Arduino/C2/First-Arduino-Program/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 First Arduino Program वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकू:

एक Arduino प्रोग्राम कसा लिहावा, प्रोग्राम Compile आणि upload कसा करावा. आणि LED कसे ब्लिंक(लुकलुकणे) करावे.

00:19 येथे मी वापरत आहे:

Arduino UNO Board,

00:23 उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि Arduino IDE.
00:30 हे ट्युटोरिअल अनुसरण्यास तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचे मूलभूत ज्ञान असावे,
00:36 C किंवा C++ प्रोग्राम लिहिण्याचे मूलभूत ज्ञान असावे,
00:41 आणि Arduino UNO Board सह USB power cable .
00:46 आपला पहिला प्रोग्राम लिहिण्यासाठी Arduino IDE उघडू.
00:52 येथे, आपण मेन्यूबार मधील विविध मेनू पाहू शकतो.
00:57 Arduino वातावरणात, प्रत्येक प्रोग्राम Sketch म्हणून सेव्ह केला जातो.
01:03 डीफॉल्टनुसार, ते Sketch underscore आणि नाव म्हणून नाव तयार करते.
01:11 तुम्ही File वर क्लिक करून आणि नंतर Save वर क्लिक करून नाव बदलू शकता.
01:18 BlinkLed म्हणून फाईलचे नाव टाईप करा.

आता Save बटणवर क्लिक करा.

01:26 हे दोन रिक्त फंक्शनसह डीफॉल्ट प्रोग्राम एन्व्हायरन्मेंट आहे - void setup आणि void loop.
01:35 आता आपण LED ब्लिंक (लुकलुकणे) करण्यास एक Arduino प्रोग्राम लिहू.
01:41 मी माझा IDE आणि Arduino board बाजूला ठेवला आहे.
01:47 हे आपल्याला प्रोग्रामचे execution आणि board मधील output पाहण्यासाठी मदत करेल.
01:54 या LED प्रोग्रामसाठी, मला पिन क्रमांक 13 ला ब्लिंक करायचे आहे.
02:00 या LED अंतर्गत ते digital input/output pin जोडलेले आहे.
02:07 मार्करसह हायलाइट लक्षात घ्या.
02:10 आता आपल्याला आपला कोड लिहायचा आहे.
02:13 void setup फंक्शन म्हणजे microcontroller सेट अप करण्यासाठी आहे.
02:18 आमच्या बाबतीत, पिन क्रमांक 13 प्रथम सेट करावा लागेल.
02:24 हे करण्यासाठी, आम्ही pinMode नावाच्या इन-बिल्ट फंक्शनचा वापर करू.
02:31 यात दोन पॅरामीटर्स आहेत - pin number कॉमा mode.
02:36 तर टाईप करा: pinMode कंस उघडा 13 कॉमा output कंस बंद करा semicolon.
02:48 आपण मोडला output म्हणून का ठेवावे?
02:51 हे असे आहे कारण पिन क्रमांक 13 आंतरिकपणे LED शी जोडलेले आहे.
02:58 व्होल्टेज उच्च असेल तेव्हा ते चमकेल परंतु व्होल्टेज शून्य असेल तेव्हा ते चमकणार नाही.
03:05 आपल्याला "LED" च्या व्होल्टेजची सेवा देण्यासाठी मोडला ‘output’ म्हणून कॉन्फिगर करावे लागेल.
03:12 पुढे आपण void loop फंक्शनसाठी कोड लिहू.
03:17 आपण LED ला लुकलुक करण्याआधी, LED ला चमकवू.
03:22 digitalWrite नावाचा एक फंक्शन आहे जो digital pin वर लिहिेल.
03:29 या फंक्शनमध्ये pin number आणि value किंवा state म्हणून दोन पॅरामीटर्स आहेत.
03:36 आधीच आपल्याला पिन क्रमांक 13 असल्याचे माहित आहे. व्हॅल्यू HIGH किंवा LOW असावी.
03:44 तर टाईप करा: digitalWrite कंस उघडा १३ कॉमा HIGH कंस बंद करा semicolon.
03:55 आम्हाला LED चमकवायचा आहे. तर, व्होल्टेज HIGH असावा.
04:00 हे सर्व आहे. कोड अतिशय सोपा आहे.
04:04 पुढील स्टेप प्रोग्राम कंपाइल करणे आहे.
04:08 प्रोग्राम तपासण्यासाठी मेनू बारवरील 'टिक' चिन्हावर क्लिक करा.
04:14 हे आपल्या प्रोग्रामला binary format मध्ये कंपाइल करेल जे microcontroller द्वारे समजण्यासारखे आहे.
04:22 तुम्ही IDE च्या तळाशी कंपाइलेशन स्थिती पाहू शकता.
04:27 पुढे आपल्याला प्रोग्राम microcontroller वर अपलोड करणे आवश्यक आहे.
04:32 अपलोड करण्यासाठी मेनूबार वरील उजव्या एरो बटणवर क्लिक करा.

अन्यथा तुम्ही Sketch मेनू आणि नंतर upload निवडू शकता.

04:48 तुम्ही पाहू शकता कि TX RX थोड्या वेळासाठी चमकत आहे. हे दर्शविते कि ट्रान्समिशन ON आहे.
04:57 आता तुम्ही पाहू शकत कि LED चमकत आहे.
05:01 LED कसे बंद करावे?

आपल्याला हा प्रोग्राम बदलावा लागेल जेणेकरून दुसऱ्या पॅरामीटरची व्हॅल्यू LOW असेल.

05:11 आता आपण कंपाइल करून हा प्रोग्रॅम अपलोड करू.
05:16 तुम्ही पाहू शकता कि LED बंद आहे.
05:20 आम्हाला ON आणि OFF करून LED कसे चालू करायचे हे माहित आहे.
05:25 पुढे आपण LED लुकलुकण्यासाठी प्रोग्राम बदलूया.
05:31 म्हणजेच एक सेकंद अंतराने ON आणि OFF करूया.
05:36 दाखवल्याप्रमाणे आपण प्रोग्राम बदलूया. Delay हा built-in function आहे जे प्रोग्रामला विशिष्ट वेळेसाठी थांबवते.
05:46 मी टाईप करेल: delay कंस उघडा 500 कंस बंद करा semicolon.

इथे 500 म्हणजे 500 मिलीसेकंद म्हणजे डिलेचा अर्धा सेकंद.

06:01 पुढे, टाईप करा digitalWrite कंस उघडा 13 कॉमा LOW कंस बंद करा semicolon.
06:12 यामुळे digital pin 13 OFF मोड मध्ये बनते.
06:17 आपल्याला किती वेळे पर्यंत OFF करून ठेवायचे आहे.

टाईप करा: delay कंस उघडा 500 कंस बंद करा semicolon.

06:28 पुन्हा, आपल्याला 500 मिलीसेकंदांसाठी OFF करायचे आहे.
06:34 आता मी पुन्हा ओळी दर ओळी Void loop प्रोग्राम समजावून सांगते.
06:40 Void loop हे एक अनंत लूप आहे आणि ते सतत कार्यान्वित होईल.
06:45 LED शी जोडलेले पिन क्रमांक 13 , 500 मिलीसेकंदांसाठी HIGH स्टेट मध्ये असेल.

आणि नंतर, 500 मिलीसेकंदांसाठी LOW स्टेट मध्ये असेल.

06:57 हा प्रोग्राम लूपमध्ये वारंवार कार्यरत आहे.
07:02 प्रोग्राम अपलोड करूया.
07:05 आपण पाहू शकतो कि आपला LED चमकत आहे.
07:10 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
07:16 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: एक Arduino प्रोग्राम कसा लिहावा,
07:21 प्रोग्राम Compile आणि upload कसा करावा आणि LED कसे ब्लिंक(लुकलुकणे) करावे.
07:27 पुढील असाइनमेंट करा. वरील Blink LED प्रोग्राममध्ये विलंब वेळेस 1500 वर बदला.
07:37 प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करा आणि LED चमकत(ब्लिंक) आहे हे पहा.
07:45 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
07:53 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

08:06 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या.
08:13 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.

08:24 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

08:35 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana