PhET/C3/Gene-Machine-The-Lac-Operon/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:38, 9 January 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Gene Machine - The Lac Operon सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.


00:08 या पाठात, Gene Machine - The Lac Operon या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघू.


00:16 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील जीवशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे.


00:23 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04,

जावा वर्जन 1.7.0,

00:34 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.


00:40 सिम्युलेशनच्या सहाय्याने आपण शिकू:
00:44 लॅक्टोज रेग्युलेशन
00:46 लॅक्टोज रेग्युलेशनमधे सहभागी असलेली जनुके
00:50 LacZ जनुकाच्या रेग्युलेशनवर परिणाम करणारे घटक.
00:55 lac operon हा जनुकांचा एक संच असून तो इ.कोलाय बॅक्टेरियांतील लॅक्टोजचे चयापचय नियंत्रित करतो.
01:05 एक ओपेरॉन हा तीन प्राथमिक DNA घटकांनी बनलेला असतो: Promoter, Operator आणि Structural gene.
01:17 Promoter ट्रान्सक्रिप्शनची सुरूवात करतो.
01:20 Operator: हा DNA घटक असून ज्याला रिप्रेसर जोडला जातो.
01:26 Structural gene: हे प्रथिन कोड करणारे जनुक आहे.
01:31 lac ओपेरॉनमधे lacZ, lacY आणि lacA ही तीन स्ट्रक्चरल जनुके आहेत.
01:40 ही जनुके एकल mRNA म्हणून एका प्रमोटरच्या नियंत्रणाखाली ट्रान्सक्राइब झाली आहेत.
01:47 जीन्समधील lac operon अशी प्रथिने दाखवतात जी सेलला लॅक्टोज वापरण्यास मदत करतात
01:55 Lac Operon ची जनुके व्यक्त होऊ शकतात आणि प्रथिने भाषांतरित केली जाऊ शकतात.
02:01 lacZ चे जनुक उत्पादन, β-galactosidase जे लॅक्टोजची फोड करते.
02:08 lacY हे Beta-galactoside permease एनकोड करते. हे पेशींमधे लॅक्टोज घेऊन येण्यास मदत करते.
02:17 lacA हे β-galactoside transacetylase साठी एनकोड करते.
02:23 सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.


02:28 मी डाउनलोड्स फोल्डरमधे Gene Machine-The Lac Operon सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे.
02:36 सिम्युलेशन कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल उघडा.
02:40 प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा.
02:47 नंतर java space hyphen jar space gene hyphen machine hyphen lac hyphen operon underscore en dot jar टाईप करून एंटर दाबा.
03:04 Gene-Machine-The Lac Operon हे सिम्युलेशन उघडेल.
03:09 सिम्युलेशन स्क्रीनच्या वरील भागात दोन टॅब्ज आहेत-

Lactose Regulation आणि

Lactose Transport.

03:19 लॅक्टोज रेग्युलेशनच्या स्क्रीनवर निळ्या रंगाचे दोन तरंगणारे RNA polymerase दिसतील.
03:27 एक अपूर्ण ओपेरॉन दिसेल ज्याची जोडणी करायची आहे.
03:32 येथे तळाशी दिलेला प्रत्येक घटक जनुकातील त्याच्या योग्य जागेशी जोडायचा आहे.
03:39 उजव्या कोपऱ्यात खाली Show Legend च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
03:44 स्क्रीनच्या उजवीकडे Legend हे पॅनेल उघडेल.
03:49 Legend पॅनेल आपल्याला स्क्रीनवरील उपस्थित रेणू ओळखण्यास मदत करते.
03:56 स्क्रीनच्या खालील भागात ऍनिमेशनचा वेग सेट करण्यासाठी स्लाइडर आहे.

Play/Pause,

step आणि

Reset All ही बटणे आहेत.

04:10 आता जनुक जुळवण्यास सुरूवात करू.
04:14 lacI promoter वर क्लिक करा.
04:17 जनुकावरील विशिष्ट भाग पिवळ्या रंगाने हायलाईट केलेला दिसेल.
04:23 lacI promoter ड्रॅग करून ते ओपेरॉनवर ठेवा.
04:28 तसेच lacI gene ड्रॅग करून ते ओपेरॉनवर ठेवा.
04:33 तरंगणारा RNA Polymerase रेणू चटकन lacI प्रमोटरला जोडला जातो.
04:39 mRNA तयार करण्यासाठी हे lacI जनुक सक्रिय करेल.
04:44 mRNA आता LacI प्रथिनामधे भाषांतरित झाला आहे जो स्क्रीनमधे तरंगत आहे.
04:51 LacI हे lac repressor प्रथिन आहे.
04:55 हे ओपेरॉनच्या Lac ऑपरेटर भागाशी जोडले जाते.
05:00 LacI प्रथिने तयार होताच, स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात वरती Lactose injector आलेला दिसेल.
05:10 डाव्या कोपऱ्यात खाली असलेल्या Show Lactose Meter च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
05:16 हा मीटर आतील लॅक्टोजच्या लेव्हलची कल्पना देईल.
05:21 पुढे LacZ जनुक एकत्र करूया.
05:24 ओपेरॉनवरील हायलाईट केलेल्या पिवळ्या रंगाच्या भागाद्वारे दाखवलेल्या जागी

Lac promoter आणि

Lac Operator ड्रॅग करून ठेवा.

05:34 तरंगत असलेले LacI प्रथिन आता ओपेरॉनच्या ऑपरेटर भागाशी जोडले जाईल.
05:41 आता ओपेरॉनवर LacZ हे जनुक ठेवा.
05:45 लॅक्टोजच्या अनुपस्थितीत LacI ऑपरेटर भागाशी जोडला जातो आणि RNA polymerase ला ओपेरॉन ट्रान्सक्राईब करण्यापासून रोखतो.
05:55 म्हणून कोणतेही LacZ एंझाइम तयार केले जात नाही.
05:59 स्क्रीनवर Lactose injector च्या सहाय्याने लॅक्टोजचे काही रेणू सोडा.
06:06 येथे Manual आणि Auto हे पंपिंगचे दोन पर्याय आहेत.
06:12 Manual हा पर्याय निवडा.
06:15 injector वरील लाल बटण दाबा.
06:19 लॅक्टोज मीटरमधे लॅक्टोज लेव्हलचे निरीक्षण करा.
06:23 ऑपरेटरला जोडलेले LacI लॅक्टोज सेन्सरसारखे कार्य करते.
06:28 लॅक्टोजचे रेणू LacI ला जोडले जातात आणि ऑपरेटरचा भाग सोडून देतात.
06:34 आता RNA Polymerase जनुकाला ट्रान्सक्राईब करू शकतो.
06:39 हा mRNA आता LacZ प्रथिनात भाषांतरित झाला आहे.
06:45 LacZ हे Beta-galactosidase एंझाइम आहे.
06:49 हे लॅक्टोजला ग्लुकोज आणि ग्लॅक्टोजमधे विभाजित करते.
06:54 लॅक्टोजचे रेणू LacZ प्रथिनाशी जोडले जातील.
06:58 LacZ प्रथिन स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लॅक्टोजचे रेणू विभाजित करेल.
07:04 Interior Lactose लेव्हल मीटरचे निरीक्षण करा. लॅक्टोज लेव्हल कमी झाली आहे.
07:10 Lactose Transport स्क्रीनवर क्लिक करा.
07:14 Lactose regulation स्क्रीनमधील सर्व फीचर्स व्यतिरिक्त Lactose Transport स्क्रीनमधे Cell Membrane आणि LacY gene ही फीचर्स आहेत.
07:24 मागे दाखवल्याप्रमाणे ओपेरॉनची जोडणी करू.
07:29 ओपेरॉनचे सर्व संबंधित घटक त्याच्या संबंधित जागी ड्रॅग करून ठेवा.
07:45 Show Legend आणि Show Lactose Meter या चेकबॉक्सवर क्लिक करा.
07:51 लॅक्टोज इंजेक्टर वापरून लॅक्टोजचे काही रेणू आत सोडा.
07:56 लॅक्टोज इंजेक्टरवरील Auto रेडिओ बटणावर क्लिक करा.
08:01 LacI, LacZ आणि LacY प्रथिने तयार होतील.
08:07 LacY हे Beta-galactoside permease एंझाइम आहे.
08:12 हे पेशीत लॅक्टोज येण्यास मदत करते.
08:17 पेशी पटलामधे LacY प्रथिन समाविष्ट झाल्याचे निरीक्षण करा.
08:23 LacY प्रथिने लॅक्टोज रेणू पेशीत झिरपण्यास मदत करते.
08:30 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे LacZ एंझाइम, पेशीमधे लॅक्टोज रेणूंचे चयापचय करतात.
08:40 LacZ जनुकांच्या रेग्युलेशनवर परिणाम करणारे घटक.
08:45 lac repressor हे लॅक्टोज सेन्सरप्रमाणे कार्य करतात.
08:49 पेशीमधे लॅक्टोज उपस्थित नसताना हे Lac operon चे ट्रान्सक्रिप्शन थांबवतात.
08:56 लॅक्टोजच्या उपस्थितीत lac रिप्रेसर DNA ला जोडून घेण्याची क्षमता गमावतात.
09:03 हे ऑपरेटरला तरंगत ठेवतात व ओपेरॉन ट्रान्सक्राईब करण्यासाठी RNA polymerase ला मार्ग मोकळा करून देतात.
09:11 थोडक्यात,

या पाठात, Gene Machine-The Lac Operon या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघितले.

09:23 तसेच आपण शिकलो,

लॅक्टोज रेग्युलेशन,

09:29 लॅक्टोज रेग्युलेशनमधे सहभागी असलेली जनुके आणि
09:33 LacZ जनुकाच्या रेग्युलेशनवर परिणाम करणारे घटक.
09:38 असाईनमेंट म्हणून : Operon मधील काही घटक जसे की, ऑपरेटर, प्रमोटर, जनुके काढून टाका.
09:48 सिम्युलेशन कार्यान्वित करा. निकालाचे निरीक्षण करून स्पष्टीकरण द्या.
09:55 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


10:04 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


10:15 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


10:19 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
10:24 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


10:33 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


10:47 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali