क्लिक करा.
05:53 Downloadsहा आयकॉन ड्रॅग करून Sample Toolbarवर ड्रॉप करा.
06:01 browser मधील नव्या टूलबारकडे लक्ष द्या.
06:04 टूलबार काढून टाकण्यासाठी Restore Default set बटणावर क्लिक करा.
06:10 कंटेट एरिया वाढवण्यासाठी आपण आयकॉनचा आकार छोटा करू शकतो.
06:16 Use Small icons नावाचा चेक बॉक्स निवडा.
06:22 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Done वर क्लिक करा.
06:27 आयकॉनचा आकार कमी झाल्याचा दिसेल.
06:32 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:36 ह्या पाठात शिकलो, Pop-up आणि Image preferences सेट करणे,
06:41 Toolbar Customize करणे.
06:43 आता असाईनमेंट.
06:46 Mozilla Firefox ची नवी विंडो उघडा. www.yahoo.com व्यतिरिक्त इतर सर्व popups ब्लॉक करा. bookmarks टूलबार समाविष्ट करा.
06:59 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:05 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:15 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:38 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:48 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana