Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-4/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:04 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:07 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बदद्ल आहे.
00:15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:28 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00:33 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Material panel म्हणजे काय?
00:37 प्रॉपर्टीस विंडो च्या Material panel मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे? हे शिकू.
00:44 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00:49 जर नसेल तर आमचे अगोदरचे, Basic Description of the Blender Interface हे ट्यूटोरियल पहा.
00:57 प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे.
01:03 आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे.
01:10 चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया.
01:14 प्रथम, आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया.
01:20 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01:28 आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये, पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
01:33 ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे, How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01:43 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
01:51 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर असलेल्या sphere आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा.
01:58 हे Material panel आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मध्ये एक मटेरियल जोडू शकतो.
02:05 डिफॉल्ट द्वारे स्टॅंडर्ड मटेरियल क्यूब मध्ये जोडले आहे.
02:10 हे मटेरियल निळ्या रंगात चिन्हांकीत असलेल्या मटेरियल स्लॉट चा एक भाग आहे.
02:15 नवीन मटेरियल स्लॉट जोडण्यासाठी, मटेरियल पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्लस (+) चिन्हावर लेफ्ट क्लिक करा.
02:24 नवीन मटेरियल जोडण्यासाठी new वर लेफ्ट क्लिक करा. डिफॉल्ट द्वारे, सर्व नवीन मटेरियल मूलभूत सेट्टिंग्स सह जोडले आहे.
02:34 नवीन मटेरियल स्लॉट डिलीट करण्यासाठी, प्लस (+) चिन्हाच्या खाली असलेल्या माइनस (-) चिन्हावर लेफ्ट क्लिक करा.
02:41 आपण आपल्या मूळ मटेरियल वर पुन्हा आलो आहोत. यास आपण White नाव देऊ.
02:46 मटेरियल स्लॉट बॉक्स आणि प्रीव्यू विंडो च्या मध्ये असलेल्या ID नेम बार मध्ये Material वर लेफ्ट क्लिक करा.
02:55 तुमच्या कीबोर्ड वर White टाइप करा आणि enter की दाबा.
03:01 मटेरियल आणि मटेरियल स्लॉट या दोन्हीची नावे white मध्ये बदलली आहे.
03:06 तुम्ही नवीन मटेरियल स्लॉट न जोडता नवीन मटेरियल जोडू शकता.
03:12 मटेरियल ID नेम बार च्या उजव्या बाजूला प्लस (+) चिन्हावर लेफ्ट क्लिक करा.
03:18 मटेरियल स्लॉट मध्ये नवीन मटेररियल जुडला आहे . यास red हे नवीन नाव देऊ.
03:27 आपण या मटेरियल चा रंग white वरुन red मध्ये बदलणार आहोत.
03:31 परंतु, प्रथम आपण मटेरियल IDनेम बार च्या खाली, रो च्या बटनांवर एक नजर टाकु.
03:37 Surface सक्रिय ओब्जेकटच्या मटेरियल ला त्याच्या सर्फेस च्या रूपात रेंडर करते.
03:44 हे ब्लेंडर मध्ये डिफॉल्ट रेंडर मटेरियल आहे.
03:48 Wire मटेरियल ला एक तार युक्त जाळी मध्ये रेंडर करते, जे ऑब्जेक्ट बहभूजाच्या फक्त किनार दर्शविते.
03:55 हे उपयुक्त असे टूल आहे, जे मॉडेलिंग आणि रेंडरिंग वरील वेळेची बचत करते.
04:00 आपण ब्लेंडर मध्ये, मॉडेलिंग बद्दल अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये, wired mesh, edges आणि polygons या बद्दल विस्तृत पणे शिकू.
04:09 Volume मटेरियल सक्रिय ऑब्जेक्ट ला संपूर्ण वॉल्यूम च्या रूपात रेंडर करते.
04:15 surface आणि wire साठी मटेरियल सेट्टिंग वेगळी आहे.
04:20 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये Volume मटेरियल चा वापर करू, तेव्हा ही सेट्टिंग्स विस्तृत पणे पाहु.
04:26 Halo मटेरियल ला सक्रिय ऑब्जेक्ट च्या भोवती हॅलो कणाच्या रूपामध्ये रेंडर करते.
04:32 पुन्हा मटेरियल सेट्टिंग्स बदलली आहे.
04:36 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये Halo मटेरियल चा वापर करू, तेव्हा ही सेट्टिंग्स विस्तृत पणे पाहु.
04:42 लक्ष द्या यामधील कोणताही पर्याय 3D व्यू मध्ये दर्शित नाही.
04:47 कारण यास फक्त रेंडर डिसप्ले मध्ये पाहिल्या जाऊ शकते.
04:52 रेंडर डिसप्ले बदद्ल शिकण्यासाठी Types of windows Properties part 1 हे ट्यूटोरियल पहा.
05:02 Surface वर पुन्हा जा. आपण Surface मटेरियल साठी सेट्टिंग्स पाहु.
05:05 खाली प्रीव्यू ( पूर्वेक्षण ) विंडो आहे, जे रेंडर्ड मटेरियल चे प्रीव्यू दर्शविते.
05:17 उजव्या बाजूला, विविध प्रीव्यू पर्यायासाठी बटनाचे कॉलम आहे.
05:22 Plane
05:24 Sphere
05:26 Cube
05:29 Monkey
05:32 Hair
05:34 आणि Sky. आता आपल्या मटेरियल चा रंग पांढऱ्या वरून लाल मध्ये बदलू.
05:42 Diffuse वर जा. Diffuse च्या खाली White Bar वर लेफ्ट क्लिक करा.
05:49 कलर मेन्यू दिसेल. आपल्याला हवा असलेला कोणताही कलर आपण या मेन्यू वरुन निवडू शकतो. मी लाल निवडते.
05:59 लेफ्ट क्लिक करा आणि white डॉट ला कलर सर्कल च्या मध्यभागी पकडा.
06:05 माउस सर्कल च्या लाल क्षेत्राच्या च्या दिशेने ड्रॅग करा.
06:11 Material पॅनल, मध्ये 3Dव्यू आणि प्रीव्यू विंडो मधील क्यूब चा रंग पांढऱ्या वरून लाल मध्ये बदलला आहे.
06:22 दुसरी पद्धत - Diffuse च्या खाली लाल बार वर पुन्हा लेफ्ट क्लिक करा.
06:28 तुम्हाला कलर सर्कल च्या खाली R, G आणि B नामक तीन बार्स दिसत आहेत का?
06:35 R. वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि enter की दाबा.
06:43 G वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter की दाबा.
06:52 B वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter की दाबा.आता क्यूब चा कलर पूर्णपणे लाल झाला आहे.
07:05 याप्रमाणे, specular च्या खाली पांढऱ्या बार वर लेफ्ट क्लिक करा. color मेन्यू मधून कोणताही कलर निवडा.
07:14 मी हिरवा निवडते.
07:17 क्यूब वरील चमक पांढऱ्या वरुन फिक्कट हिरव्या मध्ये बदलली आहे.
07:22 आता जर मला पांढरा मटेरियल पुन्हा वापरायचा असेल, तर काय? मला ते पुन्हा कसे मिळेल?
07:29 Material ID name bar वर जा. येथे नेम बार च्या डाव्या बाजूला आणखीन एक स्फियर आइकान आहे.
07:37 sphere icon वर लेफ्ट क्लिक करा. हे Material menu आहे.
07:43 sceneमध्ये वापरलेले सर्व मेटीरियल्स येथे सूचीबद्ध आहे. आता येथे फक्त दोन मटेरियल दिसत आहे- Red आणि White.
07:53 White वर लेफ्ट क्लिक करा. पुन्हा एकदा क्यूब लाल वरुन पांढऱ्या मध्ये बदलली आहे.
08:00 दोन्ही Diffuse आणि specular बार खाली Intensity बार्स आहे.
08:05 डिफॉल्ट द्वारे, Diffuse साठी इंटेन्सिटी 0.8 आहे आणि Specularसाठी 0.5 आहे.
08:15 हे फिनिश मटेरियल प्रकाराच्या आवश्यकते नुसार बदलले जाऊ शकते.
08:21 Matt finish म्हणजे Diffuse आणि specular या दोन्हीची कमी इंटेन्सिटी
08:27 उदाहरणार्थ, नैसर्गिक लाकडाच्या मटेरियल मध्ये मॅट फिनिश असते.
08:33 Glossy finish म्हणजे Diffuse आणि specular या दोन्हीची अधिक इंटेन्सिटी.
08:39 उदाहरणार्थ, कारपेंट मटेरियल मध्ये ग्लॉसी फिनिश असते.
08:46 ' ब्लेंडर मध्ये Diffuse साठी Lambert' हे डिफॉल्ट शेडर आहे.
08:52 Lambert वर लेफ्ट क्लिक करा. हे Diffuse shader मेन्यू आहे.
08:57 येथे आपण आपल्याला आवश्यक असलेले शेडर जसे, Fresnel, Minnaert, Toon, Oren-Nayar आणि Lambert निवडू शकतो.
09:08 इंटेन्सिटी प्रमाणे, विविध प्रकारच्या मटेरियल साठी शेडर्स सुद्धा विविध असतात. उदाहरणार्थ, Fresnel शेडर साठी ग्लास मटेरियल वापरला जातो.
09:19 त्याचप्रमाणे , ब्लेंडर मध्ये specularसाठी Cooktorr डिफॉल्ट शेडर आहे.
09:25 Cooktorr वर लेफ्ट क्लिक करा. हे Specular Shader menu आहे.
09:32 Blinn आणि phong हे सर्वाधिक समान शेडर्स आहेत, जे 90% मटेरियल साठी वापरले जाते.
09:40 Hardness ओब्जेक्टची स्पेक्युलॅरिटी किंवा चमक ची तीव्रता निर्धारित करते.
09:48 Hardness 50' वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter की दाबा.
09:57 स्पेक्युलर क्षेत्र स्फियर च्या प्रीव्यू वर, लहान वर्तुळात रुपांतरित झाले आहे.
10:04 पुन्हा Hardness 100' वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 10 टाइप करा आणि enter की दाबा.
10:13 आता स्पेक्युलर क्षेत्र मोठे झाले आहे आणि स्फियर प्रीव्यू वर पसरले आहे.
10:20 ही मटेरियल पॅनेल ची मूलभूत सेट्टिंग्स होती.
10:25 उरलेल्या सेट्टिंग्स नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
10:29 आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता.
10:33 क्यूब मध्ये नवीन मटेरियल जोडा आणि त्याचे रंग आणि नाव निळ्या मध्ये बदला.
10:39 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
10:48 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
11:08 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
11:11 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:14 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
11:19 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:25 आमच्या सह जुडण्यासाठी,
11:27 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana