Difference between revisions of "PhET/C2/Introduction-to-PhET-Simulations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
(No difference)

Latest revision as of 17:23, 10 September 2019

Timed Narration
00:01 इंट्रोडक्शन टु PhET सिम्युलेशन्स या पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत:

1. PhET वेबपेज उघडणे, 2. PhET सिम्युलेशनबद्दल माहिती,

00:15 3. पेजवर रजिस्टर/साइन इन करणे,

4. ॲक्टिविटीज ब्राउज करणे, 5. तुमचे ॲक्टिविटीजचे पेज शेअर करणे, 6. PhET वापरण्याच्या टीप्स,

00:27 7. ऑफलाईन ॲक्सेसबद्दल माहिती,

8. विषय आणि स्तरानुसार सिम्युलेशन्सची निवड करणे, 9. PhET मधे वापरलेल्या विविध फाईल फॉरमॅट्सची सिम्युलेशन्स डाउनलोड करणे,

00:40 10. डाउनलोड केलेली सिम्युलेशन्स उघडणे.
00:43 या पाठासाठी तुम्ही इंटरनेटशी जोडलेले असणे गरजेचे आहे.
00:47 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2, जावा वर्जन 1.7, फ्लॅश प्लेयर वर्जन 26.0.0.131 वापरत आहे.

01:08 code files च्या लिंकमधे, फ्लॅश प्लेयर आणि जावाच्या फाईल्स डाउनलोड करून इन्स्टॉल करण्यासाठी दिलेल्या आहेत.

फाईल्स डाउनलोड करून इन्स्टॉल करण्यासाठी लिंकचा वापर करा.

01:20 PhET सिम्युलेशन्सचे पेज उघडू.
01:24 तुमचा मुख्य वेबब्राउजर उघडून

http://phet.colorado.edu ही लिंक टाईप करून एंटर दाबा.

01:38 PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्सचे हे पेज उघडेल.
01:42 आता पेजवर रजिस्टर कसे करायचे ते पाहू.

पेजच्या उजवीकडील वरच्या कोपऱ्यात REGISTER बटणावर क्लिक करा.

01:51 रजिस्टरचे पेज उघडेल.
01:54 योग्य फिल्डस/टेक्स बॉक्सेसमधे संबंधित डेटा टाईप करा.

उदाहरणार्थ वैध इमेल आयडी, फर्स्ट नेम, ऑर्गनायझेशन आणि इतर माहिती.

02:11 पेजच्या खालील भागात असलेल्या REGISTER बटणावर क्लिक करा.

मी या पेजवर आधीच रजिस्टर केले आहे.

02:19 रजिस्ट्रेशनची खात्री करून घेण्यासाठी तुमचे जीमेल अकाउंट उघडा.
02:25 रजिस्ट्रेशन कार्यान्वित करण्यासाठी PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्स द्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा.
02:32 रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्ही साईन इन करू शकता.
02:36 पेजच्या वरील भागात असलेल्या रजिस्टर बटणाच्या शेजारील SIGN IN बटणावर क्लिक करा.
02:43 तुम्ही दिलेल्या इमेल आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने साईन इन करा.
02:48 मी माझ्या school.science13@gmail.com या रजिस्टर्ड इमेल आयडीच्या सहाय्याने साईन इन करणार आहे.
02:56 पासवर्ड टाईप करून Sign In बटणावर क्लिक करा.
03:01 आता What is PhET? या लिंकवर क्लिक करा.
03:05 About PhET असे शीर्षक असलेले नवे पेज उघडेल. या पेजवर PhET बद्दलची माहिती आहे.
03:13 त्या माहिती खालोखाल PhET simulations चा परिचय करून देणारा एक छोटा व्हिडिओ आहे.
03:20 मी प्ले बटणावर क्लिक करून थोड्या वेळासाठी हा व्हिडिओ सुरू करीत आहे.
03:27 उजवीकडे असलेल्या पॅनेलमधे, PhET संबंधित व्हिडिओजची सूची दिसेल.

व्हिडिओजवर क्लिक करून ते बघा.

03:36 होम पेजवर परत जा.

Browse Activities या लिंकवर क्लिक करा. ब्राउज ॲक्टिविटीजचे पेज उघडेल.

03:45 येथे सिम्युलेशन्स, टाइप्स,लेव्हल्स आणि लँग्वेजेस या सूची आहेत.
03:56 सूची स्क्रॉल करा आणि गरजेनुसार पर्याय निवडा.
04:01 सिम्युलेशन्सच्या सूचीमधून मी Bending light निवडत आहे.
04:05 टाईप्सच्या सूचीतून Lab आणि लेव्हल्सच्या सूचीतून मी HS म्हणजेच हायस्कूल हा पर्याय निवडत आहे.
04:14 लँग्वेजेसमधे English निवडत आहे.
04:18 browse बटणावर क्लिक करा.

सिम्युलेशनशी संबंधित ॲक्टिविटीज दाखवल्या जातील.

04:25 TITLE वर क्लिक करून ॲक्टिविटी निवडा.

तेथे ॲक्टिविटी डाउनलोड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

04:33 बॅक ॲरोवर क्लिक करून होमपेजवर जा.

Share your Activities लिंकवर क्लिक करा.

04:42 तुम्ही साईन इन केलेले असल्यास हे पेज थेट उघडेल.

ऑथर्स नेम, ऑथर्स ऑर्गनायझेशन आणि काँटॅक्ट इमेलसहित हे पेज उघडेल.

04:54 सिम्युलेशन्स बॉक्समधे तुम्ही ॲक्टिविटी अपलोड करणार आहात ते सिम्युलेशन निवडा.
05:00 Upload file(s) मधे, अनुमती असलेल्या अपलोड फाईल फॉरमॅट एक्स्टेन्शनची सूची येथे दिलेली आहे.
05:06 CHOOSE FILE बटणावर क्लिक करा. File Upload हा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:13 अपलोड करण्यासाठी परवानगी असलेल्या एक्स्टेन्शनची फाईल निवडा.

मी आधीच संबंधित माहिती भरलेली आहे.

05:21 परवाना करार वाचल्यानंतर Licensing Agreement च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.

SUBMIT ACTIVITY बटणावर क्लिक करा.

05:31 Update Success असा मेसेज दिसेल.

होम पेजवर परत जाऊन Tips for Using PhET लिंकवर क्लिक करा.

05:42 PhET simulations कसे वापरायचे हे सांगणाऱ्या व्हिडिओजचे नवे पेज उघडेल.

हे व्हिडिओ तुम्हाला बघता येतात.

05:53 PhETs च्या होम पेजवर परत जा.
05:57 प्ले बटणावर किंवा Play with Simulations लिंकवर क्लिक करा.
06:03 simulations हे पेज उघडेल.
06:06 पेजच्या डावीकडे Simulations हे शीर्षक दिसेल.
06:12 शिर्षकाखाली लिंक्सची सूची आहे.

New Sims,

HTML5,

Subject-wise Sims,

By Grade Level,

Teacher Resources आणि इतर लिंक्स.

06:26 येथे गरजेनुसार योग्य लिंक्स निवडू शकतो.
06:30 By Grade Level लिंकवर क्लिक करा.
06:34 चार लिंक्स असलेले नवे पेज उघडेल:

Elementary School,

Middle School,

High School आणि University.

06:44 पुन्हा तुमच्या गरजेनुसार लिंक निवडा.

मी High School लिंकवर क्लिक करत आहे.

06:51 High School या विभागांतर्गत येणारी सर्व सिम्युलेशन्स नव्या पेजवर दिसतील.
06:59 उपलब्ध असलेले सर्व Sims बघण्यासाठी All Sims लिंकवर क्लिक करा.

सर्व Sims ची सूची असलेले नवे पेज उघडेल.

07:08 पेजखाली स्क्रॉल करा. लक्षात घ्या, आपल्याकडे HTML, Java आणि Flash या 3 वेगवेगळ्या फॉरमॅट्समधे सिम्युलेशन्स आहेत.
07:19 हे सिम्युलेशनच्या उजवीकडील कोपऱ्यात खाली आयकॉनच्या सहाय्याने दाखवले आहे.
07:25 HTML फॉरमॅटमधील सिम्युलेशन्स विंडोच्या उजवीकडील कोपऱ्यात खाली HTML5 च्या आयकॉनने दाखवले आहे.
07:34 आपण HTML आणि flash फॉरमॅटमधील सिम्युलेशन्स थेट त्यावर क्लिक करून उघडू शकतो.

प्ले बटणावर क्लिक करा. सिम्युलेशन विंडो उघडेल.

07:48 इंटरनेटशी जोडलेले असेपर्यंत आपण सिम्युलेशनचे काम करू शकतो.

मागील पेजवर परत जा.

07:56 ऑफलाईन वापरासाठी सिम्युलेशन डाऊनलोड करण्यासाठी Atomic Interactions हे PhET सिम्युलेशन निवडा.
08:03 फाईल डाऊनलोड करण्यासाठी Download बटणावर क्लिक करा.
08:07 Opening atomic-interactions_en.html हा डायलॉग बॉक्स उघडेल.
08:14 Save File या रेडिओ बटणावर क्लिक करा. Ok बटणावर क्लिक करा.
08:20 माझ्या सिस्टीमवर ही फाईल Downloads फोल्डरमधे डाऊनलोड होईल.
08:25 ही atomic-interactions simulation ची डाऊनलोड केलेली HTML फाईल आहे.
08:31 सिम्युलेशन उघडण्यासाठी फाईलवर राईट क्लिक करा.

Open With Firefox Web Browser हा पर्याय निवडा. ब्राउजरमधे फाईल उघडेल.

08:43 हा atomic-interactions या सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.

वेगवेगळ्या एलिमेंटसच्या रेडिओ बटणावर क्लिक करा आणि सिम्युलेशन जाणून घ्या.

08:53 सिम्युलेशन्स पेजवर जा.
08:56 Java फाईल म्हणून उघडता येणारे सिम्युलेशन डाऊनलोड करू.

त्यासाठी Battery-Resistor Circuit हे सिम्युलेशन मी वापरणार आहे.

09:07 फाईल डाऊनलोड करण्यासाठी Download बटणावर क्लिक करा.
09:11 Opening battery-resistor-circuit_en.jar हा डायलॉग बॉक्स उघडेल.
09:18 Save File हे रेडिओ बटण निवडून Ok बटणावर क्लिक करा. Downloads फोल्डरमधे फाईल डाऊनलोड होईल.
09:27 jar file वापरण्यासाठी उबंटुमधील टर्मिनलची आवश्यकता आहे.
09:32 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl , Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
09:38 प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा.
09:44 नंतर java space hyphen jar space battery-resistor-circuit_en.jar टाईप करून एंटर दाबा.
09:58 Battery-Resistor Circuit हे सिम्युलेशन उघडेल.

टर्मिनल बंद करू नका अन्यथा ही चालू प्रोसेस बंद होईल. हे सुरू ठेवण्यासाठी Cancel बटणावर क्लिक करा.

10:09 PhETs च्या मागील पेजवर परत जाऊ.
10:13 आता Flash reader च्या सहाय्याने उघडता येणारे सिम्युलेशन डाऊनलोड करा.
10:19 त्यासाठी मी उदाहरणादाखल Calculus Grapher हे सिम्युलेशन वापरणार आहे.
10:25 ऑफलाईन वापरण्यासाठी सिम्युलेशन डाऊनलोड करा.

डाऊनलोड केल्यानंतर सिम्युलेशन उघडण्यासाठी टर्मिनलचा उपयोग करा.

10:33 सिम्युलेशनवर क्लिक करा. प्लेयरच्या सहाय्याने Calculus Grapher हे सिम्युलेशन उघडेल. सिम्युलेशन जाणून घ्या.
10:41 PhETs च्या होमपेजवर परत जा.
10:45 पेजच्या खालच्या भागात OFFLINE ACCESS लिंकवर क्लिक करा.
10:49 येथे तीन पर्याय दिसतील:

1.Desktop/Laptop Computer

2.Chrome book

3. iPad.

10:58 Desktop/Laptop Computer या पर्यायावर क्लिक करा.
11:02 येथे पुन्हा दोन इन्स्टॉलरचे पर्याय आहेत Download installer with simulations only (no activities) आणि Download installer with simulations and activities.
11:16 मी Download installer with simulations and activities हा दुसरा पर्याय निवडत आहे.
11:23 तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार तुम्ही निवडू शकता-

Windows(includes Java),

Mac OS X,

Linux,

11:34 मी लिनक्स वापरत असल्यामुळे लिनक्स इन्स्टॉलर वापरणार आहे.
11:39 Opening PhET-Installer-with-activities_Linux.bin हा डायलॉग बॉक्स उघडेल.

सेव्ह फाईल बटणावर क्लिक करा.

11:49 Downloads फोल्डरमधे फाईल सेव्ह होईल.
11:53 फाईल डाऊनलोड होण्यासाठी हे थोडा वेळ घेईल.

मी आधीच Linux installer फाईल Downloads फोल्डरमधे डाऊनलोड करून घेतली आहे.

12:03 असाईनमेंट म्हणून:

PhET इंटरॅक्टिव्ह सिम्युलेशनचे वेबपेज जाणून घ्या. वेगवेगळ्या फाईल फॉरमॅटसमधील सिम्युलेशन्स डाऊनलोड करून उघडून बघा.

12:13 थोडक्यात, या पाठात आपण शिकलो:

1. 1. PhET वेबपेज उघडणे, 2. PhET सिम्युलेशनबद्दल माहिती, 3. पेजवर रजिस्टर/साइन इन करणे,12:26 4. ॲक्टिविटीज ब्राउज करणे,

5. तुमचे ॲक्टिविटीजचे पेज शेअर करणे, 6. PhET वापरण्याच्या टीप्स, 7. ऑफलाईन ॲक्सेसबद्दल माहिती,

12:37 8. विषय आणि स्तरानुसार सिम्युलेशन्सची निवड करणे,
12:42 9. PhET मधे वापरलेल्या विविध फाईल फॉरमॅट्सची सिम्युलेशन्स डाउनलोड करणे,

10. डाउनलोड केलेली सिम्युलेशन्स उघडणे.

12:51 पुढील लिंकवरील व्हिडिओवर स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश उपलब्ध आहे. तो डाऊनलोड करून बघा.
12:58 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी संपर्क करा.

13:10 या स्पोकन ट्युटोरियल संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
13:13 कृपया साईटला भेट द्या.

ज्या भागाशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्याचे मिनिट आणि सेकंद निवडा. आपला प्रश्न थोडक्यात विचारा.

13:21 आमच्या टीममधील कोणीतरी उत्तर देईल.
13:24 स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या ट्युटोरियलवर आधारित प्रश्नांसाठी आहे.

कृपया त्यावर संबंधित नसलेले व इतर सामान्य प्रश्न विचारू नये. यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल.

13:36 असंबध्दता टाळल्यास आपल्याला ही चर्चा शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल.
13:41 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचींग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
13:49 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


14:00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali