Netbeans/C2/Introduction-to-Netbeans/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:43, 15 May 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.01 नमस्कार.
00.02 इंट्रोडक्शन टु नेटबीन्स IDE च्या पाठात आपले स्वागत.
00.06 ह्या पाठात नेटबीन्स संबंधी प्राथमिक ओळख करून घेणार आहोत.
00.13 नेटबीन्स हे विनामूल्य व खुले स्त्रोत असून इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट एनव्हायर्नमेंट www.netbeans.org वर उपलब्ध आहे.
00.23 हे अनेक घटक एकत्र जोडण्याची परवानगी देते.
00.27 विविध स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि प्रगत टेक्स्ट एडिटर्सची सुविधा देते.
00.31 GUI प्रदान करून प्रोजेक्टची निर्मिती व डिझाईन करण्याची तसेच डेटाबेसेसचीही सुविधा देते.
00.39 हा पाठ पूर्ण करण्यासाठी जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे.
00.47 या पाठात स्टँडर्ड प्रोग्रॅमिंग टर्मिनॉलॉजिज वापरल्या आहेत.
00.52 नेटबीन्स सुरू करण्यासाठी,
00.55 उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, वर्जन 11.04 आणि
01.00 नेटबीन्स IDE वर्जन 7.1.1 वापरणार आहोत.
01.05 या पाठात नेटबीन्सचे इन्स्टॉलेशन पाहणार आहोत.
01.11 आता नेटबीन्सच्या इंटरफेसची माहिती करून घेऊ.
01.16 सँपल जावा प्रोजेक्ट बनवू.
01.19 प्रथम IDE इन्स्टॉलेशन पाहू.
01.22 www.netbeans.org वरून नेटबीन्स डाऊनलोड करता येते.
01.27 ही मुख्य अधिकृत साईट आहे.
01.31 साईटच्या मुख्य पानावरील डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
01.36 उघडलेल्या पुढील पानावरील,
01.39 शेवटच्या कॉलममधील डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक करा. ज्यामधे IDE ला आवश्यक असलेल्या सपोर्टेड टेक्नॉलॉजीज आणि ग्लासफिश सर्व्हरचा समावेश आहे.
01.53 तसेच नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशनसाठी Java Development Kit, JDK इन्स्टॉल करणे गरजेचे आहे जे java.sun.com वरून डाऊनलोड करता येते.
02.05 येथे Get Java लिंकवर क्लिक करून Netbeans आणि JDK Bundle हे दोन्ही डाऊनलोड करण्यासाठी लिंक सिलेक्ट करा.
02.15 उघडलेल्या पुढील पानावरील,
02.19 ऑपरेटिंग सिस्टीमला अनुरूप असलेली सेटअप फाईल सिलेक्ट करा.
02.24 उबंटुवर सेटअप फाईल डॉट sh (.sh) फाईल म्हणून डाऊनलोड होईल.
02.29 म्हणजेच शेल स्क्रिप्ट फाईल.
02.33 टर्मिनलवर जाऊन ही फाईल कार्यान्वित करा .
02.38 प्रॉम्प्टवर नेव्हिगेट करून डाऊनलोडेड सेटअप फाईल ज्या डिरेक्टरीमधे संचित केली आहे तिथे जा.
02.46 sh पुढे डाऊनलोड केलेल्या फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
02.54 काही क्षणातच इन्स्टॉल सुरू होईल.
03.04 स्क्रीनवर इन्स्टॉलर उघडेल.
03.06 सिस्टीमवर IDE इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या सूचना पाळा.
03.13 इन्स्टॉलरमधून बाहेर पडू.
03.17 नेटबीन्स विंडो उघडू.
03.21 उबंटु ऑपरेटिंग सिस्टीमवर नेटबीन्स उघडण्यासाठी,
03.25 मेनूतील applications , (ऍप्लीकेशन्स) खालील, Programmings (प्रोग्रॅमिंग) मधील नेटबीन्स IDE आयकॉनवर क्लिक करा.
03.34 प्रथम IDE लाँच केल्यावर नेटबीन्सचे स्टार्ट पेज उघडेल.
03.41 IDE विंडोमधे दिसतील,
03.43 मेनूबारवरील मेनू,
03.46 टूलबार्स आणि
03.48 वर्कस्पेसेस ज्यात फाईल सिस्टीम विंडो,
03.52 रनटाईम विंडो आणि
03.53 आऊटपुट विंडो यांचा समावेश होतो.
03.57 नेटबीन्समधे वापरल्या जाणा-या बहुतांश कमांडस मुख्य मेनू प्रदान करते जसे की,
04.03 प्रोजेक्टस बनवणे, एडिट , कंपाईल व कार्यान्वित करणे आणि डीबग करणे .
04.10 मेनूबार खालील टूलबार वारंवार वापरल्या जाणा-या अनेक कमांडससाठी बटणे प्रदान करतो.
04.18 वर्कस्पेस म्हणजे विशिष्ट प्रकारची ऑपरेशन्स करण्यासाठी वापरल्या जाणा-या विंडोजचा संच.
04.23 जसे की वर्कस्पेस विंडो, ज्यात एडिटिंग करतात, प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर मिळणारा आऊटपुट, डिबगींगची विंडो इत्यादी.
04.35 सँपल जावा प्रोजेक्ट बनवू.
04.40 त्यासाठी File (फाईल) मेनूतील New Project (न्यू प्रोजेक्ट) वर क्लिक करा.
04.47 New Project (न्यू प्रोजेक्ट) विझार्ड बॉक्समधील कॅटॅगरीज खालील
04.51 java (जावा) निवडा. प्रोजेक्टसखालील Java Applications (जावा ऍप्लीकेशन्स) निवडून Next (नेक्स्ट) वर क्लिक करा.
04.58 name and location (नेम अँड लोकेशन) विझार्ड पेजमधे
05.02 प्रोजेक्टला KeyboardReader असे नाव द्या.
05.08 Set as Main Project चा चेकबॉक्स सिलेक्ट करून
05.12 Finish (फिनिश) क्लिक करा.
05.15 प्रोजेक्ट तयार होऊन ते IDE मधे उघडेल.
05.20 एकदा प्रोजेक्ट तयार झाले की IDE विंडोच्या डावीकडे प्रोजेक्ट विंडो आपल्याला दिसेल.
05.27 यात प्रोजेक्टच्या घटकांचा ट्री व्ह्यू दिसतो. सोर्स फाईल्स व आवश्यक त्या लायब्ररीज ह्यात असतात.
05.36 उजवीकडे सोर्स एडिटरमधे KeyboardReader.java ही फाईल उघडली आहे.
05.43 Main क्लासमधे जावा कोड टाईप करू.
05.49 हा कोड कीबोर्डवरून इनपुट घेईल आणि इनपुट पूर्णांक की अपूर्णांक संख्या हे सांगणारे आऊटपुट देईल.
05.58 हा क्लिपबोर्डवरील कोड कॉपी करून IDE वर्कस्पेसवरील कोड वर पेस्ट करू .
06.11 आता प्रोजेक्ट कार्यान्वित करायचे आहे.
06.14 नेटबीन्स IDE वर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याच्या तीन पध्दती आहेत.
06.20 पहिल्या पध्दतीत प्रोजेक्ट विंडोतील प्रोजेक्ट नोडवर क्लिक करा आणि contextual मेनूतील Run (रन) वर क्लिक करा.
06.29 किंवा टूलबार वरील Run Project (रन प्रोजेक्ट) बटणावर क्लिक करा.
06.34 प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 चा उपयोगही करू शकता.
06.40 प्रोजेक्ट नोड राईट क्लिक करून Run (रन) वर क्लिक करा.
06.45 जावा ऍप्लीकेशन कार्यान्वित होताना IDE तयार होऊन ऍप्लीकेशन कोड कंपाईल होतो आणि वर्कस्पेसच्या खाली आऊटपुट विंडो उघडली जाऊन त्यामधे प्रोग्रॅम कार्यान्वित होतो.
06.57 आता IDE "Enter any number" असे प्रॉम्प्ट करत आहे.
07.01 कोणतीही एखादी संख्या टाईप करून एंटर दाबा.
07.06 हे इनपुट पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या आहे हे दाखवत आहे.
07.11 आता असाईनमेंट करा.
07.15 KeyboardInputReader प्रोग्रॅमचा पुढील भाग म्हणून,
07.19 तापमान रूपांतर करणारा प्रोजेक्ट लिहू. जे इनपुट म्हणून तापमान घेईल.
07.27 फॅरनहीटचे सेल्सियस मधे तसेच उलट देखील रूपांतर करा.
07.31 आणि रूपांतरित टेंपरेचर आऊटपुट विंडोमधे दर्शवा.
07.36 आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे.
07.40 ती असाईनमेंट कार्यान्वित करा.
07.47 प्रोग्रॅम आऊटपुट विंडोमधे एंटर द इनपुट टेंपरेचर असे प्रॉम्प्ट करेल.
07.52 सँपल टेंपरेचर म्हणून फॅरनहीट मधे -40 टाईप करा. आणि हे सेल्सियस मधे रूपांतर केलेले टेंपरेचर दाखवेल.
08.07 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08.10 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.14 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
08.20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08.27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08.31 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08.38 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08.43 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08.49 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09.00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
09.05 सहभागासाठी धन्यवाद . नेटबीन्स शिकण्यासाठी शुभेच्छा.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana